पाबे घाट

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in मिपा कलादालन
18 Sep 2014 - 2:47 pm

जीवन आणि मृत्यू

Rosemary Leaved Balsam - लाल तेरडा
या फुलाच्या नावाबद्दल मी थोडा साशंक आहे.
कृपया जाणकारांनी मदत करावी.

Smithia Hirsuta - कवला

Graham's groundsel - सोनकी

प्रतिक्रिया

नांदेडीअन's picture

18 Sep 2014 - 2:49 pm | नांदेडीअन

फोटो High Resolution मध्ये पाहायच्या असतील तर त्यांना कृपया Right Click करून New Window किंवा New Tab मध्ये उघडा.

कल्ला आलेत भावा फोटो ..३ रा तर झक्कास च !!

जरा लोकेशन पण सांग ...

नांदेडीअन's picture

18 Sep 2014 - 10:33 pm | नांदेडीअन

धन्यवाद. :)

अहो सांगितले ना !
पाबे घाटातल्या फोटो आहेत सगळ्या.

तो तिसर्‍या क्रमांकाचा फोटो घाटाच्या मध्यावरून काढलाय.
तिथे एक छोटेसे मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला फलक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2014 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर छायाचित्रं. जुन्या आठवणी जागवल्या.
पाबे घाटाबद्दल माझी एक आठवण आहे. नविनच गाडी घेतली होती. मी सपत्नीक रायगडला निघालो होतो. मस्त पाऊस पडत होता. रस्त्यात एक बाई झाडाच्या आडोशाला उभी होती. पत्नीच्या परवानगीनेच तिला विचारलं 'कुठे जायचंय? कुठे सोडू का?' तिला घाट उतरून खाली कुठल्याशा गावात जायचं होतं. 'बसा गाडीत' म्हणालो. बसल्यावर धन्यवाद वगैरे देऊन झाले. आणि मी घाटाची वळणे गिरवायला सुरुवात केली. इथे तिची टकळी सुरू झाली. 'लय डेंजर घाट आहे. गेल्याच आठवड्यात एक बाबा, चांगला पट्टीचा चालवणारा बरं का! असाच पाऊस होता. गेला नं खाली गडगडत. नवरा, बायकू आनी पोरगं तिघंही मेले त्या अपघातात.' मला हसू आलं. मनात आलं आपणही तिघेच आहोत. बायको घाबरली. नेहमीचीच सवय. 'हळू चालवा हो' दम मारत होती. मला जास्तच हसू आलं. 'हसू नका भाऊ! खोटं न्हाई सांगत. दरवर्षी हिते अपघात होत्यात, मानसं मरत्यात. लई वंगाळ हाए हा घाट.' तो पर्यंत आम्ही घाट उतरून खाली आलो होतो. 'कुठ सोडायचं तुम्हाला.' 'आँ! संपला का घाट. हितंच फुडं सोडा देवळा जवळ.' तिला त्या देवळाजवळ सोडल्यावर ती आधी देवळात गेली. देवाला नमस्कार वगैरे केला असणार सुखरूप पोहोचविल्याबद्दल.

नांदेडीअन's picture

18 Sep 2014 - 10:37 pm | नांदेडीअन

हा घाट थोडा अवघडच वाटला मला.
टु व्हिलरला धाप लागली होती माझ्या.

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2014 - 4:25 pm | टवाळ कार्टा

R-15 V.2 आहे ना...मस्त रंपाट चालते की

नांदेडीअन's picture

19 Sep 2014 - 11:09 pm | नांदेडीअन

ती सोबत आलेल्या मित्राची आहे.
तिकडून आल्यापासून बंद पडलीये त्याची गाडी.:P

माझी बापडी पॅशन प्लस होती.

सह्यमित्र's picture

19 Sep 2014 - 3:56 pm | सह्यमित्र

रायगड ला जायला पाबे घाटात कसे गेलात? तुम्हाला राजगड म्हण्याचे आहे का? पाबे घाट पुण्याहून खानापूर मार्गे वेल्हे, राजगड, तोरणा इकडे जाताना लागतो

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2014 - 5:38 pm | प्रभाकर पेठकर

होय तसाच गेलो होतो, नकाशावर रस्ता शोधत शोधत.
मस्त धुवाँधार पाऊस. सोबत बायको. कोथरूडहून रायगडला पोहोचायला ७ तास लागले होते. बट, फिकीर नॉट. रस्ता एन्जॉय करत करत गेलो होतो. वेल्ह्याहून भोरकडे वळून तिथून रायगड गाठला होता. येताना, मुळशी मार्गे रात्री उशीराने कोथरुडास परतलो. होतो. संपूर्ण वृत्तांत रायगड -१, रायगड - २ आणि रायगड - ३ इथे वाचायला मिळेल.

पाबे घाटात देव भेटला त्या बाईला. नांदेडीअन, या सर्व फोटोत हाय रेज मुळे फारच न्याय दिलात रानफुलांना. तिसरा फोटोतली कवला फुले कास पठारावर बरीच असतात. सोनकीचा पिवळा गालीचा आता सह्याद्रीच्या माळांवर पसरेल. जांभळा तेरडा वाटांवर आहेच. झकास.

नांदेडीअन's picture

18 Sep 2014 - 10:38 pm | नांदेडीअन

धन्यवाद. :)
हां, जायचा विचार करतोय कासला.
आजवर फक्त ऎकून आणि वाचूनच आहे त्याबद्दल. :(

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2014 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त्त्त्त्त्त्त्त्त!

सुहास पाटील's picture

18 Sep 2014 - 4:49 pm | सुहास पाटील

शेवटचा एक नंबर

सुहास पाटील's picture

18 Sep 2014 - 4:51 pm | सुहास पाटील

थोडा मॉडीफाय केल्या सारखा वाटतो

दिपक.कुवेत's picture

18 Sep 2014 - 5:28 pm | दिपक.कुवेत

एवढा सुंदर निसर्ग आणि एवढे थोडेच फोटो?? ये सरासर नाईन्साफि है....

नांदेडीअन's picture

18 Sep 2014 - 10:40 pm | नांदेडीअन

सागळ्यांचे आभार.

@ दिपकजी
खूप फोटो काढल्यात हो, पण या त्यातल्या त्यात शेअर करण्यासारख्या वाटल्या.

किसन शिंदे's picture

18 Sep 2014 - 10:43 pm | किसन शिंदे

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरात अशीच अनप्लॅन्ड भटकंती केली होती पाबे घाटातून, जोडीला वल्ल्या, धन्या आणि सूड. :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 10:55 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर आहेत सर्व फोटोज.
इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

भिंगरी's picture

18 Sep 2014 - 11:03 pm | भिंगरी

फोटो मध्ये दिसतोय तो तेरडाच आहे.
आम्ही लहान असताना याच्या देठाने पाटी पुसायचो.

खटपट्या's picture

19 Sep 2014 - 1:21 am | खटपट्या

खूप छान !!

सुंदर आले आहेत सगळे फोटो.

शेवटच्या फोटोत पाणी असं का दिसतंय?

प्रचेतस's picture

19 Sep 2014 - 1:40 pm | प्रचेतस

स्लो शटर स्पीड

शिद's picture

19 Sep 2014 - 2:00 pm | शिद

अच्छा. धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2014 - 3:00 pm | प्रभाकर पेठकर

तिपाई (ट्रायपॉड) वापरली आहे का?

प्रचेतस's picture

19 Sep 2014 - 3:04 pm | प्रचेतस

नक्कीच वापरली असणार.
त्याशिवाय इतके चांगले छायाचित्र येणे अवघड आहे. कदाचित एनडी फिल्टर सुद्धा वापरलेला असावा.

नांदेडीअन's picture

19 Sep 2014 - 11:11 pm | नांदेडीअन

हॅंडहेल्ड आहे हा फोटो.
ND फिल्टरसुद्धा नाहीये.

श्वास रोखून धरायची टेक्निक बर्‍यापैकी जमायला लागली आहे आता. :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2014 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

बरंच कसब आहे. आवडलं.

प्रचेतस's picture

20 Sep 2014 - 11:10 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

धन्या's picture

19 Sep 2014 - 3:04 pm | धन्या

पाबे घाट अफलातूनच आहे.

सिंहगडाच्या नावाने रुसुन बसलेल्या आमच्या एका मित्राला आम्ही पाबेघाटातून सिंहगड प्रदक्षिणा घडवली होती ते आठवलं. त्या प्रदक्षिणेची सांगताही सिंहगडावरच झाली होती खेड शिवापूरच्या दिशेने चढाई करुन.

प्रचेतस's picture

19 Sep 2014 - 3:06 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
त्या मित्राचा नंतर समाधानाने फुललेला चेहरा पाहून तुम्हाला अगदी भरून आलं होतं ते ही आठवलं. :)

त्या प्रसंगाला जवळपास वर्ष होत येईल आता....वाटेत राजगडाकडे जे काही वळून वळून बघणं चाललं होतं त्यामुळे मी जरा धास्तावलो होतो.

कवला आणि सोनकी केवळ अप्रतिम ! :)
एक विनंती फोटो कंप्रेस करुन टाकलेत तर धागा पटकन उघडुन पाहता येतो, विशेषतः हापिसातुन ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }

नांदेडीअन's picture

20 Sep 2014 - 1:53 pm | नांदेडीअन

पुढच्या वेळी कंप्रेस करून टाकतो.

संजय क्षीरसागर's picture

20 Sep 2014 - 11:16 am | संजय क्षीरसागर

काय फोटो काढलेत राव, जबरदस्त. गदिमांनी म्हटलंय तसं, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उक्तट!
हा कॅमेरा कोणतायं?

नांदेडीअन's picture

20 Sep 2014 - 1:53 pm | नांदेडीअन

निकॉन डी ५१००

संजय क्षीरसागर's picture

20 Sep 2014 - 4:10 pm | संजय क्षीरसागर

.

सुहास झेले's picture

20 Sep 2014 - 5:42 pm | सुहास झेले

मस्तच :)

वेल्लाभट's picture

6 Oct 2014 - 12:32 pm | वेल्लाभट

जबर भारी फोटो राव ! वाह वाह वाह !!!!!

हुकुमीएक्का's picture

10 Nov 2014 - 11:25 pm | हुकुमीएक्का

सर्व फोटो मस्त आलेत.
खास वाटलेले फोटो :-
१. जीवन आणि मृत्यू
२. Smithia Hirsuta - कवला
३. Graham's groundsel - सोनकी
४. झर्‍याचा फोटो. +१ . . . .