बाजार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
16 Sep 2014 - 9:45 pm

माझा हा लेख फेब्रुवारी २०११ चा आहे. त्यामुळे त्या संदर्भाने वाचावा. काही बाबतीत माझी मते बदललेली असू शकतात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. कारण अजून तरी मी शिकणे आणि समजून घेणे थांबवले नाही

___________________________

अलीकडेच आपण एक जाहिरात बघितली असेल. कपड्याच्या दुकानात एक ग्राहक शिरतो. त्याला काही बोलू न देता दुकानदार धडधड आपल्या पसंतीचे कपडे त्याच्या अंगावर चढवून मोकळा. वरून सांगतो कि हेच तुम्हाला चांगले दिसेल. वर वर पाहता ती कंपनी आपल्याला सांगते आहे कि आम्ही तुमच्याशी असे वागत नाही. तुम्हाला हवा तो बुके आम्ही देऊ. पण गम्मत अशी आहे कि ते बुके पण त्याच कंपनीने तयार केले आहेत. तुम्हाला फक्त निवड स्वातंत्र्य आहे. अगदी तसेच जसे एखाद्या बोकडाला कुठल्याही खाटकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखे. आज आपण मॉलमध्ये जातो. एकाच्या ठिकाणी दहा वस्तू घेऊन येतो. कारण दहा वस्तू दिसतात आणि त्या उचलाव्यात म्हणून तिथे ठेवल्या असतात. मार्केटिंग तंत्रात तुम्ही अगदी चीज साठी सापळ्यात अडकणाऱ्या उंदरासारखे असता. म्हणजे त्या उचलण्याचे स्वातंत्र्य जरी तुमचे असले तरी त्या उचलाव्या ही तुमची इच्छा तुमची नसून मॉल ची असते.

दरवर्षीप्रमाणे Valentine Day साजरा होतो. वृत्तपत्रात भरभरून लेख येतात. ते काय करतात तर तुमच्या मनात वातावरण निर्मिती करतात. आणि तुम्ही त्या दिवसासाठी मनातून तयार होता. आजूबाजूला सगळा आसमंत तुम्हाला प्रेमाने भारलेला वाटू लागतो. मग त्यात आपण पण सामील व्हावे असे आपल्याला वाटू लागते. बरे सामील व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? तर कुणावर तरी प्रेम प्रदर्शित करायचे. त्यासाठी महागडे गिफ्ट घ्यायचे. म्हणजेच पद्धतशीर मार्केटिंग ला बळी पडायचे. कोण सांगते तुम्हाला Valentine Day येणार आहे ते? ...आई? वडील? आजोबा? आजी? कुणीही सांगायच्या आधी मार्केट सांगते. Valentine Day आला आहे. खरेदी करा. आपले कुठले सण अश्या पद्धतीने येतात? आणि अशा पद्धतीने साजरे होतात? आपला प्रत्येक सण शास्त्रीय पद्धतीने आणि निसर्ग नियमानुसार आखलेला आणि योजलेला आहे. विशेष म्हणजे सर्वसमावेशक आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन साजरा करण्याचा आहे. कुठे लपून छपून चोरून भिऊन साजरा करायचा एकही हिंदू सण तरी नाही. फार लांब कशाला जा आता येते आहे कि होळी. त्यात तर सबकुच्छ खुल्लम खुलला आहे. शिव्या घाला कि प्रेमाने एकमेकांना भरवा. पण तिथे मार्केट ला एक्स्पोजर नाही ना. तिथे कुठे भरमसाठ आणि महागडी खरेदी करून कुणाला इम्प्रेस करायचे आहे. मग कशाला मार्केट होळी डोक्यावर घेईल.

ज्या प्रेमाला आवाहन करून हा दिवस साजरा केला जातो ते प्रेम फक्त तरुण आणि तरुणींचे आहे. साहजिकच प्रत्येक तरुण मनात ह्या प्रेमाला खास स्थान असते. तो मनातला एक हळुवार कोपरा आहे. त्यालाच साद घातली कि माणूस काहीही करायला तयार होतो. चार पैसे खर्च करणे तर खूप कमी आहे. म्हणजे काय तर तुमच्या प्रेमाचा बाजार झाला. प्रेम अमुक पद्धतीनेच व्यक्त करायला हवे असे लाखो लेख आणि शेकडो माध्यमं कोकलून कोकलून सांगत असतात. पण कुणीही हे सांगत नाही कि बाबा प्रेम कुठल्याही क्षणी कुठल्याही रुपात कुणाबद्दल ही व्यक्त होऊ शकते. हिरकणीने कडा उतरण्याआधी प्रेम व्यक्त करायला हा दिवस योग्य आहे का हा विचार केला होता?

पाश्चात्यांची विचारसरणी अंगकारणे कठीण आहे म्हणून आपण त्यांची वेशभूषा, भाषा आणि सण उचलायचे. म्हणजे आम्ही ही त्यांच्या सारखे प्रगत आहोत हे ढोंग मिरवायला मोकळे. पण ज्या मातीत आपण वाढलो जगलो त्या संस्कृतीची, त्यातल्या महान विचारवंत आणि शास्त्रज्ञांची आपणास काहीही माहिती नाही. मग कशाच्या जोरावर आपण अप्रगत आणि तेच तेवढे प्रगत म्हणायचे. आज भारतीय तरुण वयाच्या २३-२४ पर्यंत आईबापांवर अवलंबून असतात. पाश्चात्यांचे अनुकरण करायचे तर मग त्यांच्या १४-१६ वर्षीय मुलांचे करा जे या वयातच छोटी-मोठी का होईना स्वतः कमाई करायला सुरवात करतात. ते प्रचंड श्रीमत असूनही. आपल्याकडे अल्प-श्रीमंतही फक्त गाड्या उडवयाची कामे करतात.

आमच्या ओळखीचे एक उच्च-माध्यमिक शाळेचे शिक्षक आहेत. त्यांचा रोज या संकटांशी सामना असतो. त्यांचा तर ठाम विश्वासच बसला आहे कि अमेरिकन संस्कृती आपल्या डोक्यात घुसवण्याचे हे एक मोठे षड्यंत्र आहे. समाजामध्ये सगळीकडे बघितले तर त्यांचे म्हणणे पटते. वर्गात मुले शिक्षकांना अजिबात ऐकत नाहीत. फक्त मारायचे बाकी ठेवतात. म्हणजे काय काळ आला आहे बघा. ह्याला जर कुणी प्रगती आणि विकास म्हणत असेल तर म्हणो बापडे. गुरु, शिक्षकांना पाश्चात्य देशांत अनन्य सन्मान आणि आमच्या कडे हे असे. पैश्याची गुर्मी आणि आमचे कोण काय वाकडे करेल हा अहंगंड पालकांकडून मुलांकडे व्यवस्थित वाहत आहे.

जरा आजूबाजूला नजर टाका. आपण आपल्यासारखे राहिलो नाही असेच दिसते. अति-तंग कपड्यांमधल्या लहान मोठ्या सर्वच मुली जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष्य वेधून घेतात. मी काही संस्कृती रक्षक नाही. पण या आणि अश्या मादक कपड्यांची गरज मला सांगावी. एकीने तंग तर दुसरीने व्यवस्थित कपडे घातले असतील तर कुणाकडे तुम्ही निरखून पाहाल. दोष जो बघतो त्याच्या नजरेचा नसून जे दिसते त्याचा आहे. पूर्वी भारतात अगदी सुरुवातीला पंजाबी ड्रेस सुविधाजनक म्हणून प्रचंड लोकप्रिय झाला. कारण त्यात वावरायला मुलीना बरे पडत असे. त्याचे आजचे तंग रूप बघितले तर तो वावरायला कमी आणि दाखवायला जास्त सुविधाजनक आहे असेच दिसते. मी मुद्दाम येथे भारतीय पेहरावाचे उदाहरण दिले. मुद्दा तुम्ही जीन्स घालता कि पातळ नेसता हा नसून त्यातून तुम्हाला काय अभिप्रेत आहे हा आहे. आपल्या शरीराचा आपण शोभिवंत वस्तू म्हणून उपयोग करावा हे कोण शिकवते. नीटनेटके राहणे आणि सुंदर दिसणे प्रत्येकाचा हक्क आहे. पण सुंदर दिसणे आणि विकाऊ असणे यात तितकाच फरक आहे जितका सजलेल्या नवरीत आणि सजलेल्या वेश्येत असतो. तुम्ही काय पेहराव करता आणि त्यातून काय उद्बोधित होते ह्याचा तुम्ही विचार करत नाही असा अजिबात नाही. मुलीना वाटतंच सगळ्यांनी आपल्याकडे बघावे. ही वाटण्याची इच्छा मार्केट ने तयार केली. त्या इच्छेची बाजारपेठ केली. आता रस्तोरस्ती तुम्हाला ती बाजारपेठ फिरताना दिसते आहे. सर्व अंग झाकणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साडीचे आजचे रूप थोडा छुपाव थोडा दिखाव असे झाले आहे. असे सेक्सी दिसण्याची गरज आहे? प्रेझेंटेबल असावे च्या नावाखाली उन्मादक असावे असंच आम्हाला वाटते. नाहीतर आमच्याकडे कुणी लक्ष्य देणार नाही. भाव देणार नाही. आपल्या पूर्वजांनी फार विचार करून मनुष्याच्या बुद्धीला गुणांना महत्व असावे असे सांगितले. आज बुद्धी-गुण जाऊ देत पण दिसणे नंबर एक असले पाहिजे असा सर्व विचार आहे. कारण बुद्धी-गुण मिळवणे कठीण आहे. दिसणे बाजारात विकत मिळते. आणि तेच उत्तम मानले जाते. पूर्वी गरिबी होती म्हणून लोक एकच कापडाचा जोड वापरायचे का? नाही त्या काळात गरजाच कमी होत्या. श्रीमंत माणूसही एकच प्रकारचे कपडे आयुष्यभर घालायचा. इतक्या प्रकारच्या साड्या होत्या पण होत्या साड्याच ना? आजच्या सारखे जीन्स, मिनीज, माय्क्रोज, सलवार-चुडीदार, कुर्ता आणि त्यातही १०० प्रकार होते? लो-वेस्ट, पेन्सिल, बूट-कट असे कितीतरी होते? त्यावर घालायला प्रत्येकी वेगळी पादत्राणे, आभूषणे? कारण गरज नव्हती. गरज मार्केट ने निर्माण केली. गरज निर्माण झाली कि ती भागावावीच लागते.त्यासाठी पैसा लागतो आणि तो आपल्याकडे आहे. प्रचंड आहे.

ह्यात पुरुष कुठेही नाहीत असे समजू नये. मुळात पुरुषच ह्या मार्केट चा अंतिम उपभोगी आहे. तोच ह्या स्त्रियांना बघणार. जी आवडली तिच्या साठी महागडी गिफ्ट्स घेणार. तिला फिरायला स्वतःच्या गाडीने महागड्या हॉटेलात नेणार, तिला इम्प्रेस करायला छान छान कपडे स्वतः घालणार आणि वरून इतर गोष्टी आहेतच. किती प्रकारचे मार्केट आहेत. ह्यात अतिश्रीमंतच असतात असे समजू नये. महागाई ही सापेक्ष असते. दोन वेळ खायची पंचाईत असलेला प्रेमवीर आपल्या तसल्याच प्रेयसीला चौपाटीवर नेऊन भेल खाऊ घालत असेल तरी त्याच्या आणि तिच्यासाठी ती चैन महागडीच आहे. पण प्रेम दाखवायचे असेल तर हे केलेच पाहिजे असे मार्केटने पसरवले आहे.

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे कुणालाही ना सांगत आयुष्यभर झुरत राहणे असल्या बाष्कळ आउटडेटेड कल्पनांचा मी अजिबात पुरस्कार करत नाही. तो जमाना बित गया. पण प्रेम म्हणजे सागरकिनारी दगडामागे जाऊन, भर बागेत एकमेकांच्या मांडीवर झोपून, रस्त्याच्या बाजूला वयोवृद्धांना नजर खाली घालायला लावील असे चाळे करणे नक्कीच नाही. नजरेला नजर भिडून हृदयाच्या वाढणाऱ्या ठोक्याना प्रेम म्हणणे पार जुने झाले आहे. आजकाल मुले तीही आठवी नववीतली थेट फ्रेंडशिप 'मागतात' आणि तिच्यापेक्षा 'जास्त' मिळण्याची अपेक्षा असेल तर थेट 'लवशिप' मागतात. लवशिप कबूल झाली कि तिसऱ्या दिवशी चुंबनाची मागणी होते आणि आढेवेढे घेत ती मान्य होते. पुढच्या महिनाभरात प्रेमाचे पुढचे सर्व सोपान चढत प्रेम फार 'पुढे' जाते. फार धक्कादायक असले तरी हे सत्य आहे, हे तुमच्या आमच्या घरात आमच्या नकळत घडत आहे. ह्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता दिसत नसेल तर तुझे माझ्यावर प्रेमच नाही म्हणून ब्रेक-अप ला तयार. ब्रेक-अप होणे आवश्यक कारण दुसरीकडे कुठेतरी लवशिपचा गळ टाकलेला असू शकतो. अन्यथा एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत. हा काळाचा महिमा नसून घराघरात गरजणाऱ्या टीव्हीचा महिमा आहे. लहानपणापासून मुलांना एकच भावना प्रकर्षाने दिसत असते ती म्हणजे दोन भिन्नलिंगी व्यक्तीमधले प्रेम. ते कशासाठी असते हे पण सोदाहरण दिसत असते. त्याची चव चाखावी अशीच अपेक्षा त्या हळुवार वयात होते. टीव्हीवरचे मार्केट फक्त सेक्स विकत असते. कारण मनुष्य मनाला कुठल्याक्षणी तेच आवडते. म्हणून कुठल्याही मालिकेत, सिनेमात, गाण्यात ह्याचाच मनमुराद वावर असतो. थेट सेक्स नसला तरी प्रेमकहाणीचा मसाला असतोच असतो. ती दाखवण्याची पद्धत हळुवार नसून आक्रमकच असते. त्यामुळे प्रेम हे असेच असते हेच मुलांना दिसते. जे दिसते त्याचेच अनुकरण होते. मार्केटने हळुवारपण कधीच सोडून दिलं आहे. सुसंस्कार वैगेरे करणे हा त्याचा धंदा नाही.

ह्या सगळ्या अघोरी बदलांचे Valentine Day प्रातिनिधिक उदाहरण आहे. बरे तो एक विदेशी सण म्हणून आपण विरोध करतो तर नवरात्रीत जागो-जागी कुत्र्याच्या छत्र्या सारख्या उगवणाऱ्या गरब्याचे काय. गरब्याच्या नावाखाली, सण साजरा करण्याच्या नावाखाली जे उद्योग गर्भपाताच्या रुपात दिसून येतात ते काही लपून राहिले नाही. आज आम्हाला सर्व ताबडतोब हवे आहे. वाट बघण्याची झुरण्याची आमची तयारी नाही. त्यातही काही गोडी असते हे आम्हाला मान्य नाही. थेट उपभोग हाच काय तो आनंद. आनंदाची सगळी व्याख्याच या मार्केटने बदलवली आहे. व्यक्तीकेन्द्री समाज हे त्याचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. मला आनंद मिळत असेल तर मी अमुक करणार हा तो दृष्टीकोण. आज शाळकरी आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या अंतर्गत भांडणांची ८० टक्के कारणे ही तथाकथित प्रेमप्रकरणाशी संबंधित असतात. अमुक एक मुलगी मला आवडते पण मला जो आवडत नाही त्याच्याशी बोलते म्हणून त्या ना आवडत्याला दमदाटी प्रसंगी मारहाण, माझ्या बहिणीवर कुणी लाईन का मारतो म्हणून त्याला मारहाण, माझ्या प्रेयसीला दुसऱ्या कुणी प्रपोज केले म्हणून त्याला मारहाण, माझे प्रेम प्रकरण जमत नाही परंतु त्याचे जमले म्हणून त्याला मारहाण अशी किती उदाहरणे सांगावीत.

'आज काल तरुण बिघडलेत' असा कंठशोष आदिमकाळा पासून सुरु आहे. प्रत्येक पिढी नंतर येणाऱ्या पिढीला दोष देते. त्याची काय कारणे आहेत ती असू देत. पण खरच आजच्या सारखी मुजोरी, बेफिकिरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, कुठल्या काळात होती? स्वातंत्र्यलढ्यात जीव ओतून देणारी तरुण पिढीच होती, त्यांना बिघडलेत म्हणणारे तेंव्हापण होते. पण त्या तरुणांचे ध्येय उदात्त होते. गेल्या ५ हजार वर्षाच्या भारतीय इतिहासाचा मागोवा घेतल्यास असे दिसेल आपला राजा, राज्य आणि देश ह्याचाच विचार करणारी त्या विचारांपायी प्राण बलिदान करणारी तरुण पिढी कधी नव्हे इतकी आज बदलली आहे. देशाच्या छाताडावर धंधा कधी नव्हे तो स्वार झाला आहे. आणि आपण सर्व त्याच्या सापळ्यात त्याच्या इच्छेने स्वतःच्या पायाने जात आहोत.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

विलासराव's picture

16 Sep 2014 - 10:15 pm | विलासराव

सगळं खरय.
त्यामुळेच आपल्याकडे टीव्ही नाही.

बाकी जग आपल्या गतीने चालतच रहाते आनी समाजही.

टवाळ कार्टा's picture

16 Sep 2014 - 10:33 pm | टवाळ कार्टा

एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत

हे फक्त आत्ताच गेल्या ७०-८० वर्षांत सुरु झाले???

संदीप डांगे's picture

16 Sep 2014 - 11:20 pm | संदीप डांगे

नाही का??? त्याआधी होते का?

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 9:00 am | टवाळ कार्टा

हे आधी नव्हते असे वाटत असेल तर "अभ्यास वाढवा" :)

यसवायजी's picture

16 Sep 2014 - 11:39 pm | यसवायजी

ओक्के, ते असं आहे तर.. हम्म्म.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 1:18 am | प्रभाकर पेठकर

बाजाराच्या क्लूप्त्यांना किती बळी पडायचे? अंग प्रदर्शन किती करायचे? (आमच्या काळी मुलांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला मनाई होती.) पाश्चात्यांचे कसले अनुकरण करायचे? मॉल मध्ये जाऊन काय खरेदी करायचे? वगैरे वगैरे वरील लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाच्या हातात असते. काय चांगलं आहे काय वाईट आहे, बाहेरच्या प्रभावाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे सर्वथा आपल्याच हाती असतं.
पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली प्रलोभनं वाढली असली तरी संस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे घरचे संस्कार व्यवस्थित असतील तर किंचित काळ मुले भरकटली तरी स्वतःच विचार करून योग्य मार्गावर पुन्हा येतातच. आमच्या काळीही चरस, गांजा, सिगरेट, दारू, वेश्या हि प्रलोभनं होतीच पण घरचे संस्कार बळकट होते. असो.
लेखन बरेच एकतर्फी वाटले. मार्केट, तरूण पिढी ह्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याऐवजी मागच्या पिढीचीही जबाबदारी आहे ती त्यांनी नीट पार पाडलेली जाणवत नाही. माझ्या एक पिढी पुढच्या पालकांना (आत्ता चाळीशीत असणारे) संस्कारांचे महत्व कळले आहे का? ते आपल्या मुलांसमोर कसे वागतात? ऐहिकतेला किती महत्त्व देतात? ह्याचा अभ्यास केला तर फार थोडे पालक संस्कारी दिसतात. (निदान मराठी समाजात दिसतात तरी). बाकी जी हौस मला लहानपणी करायची होती पण पैशा अभावी (किंवा घरच्यांच्या विरोधामुळे) करायला मिळाली नाही ती हौस मी माझ्या मुलांवर भागवते/भागवतो. असेच चित्र जास्त दिसते. त्यामुळे मुलांना ही 'ऐहिकता म्हणजेच आयुष्य' असा चुकीचा संदेश फार लहान वयातच पोहोचवला जातो आहे. लाड करावेत पण लाडाने मुलं बिघडत तर नाही नं ह्यावर ही बारीक लक्ष असावे.
तिसरी गोष्ट, जे जे पैसे फेकून आयतं मिळतं आहे ते ते अंगिकारील्याने 'इझी लाईफ' चा पुरस्कार होतो आहे. घरी कांही करण्याऐवजी तयार प्रोसेस्डफुडचा वाढता वापर. अगदी इडल्या, ढोकळे, लोणची, उपमा ह्यांची तयार पाकिटं, तयार पंजाबी डिशेशची पाकिटं, एव्हढेच काय अनारशाचं पीठ, मोड आलेली कडधान्य, चिरून ठेवलेल्या भाज्या, चायनिझसाठी मिश्र भाज्या, चिझ आणि ब्रेडचा वाढता वापर ह्या चुकीच्या वातावरणात आपण पुढच्या पिढीला वाढवितो आहोत. त्यांना ह्याचीच सवय लागली तर जबाबदार कोण? मुळात आपणच ह्या प्रलोभनांना बळी का पडतो?
असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत.
तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते.

पिंपातला उंदीर's picture

17 Sep 2014 - 9:17 am | पिंपातला उंदीर

आमची पिढी चान चान तुमची पिढी घाण घाण असे निक्षून सांगणारे अजून एक perception . चालू द्या

विलासराव's picture

17 Sep 2014 - 9:24 am | विलासराव

असो. विश्लेषण करत गेलं तर जाणवतं फक्त मार्केट आणि तरूण पिढी नाही तर आपणही दोषी आहोत.
तरूण पिढीच्या भरकटण्यातही आपला सहभाग आहे. कारण, दोन पिढ्यांमधला संवाद आटला आहे. घरी आलं की टिव्ही लावून बसायचं. नवरा-बायकोत संवाद नाही, आई-वडील मुलांमध्ये संवाद नाही. अशा अनेक प्रभावांमध्ये सापडलेली तरूण पिढी बाहेरच्या प्रभावांना सहज बळी पडताना दिसते.

हे तर सत्य आहेच याबद्दल शंकाच नाही.
तरीही या कंपन्यांच्या जाहीरातींना बळी पडणारा फार मोठा सुशिक्षीत वर्ग आहे. याचे कारण त्या जाहीराती आपल्या अंतर्मनावर छाप टाकतात, जिथे बहुतेकांचे काही चालत नाही. जवळ-जवळ ते आपल्याला ती वस्तु घ्यायला भाग पाडतात.

मि स्वतः अशा जाहीरातीना कधीही भुललो नसलो तरीही आजुबाजुला, मित्रमैत्रीनींच्या अनुभावावरुन हे मत मांडत आहे.

चिनार's picture

17 Sep 2014 - 9:24 am | चिनार

आपण नमूद केलेले सगळेच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. १००% सहमत नसलो तरी ८०% नक्कीच सहमत आहे . डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल आभार !!

हल्लीची पिढी पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने पुरती नासली आहे. व्हॅलेंटाईन डे , पिझ्झाबर्गर, mall culture ही सर्वच या नव्या पिढीची विषारी फळे. कीड लागलीय समाजाला. स्वातंत्र्यासाठी उसळणारं रक्त गोठलंय आणि त्यात अल्कोहोल आणि ड्रग्ज मिसळलेत.

आमच्यावेळी असं नव्हतं.. हल्ली.. आजकाल कली शिरलाय पश्चिमेकडून.

सर्वात आधी malls बंद केले पाहिजेत आणि मग डिश टीव्ही , हिंसा अन सेक्सने भरलेले सिनेमे, जीन्स टीशर्टची फॅडे..

तरच या नव्या बेफाम झालेल्या पिढीलातरणोपाय आहे. पण ही सर्व स्वप्नेच आहेत. पुढे काळोख आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत: पासून सुरुवात करावी.. किमान जीन टीशर्ट, तंग कपडे, जंक फूड , एसी गाड्या उडवणे इतके तरी सोडावे.

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 11:29 am | टवाळ कार्टा

असे असेल तर पाश्चात्य देशांमधील लोक इतके वक्तशीर आणि शिस्तप्रिय कसे??

त्यांचे समर्थन करणे सोडा. आणि अंधानुकरणही.

भारतातली जुनी कालमापन पद्धती पहा.. घटका पळे.. अगदी सूक्ष्म कालगणनेचे भान होते आपल्याकडे.

दुर्दैवाने आपण पाश्चात्यांचे उदाहरण यासाठी घेतो.

अंधानुकरण आहे म्हणजे आहेच्च. बस्स.

पैसा's picture

17 Sep 2014 - 12:10 pm | पैसा

:D आज काय "आमच्या वेळी नव्हतं ब्वा असलं" मोड ऑन काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2014 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवो, हा त्येंचा उपहास, उपहास हाय... उपवास नाय ! :)

यसवायजी's picture

17 Sep 2014 - 2:51 pm | यसवायजी

bhau, ID hack zalay kaay aaj? :))

गवि's picture

17 Sep 2014 - 3:02 pm | गवि

नाही. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा परिणाम ...

अनुप ढेरे's picture

17 Sep 2014 - 3:03 pm | अनुप ढेरे

=))
तोकडे कपडे राहिले का?

पैसा's picture

17 Sep 2014 - 12:12 pm | पैसा

व्हॅलेंटाईन डे आणि त्याचे मार्केटिंग यावर बर्‍याच उलट सुलट चर्चा झाल्या. हेच काय, आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे आणि स्वतःला किती वाचवू म्हटले तरी ते कठीण आहे. सगळ्याच बाबतीत आपले डोके खांद्यावर असू द्यावे हे खरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2014 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे नव्याजुन्याचे वाद अनादी आणि अनंत आहेत. जोपर्यंत प्रचलित चाली-रिती-विचार-कृतींना लोकंना जास्त सोईचा आणि / अथवा पसंत असणारा पर्याय निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्याविरुद्धचा ओरडा म्हणजे अरण्यरुदनच ठरते. तेव्हा बदल हवा असेल तर तसा पर्याय निर्माण करायची आणि तो लोकांना समजावून द्यायची तयारी ठेवा.

अन्यथा, "सिस्टिम कशी खराब आहे" या प्रकारच्या दिवाणखान्यात केलेल्या चर्चा रूढ झालेल्या आहेतच ! :)

पण खरच आजच्या सारखी मुजोरी, बेफिकिरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, कुठल्या काळात होती?

कुठल्या काळात नव्हती? अनादी -अनंत कळापासून माणूस असाच आहे. उगीच काळाला दोष देण्यात काहीच अर्थं नाही .

मॉल संस्कृतीत मला काहीच वावगं नाही . सध्याच्या जीवनशैली मधे ती एक सुखकर सोयच आहे . आणि फसण्यासाठी मॉल मधेच जायची आवश्यकता नाही . फसणारा कुठेही फसतोच . सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ?

सीतामाई नाही का फसली सुवर्णमृगाला ? ती कुठे मॉल मधे गेली होती ?

अहो लंकेत रावणाने गोल्ड सुक (सोन्याचा मॉल) उघडला होता. आणी तो सुवर्णमृग त्याची अ‍ॅड्व्हर्टाईज करण्यासाठीच तर पाठवला होता. मग मैया ला हवा तो मृग मग मॉलला जावेच लागले ना.

बॅटमॅन's picture

17 Sep 2014 - 1:23 pm | बॅटमॅन

अच्चा, असं झालं तर

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2014 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाजारावर बाजार उठलाय ! मिपा तुम धन्य हो ! =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2014 - 2:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

इतका नितांतसुंदर लेख वाचुन आम्हाला शेवटी हे गाण आठवलच

वरची लिंक दिसली नाही तर इकडे क्लिकावे

बाकी या लेखावर जाणकार अजुन उजेड पाडतिलच.

महाप्रचंड उणिवा असलेला लेख ...आणि त्यावरुन टरारुन फुगलेल्या संधीसाधु वयस्कारांना नव्या पिढीला झोडण्याची इच्चा प्रबळ केल्याबद्दल अभिनंदन ;)

२० % तथ्य आहे मान्य करतो, पण पुर्ण नव्या पिढीला जनरायलज्ड करायचं काही समजल नाही , या वर्षीचा कोल्हापुरात ला प्रेमदिन कसा साजरा झाला माहीत नसावे लेखकाला ( लेख २०११ चा आहे...नाही का ? ) ..कॉलेजच्या तरुण - तरुणींनी ते गुलाब ई. बाजुला ठेवुन एक महाप्रचंड मोर्चा नेला होता महानगरपालिकेवर, टोल विरोधात , तंग कपडे आणि तोकडे कपडे यामुळे लक्ष जाते हे मान्य ...पण मग तिकडेच लक्ष जाते , दुसर्‍यांनी म्हणजे ज्यांनी तसे केले नाही तिकडे लक्ष ( अगदी लेखकाचे ही ) गेलेले दिसत नाही .....दुसरी बाब जी लोक नाव ठेवतात ...त्या पिढीवर जबाबदारी होती आम्हाल घडवायची ...हे म्हणजे पालक म्हणुन " अरे , हा दिवसभर मोबाईल वर गेम्स खेळत असतो , आत्ताशी १२ वर्षांचा आहे " अरे बाबा , १२ वर्षांचा असताना मोबाईल दिला कोणी रे त्याचया हातात ..बर दुसरीकडे नाही दिला तर अरे यार पोरगं लयच बॅकवर्ड आहे रे तुझ ( आमच्या बंधुराजांना आमच्य समोर एकवलय गेलय ) आता बोला ...अश्याच बर्‍याच उणीवा आहेत लेखात ...एककल्ली झालाय ..

डांगेशेठ लेखन शैली चांगली आहे, थोडा एककल्ली पणा जाणवतोय ईतकचं !!

काळा पहाड's picture

18 Sep 2014 - 10:48 am | काळा पहाड

अरे यार पोरगं लयच बॅकवर्ड आहे रे तुझ

ब्याकवर्ड.. ब्याकवर्ड.. य पूर्ण आला पायजे.

अन शेवटचा ड देखील उच्चारताना पूर्ण उच्चारायचा. पुलंची आज्ञाच आहे तशी.

यसवायजी's picture

19 Sep 2014 - 6:35 pm | यसवायजी

प्रेम'ड ची आठवण झाली.

आयला, हे आपल्या साईडलाच जास्त फेमस होतं काय रे?

यसवायजी's picture

19 Sep 2014 - 6:46 pm | यसवायजी

म्हाईत न्हाई बॉ. पण विंग्रजीच्या तासाला हा शब्द आला की लै दंगा व्हायचा. आणी मास्तरनं कितीही सायलेंट सायलेंट असं कोकललं तरी आमचा 'ड' दणकून असायचा. :))

बॅटमॅन's picture

19 Sep 2014 - 6:48 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

याच्या भाषांतराबद्दल म्हणतोय रे ;)

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2014 - 8:16 pm | टवाळ कार्टा

=)) )) ;)

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2014 - 8:15 pm | टवाळ कार्टा

=)) ;)

अविनाश पांढरकर's picture

18 Sep 2014 - 10:19 am | अविनाश पांढरकर

मस्त आहे लेख!!!!