“” प्रियेविण उदास वाटे आज “” ----- “”मेघदूत “” कविकुलगुरू कालिदासांची “आर्त विराणी”

डॉ. दत्ता फाटक's picture
डॉ. दत्ता फाटक in जनातलं, मनातलं
16 Sep 2014 - 9:18 pm

आषाढ श्रावणाचे दिस, कुंदधुंद पण मळभटलेलं, थोडसं उदास वातावरण, काहींसं हरवलेपण जाण-वणार, बाजूलाच कुठतरी पारव्यांचे घुटूर्घुम, अन् त्यात भर घालणारी अचानक त्या वातावरणाला पोषक अशी सुरावट कानी आली, “” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात / प्रियावीण उदास वाटे आज “” श्रीमती शांताबाईच्या रसिल्या, भावनोत्कट काव्यपंग्तीच्या दुरून कुठूनतरी थोड्याशा आर्त विराणी लकेरी कानी आल्या अन आतुरलेले लोचनानी अंधारात प्रियतमाची अधीरतेने वाट पाहणारी म-दालसा नजरेसमोर उभी ठाकली. अन कॉलेजची वर्षे झाकाळली, कालिदासाच्या अवीट मेघादुतातला आ-षाढस्य प्रथमदिवसे स्वाधिकारातील प्रमत्त विरही यक्ष आठवला, ते भारलेले दिवस आठवले, त्यात मेघ-दुतास सारखे उन्मेशी काव्य, माझं खूप खूप आवडतं, मेघदूत मी तीन मात्तब्बराकडे शिकलो. प्रो, रामभाऊ देसाई, प्राचार्य रामभाऊ गाडगीळ आणि विध्यावाच्स्पती अप्पाशास्त्री अमृते तिघेही दिवंगत झालेले पण माझ्यामनी अजरामर असलेले, देसाई सर शर्ट पेंनटीले अतिशय रसिक माणूस साभिनय शिकवायचे तास संपुच नये असे वाटायचं, गाडगीळ शास्त्री झब्बा धोतीतले शृंगारिक वर्णने संयमाने पण समरसून शिक -वणारे, आणि अप्पाशास्त्री शृंगारिक वर्णने स्थितप्रज्ञ भावात पण प्रत्येक शब्दाची चिरफाड करून शिक-विणारे, या सगळ्याच्या नोटसं आणि शिकवणुकीच्या आधारे मेघदूताचा परामर्ष आणि आस्वादही घ्यायचा आहे. अर्थात संपूर्ण काव्य नव्हे तर त्यातील काही पक्व रसिल्या अवीट गोडाव्याच्या काव्य पंगतींचा मन-सोक्त आस्वाद घ्यायचा. ,
एक नमूद करतो, या काव्यातील काही वर्णने शृंगारिक स्वरूपाची असतीलही पण तो कालिदासाचा प्रतिभा पदंन्यास आहे मनमुराद आस्वाद घ्या, पण तो आस्वाद घेताना नमूद करायास थोडं जड जाताय पण ती वस्तुस्थिती आहे, बघा, एखादा संगीतातला अर्धवट जाणकार जसा संगीतातला मनसोक्त आनंद उपभोगत नाही, उपभोग घेवू शकत नाही, कारण त्याचं अर्धअधिक लक्ष काकतालीय न्यायाने आपल्याला उत्तम जाण आहे हे भासविण्यात आणि त्यातील चुका काढण्यात किंवा त्यावर टिक्का टिप्पणी करण्यात व्यतित होतं त्यामुळे बाजूचा रसिक प्रेक्षकही हतबल होतो आणि दुसरे काही महाभाग जस्ट टाईमपास म्हणून आलेले, त्याना त्यात फारसा रस असतोच असं नाही, त्यामुळे रसभंग, होतोच पण तो त्या ना-द्ब्रम्हाच्या दिव्य आनंदाला मुकतो, हे तो मान्य करणार नाही हे पण तेव्हढेच खरे!! पण तोच सामान्य जाणकार मात्र आनंदाचे डोही आनंद तरंग असा परिपूर्ण न्हाहुन निघतो, बारीकसारीक ताना, मिंड, समेच्या जागा गायकाच्या आविर्भाव, लकिबी, त्यात पुरा हरखून जातो, हरवून जातो, आणि एका दिव्य साक्षात्का-रात, दिव्य अनुभुतीत आकंठ न्हाहुन निघतो. तृप्त होतो. तात्पर्य निरक्षीर विवेकबुध्दीने दुघाचा आस्वाद घ्या, सुजाण सुज्ञास अधिक सांगणे न लगे, असो. प्रत्येकी फक्त दोनच किंवा तीन श्लोक अन्वय फोड करून त्यापुढे त्यावरचे भाष्य, स्वैर भाषानुवाद असेल. चला तर मग सुरवात करु या ======= =

कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः / शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्त्तुः /
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु / स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु // १ //

अन्वय आणि अर्थ :-- स्वाधिकारात् == आपल्या निर्धारीत कर्तव्य कर्मात // प्रमत्तः == चुकणे, अ-सावधान. // कान्ताविर्ह्गुरुणा == प्रियतम पत्नीच्या वियोगामुळे दुस्सह्य // वर्ष भोग्येण == वर्षभराच भोगण // अस्तंगमितमहिमा == पद, दिव्य शक्ति, अधिकार काढून घेतलेला. // कश्चित् == कोणीएक // यक्षः == यक्ष // जनकत नया स्नानपुण्योद्केषु == जनका ची कन्या सितेने स्नान केलेल्या पाण्याने // स्निग्धच्छायातरुषु == घनदाटच्छाया असलेल्या वृक्षा ( तळी ) // रामगिर्याश्रमेषु == रामगिरी पर्वतावरील आश्रमात राहु लागला // वसतिं ==निवास // चक्रे == केला,
ही कथा-व्यथा यक्षराज कुबेराच्या अलकापुरी नगरातली, एका नवपरिणीत, नुकतंच लग्न झाले-ल्या एका सेवक यक्षाची, त्याचं दररोज प्रातःकालिन पूजेसाठी मानससरोवरातील स्वर्णकमले आणण्याचे काम, मानसाचं मनभावन आल्हाददायी वातावरण, नुकतंच लग्न झालेलं, आपल्या प्रियतमेच्या सुखद आठवणींत रमतो रमला, परिणामी कामात दिरंगाई झाली, पूजेसाठी वेळेवर फुले न मिळाल्यान यक्षराज कुबेर बेभान झाले आणि शाप-नव्हे आज्ञा केली वर्षभर कोसो दूर रामगिरी पर्वती एकांतवासाची, बिच्चारा, रामगिरपर्वतावर झोपडी ( त्यालापूर्वी आश्रम म्हणत )बांधून राहु लागला, हा परिसर वृक्ष वल्लीनी बहरलेला, घनदाट छायांनी नटलेला, जनक तनया सीतामाईनी स्नान केल्याने पावन झालेल्या पु- ण्योदक सरोवरांचा, पण मन थोडंच रमतं, हा पत्नी विरहाने बावरा झालेला आकाशी डोळे लावून बसायचा.

तस्मिन्नद्रौ क्तिचितबलाविप्रयुक्तः स कामी / नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्तप्रकोष्ठः /
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमा श्लिष्ट सानुं / वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श // २ //

अन्वयार्थ :--- तस्मिन् अद्रौ == त्या राम गिरिपर्वतावर / अबलाविप्र युक्तः == आपल्या प्रियतमेपासून दुरावलेला. / कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः == सोन्याचे तोडे गळून पडल्याने रिक्त मनगटानचा / कामी == कामासक्त / सः == त्या यक्षाने / कतिचित् == काही / मासान् // महीने / नीत्वा == राहून /आषा- ढस्य / आषाढ महिन्यातल्या प्रतिपदेला, पहिल्या दिवशी / आश्लिष्टसानुं == पर्वत शिखराला बिलगून अ-सलेला / वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं == पर्वतावरील शीला, दगडाना आपल्या सुळ्यानी मुसंडी मारणा –--या हत्ती सारखा ( तो मेघ ) प्रेक्षणीय दिसत होता / मेघं == मेघ / ददर्श == पाहिला.
हा बापडा, पत्नीच्या वियोगामुळे ‘ ‘युग सम वाटे घडी घडी ही ‘ असे दिवस कंठत होता, दिवसे दिवस खंगत होता, शरीराने कृश झालेल्या त्याच्या मनगटातली कंगण तोडे गळून पडल्याने मनगटे सुनी-सुनी वाटत होती. अशा व्याकुळ कामासक्त अवस्थेत त्याने काही महीने व्यतीत केले. आता ग्रीष्म संपला उष्मा थंडावला, आषाढी प्रतिपदा आली, आषाढातला प्रथम-पहिला आल्हाददायी पण विरही जनाना व्याकुळ करणारा दिवस, त्या यक्षाच्या व्याकुळ डोळ्याना पर्वतशिखराला एक भला मोठा मेघ बिलगून बसलेला दि-सला. घटकाभर त्याला एक मदनंमस्त हत्तीच पर्वत शिखरावरील शिळाना मुसंडी मारत असल्याचा भास झाला. अन् थोडा सुखावला. एक टक पाहातच राहिला . .

तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतो / रन्तर्बाषपश्चिरमनुचरो राजराजस्य द्ध्द्यौ /
मेघालोके भवति सुखिनोप्यन्यथा वृत्ति चेतः / कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुन दुर्संस्थे // ३ //

अन्वयार्थ ---- राजराजस्य == यक्षराज कुबेराचा / अनुचरः == सेवक / अन्तर्बाष्पः ( सन् ) == आ-पली आसवं डोळ्यातच रिचवणारा / सा कौतुकाधानहेतो == मनोमनी उत्कंठा उत्पन्न करना-या त्या ( मेघाला ) तो / तस्य == त्या मेघाचे /पुरः == समोर / कथमपि == कोणत्याही प्रकारे / स्थित्वा== उभं राहून चिरम् == पुष्कळ वेळ / दध्यौ == ( आपल्या प्रियतमेचे ) ध्यान करत राहीला कारण / मेघालोके == मेघाना पाहील्यावर / सुखिनः अपि == आपल्या प्रियतम व्यक्तींच्या सहवासात सुखेनैव असतानाही ( त्यांच मन आषाढात हेलावतं ) / चेतः == चित्त / अन्यथावृति == निराळया प्र-कारची भावुक विकारयुक्त. / भवति == होतं / कंठाश्लेषप्रणयिनि == गळा मिठी मारण्यासाठी आसुसलेले दूरसंस्थे == दूर असलेले राहणारे / किंपुनः ==काय सांगावं.
. त्या उभ्या उभ्या, आकाशी एकटक नजर लावून असलेल्या कुबेरराज विषण्ण यक्ष सेवकाचे नेत्रातली आसवं नेत्रातच विरघळली, आणि आपल्या प्रियतमेच्या आठवात हरवून हरकुन बसला. अहो !! आषाढ श्रा-वणात प्रथमदर्शनी ह्या मेघाना पाहुन आपल्या प्रियतमेच्या सहवासात असणा-या सुखवस्तु जनांच्या मनीही आपल्या प्रियतमेच्या गळा मिठी मारण्याची उर्मी येते, मन विषयविकारी होतं, तर ह्या कोसोदूर असलेल्या आपल्या नवपरिणीत सखीला मिठीत घेण्याच्या कांक्षेने व्याकुळ अशा ह्या आसक्त कामीप्रेमी यक्षाची काय कथा बरं !!!

अपुर्ण, पुढे चालु

वाङ्मयलेखभाषांतर

प्रतिक्रिया

विलासराव's picture

16 Sep 2014 - 9:46 pm | विलासराव

अप्रतीम!!!!!!!!१
लगे रहो.

विनोद१८'s picture

16 Sep 2014 - 10:16 pm | विनोद१८

शुभेच्छा.

प्रचेतस's picture

16 Sep 2014 - 11:11 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
प्रत्येक शब्दाचा अर्थ न देता श्लोकाचा भावार्थ दिला असतात तर अधिक योग्य झाले असते.

यशोधरा's picture

16 Sep 2014 - 11:18 pm | यशोधरा

दिलाय की :)

प्रचेतस's picture

16 Sep 2014 - 11:25 pm | प्रचेतस

त्या '=' खुणा न करता :)

यशोधरा's picture

16 Sep 2014 - 11:30 pm | यशोधरा

अर्थ समजतो की काव्याचा. असूदेत :) अर्थाखालीच भावार्थ आहे '=' खुणा नसलेला :P

तो आहेच ओ पण खुणांमुळे रसभंग होतो त्याचे कायकाय :)

यशोधरा's picture

16 Sep 2014 - 11:38 pm | यशोधरा

:P

यशोधरा's picture

16 Sep 2014 - 11:14 pm | यशोधरा

अरे वा वा! क्या बात हैं! :) पटपट लिहा प्लीज :)

हरकाम्या's picture

16 Sep 2014 - 11:17 pm | हरकाम्या

आपणास वेळ कसा घालवायचा हा प्रश्न दिसतोय.

काउबॉय's picture

17 Sep 2014 - 3:01 pm | काउबॉय

पण यायोगे हुच्च हभिरुछी हिन् ठरायचा धोका असल्याने तुमचा निषेध व्यक्त करतो अर्थात हे व्यक्तिगत मत आहे सार्वमत नाही याची जाण जोपासायची प्रार्थना आहे

प्रसाद गोडबोले's picture

4 Sep 2015 - 12:58 pm | प्रसाद गोडबोले

पुढे ??

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2016 - 7:05 pm | प्रसाद गोडबोले

मेघदुताच्या सुलभ मराठी भाषांतराची पीडीएफ कोणाकडे आहे का ?

माझ्याकडे आहे. एक पीडीएफ आणि एक पुस्तक.

सतिश गावडे's picture

27 May 2016 - 9:04 pm | सतिश गावडे

हा लेख अपूर्णच राहणार आहे. :(

फाटक फार चांगला उपक्रम आहे.
( गिर्वाणवाणी आणि त्यातल्या साहित्याचे अप्रुप आठवीत असताना सहा महिनेच टिकले आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून चार वर्ष पाठांतर केलं .) संस्कृतातलं काव्य संधिसमासांमुळे नकोसं वाटतं.
#हा लेख अपूर्णच राहणार आहे- का बरं असं वाटलं सगा?

सतिश गावडे's picture

28 May 2016 - 7:38 am | सतिश गावडे

#हा लेख अपूर्णच राहणार आहे- का बरं असं वाटलं सगा?

डॉ. दत्ता फाटक आपल्यात नाहीत आता.