नविन धंदा

भिंगरी's picture
भिंगरी in जनातलं, मनातलं
15 Sep 2014 - 2:49 pm

आता नविन धंदा चालू करावा म्हणते,
'आमचे येथे पिंडाला कावळा शिवून मिळेल.'
पहिल्या १० मिनिटात कावळा शिवल्यास रु.१०१
पुढील २० मिनिटांसाठी रु.७५
त्या पुढील ३० मिनिटांसाठी रु.५० फक्त.
आणि तरीही कावळा नाहीच शिवला तर कापडाचा कावळा शिवून तो 'शिवून' मिळेल.
ता.क.....मिपा करांना खास सवलत दिली जाईल.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

कावळा नाहीच शिवला तर कापडाचा कावळा शिवून तो 'शिवून' मिळेल.
माझ्या माहिती नुसार कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करुन तो शिवला जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

विक्रान्त कुलकर्णी's picture

15 Sep 2014 - 3:17 pm | विक्रान्त कुलकर्णी

भागीदारी बद्दल काही प्रस्ताव ??? सध्याच्या नोकरीचा भारी कंटाळा आलाय.. पळी पंचपात्री तयार आहेत...

स्पा's picture

15 Sep 2014 - 3:27 pm | स्पा

चान चान जिलबी

पैसा's picture

15 Sep 2014 - 3:27 pm | पैसा

कावळे कुठून आणलेस?

सुहास..'s picture

15 Sep 2014 - 3:33 pm | सुहास..

काय भाव आहे पर कावळ्याचा

पैसा's picture

15 Sep 2014 - 4:05 pm | पैसा

कावळे कुठच्या मार्किटात विकत मिळतात म्हणून!

सुहास..'s picture

15 Sep 2014 - 4:18 pm | सुहास..

आम्ही तर हल्ली ( टपलेले ) कावळे आंजावर देखील मिळतात म्हणुन ऐकले आहे ;)

भिंगरी's picture

16 Sep 2014 - 9:02 pm | भिंगरी

'पर' विकत नाही आम्ही
घ्यायचा तर पुर्णच घ्यावा लागेल.

तुम्हाला नवउद्योग म्हणायचंय काय? ;)

मदनबाण's picture

15 Sep 2014 - 3:43 pm | मदनबाण
यसवायजी's picture

15 Sep 2014 - 3:52 pm | यसवायजी

गंदा हय पर धंदा हय ये ;))

कवितानागेश's picture

15 Sep 2014 - 4:17 pm | कवितानागेश

काय हे?
बिचारे कावळे!

नानासाहेब नेफळे's picture

15 Sep 2014 - 4:31 pm | नानासाहेब नेफळे

कौवा बिर्याणि शिकून घ्या ,व्यवसाय बंद पडल्यास कौवा बिर्याणी पेश्शल हॉटेल काढा.समस्त मिपाकर जेवायला येतीलच.
(गोश्त बिर्याणी फ्यान नानासाहेब नेफळे)

दिपक.कुवेत's picture

15 Sep 2014 - 7:50 pm | दिपक.कुवेत

छान छान. दिवसांचे कार्य करणार्‍या भटजींशी सर्पंक करा.

जेपी's picture

15 Sep 2014 - 8:13 pm | जेपी

तेवड शिर्षक बदला.
बाकी' आमच्याकडे कावळे शिवुन का शिऊन मिळतील.'
अशी पाटी 'आमच्याकडे बनवुन मिळेल.'

पैसा's picture

15 Sep 2014 - 10:16 pm | पैसा

शिवून म्हणजे मशिनवर शिवून का?

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Sep 2014 - 9:58 pm | माम्लेदारचा पन्खा

विदर्भाचा आणा.....

तेवढाच त्यान्ना वाव मिळेल....

सस्नेह's picture

15 Sep 2014 - 10:22 pm | सस्नेह

बबन रागावेल

कवितानागेश's picture

15 Sep 2014 - 10:32 pm | कवितानागेश

वेगळा कावळा झालाच पाहिजे! :)

चिगो's picture

16 Sep 2014 - 8:36 pm | चिगो

म्हणूनच म्हणतो ना राव इदर्भावर अन्याय होते म्हणूनशान.. ;-)

खटपट्या's picture

15 Sep 2014 - 10:49 pm | खटपट्या

आवो, भिंगरीताय, आमच्याकडे प्रशिक्षित कावळे हायती. छोटे, मोठे, डोम कावळे, रिमोट वर चालणारे असे सगळे हायेत.
कधी आणि कूट पाहिजेत ते फक्त सांगा.
दुपारी कावळ्यांची झोपायची वेळ असते. तेव्हा जर पायजे असल तर त्याला वर्टाइम द्यावा लागल.
आमि पाटवलेला कावळा शिवला न्हाई तर कस्टम्बर सपोर्ट लंबर बी हाये.
थोड्याच दिवसात वेब साईट चालू करू
आणि आम्ही पितृपक्ष नावाचा राजकीय पक्ष पण काढलाय. आधी कावळा युनियन व्हती. आता राजकीय पक्ष काढलाय.

असो, मला वाटले होते 'जनातील मनातील' मध्ये लेखन प्रकाशित करायचे नियम तरी या ८ वर्षानंतर स्पष्ट झाले असतील. माझे पुढील लेख मी खरडफळा येथे प्रसिद्ध करेन.

कल्पना चांगलीय.शुभेच्छा ...उद्योग भरभराटीस आल्यास किंवा उद्योग करून तुम्ही 'काव'ल्यास तुम्हाला 'यंग अचिवर' ,'उद्योगिनी' वगैरे तत्सम पुरस्कारासाठी नामांकन किंवा थेट पुरस्कार (सब्जेक्ट टू जुरी सेटलमेंट) रास्त दरात आणि भिडस्त स्वभावात बसवून दिले जाईल.
(भिडस्त स्वभावात= पुरस्कार नम्रपणे स्वीकारणे आणि श्रेय देणे याबाबत सविस्तर ट्रेनिंग इन्क्लुडेड)

मुक्त विहारि's picture

15 Sep 2014 - 11:36 pm | मुक्त विहारि

ह्या विषयाच्या अनुशंगाने पडलेले इतर प्रश्र्न...

१. कावळे भाताच्या पिंडालाच का शिवतात? भज्यांना किंवा पोळीला का नाही?

२. कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर चालते का?

३. कावळा पटकन शिवावा म्हणून काय उपाय योजना करता येईल?

४. माझ्या पिंडदानाच्या वेळी भाताच्या जागी बिर्याणी ठेवली तर चालेल का? इथे बिर्याणी खावूनच दिवस मोजावे लागतात.

पिवळा डांबिस's picture

16 Sep 2014 - 12:14 am | पिवळा डांबिस

कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर....

याचसाठी केला होता अट्टहास,
की शेवटचा दीस गोड व्हावा!!!
:)

आनन्दिता's picture

19 Sep 2014 - 7:14 pm | आनन्दिता

=))

भिंगरी's picture

12 Nov 2014 - 10:42 pm | भिंगरी

पिडांकाकू रडतील का 'कावळी'शिवल्यावर?

पिवळा डांबिस's picture

13 Nov 2014 - 12:08 pm | पिवळा डांबिस

काकूचा इथे काय संबंध?
मी मेलोय ना?
मग नवी विटी नवीन राज्य!!!!!
;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

कावळ्याच्या जागी कावळी शिवली तर....

याचसाठी केला होता अट्टहास,
की शेवटचा दीस गोड व्हावा!!!

की शेवटचा किस गोड व्हावा!!! ...असे वाचले :)

फुंटी's picture

16 Sep 2014 - 12:26 am | फुंटी

काव काव उत्तरे-
१) भज्यांना आणि पोळीला स्पर्श करीत नाहीत असे काही नाही.'काक्स्पर्श' पितरांच्या आवडीनिवडींवर अवलंबून असतो .
२) इथेही आरक्षण प्रस्तावित आहे.चिंता नसावी.लवकरच ठराव काकसभेत मंजूर होईल
३) कावळ्यांना १२ .१४ ची चर्चगेट फास्ट पकडायची घाई नसते .म्हणे पटकन शिवावा...
४) दिवस मोजावे लागतात अस म्हणताय तरी बिर्याणी हवीय पिंडदानाला ?? कम्माल आहे....नवीन मेनू ट्राय करा ना...

खटपट्या's picture

16 Sep 2014 - 12:31 am | खटपट्या

एक निरीक्षण - कावळा पिंडाला शिवला नाही तर गुरुजी त्यावर दही ओततात. लगेच कावळा शिवतो

आयला मागच्या सहा दिवसात zee takies वाल्यांनी 4 वेळेस काकस्पर्श हा चित्रपट दाखवला.
आता पण चालु आहे.

सस्नेह's picture

16 Sep 2014 - 10:37 pm | सस्नेह

कावळा महोत्सव सुरू असेल..

सस्नेह's picture

16 Sep 2014 - 10:46 pm | सस्नेह

कावळा महोत्सव सुरू असेल..

हरकाम्या's picture

16 Sep 2014 - 11:14 pm | हरकाम्या

तुम्ही त्यात लिहिले आहे की " मिपाकरांना खास सवलत " ही सवलत नक्की कोणासाठी ?
जिवन्त की मरु घातलेल्या " मिपाकरांसाठी "?

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 9:02 am | टवाळ कार्टा

जिवन्त की मरु घातलेल्या " मिपाकरांसाठी "?

_/|\_
आपल्या चरणकमलांचा फोटो पाठवावा...मिपावर मंदिर सुरु करत आहेत...त्यात लावू

कावळे घरचेच की भाडोत्री ?

भिंगरी's picture

17 Sep 2014 - 5:22 pm | भिंगरी

कावळे घरच्या मिपावर असताना भाडोत्री कशाला गं मनीषा

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः। वसन्त समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः

यसवायजी's picture

19 Sep 2014 - 6:35 pm | यसवायजी

हाणतेज्या.. :)) क्या मारा हय

स्वप्नज's picture

13 Nov 2014 - 7:10 pm | स्वप्नज

'जिलेबी'ला कावळा शिवतो का??
छान जिलेबी....

भिंगरी's picture

25 Aug 2015 - 11:01 pm | भिंगरी

'छान' जिलेबीवरच कावळे तुटून पडतात.

जव्हेरगंज's picture

26 Aug 2015 - 2:32 pm | जव्हेरगंज

चक्क १० महिन्यानंतर उत्तर भेटले त्यांना .. धन्य ..
बाकी कावळे ऐकदा तुटल्यावर पुन्हा जोडावे कसे ?

भिंगरी's picture

26 Aug 2015 - 4:12 pm | भिंगरी

'जोड'धंद्याने