प्रोग्रेसिव्ह लेन्सेस सुविधा कि त्रास.

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
14 Sep 2014 - 12:07 pm
गाभा: 

लांबचा आणि जवळचा असे दोन्ही नंबर निघाले कि प्रोग्रेसिव्ह लेन्सेस वापरा असे सांगतात नव्हे जोरदार समर्थन करतात.
२०१० साली मी ते तसे १.५ वर्षे वापरून पहायचा बराच प्रयत्न केला पण ड्रायव्हिंग, laptop वरचे काम (टेबल वर ठेऊन) आणि हातात पुस्तक/पेपर घेऊन वाचणे ह्या दिनचर्येतील गोष्टींसाठी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा त्रास जास्ती झाला..शेवटी जवळचा नंबर नगण्य असल्याने फक्त लांबचा चष्मा करून घेऊन तोच वापरला
आता पुन्हा जवळचा आणि लांबचा नंबर अंशत: वाढल्याने त्या प्रोग्रेसिव्ह वापराच्या सल्ल्याला तोंड देतोय...

१. आपण एखाद्या ठिकाणी 'बघत' असतांना मानेची हालचाल आणि डोळ्यांची हालचाल ह्यांचे संगनमत करून फोकस करत असतो
२. मानेला रग लागल्यास डोळ्यांची हालचाल करून लक्ष विचलित होऊ देत नाही 'फोकस' जात नाही.
३. मान आणि डोळे एकाच ठिकाणी फारवेळ अजिबात नं हलवता आपण वागू शकत नाही.
---------- आणि इथेच माझा झोल सुरु होतोय ..ज्या लेन्स्वरील प्रत्येक बिंदूचा फोकल पोइंत वेगवेगळा आहे त्यामुळे एखाद्या कोनात (उदा ड्रायव्हिंग करतांना) बघत असतांना जर थोडे लक्ष विचलित झाले किंवा मानेची किंवा डोळ्यांची थोडीही हालचाल झाली तर सर्वस्वी वेगळा फोकस निर्माण होतो आणि धूसरता वाढते ...म्हणजे पुन्हा नव्याने मान डोळे ह्यांची हालचाल करून सोयीस्कर फोकल पोइंत निवडून योग्य पोइंत मिळाला कि तिथेच 'statue'अवस्थेत बसून राहायचे

हा फक्त माझा अनुभव आहे...कि मी कुठे चुकतो.....का प्रोग्रेसीव्ह लेन्स हाच एक घोळ आहे ...
बर हा प्रकार तसा महागडा असल्याने 'करून पाहू नाहीतर दुसरे बघू' म्हणायची सोय नाही...

मिपा अध्वर्युंचे काय अनुभव/सल्ले/मत आहे ???

प्रतिक्रिया

ऋतुराज चित्रे's picture

14 Sep 2014 - 1:06 pm | ऋतुराज चित्रे

बायफोकल लेन्स वापरताना पुस्तक वाचताना किंवा दूरचे वाचताना मला काहीही त्रास होत नव्हता परंतू डेस्कटॉपवर काम करताना त्रास होत असे. जवळून उडनारा डास अचानक दिसेनासा होइ.

नेत्रतज्ञाकडून डोळे तपासून घेतले. त्यांनी प्रोग्रेसिव लेन्स वापरण्यास सांगितले. डोळ्यांना सवय होइपर्यंत त्रास होइल नंतर तुम्ही प्रोग्रेसिवच्या प्रेमात पडाल असे सांगितले.

घेतला एकदाचा महागडा प्रोग्रेसिव चष्मा. तंतोतंत तुमचेच अनुभव मला आले. घुबडासारखी मान व डोळे फिरवून घरात चेष्टेचा विषय बनलो होतो. भिक नको पण कूत्र आवर अशी माझी अवस्था झाली होती, करणार काय मारुतिच्या बेंबीत बोट घातले होते.

माझ्या डोळ्यांनाच माझी किव आली व त्यांनी नमते घेवून घेतले एकदाचे प्रोग्रेसिवशी जुळवून. आता मला डास दिसूही लागले व मारताही येऊ लागले. पैसे अगदीच वाया गेले नाही ह्याचे समधान वाटले. परंतू सगळेच आलबेल आहे अशातलाही भाग नाही.

वर्षभरात जवळचा नंबर बदलला की त्याच प्रोग्रेसिव लेन्समधून फोकल पोइंट जुळवताना थोडे दिवस त्रास होतो. नवीन लेन्स घेइपर्यंत त्रास सहन करवा लागतो.

कधी गर्दीत चष्म्याला धक्का लागून नेसल क्लिप दाबल्या गेल्या तरी चष्म्याचा कोन बदलल्यामुळे थोडे दिवस त्रास होतो.

फक्त जवळचा व लांबचा नंबर असल्यास दोन्ही दरम्यानचे स्पष्ट दिसत असल्यास प्रोग्रेसिव लेन्स वापरण्याची गरज नाही.

पैसा's picture

14 Sep 2014 - 8:57 pm | पैसा

अजूनतरी फक्त वाचायला चष्मा लागतोय. दोन्ही नंबर्स म्हणजे कटकटच आहे. मग सरळ दोन वेगळे चष्मे वापरलेत तर?

आशु जोग's picture

15 Sep 2014 - 12:49 am | आशु जोग

अजूनतरी फक्त वाचायला चष्मा लागतोय. दोन्ही नंबर्स म्हणजे कटकटच आहे. मग सरळ दोन वेगळे चष्मे वापरलेत तर?

मग ड्यूएल सिमचे फायदे कसे मिळतील ;D

चौकटराजा's picture

16 Sep 2014 - 4:19 pm | चौकटराजा

शौकिन या चित्रपटाचा उत्तरार्ध आला तर त्यात रोल मिळेल. पण अर्र.......तुम्ही अनाहिता च्या मेंबर आहात हे विसरलोच की !

सामान्यनागरिक's picture

26 Sep 2014 - 6:18 pm | सामान्यनागरिक

त्यातला एक नेहेमी आपण कुठेतरी विसरतो आणि तसेही दोन चष्मे बाळगणे त्रासाचे असते. त्यत दोन सेट बनवावे लागतील.
प्रोग्रेसिव काचेबरोबर जुळवुन घेणे जरा त्रासाचे असते. त्यात गाडीचालवतांना जास्तच. उगीच नको रिस्क.

कवितानागेश's picture

14 Sep 2014 - 10:54 pm | कवितानागेश

प्रोग्रेसिव्ह लेन्सचा माझ्या आईलापण असाच त्रास झला होता. आत परत बायफोकल वापरतेय.

रमेश आठवले's picture

14 Sep 2014 - 11:05 pm | रमेश आठवले

मी गेले कैक वर्षे progressive लेन्सेस वापरत आहे. सुरवातीला त्यांना कम्पनीच्या नावावरून varilux असे म्हणत असत. मला दूरचे पाहण्याचा नंबर कमी आहे आणि जवळचा नंबर भरपूर आहे. आधी बाय फोकल वापरत होतो. त्या पेक्षा progressive खूपच जास्त उपयोगी वाटतो. दर एक दोन वर्षांनी चेक करून घेऊन, जरूर तसा नंबर बदल करून घेतो. जिना उतरताना मात्र जरा सावधगिरी बाळगावी लागते.

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2014 - 1:00 am | प्रभाकर पेठकर

मी गेली १४ वर्षे प्रोग्रेसिव्ह लेन्सेस वापरत आहे. चष्मा लावल्यापासून १-२ दिवस रस्त्याने चालताना, जमिनीची पातळी वेगळी दिसल्याने, जरा बाचकल्यासारखे व्हायचे पण २-३ दिवसांतच डोळ्यांनी ह्या फरकाशी मिळतेजुळते घेतले (डॉक्टरांनीही तसे सांगितले होतेच) त्यामुळे नंतर कधी त्रास झाला नाही. एकदा नंबर वाढला आणि पुन्हा एकदा नविन लेन्स लावल्यावर पुन्हा २ दिवस त्रास झाला पण ह्या वेळी कमी झाला. आणि २ दिवसांत पुन्हा डोळ्यांनी जुळवून घेतले. बाकी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा कधीच त्रास झाला नाही.
हं! बॅडमिन्टन खेळताना शटल 'मिस' व्हायचे (दोन वेगवेगळ्या फोकल लेंग्थमधून प्रवास केल्याने) पण पुढे गुडघ्यांच्या त्रासामुळे डॉक्टरांनी बॅडमिन्टन खेळायलाच बंदी घातल्याने त्या समस्येवर परस्पर तोडगा निघाला.

रेवती's picture

15 Sep 2014 - 2:38 am | रेवती

नवर्‍याला तीन चार महिन्यापूर्वीच असे ग्लासेस मिळालेत. तुम्हाला होतोय तसाच त्रास झाला आता बरेच जुळवून घेतले आहे पण एकंदरीतच बायफोकल बरा असे त्याला वाटते.

बाइफोकलच वापरा. फक्त स्नूकर बिलीअर्ड खेळणारे मोठ्या फ्रेमचे वापरतात तसे घेतले तर मोठे दृष्य एकाच वेळी पाहता येईल. रोडवरच्या डावीकडच्यासाइन आणि कारचा डैशबोर्ड मान न वळवता फक्त डोळे फिरवून काम होईल.

नितिन थत्ते's picture

17 Sep 2014 - 8:13 am | नितिन थत्ते

मी पण प्रोग्रेसिव्हचा नाद सोडून बायफोकल चष्मा करून घेतला.

अत्रन्गि पाउस's picture

20 Sep 2014 - 10:17 am | अत्रन्गि पाउस

नवीन बायफोकल करून घेतला शेवटी...