सोन्याच्या पोइंटवाला पेन....

फुंटी's picture
फुंटी in जनातलं, मनातलं
14 Sep 2014 - 3:24 am

झोप येत नाही म्हणून खिडकी उघडून बाहेर पाहिलं....समोरच घुबड बसल होत विजेच्या तारेवर....घुबड दिसण शुभशकून म्हणावा की अपशकून या विचारात असतानाच खिळवून ठेवलं त्याने ...त्याच ते मान वाकडी करून पाहण विचित्रच ...त्यात हे पांढर घुबड....थोड्या अंतरावर अजून एक घुबड होत...टेरेस वर चिमण्यांची घरटी ठेवलीत ...आताशा चिमण्या येऊन घरटी करतात .त्या घुबडांच्या मनात तसं काही नसेल ना? दोघानाही थोडावेळ न्याहाळले ...लक्षण ठीक दिसत नव्हती.रेकी करावी तशी उडताहेत ....रात्री एक वेगळी दुनिया जागी असते....माळावर मांजर उंदराचा पाठलाग करत धुडगूस घालत ...घरभर पाली फिरतात कीटक शोधत ....कुत्री केकाटतात ,रडतात ....साला कुत्री रडली की म्हणे कुणीतरी टपकतो ...आजूबाजूला कुणी वेटिंग वर आहे का हेही मनातल्या मनात तपासून झालय...स्वतःच्या जगण्याची खात्री करून ...त्यात आज ही घुबड बेरकी मोहिमेवर...बाहेर जाऊन कानोसा घ्यावा या शिकारी जगाचा ...टेबलफ्यान खाटखुट करत वारा देतोय...वैताग नुसता...वारा नको रे तुझा पण आवाज आवर...झोपू दे मला....सात टीप टोप ,एक मारी,,एक केळ गेलं पोटात...आवाज देतोय समुद्र...उगाच अस्वस्थ करून टाकते मेघना ...एवढ अस्वस्थ करणार का लिहितेस ग बाई?? चांगल काही लिही ना शांत झोप येईल अस...कुदळ घेऊन खोद्ल्यागत वाटत मनाला...मी म्हणजे आहे तरी कोण ??माणूस मारतो तेव्हा काय निघून जात ?? अदृश्यच असत ना ते ?? मग मी पण अदृश्यच.....असलं बरळण म्हणजे मानसोपचाराची गरज अस म्हणेल कुणी....म्हणेनात ..तरी ज्ञानेश्वराला २१ व्या वर्षी समाधी घ्यावीशी का वाटली असेल ??जगण्यातला फोलपणा कळला म्हणून?? पोर काढून लोकसंख्या फुगवायला करोडो आहेत...आपल अस्तित्वच त्या अदृश्य शक्तीत आहे मग हाय काय न नाय काय....विचार किती पटापट सरकतात ....झोप आली ...विष्णू नाना आणि मला नानासाहेबांकडून सोन्याच्या पोइंट वाला पेन मिळणार आहे...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

14 Sep 2014 - 2:19 pm | मनिम्याऊ

???

संचित's picture

14 Sep 2014 - 10:46 pm | संचित

भौ, हा सोन्याचा पेन व्हाय तरी काय ?

चौथा कोनाडा's picture

14 Sep 2014 - 10:57 pm | चौथा कोनाडा

क्रियेचर ३डी शिणुमाचा असंल का ह्यो ? पन असं येक वाटून र्‍हायलयं, ह्या लेखातल्या वळी एका-आड-एक लावल्या तं येकदम फाडू दुर्बोध कविता व्हईल. युनिवरशिटीला लावून टाकू.

पेनाचा पॉईंट जाऊदे पण ह्या लेखामध्ये काही पॉईंट आहे का तेच तपासावं लाहेल आता.

पॉईंट रोखून सगळेच लिहितात हो.बाकी एकंदर पॉईंट तुमच्या लक्षात आलेलाच दिसत नाही ...आपल्या जगण्यात काही पॉईंट आहे का तेही शोधाव मानसान कधी मधी...

विजुभाऊ's picture

15 Sep 2014 - 1:18 pm | विजुभाऊ

अरेच्चा. त्या कोणत्यातरी शरदिनी तै बहुतेक गद्द्यात ल्ह्यायला लागल्या की काय?
काय च्या काय...... लिटरेचरल डायरीया झाल्यासारख्या एकामागोमाग ओळी खरडून ठेवल्यात.

फुंटी's picture

15 Sep 2014 - 1:45 pm | फुंटी

अधाशी वाचनानेच होतो ना हो डायरिया.....

काउबॉय's picture

15 Sep 2014 - 2:33 pm | काउबॉय

Hopelessness of everything pop up in the mind. In short...मनाला मुरड घालून जगु नका तशी वेळ आली असेल तर आयुष्य व्यवस्थेत आवश्यक बदल करा.

लिखाणाचा संबंध लेखकाच्या मनस्थितीशी जोडणे नेहमीच रास्त नस्ते...

काउबॉय's picture

15 Sep 2014 - 3:20 pm | काउबॉय

100 वेळा.

फुंटी's picture

15 Sep 2014 - 3:03 pm | फुंटी

"विषयामध्ये आसक्ती नसते तेव्हा भाषा आपोआप दुर्बोध होते."

आदूबाळ's picture

15 Sep 2014 - 3:17 pm | आदूबाळ

हेही तितकंच खरं.

प्यारे१'s picture

15 Sep 2014 - 3:27 pm | प्यारे१

व पु काळे आठवले.
विषयात आसक्ती नसेल तेव्हा सगळं सक्तीचं होऊन जातं. ;)

आधी विमान डोक्यावरंन गेलं ...

विषय चांगला नोवडलाय पण अजुन थोडा फुलवायला हवा होता ...झोप आजच नाही ( ते ही त्या सोन्याच्या फांउटन्पेन मुळे की ई. ) की ते स्पष्ट नाही ..

झोप नव्हती तोवर लिहील ... झोप आल्यावर आणि गाढ झोप लागायच्या आधी एखाद्या गोष्टीने अचानक जाग येते...laptop चालू राहिला म्हणून मला अचानक जाग आली...त्यापूर्वी ग्लानीत समोर आलेल्या प्रतिमा लिहून टाकल्या ..विष्णूनाना ,मी आणि नानासाहेब आणि सोन्याचा point असलेल पेन ...परस्पर संबंध काय ते त्या क्षणी कळल नाही ...आताही नाही...

माणूस मारतो तेव्हा काय निघून जात ??
तसेच मी बेडुक का नाही ? मी गांडुळ का नाही ? मी मुंगी का नाही ? माणुसच का ? असे प्रश्न पडणे देखील चूक नाही.
मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

सुहास..'s picture

15 Sep 2014 - 4:14 pm | सुहास..

अरे रे बाणा !! तुम्ही " मुंगळा होवुन वस्तु पहायला शिकला नाहीत " .....ए जालीम का गालिब , तुने पी ही नंही ;)

आजची स्वाक्षरी :- मिपाकर म्हणुन शरमेची गोष्ट

लेख वाचुन मला मुक्तपीठीय 'स्वाती ठकार' यांची आठ्वण झाली. तुम्ही सकाळ वर 'स्वाती ठकार' या नावाने प्रतिक्रिया लिहता काय हो ?
ठरवुन देखील तशा प्रतिक्रिया लिहता येत नाहीत हो.

पशुपथिनाथ...ताठ उभी राहा... आणि इकडे बघ.. काय वाह्यातपणा चालवलाय? तुम्ही कधी साकीनाकाच्या जंगलात गेला आहात का हो? दुपारी ३ वाजता पण किर्र अंधार असतो म्हणे... तिथे जाऊन स्तनातन मंदिराजवळ मिसळ आणि तर्री खायची. पण बरोबर कमीत कमी २३ लोक तरी पाहिजेच. तरीपण तुम्ही ऐकायचं नाही हेच ठरवले असेल.. तर मात्र मला वेगळा उपाय करावा लागेल. मग मात्र मी तुम्हाला टाच दाखवीन.. चालेल ना? चल तर मग..

~आसिफ.

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2014 - 9:48 pm | टवाळ कार्टा

स्तनातन मंदिराजवळ

=))

शिद's picture

16 Sep 2014 - 7:02 pm | शिद

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2014 - 4:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

..विष्णू नाना आणि मला नानासाहेबांकडून सोन्याच्या पोइंट वाला पेन मिळणार आहे...पण नानासाहेबांच्या समाधि भोवती तर शेवाळ आणि घाणीच साम्राज्य झाल आहे...त्यात हे उरळी आणि फुरसुंगी वाले सतत आंदोलन करत असतात... आंदोलन संगठित सत्ता तंत्र या व्यवस्था द्वारा शोषण और अन्याय किए जाने के बोध से उसके खिलाफ पैदा हुआ संगठित और सुनियोजित अथवा स्वतःस्फूर्त सामूहिक संघर्ष है।... क्या जीत मे क्या हार मे, किंचित नही विचलीत मै, संघर्षमे जो भी मिला ये भी सही वो भी सही... सहि रे सही चे प्रयोग भरत ने का बर बंद केले?... सहि करण्यासाठी फाउंटन पेन हवय भो*** ते सुध्दा सोन्याच्या पोईंटचंटचा.. बर झाल त्याला टोपण सापडत नाहिते... मि.पा. वर बरेच जण टोपण नावाने का बरं लिहित असतिल?... असतिल त्याचे दात दिसतिल.... दातावरच्या किटणाला औषध काय?... काय बाई सांगु कस ग सांगु?... समस्त हिंदुस्तानातल्या शेळपट लोचट लाळघोट्या नेभळट आणि लाचार बांधवांचा विजय असो... हे यान एकदा मंगळावर पोचल कि सुटलो रे बाबा...

पैजारबुवा,

अन्या दातार's picture

22 Sep 2014 - 9:29 am | अन्या दातार

सोन्या कितवीत आहे हो?

...फारच विनोदी बुवा तुम्ही ....