कार्यालयातून मिपा कसे हाताळावे ? काही प्रश्न…

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
10 Sep 2014 - 3:59 pm
गाभा: 

मिपावर कधीही आणि कोणत्याही वेळी लॉगीन केल्यास (विशेषतः कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ) कमीत कमी २० विद्वान/विदुषी ऑनलाईन असतातच. ह्यातले साधारण ५० टक्के जरी समजा स्वतःचा व्यवसाय करत असले किंवा त्या दिवशी सुट्टी असली असे समजूया………. तरीही ह्यात काही असे अर्क नक्कीच असणार जे त्यांच्या कार्यालयातून मिपा पाहत असणार( नव्हे पाहतातच ).

मला नेहमी ह्या गोष्टीचे अप्रूप वाटत आलंय की कोणकोणत्या प्रकारे हे सगळे लोक्स मिपा पाहत किवा वाचत असतील? किती विविध प्रकारच्या संकटांना तोंड देत , जगाचे डोळे चुकवत, अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य अशी कोणतीतरी गोष्ट करतोय असा भाव मनात आणि चेहऱ्यावर आणत गपचूप मिपा पाहत असतील तेव्हा कशी त्यांची तारांबळ उडत असेल ? ( ह्यात अस्मादिकही आहेत ) तरी मला बरेच प्रश्न पडतात ते असे :

१) चोरून दूध पिणाऱ्या मांजराचे भाव त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर उमटत असतील का?
२) मिपा पाहताना अचानक बॉस किंवा सहकाऱ्यांची धाड पडल्यास तो हल्ला कसा परतवून लावावा(काय योगायोग आहे बघा…. हे लिहित असताना आमचाच बॉस माझ्या मागे उभा राहिला !! चला…) ?
३) दिवसरात्र मिपाची चटक लावून "मिपाधीन" झालेल्या माणसांकडे पाहून त्यांचे सहकारी (किंवा घरचेही ) काय विचार करत असतील ?
४) जर सगळे लोक असे कार्यालयात मिपा पाहत असतील तर त्या कार्यालयाच्या कामाचे काय होत असेल (मला नका विचारू !! )?
५) सगळ्या कार्यालयांना मिपाचे सभासद करून घेतले तर ह्या प्रकाराला सी एस आर खाली प्रोत्साहन देता येईल काय?
६) बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिपाच्या हाटेलात आलेली गिऱ्हाईक इतरही मराठी संस्थळांच्या ठिकाणी लेखनकला दाखवत असतात. इतका वेळ त्यांच्याकडे कुठून येतो?

अवांतर : कार्यालयातून मिपा पाहिल्यास त्याचा वास आयटीला लागतो का ?

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

10 Sep 2014 - 4:03 pm | मृत्युन्जय

मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी बसतो तिथुन माझा संगणक कोणालाच दिसत नाही. १- २ वेळा बॉसने त्यातुनही मिपा चालु असलेले बघितले. मी सांगितली मिसळपाव नावाची एक मराठी साईट आहे म्हणुन. बॉसने केवळ वोक्के म्हणुन सोडुन दिले :). तसाही माझा बॉस याबाबत खुप सोशिक आहे. जोपर्यंत मी पॉर्नो साईट्स बघत नाही किंवा ७००-८०० एम्बीचे चित्रपट डाउनलोडवायला लावत नाही तोपर्यंत तो काही बोलणार नाही,

तुषार काळभोर's picture

10 Sep 2014 - 5:02 pm | तुषार काळभोर

डिट्टो!!

+
आख्ख्या हापिसात लोक्स मला मिसळपाव या नावाने ओळखतात. माझ्या सिस्टमवर एकवेळ इमेल ओपन नसेल, पण मिपा नक्की ओपन असते.

प्रमोद देर्देकर's picture

10 Sep 2014 - 4:06 pm | प्रमोद देर्देकर

हो आयटीला सगळ्या गोष्टींचा सुगावा लागतोच लागतो. पण माझ्याकडे काहीच प्रश्न नाहिये. माझा आयटीवाला तर माझ्याकडे आला तर सरळ मोठ्याने विचारतो काय मग मिसळपाववाले कसं काय चाल्लंय तुमच्या मिसळपावचं ? काय विषेश नविन लेख वगैरे?
आता बोला.

तुषार काळभोर's picture

10 Sep 2014 - 5:05 pm | तुषार काळभोर

पण इथे मीच आयटीवाला आहे :)
त्यामुळे येता-जाता बरेच जण 'काय मिसळपाव? आज काय नवीन?' किंवा एखादी सहकारी'ण' "आज काय नवीन(पाकृ)?" असे विचारत असतात

उपजतच मल्टिटास्कर असल्याने कधी मॅनेजर ला गरज नाही पडली , अ‍ॅडमीन राईटस आहेतच ...पण मॅनेजर ला माझ्या डेस्क वर यायची हिम्मत आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे, अर्थात आम्ही कार्यालयातही भाईगिरी करतो अशी शंका देखील मनात आणु नये , आम्ही कार्यालयात, स्क्रिप्टींग नावाचा प्रकार कोळुन प्यायलेले असल्याने, सर्व काही अ‍ॅटोमेटेड करुन ठेवले आहे, हां, त्याबाबत मात्र दादा, आबा, साहेब, जी, मात्र आम्हीच ;)

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2014 - 4:18 pm | पिलीयन रायडर

माझ्या आख्या ऑफिसला मिसळपाव बद्दल माहिती आहे.. अनेकांनी "हे नक्की काय आहे?" असं विचारलं ही आहे.. सगळे लेख मी हापिसात बसुन लिहीलेले आहेत.. घरी लिहु म्हणलं की होत नाही (होते ते सोनेरी दिवस.. )

बॉसनी एकदा सौम्य शब्दात "बाळ असलं की घरी वेळ मिळत नाही स्वतः साठी,.. पण तरी जमल्यास कामकडे जास्त लक्ष द्या.." अशी घाबरत घाबरत विनंती केली होती!! तरीही आम्ही मिपावरच पडीक असतो ह्यातच काय ते आलं..!

vikramaditya's picture

10 Sep 2014 - 4:19 pm | vikramaditya

उलट उदाहरण पण आहे.

बहुतांश लोक आपल्या कामातुन वेळ काढुन मिपावर येतात.

पण सर्वांचे एक लाडके 'असे ते' मिपावर आणि आंजावर गरळ ओकण्याच्या कामातुन वेळ काढुन मग उरलेली कामे (असलीच) तर करतात. "देव" करो आणि एखाद्या सरकारी रोजगार योजनेतुन त्यांना काही रोजगार मिळो.

मग आपण 'कामा'तुन कसा वेळ काढुन लिहितो या विषयी ते सांगतील.

प्यारे१'s picture

10 Sep 2014 - 4:26 pm | प्यारे१

हा धागा एखाद्या 'मालकांनी अथवा बॉसने' सदरहू आयडीच्या माध्यमातून काढला असल्याची थिअरी ह्याठिकाणी आम्ही बोलून दाखवत आहोत. ;)

मामलेदारान्च्या पन्ख्याबद्द ल काहीही म्हणणं नाही मात्र सगळे सदश्य नेमकं काय करतात हे सम्जून घेऊन त्या प्रकारे काही उपाय्योजना करण्याचा गणिमी कहावा बॉसेस अथवा मालकांनी केला असण्याची दाट शक्यता व्यक्त करुन मी माझे चार शब्द ह्याठिकाणी संपवतो.

बॉस अथवा मालक ऑफिसातच असतो असं समजण्याची चूक करणारांना वाढदिवसाच्या आगाऊ आणि आगावू शुभेच्छा!

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Sep 2014 - 10:30 am | माम्लेदारचा पन्खा

म्हंजी असं व्हनार न्हाय तुमचं …. एशीपी पर्द्युमनला त्याचं काम करू द्या तिरक्या डोस्क्यान (त्ये बेनं कायमचं चिकटलंय तिथं ) …त्यैवजि आस्था आन संस्कार चायनल बघत चला !!!

त्या उत्तरांचा तुम्ही काय उपयोग करणार आहात हे कळल्याशिवाय उत्तरे देऊ शकत नाही.

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 4:48 pm | दिपक.कुवेत

देत आहेस ते सांगीतलस तरी पुरे.

अर्थात हापिसातून, एकदा घरी गेलं की मिपा बघायला वेळ कुठे असतो.

असं बिनडोक विधान केलेलं...."It has been observed that you are reading/viewing always Marathi sites". मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार. तेव्हापासून त्याने विचारणचं सोडून दिलं आणि शीवाय कामांवर परीणाम होत नसल्याने तो जास्त लक्ष देत नाहि. अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत (अगदि फोटो सीलेक्ट करुन ते पिकासावर अपलोड करण्यापर्यंत). तात्पर्य...बिनधास्त वाचतो आणि खर्‍या अर्थाने मिपा एंजॉय करतो (ऑफिसमधेच :D

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2014 - 4:57 pm | पिलीयन रायडर

अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत

वा!!! काय अभिमान आहे!!!

मी पण ताठ मानेनी सांगते की कान्हाची आक्खी सिरिज संपुर्णपणे हापिसात बसुन केली आहे.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2014 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!वा... वा ! =))

मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार.

हाण तेजायला!!!! एकच नंबर. मान गये.

अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेत

नशिब ऑफिसमधेच तयार केल्या नाहीत. ऑफीसमधे जर खिलवल्या तर तिकडुन ऑफीस कँटीनमधे बदली करतील ;)

बाकी आमच्या ईकडे प्रत्येकाला वेग्-वेगळे क्युबिकल आणि त्यातपण २ मॉनिटर असल्यामुळे धिंगाणाच असतो.

आवडता प्रांत असल्याने काम करण्यास मजा येईल पण दुर्दैवाने आमच्या कँटिन मधे फक्त चहा/कॉफि मिळते आणि त्या करीता ऑफिस बॉय आहे. हां पण पाकृ केलेले नयनरम्य फोटो (नुसते) दाखवण्याचे उदात्त कार्य मात्र चोख पार पाडतो. त्यांनाच खवचटपणे विचारतो मल्लू स्टाईल मधे....Ayoo which one is good?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2014 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

धागाकर्त्या प्रमाणे मला प्रश्न पडतात.
काकु वाचल्यावर जास्तच .
एक प्रश्न विचारतो काकु मध्ये मेगाबायटी प्रतिसाद देणार्यांचे कळफलक लोखंडी आहेत का ?प्लॉस्टीक असते तर केव्हाच मोडुन गेले असते.

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2014 - 4:59 pm | पिलीयन रायडर

हा एक अजुन मोठा प्रॉब्लेम आहे..
कानात ठ्णाणा गाणी वाजवत मिपा पहात बसलं आणि असले काही प्रतिसाद वाचले की भस्सकन हसायला येतं.. ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा खुप जोरात इतरांना ऐकु जातं..!

माझा पण एक प्रश्न.. दिवसभर सतत प्रतिसाद देत रहणारे नक्की पोटापाण्यासाठी काय करतात..?

बबन ताम्बे's picture

10 Sep 2014 - 5:06 pm | बबन ताम्बे

:-)

वा वा वा...मराठी बाणा सोडू नका....दिपकराव..अभिनंदन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2014 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही मोबाईलवरुन प्रतिसाद मिपा वाचतो. वर्ग आटोपले की मिपा मोबाईलवर सुरु. आमच्याशी लोकांनी बोलणं सोडून आहे. ते बोलत असतात आणि मी हु हुं करत मोबाईलवरुन मिपा चाळत असतो. प्रतिसादही मोबाईलवरुन लिहितो. वेळ लागतो पण काही आवश्यक ठिकाणी प्रतिसाद लिहितोच लिहितो. (मोबाईलची एक एक्स्ट्रा ब्याटरी ब्यागेत घेऊन जावी लागते)

मिसळपाव मराठीतलं एक अग्रणी संकेतस्थळ आहे आणि मी तिथे पडीक असतो आता एव्हाना सर्वांना कळुन चुकलं आहे. आमचे प्राचार्य मित्र माझं मोबाईल वेड पाहुन महाविद्यालयात ज्यामर लावायचं म्हणत आहेत. विद्यार्थी खुप मोबाईलवर असतात असं म्हणायला ते विसरले नाहीत. ;) (वाय फाय सर्वांसाठी आम्हीच खुलं केलं)

मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर सदस्यातले हे पडीक चाळीस पन्नास मिपाकर काय वाचत असतात काय माहिती. आणि मिपा बंद असतं तेव्हा यांचं हापिसातल्या कामात लक्ष असतं का, की माझ्यासारखे पानावर रिफ्रेस मारुन मारुन थकून जातात.

असो,

-दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 5:35 pm | दिपक.कुवेत

हे मिपा बंद असलं कि काहि सुचत नाहि, कामात लक्ष लागत नाहि. पान रिफ्रेश करुन काहि उपयोग नसतो म्हणा पण दर पाच मि. एक नविन आशा घेउन मी डोकवुन जातो.

खटपट्या's picture

11 Sep 2014 - 4:58 am | खटपट्या

मिपा बंद असेल तर मी आत्मू यांना चेपू वर विचारून खात्री करून घेतो.
(आमची लाईट गेलीय, तुमची पण गेलीय का ? या धर्तीवर)

धन्या's picture

11 Sep 2014 - 10:01 am | धन्या

मीसुद्धा वल्कवॉगनसोबत लघूसंदेशांची देवाणघेवाण करुन माहिती करुन घेतो.

मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर सदस्यातले हे पडीक चाळीस पन्नास मिपाकर काय वाचत असतात काय माहिती. आणि मिपा बंद असतं तेव्हा यांचं हापिसातल्या कामात लक्ष असतं का, की माझ्यासारखे पानावर रिफ्रेस मारुन मारुन थकून जातात. >>

आम्ही तर तुमचेच जुने लेख आणि प्रतिसाद वाचतो ब्वा ;)

आदूबाळ's picture

10 Sep 2014 - 6:08 pm | आदूबाळ

आल्ट टॅब या बटणांवर आमचं नितांत प्रेम आहे. कधी कधी मिपा बंद करून इमानदारीत आपलं काम करत बसलो तरी सवय म्हणून उग्गाच चारपाचदा आल्टॅब हानतो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Sep 2014 - 6:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एकेक पिढ्या स्मार्ट होत चालल्या आहेत हे नक्की. काम सांभाळून हे सर्व करणे म्हणजे कठीण काम आहे.लेखात +१वा २००% सहमत करण्यासाठी कदाचित कमी वेळ लागेल पण ग्रेट ब्रिटनचे विभाजन होईल्की नाही किंवा आर.बी.आय ला सल्ले,ओबामा,मोदी,नवाझ शरीफ्,चीनच्या अध्यक्षांना ईशारे देणारे लेख वाचले की बरे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2014 - 6:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चाणक्यांच्या बाण्यानी आम्ही हापिसाच्या खर्चानी मिपा पाहात नाही. (टु डु लिस्ट= आय.टी. अ‍ॅडमिन ला खोपच्यात घेणे आहे, रिमोट अ‍ॅक्सीस नी नं होणारी कामं शोधुन काढणे) त्यासाठी स्वतःचा फोन आणि ३जी वापरतो. =))

काउबॉय's picture

10 Sep 2014 - 6:21 pm | काउबॉय

यावर मिपा कसे चालते माहीत नाही पण आख्खा ब्राउजर शोर्टकीने आहे त्या स्थितीला विजिबल/हाइड करता यायचा. आता ब्राउजरच हाइड झाला झटक्यात तर त्यावर काय लोड झाले होते हां प्रश्न फक्त नेटवर्क गायच सोडवू शकतो

ताठ मराठी बाणा आवडला. बाकी हापिसातले लोक पटाचा उपयोग कसा करतात हे शोधणे मासा पाणी कधी पितो हे कळण्याइतके अवघड असते.

मार्क ट्वेन's picture

10 Sep 2014 - 8:46 pm | मार्क ट्वेन

आमच्या आफिसात 'देवनागरी अक्षर भैंस बराबर' असल्यामुळे आम्ही दिवसभर बिन्धास्त सगळ्या मराठी साईट्स उघडून बसतो. कोणी विचारलंच तर 'धिस इज अ‍ॅन इंडियन प्रोग्रॅमिंग हेल्प फोरम' म्हणून सांगायचं.

काळा पहाड's picture

10 Sep 2014 - 10:59 pm | काळा पहाड

आणि ज्ञानदेव आणि तुकारामांचा फोटो बघून कोण म्हणून विचारलं तर काय सांगायचं? सांगा हे या आठवड्याचे बेस्ट प्रोग्रामर्स म्हणून.

हाहाहाहाहाहाहाअहाहाहाहाहाहाहाअहाहा
खल्ल्ल्लास !

नाखु's picture

11 Sep 2014 - 8:58 am | नाखु

काही दिवस मिपा बंद होते म्हणून मी "हाफिसाकडे" दुर्लक्ष केले.आता मिपा आहे आनि कुणाकडेही "दुर्लक्ष"" नाही अति-अवांतर

आम्ही अजिबात "चेपु लागीर झाड" नसल्याने हाफिसात फार वांधा नाही.
सुबोध खरे's picture

11 Sep 2014 - 9:56 am | सुबोध खरे

मी सकाळी आणी संध्याकाळी दवाखान्यात मिसळपाव उघडून ठेवतो आणी वेळ मिळेल तसा वाचतो पण रुग्ण असतील तर नाही. रुग्णासमोर डॉक्टर मिसळपाव वाचत बसले आहेत हे बरे दिसत नाही. ( व्यावसायिक बांधिलकी का काय ते म्हणतात ना ?) बाकी एम टी एन एल चा अमर्यादित रुंद पट्टा कायम चालू असल्याने बंद करण्याची वेळ येत नाही. म्हणजे मी पण मिपावर नेहमी पडीक असतोच

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 10:34 am | वेल्लाभट

आणि तितकेच रोचक प्रतिसाद.
वाचून खूप दिलासा मिळाला की मी जे छोट्याशा विंडोत अधून मधून बाजूला, मागे बघत करतो ते पाप नाही आहे !... तसं तर सगळेच करतात... अगदी छातीठोकपणे :) वा. किती बरं वाटतंय. पण विंडो छोटीच ठेवलीय अजूनही. दिसतं ना.... या लॅपटॉपचं थोबाड सहजपणे अगदी. डेस्क म्हणजे अगदी चौकात बसवलंय माझं. येता जाता बाकीचे साले काही काम नसल्यागत लागणारं प्रत्येक डेस्क न्याहाळत जातात. वाईट सवयच आहे ती भारतीयांची. सिग्नल ला गाडी थांबली की बाजूच्या गाडीत डोळे घातल्याशिवाय रहातच नाही आपण. असो.

मिपा बघतो ऑफिस मधून. फक्त विंडो छोटी करून. अरे वा! यमक जुळलं.

>> मी जे छोट्याशा विंडोत अधून मधून बाजूला, मागे बघत करतो

हायला... मी पण...

मधुरा देशपांडे's picture

11 Sep 2014 - 11:55 am | मधुरा देशपांडे

मी पण. ऑफिसमधून छोटी विंडो करून. आणि आजूबाजूला लक्ष ठेवत. कुणीही टपकले तरी मी काम करते आहे असे दाखवायला इतर भरमसाठ विंडो पण ओपन असतातच. आधीची जागा चांगली होती. कुणाला काही फारसे दिसायचे नाही. ती जागा बदलली आणि सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी आले तेव्हा पहिला विचार हाच डोक्यात आला होता की आता मिपा मिपा कसे खेळणार.
@वेल्ला भट - दुसऱ्याच्या पीसी वर काय चालले आहे हे न्याहाळणारे फक्त भारतीयच नाही हो. सगळे लोक असेच करतात हा अनुभव आहे. इथे माझ्या आजूबाजूच्या कुणालाही मी काय वाचते हे समजत नाही. पण तरीही कामाशिवाय काहीतरी करते आहे अशा दृष्टीने बघतातच.

रायनची आई's picture

11 Sep 2014 - 11:20 am | रायनची आई

मी पण ऑफीस मधूनच मिपा बघते..पण माझा पीसी सगळ्याना दिसेल अशाच जागी आहे म्हणून काळजी घ्यावी लागते..आणि ऑफीस मधे कामही खूप जास्त असते त्यामुळे अनेकदा ठरवून ही प्रतिसाद देता येत नाही..शिवाय मराठी टंकायलाही मला वेळ जास्त लागतो ना..मलाही अनेक वेळा आजूबाजूच्यानी मिपा बघताना पकडलेले आहे..पण घरून बघायचा तर मी विचारपण करू शकत नाही कारण घरी अडीच वर्षाच्या फुलटु हायपर मुलाच्या मागे धावून एक क्षणाची ही उसंत नसते..

३) दिवसरात्र मिपाची चटक लावून "मिपाधीन" झालेल्या माणसांकडे पाहून त्यांचे सहकारी (किंवा घरचेही ) काय विचार करत असतील ?
काय म्हणणार? म्हणत असतील, "बरं आहे येताजाता आमचे डोके खाण्यापेक्षा काही बरा उद्योग करतो/करते आहे "

४) जर सगळे लोक असे कार्यालयात मिपा पाहत असतील तर त्या कार्यालयाच्या कामाचे काय होत असेल (मला नका विचारू !! )?

"कुणीही मान मोडुन काम न करता आमची बेन्सन आणि जॉन्सन कं इतकी वर्षे टिकली कशी याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. म्हणुनच हे जग चालावे म्हणुन कुणी काही करण्याची आवश्यकता आहे असे मला अजिबात वाटत नाही." इति धोंडो भिकाजी जोशी (असामी आसामी - पु. ल. देशपांडे)

६) बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिपाच्या हाटेलात आलेली गिऱ्हाईक इतरही मराठी संस्थळांच्या ठिकाणी लेखनकला दाखवत असतात. इतका वेळ त्यांच्याकडे कुठून येतो?
इच्छा असली की मार्गं मिळतोच . आता तुम्हाला नाही ़का इतका वेळ मिळाला इतक्या गहन प्रश्नांवर विचार करायला?
*smile* :-) :) +) =) :smile:

नित्य नुतन's picture

11 Sep 2014 - 3:10 pm | नित्य नुतन

कसला जिव्हाळ्याचा विषय..
नवर्याला म्हटलं, जरा लवकर घरी ये, तर म्हणतो मला हापिसात काम असतं. तुझ्यासारखा मिसळपाववर नसतो मी दिवसभर ...

मी संगणक स्क्रीनकडे बघुन मधेच हसले तरी आता हापिसात आजुबाजुचे समजुन जातात मिसळपाव वर आहे ...

मी हल्ली क्लिनिकमध्ये मिपा उघडणं बंद केलंय.नाहीतर दर दोन पेशंटच्या मधल्या वेळात मिपामिपा खेळायचे!! मग कधी अचानक एखादा प्रतिसाद काम करताना आठवुन खिक्क व्हायचं!मिपाच डोक्यात घोळतंय लक्षात आलं, जे माझ्या कामात योग्य नाही,मग क्लिनिकमधला भारत संचारचा रुंद पट्टा(धन्यवाद डाॅ.खरे!!)आता पेशंटच्या वेळात बंद म्हणजे बंद !!तरी इ.एक्कांच्या धाग्यावरच्या कलगीतुर्याच्या अपडेट्स घेतल्याच न राहावुन!

भावना कल्लोळ's picture

11 Sep 2014 - 3:26 pm | भावना कल्लोळ

आम्ही पण ऑफिस मधल्या वेळेतच मिपाकर असतो.

भिंगरी's picture

11 Sep 2014 - 3:34 pm | भिंगरी

{कधी अचानक एखादा प्रतिसाद काम करताना आठवुन खिक्क व्हायचं}<<<<<<<<<<<<
आज बाजारात जाताना रस्त्यातच मी खिक्क करुन हसले.(मिपावरचे अपचनावरचे प्रतिसाद आठवून)
आजुबाजुचे चमत्कारीक नजरने माझ्याकडे पाहू लागले.
इश्श्य बाई,किती किती लाज वाटली मला.

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 1:41 am | मुक्त विहारि

कोणे एके काळी ऑफीस मध्ये मिपा-मिपा खेळायचो.

सध्या मात्र जेमतेम अर्धा तासच मिळतो.

आणि

रात्री एखादा तास, त्यामुळे सध्या वेळ मिळत नाही.

बाद्वे,

मिपा घरच्या पेक्षा ऑफीसमध्येच जास्त खुलते.

इतरांना चिडवत, मिपाच्या कॉमेंट्स वाचतांना हसतांना जी मज्जा आहे, ती एकटेच खिदळतांना येत नाही...

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Sep 2014 - 3:33 pm | माम्लेदारचा पन्खा

सही प्रतिसाद....

मी रोज ट्रेन मध्ये दादर-ठाणे प्रवासात वाचतो.
पिरा ने म्हटल्याप्रमाणे "काही प्रतिसाद/लेख वाचले की भस्सकन हसायला येतं", बाजुचे एक-दोन जण पाहतात.
एखादा भावनिक लेख (उ.दा. रणजित चितळ्यांचा सियाचीन ग्लेशीयर) वाचतांना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, त्या लपवायच्या कशा हा प्रश्न पडतो.
प्रतिसाद वीकांताल टंकतो.

उडन खटोला's picture

16 Dec 2014 - 4:46 pm | उडन खटोला

लय भारी धागा ,आणि लय लय भारी प्रतिसाद

विवेकपटाईत's picture

16 Dec 2014 - 8:06 pm | विवेकपटाईत

.... असल्यामुळे कार्यालयात अंतरजाला वर जाता येत नाही. घरी आल्यावरच चिरंजीव लेपटोप वर काही करत नसेल तेंव्हाच.