. . फाळणी होणार का...

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
10 Sep 2014 - 2:00 pm
गाभा: 

ग्रेट ब्रिटनची फाळणी होणार का...
बीबीसी

Will David Cameron resign?

.

सध्याच्या घडामोडी पाहता ग्रेट ब्रिटनचे काय होणार असा प्रश्न आहे ? स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटनचा एक प्रांत आहे. तो फुटून निघाल्यास ब्रिटन पूर्वीप्रमाणे ग्रेट राहणार नाही. ब्रिटन व स्कॉटलंड १७०७ मधे एकत्र आले. १८०० साली आयर्लंड जोडले गेले. स्कॉटलंडच्या नेत्यांना वेगळे व्हायचे आहे. ब्रिटनच्या नेत्यांचा मात्र विरोध आहे. स्कॉटलंडमधील नैसर्गिक वायूंच्या साठ्यावर आम्ही निभावून नेवू असा स्कॉटलंडचा विश्वास आहे. आता तेवढे पुरेसे असते का ? याचा विचार झाला पाहीजे. हिंदूस्थानाला स्वातंत्र्य देताना ब्रिटनचे नेते म्हणत असत. "हू सेज इंडिया इज ए नेशन, इंडिया इज जस्ट ए पॉप्युलेशन" तसंच इथले लोक स्वातंत्र्याच्या लायकीचे नाहीत. ते जनावराप्रमाणे एकमेकांचे गळे चिरतील. असेही भाकीत त्यांनी वर्तवले होते. आमच्याकडचे काही टिकाकार सोयीप्रमाणे या वाक्याचा आधार घेतात. आज तो ब्रिटन फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. येणार्‍या १८ सप्टेंबरच्या सार्वमताचा निकाल काहीही लागो. सारं काही आलबेल
नाही. हे नक्की. आयर्लंडबाबतही उत्सुकता आहे.

जाता जाता

स्पेन आणि कॅनडामधूनही अशाच फुटीरतेच्या वार्ता येत आहेत. पाहूया काय होतय ते.

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

10 Sep 2014 - 2:11 pm | काउबॉय

पण विभाजन झाले तर मोठी चपराक बसेल. मजा आयेगा.

प्रसाद गोडबोले's picture

10 Sep 2014 - 2:15 pm | प्रसाद गोडबोले

माझ्या माहीती नुसार संपुर्ण आयर्लंड हे कधीच ग्रेट ब्रिटनचे पार्ट नव्हते , नॉर्थन आयर्लंड हा ग्रेट ब्रिटनचा पार्ट आहे , तोही विवादास्पद आहे .

फाळणी झाल्याने काही विषेष सिध्द होईल असे वाटत नाही .

ह्या प्रकाराची भारत पाकिस्तान फाळणीशी तुलना करणे अयोग्य आहे .

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2014 - 2:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

होऊ देत फ़ाळणी!!!, let these good for nothing south English understand the pain! Although it'll b a peaceful partition IT SHOULD HAPPEN, जनमत चाचण्या पण तेच म्हणत आहेत बहुतेक, सर्वे विभाजनवादी पक्षा च्या बाजूने आहेत बहुतेक.

विक्रान्त कुलकर्णी's picture

10 Sep 2014 - 2:32 pm | विक्रान्त कुलकर्णी

तसेही पहिल्यापासून स्कॉटलंड, वेल्स, इंग्लंड यान्चे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीते वेगळी आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलण्ड, कॅनडा सारखे वसाहतीचे स्वातन्त्र्य दिले जाईल अशी शक्यता वाटते. स्कॉटलंड स्वतंत्र झाले तरी आपल्याकडे दन्गली वगैरे झाल्या तसे काही होण्याची शक्यता कमी. बाकी सार्वमतानंतर कळेलच...

फक्त समाजकंटकामूळेच सुरु होतात असा विश्वास आहे. 1947 च्या दंगलीमागील अधिष्ठान याला अपवाद होते कारण त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले होते या जबरदस्त युक्तिवादावर माझा विश्वास नाही. जसे एक संयुक्त राष्ट्र म्हणुन आपण चीन विरोधी युध्दाला तयारीत न्हवतो तसेच एक राष्ट्र म्हणून आपण 1947 समाजकंटकाना काबू करायला उभे न्हवतो यापलिकडे दंगलीचे कोणतेही व्यावहारिक स्पष्टीकरण आहे का ?

स्कॉटलंडमध्ये ब्रिटनच्या एकूण भूभागापैकी एक तृतीयांश भूभाग येत असून ब्रिटनचा अण्वस्त्रसंपन्न नाविक तळ - 'ट्रायडंट' हा देखील स्कॉटलंडमध्ये आहे.
अधिक इथे :- स्कॉटलंडचे स्वातंत्र्य रोखण्यासाठी ब्रिटीश खासदारांची धावाधाव

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2014 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

या मुद्द्यावर अगोदर दोन रेफरंडम्स झाले आहेतः

१. First devolution referendum, 1979 : ५२% विरुद्ध ४८% अश्या निसटत्या मताने फाळणीची मागणी पराभूत झाली.

२. Second devolution referendum, 1997 : एकूण मतदारांच्या ४४.८७% ने मतदान केले. त्यापैकी ७४.३% मते मिळून स्वातंत्र्याची पहिली पायरी म्हणून स्वतंत्र स्कॉटिश पार्लमेंटला परवानगी मिळाली.

आताचा रेफरंडम Independence referendum, 2014 या नावाने ओळखला जातो आणि तो यशस्वी झाला तर स्कॉटलंड या नावाचे स्वतंत्र राष्ट्र आस्तित्वात येईल.

सद्या स्कॉटलंडच्या पार्लमेंटमध्ये सत्तेवर असलेली Scottish National Party (SNP) स्वातंत्र्याचा नारा देऊनच सत्तेत आलेली आहे. आतापर्यंतची हवा पाहता तो यशस्वी होईल असे रंग आहेत. स्कॉटिश प्रभावक्षेत्रात मिळालेल्या खनिज तेलाने त्या देशाच्या स्वतंत्र आस्तित्वाला बळकटी आली आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Sep 2014 - 3:54 pm | अविनाशकुलकर्णी

धागा पाहिला अन.. रॉयन्स डॉटर नावाचा अप्रतिम सिनेमा आठवला..
बाकि काळा पहाडला आवरायला साक्षात बाबुराव अर्नाळकर खाली उतरले पाहिजेत..अन्यथा अवघड आहे

बहिरुपी's picture

10 Sep 2014 - 8:35 pm | बहिरुपी

ज्यांनी आमच्या देशाची फाळणी करवली/केली, त्यांच्या देशाचीपण फाळणी नक्किच व्हावी.

आशु जोग's picture

17 Sep 2014 - 4:24 pm | आशु जोग

http://www.loksatta.com/desh-videsh-news/voting-in-scotland-906457/

स्कॉटलंडचे भवितव्य गुरुवारी ठरणार

गेली ३०५ वर्षे स्कॉटलंड राजकीयदृष्टय़ा इंग्लंडशी संलग्न आहे, तेथील ४० लाख लोकांपैकी एक तृतीयांश लोकांना स्कॉटलंड हा वेगळा देश असावा असे वाटते. स्वायत्तता मिळाली तर स्कॉटलंडची चांगली वाढ होईल असे त्यांचे मत आहे. स्कॉटिश संसदेला जादा आर्थिक व कायदेशीर अधिकार हवे आहेत.
सार्वमत आताच का?
स्कॉटलंडला वेगळा देश करण्याच्या मुद्दय़ावर स्कॉटलंडचे प्रथम मंत्री अ‍ॅलेक्स सालमंड यांनी मतदान घेण्याची घोषणा केली होती. त्यात सालमंड व इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात १८ सप्टेंबर २०१२ रोजी एडिंबर्ग करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्यामुळे हे सार्वमत कायदेशीर मानले जाते.
स्कॉटलंडचे इंग्लंडशी संबंध
स्कॉटलंडचे इंग्लंडशी संबंध चढउताराचे आहेत. ७०० वर्षांपूर्वी विल्यम वॉलेस व रॉबर्ट द ब्रूस यांनी स्कॉटलंडचे नेतृत्व केले. १५१३ मध्ये इंग्लंडने फ्लॉडेन येथे स्कॉटलंडचा पराभव केला व त्यानंतर स्कॉटिश व इंग्लिश यांचे १६०३ मध्ये एकीकरण झाले. त्या वेळी स्कॉटलंडचे राजे जेम्स सहावे हे सर्व ब्रिटिश बेटांचे राजे होते. १७०७ मध्ये स्कॉटलंड व इंग्लंड यांच्या राजकीय एकीकरणावर आणखी शिक्कामोर्तब झाले. राजकीय सत्ता लंडनकडे गेली, पण स्कॉटलंडची कायदा पद्धती कायम राहिली. मे २०११ मध्ये सालमंड व स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवून स्कॉटिश संसदेवर वर्चस्व प्रस्थापित केले.
स्कॉटलंडला काय मिळेल?
स्कॉटलंडला कर, कायदा, उत्तर समुद्रातील तेलसाठा यावर नियंत्रण मिळेल. स्कॉटलंडला आर्थिक जोखीम पत्करावी लागेल, संरक्षणावरही परिणाम होईल. परदेशी बँकांवर अवलंबून रहावे लागेल.

मतदान केव्हा व कसे?
स्कॉटलंडच्या सार्वमतासाठी १८ सप्टेंबरला सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होईल ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल. त्यात 'शुड स्कॉटलंड बी अ‍ॅन इंडिपेंडंट कंट्री' हा सहा शब्दांचा प्रश्न विचारला आहे व त्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर द्यायचे आहे. सात लाख लोकांनी पोस्टाने मतदान केले आहे. ५१ टक्के मते मिळाली तर स्कॉटलंड स्वतंत्र देश होणार आहे. एकूण मतदारसंख्या ४२ लाख ८५ हजार ३२३ आहे. १९ सप्टेंबरच्या सकाळी मतमोजणीचा निकाल जाहीर होईल.
स्कॉटलंड आणि ब्रिटनचे जुने नाते. परंतु आता या स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहत असून त्याचीच परिणती म्हणून येत्या १८ सप्टेंबर रोजी तेथे सार्वमत घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त एकूण घडामोडींचा हा धावता आढावा..

घटनाक्रम
५ मे २०११: एसएनपी पक्षाला १२९ पैकी ६९ जागा मिळाल्याने स्कॉटिश सरकारची स्थापना. २०१६ पर्यंत सरकार चालवण्याची मुदत.
ऑगस्ट २००७ ते नोव्हेंबर २००९ : स्कॉटिश सरकारने सार्वमताविषयी राष्ट्रीय चर्चा सुरू केली.
२५ जानेवारी २०१२: युवर रेफरेंडम मोहिमेची सुरूवात
११ मे २०१२ : मोहिमेला २६ हजार जणांचा प्रतिसाद.
१५ ऑक्टोबर २०१२: एडिंबर्ग करारावर स्वाक्षऱ्या
३० जानेवारी २०१३: सार्वमताचा प्रश्न काय असावा यावर स्कॉटिश सरकारशी मतैक्य
५ फेब्रुवारी २०१३: स्कॉटिश सरकारने घटनात्मक रचना कशी असेल ते प्रसिद्ध केले, मार्च २०१६ पर्यंत स्कॉटलंडला स्वातंत्र्य मिळण्याची अपेक्षा.
१२ मार्च २०१३: स्कॉटिश स्वातंत्र्य सार्वमत विधेयक स्कॉटिश संसदेत सादर.
१४ नोव्हेंबर २०१३: स्कॉटिश स्वातंत्र्य सार्वमत विधेयक स्कॉटिश संसदेत मंजूर.
२६ नोव्हेंबर २०१३: स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याविषयी मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध.
१८ सप्टेंबर २०१४: स्कॉटलंडच्या सार्वमतासाठी मतदान.

पान्डू हवालदार's picture

11 Sep 2014 - 1:31 am | पान्डू हवालदार

"स्पेन आणि कॅनडामधूनही अशाच फुटीरतेच्या वार्ता येत आहे" ? हे कुठे वाचले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पेनमध्ये Basque Country आणि Catalonia हे स्पेनपेक्षा वेगळी भाषा आणि संस्कृती असणारे दोन प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत.

कॅनडामध्ये फ्रेंच भाषिक Quebec प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी १९८० आणि १९९५ साली रेफेरंडम झाले आहेत.

माझ्या समोरचा डेव्हीड म्हणतो...आय अ‍ॅम नॉट ब्रिटीश...आय अ‍ॅम वेल्श!!!
आय डोन्ट नो हू इज द क्वीन. शी डज नॉट नो मी, आय डु नॉट नो हर!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Sep 2014 - 8:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

"डिव्हाईड अ‍ॅंड रुल" वाल्यांना चपराक बसल्याचा आनंद आहेच.
ते म्हणतात ना "कर्मा ईझ अ बि*" =))

पैसा's picture

11 Sep 2014 - 9:51 am | पैसा

तसेही आपण बोलताना सगळ्या 'ग्रेट ब्रिटनला' इंग्लंड असं सहजच म्हणतो. त्यांच्या एकूण राज्यघटनेशी आपल्याला तसे देणे घेणे नसतेच. ते खरे युनायटेड किंग्डम आहे. म्हणजे देशांचा संघ असे काहीसे?

समजा यु.के. ची फाळणी होऊन आता स्कॉटलंड वेगळे झाले तर उद्या वेल्स आणि राहिलेला आयर्लंड यांनाही स्वतंत्र व्हायला जोर येईल. मात्र इंग्लंडची राणी ऑस्ट्रेलियाची अधिकृत राणी आहे तसे या देशांचेही असेल का?

सुनील's picture

11 Sep 2014 - 10:10 am | सुनील

तसे आजदेखिल इंग्लंड आणि स्कॉटलंडातील लोक आपापल्या प्रदेशांना देश (country) असेच संबोधतात.
(स्कॉचच्या बाटल्यांवर 'मेड इन स्कॉटलंड' असेच छापलेले असते! ;))

स्कॉटलंडचे स्वतंत्र पार्लमेंट आजदेखिल आहे. फक्त तिथे प्राइम मिनिस्टरऐवजी फर्स्ट मिनिस्टर असतो.

कॉमनवेल्थ खेळांत आजही स्कॉटलंड स्वतंत्रपणे भाग घेतेच.

मुख्य गोष्ट चलनाची. बँक ऑफ इंग्लंडप्रमाणेच बँक ऑफ स्कॉटलंडच्या नोटादेखिल चलनात आहेत. त्यांचे मूल्य एकसारखे आहे आणि त्या एकमेकांऐवजी वापरता येतात, हे खरे.

उद्या जर स्कॉटलंडने वेगळे व्हायचे ठरवलेच तरी, बहुधा हेड ऑफ स्टेट (सध्या राणी) ही एकच राहील असे दिसते. बहुधा सैन्यदेखिल एकच असेल.

मग नक्की वेगळे असे काय होणार आहे (झालेच तर), ते पुरेसे स्पष्ट नाही.

मग नक्की वेगळे असे काय होणार आहे (झालेच तर), ते पुरेसे स्पष्ट नाही.

बहुदा घटना/कायदा यात पूर्ण स्वायत्तता येईलच. चिवाय सैन्य सर्वार्थाने एकच असेल का कल्पना नाही.
सध्यातरी चलन बदलेल असे वाटत नाही. मात्र काहि काळात ते एकमेकांना टाईड राहिलच का हे स्कॉटलंडमधील भूगॅस किती परतवा देतोय त्यावर ठरावे

पैसा's picture

11 Sep 2014 - 10:55 am | पैसा

म्हणजे शिल्लक राहिलेला ब्रिटन आणखी गरीब होणार तर!

आशु जोग's picture

11 Sep 2014 - 12:19 pm | आशु जोग

इतक्यात तरी संरक्षण क्षेत्रात फार वेगळी चूल मांडली जाणार नाही. आर्थिक आणि बँकींग क्षेत्रातही तेच सहकार्य राहील. परराष्ट धोरणात सूक्ष्म बदल दिसायला लागतील. कुठेतरी वेगळी अस्मिता दिसायला हवीच.

विजुभाऊ's picture

11 Sep 2014 - 11:01 am | विजुभाऊ

असा काय फरक पडणार आहे? तसेही इंग्लंड सध्या एक ट्रेडिंग नेशन म्हणूनच शिल्लक आहे.

प्रसाद१९७१'s picture

11 Sep 2014 - 11:30 am | प्रसाद१९७१

फारसा काही फरक पडणार नाहीये ह्या फाळणी नंतर ( जर झाली तर ). ही काही भारत्-पाकीस्तान सारखी फाळणी नाहीये की त्यामुळे LOC तयार होइल वगैरे.
इंग्लीश आणि स्कॉटीश लोक गेल्या ४०० वर्षात मिसळुन गेली आहेत.
दोन्ही देशांचे इंटरेस्ट पण एकमेकात फार गुंतलेले आहेत जे वेगळे काढणे कठीण आहे. दोन वेगळे देश झाल्यामुळे कंपनी आणि व्यापाराला मात्र फाल्तू अडथळे येणार आहेत.

कदाचित १०-१५ वर्षानी पुन्हा एकत्रीकरण करायला लागेल.

आशु जोग's picture

19 Sep 2014 - 12:46 pm | आशु जोग

बंगालचीसुद्धा फाळणी झाली होती

त्यावेळी ती रद्द झाली तरी पुढे वेगळा बांगलादेश बनल्याशिवाय राहीला नाही...

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 12:09 pm | बॅटमॅन

चलन तेच ठेवून पोलिटिकली विभक्त होणार असतील तर मात्र अवघड आहे असे तो पॉल क्रुगमन सांगत होता बॉ.

सुनील's picture

11 Sep 2014 - 12:13 pm | सुनील

चलन तेच ठेवून पोलिटिकली विभक्त होणार असतील

युरो झोनमध्ये काय वेगळं आहे?

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 12:14 pm | बॅटमॅन

होय तेच ते. त्यामुळे ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, इ. देश कसे बोंबललेत आणि त्याचा परिणाम जर्मनी इ. अन्य ष्ट्राँग देशांवरही वैट्ट होतो ती परिस्थिती इंग्लंडवर ओढवेल/ओढवू शकेल म्हणून तसे नको असे तो म्हणतो.

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 12:45 pm | प्रसाद गोडबोले

मिसळपाव वरील फुटीरतावाद्यांना चपराक !

http://maharashtratimes.indiatimes.com/international/scottish-referendum...

अखेर स्कॉटलंडने ग्रेटब्रिटन मध्येच राहण्याचा निर्णय घेतला :)
मिसळपाव वरील काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की ज्यांनी आपल्या देष्हाची फाळणी केली त्यांच्या देषाची फाळणी होणार म्हणुन ! किती विकृतही मनोवृत्ती !!

अखेर स्कॉटलंडच्या जनतेने फुटीरता वाद्यांना चांगला धडा शिकवलाय ... ह्याचे सारे श्रेय आपण त्यांचा जनतेला द्यायला हवे . शिवाय इंग्लंड मधे कोणी गांधी नेहरु वादी नव्हते त्याचा इंग्लिश / ब्रिटिश जनतेला प्रचंड फायला झाल्याचे दिसुन येत आहे !

लॉन्ग लिव्ह द क्वीन :)

धर्मराजमुटके's picture

19 Sep 2014 - 12:49 pm | धर्मराजमुटके

पण महाराष्ट्रात युतीची फाळणी झालीच.

आशु जोग's picture

19 Sep 2014 - 12:50 pm | आशु जोग

तुम्हाला राणीचे फार प्रेम

तुम्ही काय राजे का !

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 1:19 pm | प्रसाद गोडबोले

राणीवर प्रेम तर आहेच हो .... तब्बल नऊ पोरं जन्माला घालुन राहिली , आम्ही राजे नाही पण राजाचा हेवा वाटुन राहिला *man_in_love*

आम्हाला राणीच्या प्रेमापेक्षा फाळणीचे खापर ब्रिटीशांवर फोडणार्‍यांचा राग जास्त आहे ... एक माणुस लिंकन सारखा असता तर भारताची फाळणी टाळता आली असती :( , आमचे नेतृत्वच कुचकामी होते त्याचे खापर राणीवर का फोडता ??

स्कॉटलंडने विभक्त न होन्याचा निरनय या ठिकानी या माद्यमातूण घेटलेला हाये.

बेटर लक नेक्स्ट टाईम ?

आशु जोग's picture

16 Jan 2015 - 12:46 am | आशु जोग

११० वर्षापूर्वी बंगालच्या फाळणीचा प्रयत्न झाला होता, बीजे रोवली गेली. तेव्हा नाही पण नंतर त्याचा परिणाम निश्चित दिसून आला. इथेही लोकांच्या भावना Yes Please आणि No Thanks मधून लक्षात आल्या. मतदानात हरल्यावरही चर्चा स्वातंत्र्यवाद्यांचीच होते आहे.