The morning after..

निखळानंद's picture
निखळानंद in काथ्याकूट
9 Sep 2014 - 4:35 pm
गाभा: 

आदल्या रात्री उत्सव साजरा करताना अनवधानाने, जोशात किंवा धुंदीत काही खबरदारी घ्यायची राहून गेली तर त्यातून काही अनपेक्षित, अनावश्यक असे घडू नये म्हणून बाजारात 'The morning after pill' मिळते. सुजाण आणि समंजस लोक ती घेतात..

पण दहा दिवस दणक्यात उत्सव साजरा केल्यावर आणि दहाव्या रात्री त्याचा कर्णकर्कश परिपाक मोठ्या धामधुमीत केल्यानंतर अकराव्या सकाळी त्याच्या परिणामांची तमा न बाळगता आपण आपल्या कामाला लागतो. किंबहुना आपल्या जल्लोशी उत्सवाचे काही दुष्परिणाम असू शकतील हे आपल्या गावीही नसते..

But all is not lost....
आज मुंबईच्या चौपाट्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवणा-या लोकांना, त्यांच्या विचारप्रक्रियेला, त्यांच्या कृतीशीलतेला, त्यांच्या सद्भावनेला माझा आत्यंतिक मानाचा मुजरा !
त्या महासागराने साभार परत केलेले आपल्या उत्तुंग, भव्य, दिमाखदार, 'राजे'शाही पापांचे ढिगारे उचलण्याचे काम ही मंडळी करत आहेत.
त्यात कदाचित काही विद्यार्थी जबरदस्तीने कार्यकर्ते म्हणून ओढले गेले असतील आणि अनिच्छेने किंवा चरफडतही ते हे काम करत असतील.. पण मोठे झाल्यावर योग्यायोग्यतेचे निकष लावण्याएवढे समंजस आणि सुजाण नागरिक ते या कामातून नक्कीच झालेले असतील.. त्यांनाही आजच प्रणाम!
पुण्यात मानाचे गणपती असतात. त्यांच्या क्रमांकानुसारच त्यांची मिरवणूक निघते. पण ते सगळे मानाचे गणपती देखील या कार्यकर्त्यांना पहिल्या क्रमांकाचा मान देतील.. त्यांची मिरवणूक निघत नसली तरीही..!

All is not lost म्हणताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मुंबईत आता खास विसर्जनासाठी artificial ponds तयार करतात. गेल्या वर्षी अश्या ponds मधे सुमारे 22000 मूर्तींचे विसर्जन झाले. या वर्षी तो आकडा काकणभर जास्तच असेल. या बाबतची सजगता आणि मान्यता वाढतीये ही आनंदाची बाब..!

प्रतिक्रिया

बर्‍याच दिवसांनी दिसलात !!

गणेशोत्सव याकाळातही सार्वजनिक असावा का हा विचार करण्याची खरंच गरज आहे.

निखळानंद's picture

9 Sep 2014 - 5:10 pm | निखळानंद

टिळकांनी सुरु केलेला हा गणेशोत्सव नक्कीच नाही..
सार्वजनिक असलेले काहीच आता चांगले असत नाही..
मला वाटतं समूहानी करण्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी एक चांगला नेता असावा लागतो.
गल्लोगल्ली चांगले नेते येणार कुठुन ? योग्य मार्गदर्शना अभावी मग मेंढरं हैदोस घालतात...

कवितानागेश's picture

9 Sep 2014 - 7:25 pm | कवितानागेश

पण बंद करणं कठीण आहे. निदान यापुढे अजून नवीन गणेशोत्सव मंडळांना मान्यता देउ नये.

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 5:24 pm | काळा पहाड

सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2014 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

निखळानंद's picture

9 Sep 2014 - 5:37 pm | निखळानंद

अहो चांगली खाज असलेले कार्यकर्ते ही आहेत म्हणून त्यांच्या गौरवा साठीच तर मी हा धागा काढला.
नाहीतर 'गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप' या विषयावर इतर धागे आहेतच..
सगळ्या अनागोंदीत काहीतरी चांगले बघावे म्हणून मी या चौपाटी स्वछ करणा-या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवला..

नवीन दिसतांय म्हणून सांगतो, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देत बसू नका. एकदा मिपार्पणमस्तु केलंत की आभाराचं भाषण द्यायला एक प्रतिसाद टाकावा.

*हे माझं मत झालं, शेवटी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ;)

>>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, मोहर्रम, न्यू इयर इ.) कायद्यानं बंद केले पाहिजेत. ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायची खाज आहे अशा कार्य्कर्त्यांना सरकारने पकडून त्यांच्याकडून गटारी साफ करणे, रोड दुरुस्त करणे, रस्त्यावरचा कचरा उचलणे इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

शब्दाशब्दाशी सहमत !! *HAPPY*

विजुभाऊ's picture

9 Sep 2014 - 5:30 pm | विजुभाऊ

इत्यादी कामं (जबरदस्तीनं) करून घ्यावीत.

हे सूड घेणे झाले

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 5:32 pm | काळा पहाड

बर मग?

भिंगरी's picture

9 Sep 2014 - 10:57 pm | भिंगरी

सूड घ्या,आसूड ओढा,पण स्वच्छ्ता करून घ्या हो.

आव्ह तुमचं म्हणणं एकदम खर हाय बगा. पन आपल्याकडे कायदाच लोकांना हवीतशी भक्ती करायची परवांगी देतो न.
मंग हे लोक तिथ पण केस खेळतील अन जिकतील पन.
आजचा पेपर वाचला तर चांगल्या बातम्या आइवजि गणेशोत्सवाचे वाभाडे काढणाऱ्या बातम्याच जादा.
अन त्यात तुमी अश्या pill वगैरे ची नावं घेता ते पण तेवढच खर हाय. मेडिकल मधी त्याप्रमाने मिळणाऱ्या साधनांची इक्री लई वाढते नवरात्र,रंगपंचमी,गणपती या काळात.
आता सार्वजनिक उत्सव हे कमाईच साधन हाये. कोन बंद करायची भाषा करणार?

पैसा's picture

10 Sep 2014 - 9:10 am | पैसा

चांगले उपक्रम करणार्‍यांचे अभिनंदन आणि आभार! त्यांचं काम नेहमीच दुर्लक्षित रहातं.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता सगळे सार्वजनिक उत्सव बंद करावेत यावर सहमत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2014 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा

@१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता सगळे सार्वजनिक उत्सव बंद करावेत यावर सहमत आहे.>>> ++++++११११११११

मराठी_माणूस's picture

11 Sep 2014 - 3:00 pm | मराठी_माणूस

आणि झुंडीने जाणार्‍या पदयत्राही

मराठी_माणूस's picture

11 Sep 2014 - 3:00 pm | मराठी_माणूस

आणि झुंडीने जाणार्‍या पदयात्राही

विशारद's picture

10 Sep 2014 - 7:17 pm | विशारद

मस्त लेख..
अगदी मनातले पानावर..!
@ पैसा -- तुमच्या प्रतिसादाला पूर्ण सहमती!