मोग~याचा गजरा .....

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Sep 2014 - 9:15 am

गोष्ट जुनी आहे

लुधियाना ला "हीरो मॅजेस्टिक लिमिटेड" नावाची सायकल.. मोटर सायकल ला लागणारे स्पेअर पार्ट्स बनवणारी अग्रगण कंपनी आहे..
आमच्या युनिट ला त्यांच्या प्रॉडक्ट साठी गेजस बनवण्याची तगडी ऑर्डर असायची..
कंपनी कडे अडीच ३ लाखाची बिले थकली होती..तसेच लुधियाना ला एक लोकल ट्रेडर पण होता त्याच्या बिलाची वसुली पण करायची होती..म्हणून लुधियाना ला जाण्याचे मी ठरवले.
नेमकी त्याच वेळी हिच्या ब्यांकेस २-३ दिवसाची सुटी आली होती आणखीनं रजा टाकून हि म्हणाली "मी पण येणार"
मी होकार दिल्यावर ति पण खूश झाली व लुधियानाचे काम झाले की दिल्ली ला जाऊ असे सुचवू लागली.
मला वसुलीचे टेन्शन होते त्या मुळे वसुली झाली तर जाऊ नाहीतर "सवेरेवाली गाडी से पुना...असे सांगितले.
लुधियानाला आल्यावर "धंटाघर " परिसरातील एका चांगल्या हॉटेल मध्ये उतरलो..
दुस~या दिवशी स्नान ..चकाचक दाढी करून मी १० च्या सुमारास कामासाठी बाहेर पडलो..
कारखाना हॉटेल पासून ५-६ की.मी दूर होता..रिक्शांनी पोहोचलो..
नमस्कार चमत्कार झाले अन मी बिलाची लिस्ट पर्चेस च्या ऑफिसरला दिली..
मग ति अकाउंट्स नंतर फायनास मधे फिरु लागली.
शेवटी ३-३.३० च्या सुमारास चेक तयार झाल पण साईनिंग ऍथॉरिटी जागेवर नव्हती..ति आला अन एकदाचा चेक हातात पडला अन मी मनात हुश्श केले..
४ च्या सुमारास एक नवी ऑर्डर हातात घेऊन सर्वांची आभार मानत कारखाना सोडला..
तिथून तडक ट्रेडर कडे आलो..तास भर वेळ घालवल्यावर दहा हजाराची कॅश हातात पडली ..चोराची लंगोटी..
५.३० वाजून गेले होते..ट्रेडर च्या दुकानातून हिला फोन केला व म्हटले काम मनासारखे झाले आहे..तयार राहा बाहेर जायचे फिरायला म्हणून..
हॉटेल वर येताना एक फुलाचे दुकान लागले तिथून मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले..
हॉटेल वर येतायेता ६-६.१५ वाजुन गेले होते..मी रुम वर गेलो हि नट्टा पट्टा करून तयार होतीच..
आल्याआल्या तिच्या हातात रक्कम व चेक दिला व फ्रेश होण्यास बाथरूम मध्ये गेलो.
बाहेर आल्यावर हिला सांगितले "तुला गजरे आणले आहेत" गजरे पाहिल्यावर ति पण खूश झाली..
तयार झाल्यावर हिला म्हटले "मी काउंटर वर जरा चौकशी करतो..तू रूम आवरून लॉक लावून ये" व निघालो..
खाली काउंटर वर मॅनेजर कडे कोणते चांगले हॉटेल जेवण्या साठी इत्यादी विचारत असताना हि गजरे माळत जिना उतरत होती..
व मॅनेजर माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता हिच्या कडे बघत होता..
मी टेबलावर टकटक केले अन माझ्या कडे लक्ष वेधले..हि पण सोफ्यावर जाऊन पेपर चाळत बसली..
मात्र मॅन्येजर तिच्या कडे बघत होता..
मी नजरेनेच "काय? असे विचारले..
त्या वर तो म्हणाला"सर जी आपको एक बोलू तो चलेगा?"
मी मान डोलवताच ..तो म्हणाला" मॅडम जी को गजरा उतारनेको बोलिये मी मानेनेच "क्यु" असे विचारताच तो म्हणाला सरजी..ईधर का रिवाज है कि अच्छ्यी घरकि औरते गजरा नही सजाती... "वोह टाईप" की औरते गजरा सजाकर घुमती है"
मी हिच्या कडे आलो अन तिला कानात सांगितले की गजरा काढ..कारण ऐकताच हिने गजरा काढला व पर्स मध्ये ठेवला.
बाहेर आल्यावर आम्ही दोघेजण ब~याच वेळ हसत होतो..
दक्षिणे कडे बंगळूर.चेन्नईला गेले की पार शाळकरी मुली ते ६०-६५ वर्षाच्या आज्या डोक्यात गजरे घालून मिरवत असतात..आणी हरयाणा लुधियाणा त हा प्रकार..किती विविधता आहे भारतात ....

समाज

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

9 Sep 2014 - 11:36 am | खटपट्या

छान अनुभव !!
किती विविधता (?) आहे भारतात.

एस's picture

9 Sep 2014 - 11:40 am | एस

मस्त अनुभव!

काय तो मोगरा आहा...काय त्याचा गंध...
पार मनाला करुन टाकतो धुंद.
आणि हे सरदार
कुठे त्यांची बुद्धि होते बंद....

काय म्हणावे यांच्या अरसिक पणाला...मनाला?

तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही.
आणि हे सरदार
कुठे त्यांची बुद्धि होते बंद...

जोक्स पोस्ट केल्यास खबरदार!
Jul 24, 2014, 01.37AM IST
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शीख समुदायांबाबत जोक्स पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे या समुदायाच्या भावना दुखवल्या जातात. यापुढे अशाप्रकारचे जोक्स पोस्ट केल्यास संबंधिताला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. याबाबतचे आदेश गुन्हे शाखेने दिले आहेत. तक्रार केल्यास कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. जोक्स, कमेंट्सच्या माध्यमातून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याबाबत रेणू यांनी पाठक यांचे लक्ष वेधले. रेणू यांनी पाठक यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली. शीख समुदाय सत्यनिष्ठा, धाडस व त्यागाचे प्रतीक आहे, असेही रेणू यांनी पाठक यांना सांगितले. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रेणू यांनी केली. पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश राऊत यांनी परिपत्रक काढले. त्यानुसार शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे जोक्स किंवा पोस्ट टाकल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/jokes...

रवीराज's picture

9 Sep 2014 - 11:29 pm | रवीराज

लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद, यापुढे खबरदारी घेतली जाईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2014 - 9:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि हे सरदार
कुठे त्यांची बुद्धि होते बंद....

मा़झ्या आयुष्यात जेवढे सरदारजी मित्र आहेत ते सर्व अतिशय रसिक, बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. कुठल्या कर्मदरिद्री माणसानी सरदारजींवर जोक करायची प्रथा सुरु केली तो महामुर्ख असणारे. बाकी तुम्हाला सरदारजी टॅक्सीवाला, १०० रुपये आणि सरदारजींवर जोक करणार्‍यांची गोष्ट ठाऊक असेलचं.

विजुभाऊ's picture

9 Sep 2014 - 12:33 pm | विजुभाऊ

हा संस्कृतीचा परीणाम आहे.
उत्तरभारतीय लोक हे असेच. स्त्रीयांना मान देणे हे त्याम्च्या संस्कृतीतच नाहिय्ये.

टवाळ कार्टा's picture

9 Sep 2014 - 2:16 pm | टवाळ कार्टा

भारतातील कोणत्या संस्कुतीत स्त्रीभ्रुणहत्या होत नाही? किंवा मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत नव्हता/लागत नाही???

सहमत. अख्ख्या भारतात सर्वांत पुरुषप्रधान असतील तर ते नार्दिंडियनच.

उत्तर भारतीय विषेशतः एन सी आर च्या आसपासचे जरा जास्तच

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:54 pm | बॅटमॅन

लैच. :(

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

अनुभव आणि अनुभव कथन दोन्ही खासच आहे.

फक्त...
>>>> मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले..

३ मोगर्‍याचे नाही तर.... 'मोगर्‍याचे ३ गजरे खरेदी केले.' असे वाक्य हवे.

"पण साईनिंग ऍथॉरिटी जागेवर नव्हती..ति आला अन एकदाचा" हे नक्कि कोणतं लिंग म्हणायचं?

सविता००१'s picture

9 Sep 2014 - 2:53 pm | सविता००१

आमच्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी आई-वडील, भाउ आणि मी गेलो होतो. १० वर्षे झाली असतील. तेव्हा तिथल्या गुरुजींनी आईला आणि मला पूजेला बसणार तर गजरा किंवा फुलं केसात का माळली नाहीत असं विचारलं होतं. आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो होतो. रीतिरिवाज फारसे माहित नव्हते तिथल्या देवळांमधले. तर स्वतः गुरुजींनी त्यांच्या मुलीला पाठवून गजरे मागवून घेतले, ते आम्हाला घालायला लावले आणि मग पूजा केली आईबाबांनी.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2014 - 2:53 pm | मुक्त विहारि

झकास...

लेखाचे बदलेले शिषेक, लेखातला आधीचा गायब झालेला भाग... या वरुन अकु परत त्यांच्या मूळ पदावर येत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

बिल वसुलीचं उपाख्यान काही कळलं नाही ब्वा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2014 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोगर्‍याचा किस्सा भारीच.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

11 Sep 2014 - 4:52 pm | तिमा

मोगर्‍याचे गजरे लिहिताना तुम्ही 'मोग~याचे गजरे' असं लिहून त्यांना कोमेजवून टाकले आहे.

या अविकाकांना लय ईट्रेस्ट ब्वा गजर्‍यात आणि माळणारीत ;)