बिनडोक बनियान आणि मार्मीक मदिरा !

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
9 Sep 2014 - 12:01 am

बिइंग इडीयट मला इडीयट बॉक्स फ़ार आवडतो. मी बटाटा कोच ही आहे त्यामुळे तंगड्या वर करुन सतत बॉक्स बघत बसतो. सारख खात ही असतो (डीप्रेस्ड माणसं सारखी विनाकारण काही ना काही तोंडात टाकतच असतात त्याला स्ट्रेस इटींग अस कायतरी म्हणतात ) माझ वजन वाढतयं केस पांढरे होताहेत मात्र पगार काही केल्या वाढत नाहीये. सर्वच हातातुन निसटल्यासारख वाटतय. पुर्वीसारख पोरीं ना इम्प्रेस करणं जमतच नाहीये. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इम्प्रेस करण्याची तृष्णा च कमी कमी होत चाललीय हो हल्ली. हे म्हणजे खुप च झालय. हल्ली माझी आवडती मालिका होणार सुन मी ह्या घरची देखील मला अपील होत नाहीये. अशा भयाण अवस्थेत मग मी जाहीरातींवर लक्ष केंद्रीत करायच ठरवलं. आणि काय सांगु माझा हौसला देखील वाढला आणि हसुन हसुन मनोरंजन देखील छान झालं.
तर माझा रीसर्च पेपर दोन उत्पादनांवर आधारलेला आहे. एक म्हणजे बनियान ( हे एक प्रकारच अंर्तवस्त्र पुरुष सदरयाच्या आत घालतात ) यात खर म्हणजे एक जोडी असते बनियान सोबतच सहसा आणखी एक अंर्तवस्त्र पुरुष मंडळी कमरेच्या खाली देखील घालतात. मात्र बिलो द बेल्ट लिहीणं हे चारचौघात बर दिसत नाही व लेख उडण्याच्या शक्यता बळावतात म्हणुन मी जेव्हाजेव्हा बनियान म्हणेन तेव्हा तेव्हा तुम्ही मनातल्या मनात समजुन घेत चला की यात हे देखील इन्क्ल्युड आहे. तर दोन्ही मिळुन आपण बनियान हा कोडवर्ड पक्का करुन घेउ. दुसर उत्पादन म्हणजे मदिरा जी आपल्या सर्वांना परीचयाचीच आहे. त्याला दारु हा घाणेरडा प्रतिशब्द आहे तो आपण टाळु या.
तर मित्र हो या दोन उत्पादनाच्या जाहीरातीत एक खासियत आहे. यातील बनियान च्या जाहीराती बिनडोक जाहीरातीच्या स्पर्धेत उतरलेल्या उसकी बनियान मेरे बनियान से बिनडोक कैसी ? हा सनातन प्रश्न बनियान फ़ॅक्टरीचे मालक मुठी आदळुन आदळुन जाहीरात एजन्सीच्या ऑफ़ीसात विचारतात व मग पेटुन उठलेला एखादा भरत दाभोळकर कल्पना पेटवुन स्पर्धकापेक्षा अधिक बिनडोक जाहीरात काढुन दाखवितो. उदा. रुपा फ़्रंटलाइनच्या जाहीरातीतला देखणा दिग्विजयाकडे वाटचाल करत असलेला तरुण विलक्षण न्यायबुध्दी असलेल्या राजपाल यादव या सिक्युरीटी गार्ड ला ठणकावुन सांगतो की त्याने रुपा फ़्रंटलाइन बनियान घातलेला आहे म्हणुन सर्वात पुढे राहणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हे ज्ञान झाल्यावर मात्र राजपाल यादव कर्तव्यात कसुर न करता अगोदर विचारतो रुपा फ़्रंटलाइन पहना है ? तो चलो आगे. काश ये मुझे पहले मालुम होता. मी कैक ठीकाणी वेड्यासारखा पुर्ण शर्ट पॅन्ट घालुन क्यु मध्ये उभा राहुन राहुन वेळ घालवलाय आता बस बस बस नाही साहवत आता हे, आताच जाउन रुपा चा बनियान आणतो. ही जाहीरात बघुन चिडलेल्या लक्स च्या मालकाने जाहीरात एजन्सीला दम भरला त्याचा परीणाम म्हणजे स्वत: सनी देओल ट्रेन मध्ये चढला ( नुसता नाय चढला अपना लक पहन के चढला ) मग काय विचारता राव गाडी सुरु झाली धावाय लागली आणि पैलवानाचा तोल गेला की पन गिरे भी तो ऐसे गिरे के क्या कहने चुकुन सनीच्या हातुन चेन ओढली गेली आणि ट्रेन थांबली सनी पैलवान त्याला न शोभणार घाबरला व मग एक आश्चर्य घडल अचानक घोषणा झाली की ट्रेन ज्या माणसाने चेन ओढली त्याच अभिनंदन करते त्याच्यामुळे एक मोठा अपघात टळला आणि हजारो लोकांचे प्राण वाचले कारण क्या तर लक पहनके सनी पैलवान गाडीत चढला. यातील बिनडोकपणा तर धक्का देउन च जातो पण लॉस मध्ये जात असलेली भारतीय रेल च्या मारी लाउडस्पीकर प्रत्येक डब्यात व इतक्या इमीजीएटली घोषणा करुन तात्काळ आभार ही मानते. वॉव वॉव वॉव ! आता या सनीला शोधुन मित्रांनो पॅन्ट्रि त ही टाकुया साल त्यांच ही नशीब फ़ळफ़ळेल. कींवा आपण सगळे लक्स चा बनियान घालुन ट्रेन च्या वेळापत्रकाला हातात धरुया.
बिनडोकपणा चालुच आहे तर सल्लु कसा नाही दिसला अजुन तर तो गेलाय डीक्सीचा बनियान घालुन एका प्रतिष्टीत कराटे च्या शाओलिन मठात ज्या अतिशय सिरीयस कराटे साधकांना त्याने डीक्सीचे बनियान घालुन कसे थिल्लर बनवुन टाकले हे माझ्यासारख्या अभिजात कुंग फ़ु च्या प्रेमींना बघुन काय वेदना होतात शब्दात मांडणे कठीण आहे.
असे का होत असावे बनियान च्या जाहीराती इतक्या बिनडोकच का बनतात. याचे उत्तर बनियान मध्येच दडलेले आहे. जरा बघा याच्याकडे हाउ बोरींग इट इज यार ! एकतर बहुतांशी रंग पांढरा व्हरायटी काय तर एक बिनबाहीचा एक बाहीचा. फ़ार तर फ़ार एखादा दुसरा रंगीत बनतो व मामु का जालीवाला बनियान. हे एक इंटरेस्टीग आहे माझा एक धागा आहे प्रश्नांचा त्यात हा प्रश्न पण घ्या माणसं जिती जागती माणसं मुळात बनियान का घालतात ? व त्याहुन मोठा प्रश्न म्हणजे जाळीचा बनियान का घालतात? म्हणजे नाही घातला समजा बनियान ( इथे कोडवर्ड ला अपवाद आहे मी केवळ वरच्या अंर्तवस्त्र विषयी बोलत आहे खालच्या ची गरज सनातन आहे त्यात वादच नाही ) तर अस काय मोठ बिघडत ? एखाद दुसरा शर्ट टुचतो व घाम थोडा सुकत नाही व फ़ारतर आतील अवयव शर्ट पारदर्शक असल्याने दिसु शकतात इतकच ना अहो पण पुरुषांना काय प्रॉब्लेम आहे ? आणि अस बघा हल्ली पीके व पुर्वी सावरीया चे दिवस होते. हल्ली आमिर व पुर्वी रणबीर कपुर ने आपापल्या परीने बनियान चा निषेध केलेलाच आहे. वैसा सल्लु भे अपनाइच आदमी था रे पन पैसे के लिए ना आदमी कीसी भी हद तक निचे गिरता है उसने एक पल के लिए भी नइ सोचा पैसे के लिए ऒर बनियान पहनके खडा हो गया डिक्सी की जाहीरात मे. जिसकु इतनी बार कपडे निकालते हुए देखा उस्को एसे बनियान पहनना शोभा देत का सांगा भावोजी सांगा !
बनियान ला एक सुंदर प्रतिशब्द आहे गंजीफ़्रॉक ! तर अस वाटतय की गंजीफ़्रॉक च्या जाहीराती बनविणारयांच डोक गंजलय की काय ? यात सर्वश्रेष्ठ बिनडोकपणात इतर सर्वांना मात दिलेली आहे अमुल माचो या व्रॅंडने बडे आरामसे ये नंबर वन पे पहुचा है. यातल्या एका जाहीरातीत जसा महानायक नवाब ज्युनियर पतोडी एक रेस जिंकतो हसत खेळत तस्सचं. तर अमुल माचो ने सारी हदे तोड दी है. अमुल माचो घातल्यावर इव्हन कोंबडी देखील ऑन डीमांड हवी तितकी अंडी देते. ( ही एक दुध क्रांती नंतरची पोल्ट्री क्रांती आहे ) यातील एका जाहीरातीत पिवळ्या साडीतील एक नवविवाहीता दाखविलेली आहे जिच्या पतीच अंतर्वस्त्र एक माकड पळवुन नेतं. मग ते मर्कट लीला सोडुन मानव लीला करत त्याला माकडीणी ही दाद देतात. आणि पिवळ्या साडीतील नवविवाहीता ही मग हे सर्व बघुन आनंदी होते. व जाहीरातीच्या शेवटी महावाक्य येते ये तो बडा टॉइंग है ! क्या बात है माकडा पासुन माणुस झाला अस आजपर्यंत माहीत होत आता माणसांपासुन माकड बनतायत क्या बात है ये तो बडा टॉइंग है. आणि अमुल माचो बनियान घालुन सैफ़ ने केलेल चोराच मनपरीवर्तन तर लाजवाव है. आणि एक फ़ेमिनीस्टांना एकाच वेळी फ़ॅन्टसी ने आनंद देणारी व नंतर चीड आणणारी ती जाहीरात ज्यात पुरुषांवर अगोदर अन्याय होतांना स्त्रीया त्यावर हावी होतांना दाखविलेल्या आहेत मग नायक मंदीरात जातो. मग ओए बस कर बे मग अमुल माचो बनियान घालुन तो म्हैलांना आपली जागा दाखवुन देतो याने एकेकाळी फ़ेमीनीस्ट महीलांना फ़ार संताप आणलेला होता. थोड्या इंग्रजाळलेले ब्रॅंड ही भारतीय भावंडाच्या प्रभावात च जाहीरात बनवतात प्रीप्रेअर्ड टु गेट असाल्टेड काय न काय !
तर या पार्श्वभुमी वर आमची प्रिय मदिरा वाले जीला विनाकारण च बदनाम करण्यात आलेले आहे. काय सुंदर मार्मीक फ़िलॉसॉफ़ीकल जाहीराती बनवितात बघा. मदिरे ची जाहीरात बनविणारे सर्व मला वाटत पार्टटाइम फ़िलॉसॉफ़ी डीपार्टमेंट चे प्राध्यापक च असावेत. हेवर्ड्स ५००० ची हौसला है बुलंद ही अप्रतिम जाहीरात बघा यातील नितांतसुंदर अस हे गाण कैलाश खेर ने गायलेल आहे हे तुनळी वर अवश्य नीट एकावे ही आग्रहाची विनंती यातील सुंदर शब्द बघावे
हौसला हो बुलंद हौसला हो बुलंद हौसला हो बुलंद
जैसे कंधे पे एक दोस्त का हात हो , जैसे दिल मे उजाले के दरीया बहे , जैसे आखो से चिंता की चिलमन उठे , जैसे सोइ हुइ हिम्मत अंगडाइ ले ,जैसे जीना खुशी की कहानी लगे इ. इ. फ़ार च सुंदर कविता आहे. व सर्व सत्यकथे वर आधारीत क्लीपींग दाखविलेल्या आहेत. जसे एक साउथ इंडीयन कोळी अन्यायाविरुद्ध कसा लढतो एक पत्रकार एक कथालेखक अनेक सुंदर प्रेरणादायी रीअल लाइफ़ हीरोज च्या रीअल लाइफ़ स्टोरीज यात येतात अप्रतिम अर्थपुर्ण गाण्यासहीत !
तशीच दुसरी एक बकार्डी ची एक जाहीरात बघा बकार्डी अनटेमेबल सिन्स १८६२ अत्यंत अप्रतिम असे एतिहासिक संदर्भ या जाहीरातीत येतात शब्द असे येतात द फ़ायर ऒफ़ १८८० कुड नॉट स्टॉप अस, नॉर द क्युबन रिव्होल्युशन, नॉर द एक्साइल इन सिक्स्टीज इ. इ. शेवटी महावाक्य येते.
द बकार्डी फ़ॅमिली डीडन्ट जस्ट सरव्हाइव्ह्ड वुइ थ्राइव्ड बिकॉज ट्रु पॅशन कॅन नॉट बे टेम्ड
यातील ट्रु पॅशन कॅन नॉट बी टेम्ड इज ग्रेट !
ग्रीन लेबल ची सुंदर प्रेरणादायी जाहीरात बघा एक तरुण कॉम्पुटर सुधारुन देतो मग ते गाण येत
पल पल के जतन से बढते जाना है अपने इरादो से मंजिल को पाना है अपने रगो से मंजिल को अपनाना है ! कुछ पाना है कुछ कर दिखाना है ! कुछ पाना है कुछ कर दिखाना है !
रॉयल चॅलेंज च्या जाहीरातीतील ही पोएट्री बघा
माय लाइफ़ इज ग्रेट , माय लाइफ़ इज रुम विदाउट विंडोज लाइफ़ काय आहे यावर अनेक मार्मीक टीप्पणी यात येतात. जसे
लाइफ़ इज डान्सींग टु युवर ओन ट्युन्स समटाइम्स टु ऑदर्स ट्युन्स
लाइफ़ इज एक्स्प्लोरींग टु अननोन , लाइफ़ इज बंडल ऑफ़ नर्व्ह्ज , लाइफ़ इज अनप्रेडीक्टेबल
व्हॉटेव्हर लाइफ़ थ्रोज एट मी आय टेक इट असे म्हणुन लाइफ़ हे कसे एक रॉयल चॅलेंच आहे हे ही जाहीरात दाखवुन देते.
अजुन एक अप्रतिम जाहीरात रॉयल स्टॅग ची मेक इट लार्ज यात शाहरुख व सैफ़ अली खान दोघांवर दोन वेगवेगळ्या जाहीराती बनविलेल्या आहेत. फ़ार च सुंदर एकच मार्मीक प्रश्न ते वारंवार स्वत:ला विचारतात की हॅव आय मेड इट लार्ज यात सैफ़ वरील जाहीरात तर फ़ार च रीअलीस्टीक जमलीय तो म्हणतो मी सिल्व्हर स्पुन घेउन जन्माला आलो असे लोक म्हणत मला सिल्व्हर स्पुन ते सिल्व्हर स्क्रीन पर्यंतचा प्रवास एकट्याने करायचा होता. मी स्वत:ला विचारतो सतत हॅव आय मेड इट लार्ज ? काय मार्मीक प्रश्न काय सुंदर जाहीरात ! यावरुन आपणही स्वत:ला हा प्रश्न सतत विचारायला हवा मी एकदम नव्याने प्रेरीत झालेलो ही जाहीरात बघुन आणि स्वत:ला प्रश्न केला हॅव आय मेड इट लार्ज आणि मला उत्तर मिळाल हो हो माझ पोट मी लार्ज केलय नक्कीच !
या जाहीरातीच्या विडंबन असलेल्या जाहीरातीत मोठ मोठे बॉल बेअरींग बनवुन सरदारजी अत्यंत कळवळ्याने बापाला सांगतो बट डॅडी आय हॅव मेड इट लार्ज ! असो पण मुळ जाहीरात खरच मार्मीक !
लास्ट बट नॉट द लीस्ट मी आजपर्यंत बघितलेल्या सर्वात सुंदर जाहीराती या जॉनी वॉकर व्हिस्कीच्या आहेत. फ़ार पुर्वी इंग्लीश मुव्हिज च्या चॅनेल वर यायच्या हमखास मी त्या जाहीरांतीसाठी पुर्ण पिक्चर बघायचो एकाहुन एक ग्रेट जाहीराती जॉनी वॉकर च्या आहेत
एका जाहीरातीत एक रीअल लाइफ़ युद्धग्रस्त कुठलासा अफ़्रीकन देश व त्यातील तरुण दाखवायचे जिथे सतत खुनी हिंसाचार सुरु असतो माणस मारली जात असतात. त्याच्या शेजारी जुन्या रायफ़ल्सचा खच पडलेला दाखवितात आणि मग तो बोलत असतो आपल्याशी त्याच्या परीस्थीती विषयी आणि मगतो दाखवु लागतो त्या जुन्या गंजलेल्या भंगार रायफ़ल्स ना घेउन तो एकाहुन एक सुंदर शिल्प करीत जातो. ते बघण्यासारख आहे. याच व अशा सारखे असे अनेक रीअल लाइफ़ हीरोज त्याच्या जाहीरातीतुन ते दाखवितात की कीती विपरीत परीस्थीतीत ते कीती सुंदर सकारात्मक रीतीने जिवन जगतायत ,संघर्ष करताहेत. यु ट्युब वर जॉनी वॉकर च्या एकाहुन एक सर्वच जाहीराती आहेत अवश्य बघा तर मग जॉनी वॉकर च्या जाहीरातीच्या शेवटी त्याची अप्रतिम पंचलाइन सुंदर लोगो आणि संगिता सहीत येते ती अशी,
Whatever is your journey , Keep Walking !!!

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रफुल्ल पा's picture

9 Sep 2014 - 1:41 am | प्रफुल्ल पा

वा फार् छान

सस्नेह's picture

9 Sep 2014 - 8:41 am | सस्नेह

केला आहे झैरातीन्चा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2014 - 8:43 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

सवंगडी's picture

9 Sep 2014 - 9:17 am | सवंगडी

ओ… काय लिव्हलंय तुमी ! बरका अब्यास तुमचा.
पण वाचायला तरास कि हो… मधी मधी जागा सोडा कि राव.
मदिरे बरोबर भारी लागतो.

उगा काहितरीच's picture

9 Sep 2014 - 11:15 am | उगा काहितरीच

असेच म्हणतो.

आनन्दा's picture

9 Sep 2014 - 10:58 am | आनन्दा

ह्म्म.. मला वाटते हा फंडामेंटल फरक आहे.
बनियान ची खरेदी किमान ब्रँड सिलेक्शन महिला वर्गच करत असावा. जसे की बायको नवर्‍याला सांगत असेल, तू की नेहमी अमूल माचोच घालत जा, म्हणजे मला चोरांची भीती नाही, वगैरे. वगैरेचा अर्थ वाचकांनी समजून घ्यावा. :)

त्यामुळे त्या सार्‍या जाहिराती पण बायकांच्या सिरीयलसाऱख्याच आहेत.
मदिरेचे याउलट अहे, त्यामुळे सारी क्रीएटिव्हिटी त्यामध्ये दिसते.

मदनबाण's picture

9 Sep 2014 - 12:01 pm | मदनबाण

जबराट ! ;)
मी जेव्हाजेव्हा बनियान म्हणेन तेव्हा तेव्हा तुम्ही मनातल्या मनात समजुन घेत चला की यात हे देखील इन्क्ल्युड आहे.
अच्छा बाय डिफॉल्ट काय ! ;)

राजपाल यादव कर्तव्यात कसुर न करता अगोदर विचारतो रुपा फ़्रंटलाइन पहना है ?
अगर आपने रुपा फ़्रंटलाइन पहना है तो फिर रुपा क्या पेहेनेगी ? अशी टवाळ वाक्ये आमच्या मित्र मंडळीत होत. ;)

ये तो बडा टॉइंग है.
सना खान सना खान सना खान... ;) काय कपडे सॉलिड्ड धुतले आहेत ! ;)

जाता जाता :- काही काळा पूर्वी मला वाटतं एका मदिरा कंपनीची प्रिमियम अ‍ॅपल जूस ची जाहिरात आली होती त्यात एक गच्च उरोजाची ललना दाखवण्यात आली, ग्लासचा एक घोट घेतल्यावर ललनेची वस्त्रे कमी होत जातात... पण वादग्रस्त झाल्याने ती बंद करण्यात आली. मला वाटतं {नक्की नाही} रमेश देव यांच्या मुलानी ती बनवलेली जाहिरात होती. कोणी जमल्यास यावर अधिक "प्रकाश" पाडावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

टवाळ कार्टा's picture

9 Sep 2014 - 12:28 pm | टवाळ कार्टा

"गच्च" :P...कोणितरी पहिल्यांदीच वापरला का हा शब्द ;)

मदनबाण's picture

9 Sep 2014 - 1:20 pm | मदनबाण

कोणितरी पहिल्यांदीच वापरला का हा शब्द
नाही. गच्च /ट्च्च असे शब्द प्रयोग आधीही झाले आहेत.

बाकी गंजीफ़्रॉक च्या आणि डिफॉल्टच्या जाहिरातीत स्त्रीयांचे काय काम असते ते अजुन मला कळलेले नाही ! म्हणे वस्त्रे पुरुषांची आणि त्याच्या जाहिरातीत स्त्रीया लागतातच !

जाता जाता :- वरच्या प्रतिसादात ज्या अ‍ॅपल ज्यूसच्या जाहिरातीचा उल्लेख केला होता ती जाहिरात सापडली !( AC Black Apple Juice ad }मला वाटतं... साल २००० च्या आधीची असावी ही जाहिरात.
http://www.indiantvads.com/banned-tv-ads/ac-black-banned-ad-apple-juice....

छान.. यात इम्पिरियल ब्लू जाहिरातमालिका राहिली का ? गझल्सच्या पार्श्वसंगीतावर पुरुषी मनाचे अफलातून दर्शन.. हलकेफुलके.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2014 - 11:16 am | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना इम्पिरियल ब्लू शोधत होतो.
मदिरेच्या जाहिराती या विषयावर लिहिताना त्या जाहिरात मालिकेचा उल्लेख असलाच पाहिजे.
पैजारबुवा,

सुहास..'s picture

9 Sep 2014 - 4:35 pm | सुहास..

सुपर्ब !!

अवांतर : तुझा लेख आणि व्याकरणात इतक्या चुका ? जॉनी वॉकरचा प्रभाव की काय ;)

बनियानच्या असल्या टुकार अ‍ॅड पाहून आम्ही वर दिलेल्या कंपन्यांना कस्पटाइतकीही किंमत देत नाही. ;)

चिनार's picture

10 Sep 2014 - 11:31 am | चिनार

मस्त लिहिलय !!

पैसा's picture

10 Sep 2014 - 12:12 pm | पैसा

पहिला अर्धा भाग खूप छान! हलकाफुलका! पुढचा अर्धा भाग मात्र ओळखीचा नाही!

hemants.gokhale's picture

10 Sep 2014 - 1:59 pm | hemants.gokhale

आशिच एक जाहिरात स्मिर्नोफ चि पन होति, स्मिर्नोफ च्या बातलिमधुन लोकान्कदे पाहिल्यावर मनस्स ऐवजि वेगवेग्ले प्रनि दिसतात. हिरो स्वताला पहातो तेत्य्यत्याला स्वताचे प्रतिबिम्बा पन प्रान्याचे दिसते. मस्त जाहिरत होति.