आठवणी

कल्पतरू's picture
कल्पतरू in जनातलं, मनातलं
7 Sep 2014 - 1:36 pm

असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात.

७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing. प्रोजेक्ट मध्ये जाशील तर तुला कुठचीही location भेटेल, जंगलातून 20-25 km दिवसाला चालावं लागेल. जर manufacturing निवडशील तर तू इथेच थांबशील तुला गेस्ट हाउस मध्ये राहायची व्यवस्था करतो. बोल तुला कुठलं फिल्ड पाहिजे?”. मी मनातल्या मनात बोललो जाऊ दे कुठे जंगलात फिरतोस, आणि मी panel manufacturing लाईन मध्ये आलो. जॉईनिंग डेट घेतली ११.११.११ कसली भारी डेट होती ती. गर्लफ्रेंड सोबत केलेली डेट पण फिकी पडेल तिच्यासमोर ( आता मला गर्लफ्रेंड नाही ही गोष्ट वेगळी).

माझ्या दिवसाची सुरवात उशीराच व्हायची. ९ वाजता ऑफिस असलं की मी ८.३० ला उठायचो. गरम पाण्याची तर अपेक्षा नसायचीच. नवनाथ ने मला मस्त उपाय दिला होता, बाजूच्या रूम मधली खिडकी खोलून गिझर मधून पाणी आणायचं. मी खिडकी खोलण्यात expert झालो होतो. पण म्हणतात ना कुठल्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. एक दिवशी ही बातमी श्री सरांना समजली आणि त्यांनी सगळी गेस्ट हाउस ची बिल्डींग आमच्याकडून साफ करून घेतली. असो.

नंतर यायचो शॉप फ्लोअरला. इथला अनुभव खतरनाक होता. चढलात तर हिमालयाच्या शिखरावर नाहीतर समुद्राच्या तळाला केव्हा गेलात याचा पत्ता सुधा तुम्हाला लागणार नाही. त्यात भर म्हणजे आमचे सर. गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकला की जो तो सैरा-वैरा पळत सुटायचा. पण सगळी माणसं जीवाला जीव देणारी भेटली. भरपूर वेळा सर कॉस्टिंग काढयला द्यायचे, माझ्या चुका कुठे होताहेत ते समजून सांगायचे, कधी कधी मला stock घ्यायला सांगायचे मला सगळ्या material ची माहिती व्हावी हा हेतू त्यामागे असायचा. मला आठवतंय एकदा ऑटो कॅड वर मी G.A. काढत होतो पण मला व्यवस्थित जमत नव्हतं, सर आले माझ्या बाजूला उभे राहिले आणि ते जवळ जवळ अर्धा तास मला ऑटो कॅड command समजून सांगत होते. हा प्रसंग अगदी शेवट पर्यंत माझ्या लक्षात राहील. तिथे काम करणाऱ्या माणसांकडून भरपूर काही शिकायला भेटलं. काही विचारलं तर हातातलं काम बाजूला ठेऊन पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे काम करणाऱ्या माणसांशी माझी कधीच भांडणं झाली नाहीत. त्याच्यासोबत साईट वर असू दे नाहीतर शॉपला. रात्री बाहेर जेवणाची खूप तारांबळ उडायची. पण रविवार असला की सोन्या आणि मया मला आवर्जून चिकन खायला बोलावणार. खास माझ्यासाठी बिर्याणीचा बेत आखणार. दीड वर्षातली माझी खरी कमाई हीच होती.

रविवारचा सुट्टीचा दिवस भेटला की संध्याकाळी सगळे गच्चीवर जमायचो. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही झोपायला पण इथेच यायचो, हा आमचा कट्टा होता. मनातल्या सगळ्या गोष्टी इथे बाहेर पडायच्या. मग धमाल आणि मजा मस्ती. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या करामती सांगयचा live busbar ला हात कसा लावायचा मग त्याचे साहेब काय बोलायचे, मधूनच भूतांचा विषय निघायचा मग भूतानी त्या कोपऱ्यातली कंपनी बंद कशी पाडली हे तिखट मीठ लाऊन सांगितलं जायचं, मधूनच नवनाथ आणि संदीपची शाब्दिक चकमक घडणार. माझा वाढदिवस रात्री १२ वाजता याच गच्चीवर साजरा केला, परत आम्ही केलेली कोजागिरी पोर्णिमा ती ही अविस्मरणीय. आजही ते दिवस आठवले की नकळत मन पुन्हा या गच्चीवर जाऊन बसतं.

रेखाटनलेख

प्रतिक्रिया

कल्पतरू's picture

7 Sep 2014 - 1:38 pm | कल्पतरू

पहिलाच प्रयत्न आहे काही चुकलं असल्यास सांभाळून घ्या

दिपक.कुवेत's picture

7 Sep 2014 - 2:32 pm | दिपक.कुवेत

मस्त आठवणी. चित्र अगदि डोळ्यासमोर उभं राहिलं.

भिंगरी's picture

7 Sep 2014 - 3:52 pm | भिंगरी

पहिलटकरीण असून चांगल्या कळा दिल्यास की.
नाहीतर आमची तर फेफे उडाली होती.

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Sep 2014 - 8:42 pm | माम्लेदारचा पन्खा

पुढे पुढे सरावाने विचारप्रसुती सुलभ होईल

चांगलं लिहिलं आहे. पुलेशु.

पैसा's picture

7 Sep 2014 - 9:17 pm | पैसा

आठवणी चांगल्या लिहिल्यात.
लिहिताना परिच्छेद पाडले, जरा सुसूत्र लिहिलं की अजून चांगलं, सफाईदार होईल. इथे भरपूर वाचा, आणि लिहीत रहा!

मुक्त विहारि's picture

7 Sep 2014 - 11:49 pm | मुक्त विहारि

कळफलक सलामत तो लेख पचास...

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2014 - 12:36 am | प्रभाकर पेठकर

सगळ्याच आठवणी त्रोटक वाटल्या. कुठल्याही आठवणीचे पुरेसे तपशिल न दिल्याने नीट संगती लागत नाही.

शिवाय,

प्रोजेक्ट मध्ये जाशील तर तुला कुठचीही location भेटेल.
बाजूच्या रूम मधली खिडकी खोलून गिझर मधून पाणी आणायचं.
तिथे काम करणाऱ्या माणसांकडून भरपूर काही शिकायला भेटलं.
रविवारचा सुट्टीचा दिवस भेटला की संध्याकाळी सगळे गच्चीवर जमायचो.

अशा मोजक्या कांही वाक्यांमधील शब्द योजनेवर पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे.

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 12:07 am | काळा पहाड

भेटला

ते मालेगाव किंवा तत्सम भागातले असावेत. किंवा मग नागपूरचे.

कल्पतरू's picture

9 Sep 2014 - 9:27 pm | कल्पतरू

मी रायगडचा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2014 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

@मी रायगडचा आहे.>>> याहूsssss :-D आमच्या गावचा मानूस! ;-) धन्याssss ये रं... मि.पा.वर रायगड आघाडी "करु!" :-D

सूड's picture

11 Sep 2014 - 8:43 pm | सूड

रायगड म्हण्टां जाल्यार खंयचो तां इचारा तेका, कर्जत पण रायगडात येतां!!

कल्पतरू's picture

11 Sep 2014 - 9:02 pm | कल्पतरू

मी आपला माणगाव महाड पट्ट्यातला

११/११/११ ला जॉइनींग म्हणजे फक्त २ / २II वर्षे झालीयेत या गोष्टीला (म्हणजे मी २०११ गृहित धरून म्हणतोय, १९११ असेल तर क्षमस्व!)...आणि इतक्यातच तुम्हाला त्याच्या आठवणी पण यायला लागल्या?

विटेकर's picture

8 Sep 2014 - 2:21 pm | विटेकर

लिहित रहा ..
दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचित जावे |
इथे आणि एकणूच आंतरजालावर लोक आय टी सोडून अन्यत्र काम करतात यावर फारसा कोणाचा पट्कन विश्वास बसत नाही. दिवसभर तोंडात माती जाई पर्यन्त काम केल्यावरच पैसे मिळतात ही गोष्ट लोकांना पटणार नाही. इथल्या ब्याचलर लोकांचे विकांत गच्चीवर नाही तर मॉल मध्ये किंवा मल्टीप्लेक्स मध्ये जातात आणि ऑन साईट आणि बेन्च हेच इथल्या चर्चांचे विषय असतात. हिंजवडी मधल्या चकचकित काचेच्या इमारतीत काम करणार्‍यांना पलिकडच्या पिरंगुट मधे काम करणार , रोज जेवणाचा डबा घेऊन मोटार सायकलवर / सायकल्वर जाणारा तथाकथित सुपरवायजर / कामगार याबद्दल फारशी माहीती नसते.
कंत्राटी कामगार आणि टायर थ्री / फोर कंपन्यातील विश्व, त्यातील उलथापालथ , जगण्याची लढाई याबाबत इथे वानवा आहे. तेव्हा खूप लिहा .. लिहिता लिहिता जमेल सरावाने. आणि मुख्य, गांगरुन जाऊ नका. पडता - रडता घेई उचलोनी कडेवरी | असेही लोक इथे आहेत , ते सहायभूत होतीलच.
असो, त्यानिमित्ताने मला माझा नोकरीच पहिला दिवस आठवला - ०१.०१.१९८९
त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले !

बॅटमॅन's picture

8 Sep 2014 - 2:45 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!

मदनबाण's picture

8 Sep 2014 - 5:34 pm | मदनबाण

मस्त ! लिहीत रहा. :)

मदनबाण.....

आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Kom

अनुप ढेरे's picture

8 Sep 2014 - 6:41 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय!

कल्पतरू's picture

8 Sep 2014 - 9:22 pm | कल्पतरू

पुढच्या लिखाणात कमीत कमी चुका करायचा प्रयत्न करेन. @विटेकर नक्कीच लिहीन, खूप काही आहे आपल्या कामाबद्दल लिहिण्यासारखं.

vikramaditya's picture

8 Sep 2014 - 9:34 pm | vikramaditya

लिहित रहा...

मितभाषी's picture

8 Sep 2014 - 9:43 pm | मितभाषी

लिहीत रहा.
बसबारचे व्होल्टेज किती हो ते?

कल्पतरू's picture

9 Sep 2014 - 9:25 pm | कल्पतरू

आम्ही LT panels बनवायचो त्यामुळे व्होल्टेज ४४० च्या पुढे नासायचं पण करंट ४०००A पर्यंत असायचा. साईट वर गेलो कि HT panels असायचे त्यांचं व्होल्टेज ११००० V पर्यंत असायचं पण त्याच्यावर कधी काम नाही केलं.

बॅटमॅन's picture

10 Sep 2014 - 12:51 pm | बॅटमॅन

४००० अँपिअर????? इतक्या करंटमध्ये काय व्हायचं ओ त्याचं, वितळूनच जायचा कुठंतर. माझं ज्ञान या बाबतीत ना के बराबर आहे, पण आकडा लयच मोठा वाटतो आहे.

सस्नेह's picture

10 Sep 2014 - 1:01 pm | सस्नेह

LT करंट इतका असू शकत नाही.

कल्पतरू's picture

11 Sep 2014 - 8:40 pm | कल्पतरू

@स्नेहांकिता ४००० मी कमीच बोललो. 12000A पर्यंत पण असतो करंट. फोटो कसे टाकायचे अजून उमगलं नाही. नाहीतर आत्ताच तो सुर्य आणि हा जयद्रथ करणार होतो.

@बॅटमॅन तुमची शंका अगदी बरोबर आहे. पण बसबार वितळत नाही. आता एक उदाहरण घेऊ. आपण करंट वाहून नेण्यासाठी aluminium किंवा copper बसबार वापरतो. copper बसबारची क्षमता aluminium पेक्षा २५-४५% जास्त असते. density factor पण महत्वाची भूमिका बजावतो aluminium साठी तो (०.८-१.० A / MM २) तर COPPER साठी (१.२५ A / MM २) असतो . आता खाली चित्र दिलाय तो १००० A चा ब्रेकर आहे आणि aluminium बसबारची साईझ आहे १२०X१० MM म्हणजे १२० MM रुंद आणि १० MM जाड. याचा एरिया झाला १२०० mm2 . आता आपण जर density factor १ पकडला तर आपला हा बसबार १२०० A करंट वाहून नेऊ शकतो. आता ४००० A साठी 100x10 चे ४ बसबार घ्यायचे आणि एका मागोमाग लावायचे कि म्हणजे बसबार ची रुंदी १०० ठेवायची पण जाडी मात्र ४ पटीने वाढवायची म्हणजे बघा 100x40 =४००० A झाली ना बॉस आपली 4000A ची सिस्टीम रेडी. कशाला वितळतय काय. वितळायची शक्यता असते पण फार फार कमी, अगदी नगण्य.
ref

कल्पतरू's picture

11 Sep 2014 - 11:06 pm | कल्पतरू

ref1
ref2

४४० च्या लाइव्ह बसबार ला ट्च... रोचक आहे.
लिहा. वाचतोय..

कल्पतरू's picture

11 Sep 2014 - 8:53 pm | कल्पतरू

ते आता बसबार वर स्लीव चढवलेल्या असतात आणि आपल्या पायात पण सेफ्टी बूट असतात त्यामुळे शॉक लागत नाही कधीतरी झिणझिण्या बसतात. भारी वाटतं तेव्हा. पक्त एकच काळजी घ्यायची ती म्हणजे बसबार शिवाय दुसरीकडे कुठेही चुकून पण शरीराचा स्पर्श होता कामा नये, नाहीतर झालाच आपला कोळसा.

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 12:09 am | काळा पहाड

मी मनातल्या मनात बोललो जाऊ दे कुठे जंगलात फिरतोस, आणि मी panel manufacturing लाईन मध्ये आलो.

चुकीचा अ‍ॅटिट्यूड.

सस्नेह's picture

9 Sep 2014 - 9:42 pm | सस्नेह

संकलन थोडे सुधारता येते का बघा.
विचार नियमिततेने संकलित केल्यावर लेखन आणखी परिणामकारक होईल.
पुलेशु

इरसाल's picture

10 Sep 2014 - 2:19 pm | इरसाल

विटेकरसाहेबांनी तुमच्या शतकाची तजवीज वर करुन ठेवलीय.

इरसाल's picture

10 Sep 2014 - 2:23 pm | इरसाल

११.११.११ ला एका साउथ कोरियन कुंपणी बरोबर दिल्लीला ताज मधे इंटर्व्हु होऊन निवडला गेलो होतो. अपिंट्मेंट लेटर सुद्धा मिळाले पण अर्थकारण आडवे आल्यामुळे जॉईन झालो नाही. नायतर हाच प्रतिसाद कोरियात बसुन लिहीत असतो.
(याचाच दुसरा अर्थ असा की इथे बसुन पण काम नाय करत नी तिथे बसुन पण नस्ते केले ;) )

काळा पहाड's picture

10 Sep 2014 - 3:10 pm | काळा पहाड

थोडक्यात, तुम्हाला कोरियन्स कसं काम करतात याची कल्पना नाही. तिथे ९ म्हणजे जास्तीत जास्त ९:०५ ला हजर व्हावं लागतं. ९:१० चालत नाही. दुसरं, ते १२-१४ तास रेग्युलरली कामं करतात. तुम्हालाही तिथे तसंच काम करावं लागतं.

इरसाल's picture

11 Sep 2014 - 2:04 pm | इरसाल

आधीच्या कंपनीची शाखा होती तिथे लॅब सेटअप करण्यासाठी १५ दिवस होतो (डोळा मारलेला नाही पाहिलात का ?)

काळा पहाड's picture

11 Sep 2014 - 2:30 pm | काळा पहाड

हो तो नाही पाहिला खरा

प्रसाद१९७१'s picture

11 Sep 2014 - 2:26 pm | प्रसाद१९७१

एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता

मला वाटले ह्या वाक्याचा पुढे कुठे रेफरन्स येइल :-(