तुमचे शरीर अपचन कसे हाताळते?

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
5 Sep 2014 - 4:29 pm
गाभा: 

बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया.
मला दोन प्रश्न आहेत,

तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?
१. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते
२. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात.
३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते.
४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते..
औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे.

आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न -
तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते. तेव्हा तुम्ही काय करता?
१. मी ज्याचे माप केव्हातरी त्याच्या पदरात घालतोच. सडेतोड.
२. विचार करतो, जमल तर मन्य करतो, नाहीतर सोडून देतो.
३. कोणाशीच बोलता येत नाही, भयंकर मनस्ताप होतो, आतल्या आत धुमसत रहतो.
४. तिथे नाही जमले तर कोणाजवळ तरी मन मोकळे करतोच.

या प्रश्नांना या व्यतिरिक्त आणखीदे़हील पर्याय असू शकतात, पण मला सुचले ते इथे दिले आहेत. आपण आणखीन पर्याय देखील वाढवू शकता.

काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे.
ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

5 Sep 2014 - 4:36 pm | प्रसाद१९७१

तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?

काय करता? असा प्रश्न विचारुन काय होते ते का लिहिले आहे?

आनन्दा's picture

5 Sep 2014 - 4:38 pm | आनन्दा

योग्य शब्दरचना मिळाली नाही म्हणून.

आदूबाळ's picture

5 Sep 2014 - 4:41 pm | आदूबाळ

तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?

मी काहीच करत नाही. जे व्हायचं ते आपोआप होतं... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2014 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा

@जे व्हायचं ते आपोआप होतं... >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

मुळात अपचन व्हावं असं मी काही करतच नाही. ;)

जेपी's picture

5 Sep 2014 - 4:54 pm | जेपी

सूड ला +1
आणी दुसर्या प्रश्नाचे उत्तर-
साम,दाम,दंड,भेद

समीरसूर's picture

5 Sep 2014 - 5:06 pm | समीरसूर

मला वाटतं अपचन (इनडायजेशन) आणि पित्त (अ‍ॅसिडीटी) हे दोन निराळे अनुभव आहेत. अपचन झालं तर मळमळ होऊन धपाधपा उलटी होऊन सगळं आभाळ मोकळं होऊन जातं. अ‍ॅसिडीटी ही उद्बत्तीसारखी असते. पोटातलं अ‍ॅसिड तुम्हाला बराच वेळ आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. मग करपट ढेकर, डोकं दुखणे, पोटर्‍या दुखणे, छातीत जळजळ होणे असं काहीबाही व्हायला लागतं. अर्थात अपचन आणि वाढलेले पित्त वेगळे आहेत असं माझं मत आहे. मला नक्की माहित नाही. खरेसाहेब जास्त प्रकाश टाकू शकतील. अपचन व्हायचा धोका असेल तर मी पुदीन हराच्या दोन गोळ्या घेतो. लगेच बरं वाटतं. अ‍ॅसिडीटी वाढली तर मात्र काही केल्या माझी अ‍ॅसिडीटी जात नाही. ती दुसर्‍या दिवशी सकाळीच आपोआप बरी होते.

बाकी दुसरा प्रश्नः बोलण्यासारखी परिस्थिती नसेल तेव्हा काय करणार गप्प बसणार. :-)

ह्म्म.. अपचन आणि अ‍ॅसिडिटी वेगळी हे खरेच. पण अ‍ॅसिडिटी म्हणजे आम्लपित्त. पित्तचे आणखीदेखील प्रकार असतात.
काही लोकांना अपचन झाले की उलटी होते. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे.
ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय.

आनन्दा's picture

5 Sep 2014 - 6:07 pm | आनन्दा

संपदकांना विनंती - पुढील मजकूर जमल्यास मूळ लेखात शेवटी जोडावा - थोडेसे विषयांतर होते आहे असे वाटतेय.

"काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे.
ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय."

तसेच लेखाचे शीर्षक बदलून "तुमचे शरीर अपचन कसे हाताळते? " असा करावा.

स्वप्नांची राणी's picture

5 Sep 2014 - 5:10 pm | स्वप्नांची राणी

अपचन झालेच कधी तर गळती लागते असा स्वानुभव! त्यामुळे सहसा कच्चं सलाद, ज्युसेस, मिल्कशेक्स ई.ई. टाळतेच. पण तरिही गळती लागलीच तर गुपचूप डॉ. कडे पळते.

एखादी परिस्थीती पटत नाही पण तरिही बोल्ण्यासरखी परिस्थीती नसते तेंव्हा सुमडिमधे गप्प बसते. आणि समोरच्याची ऐकण्याची परिस्थीती झाली की ऐकवते.

बॅटमॅन's picture

9 Sep 2014 - 4:18 pm | बॅटमॅन

गळती =)) =)) =))

आरं पोटाला लागली कळ...
........(फुल्या भरून काढणे आपापल्या परीने) =))

प्रसाद गोडबोले's picture

5 Sep 2014 - 5:24 pm | प्रसाद गोडबोले

त्रिफळा चुर्ण नित्यनेमाने घेतल्यास सहसा अपचनाचा त्रास होत नाही ...

अर्थात दुसर्‍याला त्रास द्यायचा असल्यास डाळीचे पदार्थ किंव्वा पावटे , वाल , पोलिस वगैरे खावुन मस्त अपचन करवता येते *lol*

सौंदाळा's picture

5 Sep 2014 - 5:43 pm | सौंदाळा

मी उन्हाळ्यात (मे मधे) आणि दिवाळी झाल्यावर (डिसेंबर मधे) असे वर्षातुन दोनदा एरंडेल घेतो त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही.
अपवाद : लग्नाअधी सगळ्या शाकाहारी, मांसाहारी केळवणी झोडुन झाल्या त्या वर्षी तीनदा घेतले होते.

शनिवारी पहाटे ५.३० ला आई झोपेतुन उठवते. अर्धाकप कोर्‍या चहात ५० मिली एरंडेल तेल तयार असते ते झोपेतच पिऊन परत झोपी जातो. ६.३०/७ ला उठुन पेपर वाचतोय तोच पोटात जलविद्युत केंद्रातले जनित्र चालु झाल्यासारखा आवाज येतो. मग लोटापरेड सुरु होते. कोमट पाणी, लिंबु सरबत आणि चहा यावरच दुपारचे १२/१ पर्यंतचा वेळ काढायला लागतो. तोपर्यंत ६/७ वेळा लोटापरेड होते. दुपारी जेवायला मुगाच्या डाळीची मऊ खिचडी असते. संध्याकाळी परत डाळ्-भात खाऊन दिवस समाप्त होतो.
रविवारी झणझणीत चिकन किंवा तळलेले मासे खाऊन मी पुढच्या सहा महिन्यासाठी सज्ज होतो

प्रसाद गोडबोले's picture

5 Sep 2014 - 5:56 pm | प्रसाद गोडबोले

हायला !

एरंडेल प्रभावी असते हे ऐकुन होतो पण ६ -६ महिने प्रभाव टिकतो हे वाचुन आश्चर्य वाटले !

बाकी एकदा हा प्रयोग करुन पहायला हरकत नाही ...अगदी खंगळुन काढल्या सारखं वाटत असेल नै ! :)

सौंदाळा's picture

5 Sep 2014 - 6:06 pm | सौंदाळा

एरंडेल तेल घेतल्याने अपचन होणारच नाही असे नाही मात्र ते पोटासाठी फॅक्टरी रीसेट मारल्यासारखे आहे.
अतिजेवण, मसालेदार पदार्थ याचा अतिरेक झाला तर अपचन होणारच.

बाकी 'शारंगधर सुखसारक वटी' सुद्धा चांगली आहे बरं का. रात्री उशिरा २ गोळ्या गरम पाण्यातुन घेतल्या की सकाळी दोनदा जाऊन यायला लागते.

एरंडेल तेल घेतल्याने अपचन होणारच नाही असे नाही मात्र ते पोटासाठी फॅक्टरी रीसेट मारल्यासारखे आहे.>>

+१

पण घ्यायचं म्हणजे लई डेरिंगच काम हाय :)

जेपी's picture

5 Sep 2014 - 5:59 pm | जेपी

आम्लपित्त कस कमी करावे?
आणी सौंदाळा 50 ml एंरडेल .....बाब्बोव

"आम्लपित्तावर उपाय कडूपित्त" असे ऐकून आहे

प्यारे१'s picture

5 Sep 2014 - 6:02 pm | प्यारे१

अवांतरः आनन्दा तुम्ही आआप समर्थक ना?

आनन्दा's picture

5 Sep 2014 - 6:09 pm | आनन्दा

का बर? त्याचा आणि तुमच्या पोटाचा काय संबंध? बाकी माझे समर्थन पहायचे असेल तर इथे कळेल

तिमा's picture

5 Sep 2014 - 9:04 pm | तिमा

सहसा अपचन होतच नाही पण झालेच तर एक दिवस फक्त, लिंबु पिळलेल्या काळ्या कॉफीवर काढतो आणि लोपामाईड ची एक गोळी घेतो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Sep 2014 - 12:20 am | माईसाहेब कुरसूंदीकर

भोजनानंतर थोड्यावेळाने वज्रासनात बस रे आनंदा जरा.रात्री चमचमीत सामिष खाणे कमी कर.

वॉल्टर व्हाईट's picture

6 Sep 2014 - 3:57 am | वॉल्टर व्हाईट

लंघन करतो.

vikramaditya's picture

6 Sep 2014 - 4:32 pm | vikramaditya

विषय तसा गंभीर आहे.

आंतर्जालावरील (कु)प्रसिद्ध (कु)तर्कतीर्थ प्रतिक्रियामार्तंडाना याविषयी सल्ला विचारा.

बरेच वर्षे प्रतिसादांचा रतीब घालुन घालुन त्याद्वारे मनातील मळमळ, जळजळ आणि मुख्य म्हणजे गरळ ओकुन ओकुन पण काहीच कमी होत नाही. दुखणे विकोपाला गेले आहे. आता त्यांना दवा की नाही दुवा कि जरुरत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2014 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे

:) सहमत आहे. उनको अपने हालात पे छोड दो!

रामदास's picture

6 Sep 2014 - 6:04 pm | रामदास

शिंका येऊ नयेत किंवा खोकल्याची ढास लागू नये याची काळजी घेतो.

पैसा's picture

7 Sep 2014 - 10:53 am | पैसा

न शिंकता कसं रहायचं ब्वा!

कवितानागेश's picture

6 Sep 2014 - 9:09 pm | कवितानागेश

कुठल्याही प्रकारचं अपचन झालं की काळं मीठ आणि कोमट पाणी पिते. शिवाय अन्न न घेता भरपूर पाणी पिते. नैसर्गिकरित्या सहज शरीरशुद्धी होते. १ दिवसात सिस्टम ठिकाणावर येते.

सायकोसोम्याटिक आजार असेल तर दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकसारखी येऊ शकतील नाही? पण केवळ अति खाल्ल्याने अपचन झाले तर काहीतरी औषध घ्यायला लागणारच!

आनन्दा's picture

8 Sep 2014 - 10:13 am | आनन्दा

ह्म्म.. मला तोच प्रयत्न करायचा आहे. एखाद्या माणसाला समुपदेशन देऊन त्याचे बद्धकोष्ठ दूर होईल का या गोष्टीवर सध्या विचार करत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2014 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

ही बद्धकोष्ठता आयबीएस मधील IBS(C) या उपप्रकारच्या स्वरुपाची असेल तर समुपदेशनाचा उपयोग होतो. सीबीटी या प्रकाराचे समुपदेशन इथे वापरले जाते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Sep 2014 - 6:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१. मी ज्याचे माप केव्हातरी त्याच्या पदरात घालतोच. सडेतोड
४. तिथे नाही जमले तर कोणाजवळ तरी मन मोकळे करतोच.

पोटे's picture

7 Sep 2014 - 7:00 pm | पोटे

आमच अपचन आम्ही दुसर्‍याच्या नाकावर सोडुन देतो

सुहास पाटील's picture

9 Sep 2014 - 3:37 pm | सुहास पाटील

> आमच अपचन आम्ही दुसर्‍याच्या नाकावर सोडुन देतो
aa

एकदम लाईट जेवायचं. अगदी मऊ पाणीदार भात आणि तसेच वरण एक दिवसभर दोन्ही वेळेस खाल्ले की सिस्टिम आरामात ठीक होते.

शक्यतो अपचन होत नाही कारण तेव्हढा लोड माझ्या तंबोर्‍यावर देत नाही ! ;)
पण झाल्यास आलं ठेचतो, त्यात लिंबु पिळतो त्यात थोडेसे काळे मीठ टाकतो आणि चाटण खातो... नंतर थोडे कोमट पाणी पितो.सौंदाळा यांनी सांगितल्या प्रमाणे वर्षातुन २ वेळा तरी चमचाभर एरंडेल तेल घेउन रिसेट मारतो.
पोट ठीक वाटत नसल्यास क्वचीत धौती-योग चूर्ण घेतो,जाहिरातीत सांगितल्या प्रमाणेच सकाळी सगळं ओके होत ! ;)
वेगवेगळी चूर्ण-वट्या प्रयोग म्हणुन ट्राय मारुन झाल्या आहेत, त्यात हे धौती-योग चूर्ण माझ्या प्रकॄतीस एकदम फीट बसलं.
प्रश्नाच्या दुसर्‍या भागासाठी असलेल्या उत्तरासाठी स्पॅरो मामांचा प्रतिसाद वर स्क्रोल करुन वाचावा. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2014 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले

तंबोरा =))

अवांतर : ह्यावरुन आठवला एक किस्सा : आम्ही कॉलेजात होतो तेव्हा एकांकिकेत काम करण्यासाठी एका स्त्री पात्राची आवश्यकता होती , अन कथेची गरज म्हणुन ती कलाकार अतिषय सुंदर असणे आवश्यक होते ,( मी लेखक दिग्दर्शक होतो पण कास्टींगची जबाबदारी आमच्या एका मित्राने स्विकारली ) तेव्हा तो आमचा मित्र चक्क एका सरांना घेवुन , वर्गावर्गात जाऊन ' सुयोग्य कलाकार' शोधत होता , जेव्हा रोलला साजेशी मुलगी सापडली अन स्टेजवर आली तेव्हा ते सर , खुद्द सर , म्हणाले होते " वाह , काय गिटार शोधली आहे लेका , लय ब्येस " =))

कधीतरी एकदा कॉलेजच्या युथमधील असल्या गोष्टींवर लिहायचे आहे वेळ काढुन !

हे वाचुन कोणाला अपचन झाल्यास माझी जबाबदारी नाही *biggrin*

बॅटमॅन's picture

9 Sep 2014 - 6:11 pm | बॅटमॅन

आयला =))

खत्तरनाक किस्सा =))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Sep 2014 - 9:16 pm | निनाद मुक्काम प...

एरंडेल चा किस्सा वाचला व तोंडात त्याची कोर्या चहासोबत चव आली ,
मी एरेंडेल जंतासाठी घ्यायचो ,
अंगातील उष्णता त्याने निघून जाते.
अपंचन टाळण्यासाठी वैद्य पाटणकर काढा बेस्ट