स्वामी चेकाळदर्शी उवाच: प्रतिगामीस्य किम् लक्षणं?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
5 Sep 2014 - 12:01 pm
गाभा: 

माझ्या चेकाळपंथी आशारामा, स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा धर्मतत्वाचा मुलामा चढवायची, आपली जुनी हौस कायम आहे वाटते. उपजत धार्मिक, निस्वार्थी, निर्मोही अशी स्वतःच बनविलेली, स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न आपणाला हातचलाखीने आजही तुरुंगातूनच करावेच लागतात.
माझ्या उच्चनैतिक ओसामा-बाबा, आपल्यासारख्यां विचारसरणीच्या तमाम लोकांच्या मुखकमलातून, उच्च नैतिक अधिष्ठानाचे संरक्षक कवच
लाभलेले, 'एकादे उच्च उद्दिष्ट/एकादे विशाल ध्येय/एकादे उदात्त कारण', एखाद्या अहिंसक व्यक्तीच्या विचारांचा सामना न करता, त्याच्याच हिंसेचे समर्थन वध म्हणून कराया पुरेसे ठरते.
माझ्या आध्यात्मिक भामटेश्वरा, सांप्रदायिक अढींचा दुरुपयोग करून दयामाया न ठेवता दिलेल्या चिथावण्या व हिंसा, हे केवळ सत्तेसाठी सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर त्याही पलीकडील कांहीं महान धार्मिक ध्येयांसाठी असे दाखविण्याची आपणाला फार आवड आहे. आणि आश्या कार्यात,
आलेला मृत्यू हे इहलोकापलीकडील अध्यात्मिक मोक्ष मिळविण्याच्या दिशेकडे नेणार्‍या तात्विक परंपरेचा भाग आहे असे आपल्या भक्तांना पटवण्यात आपण चतुर आहातच. आपण सत्तेपासून कसे विरक्त आहोत हे सिद्ध करण्यासाठी, आपण अश्या परंपरेचा उल्लेखसुद्धा वेळोवेळी करता.
आपल्या सत्तेच्या अनैतिकपणे चालविलेल्या पाठलागाला झाकण्यासाठी, अखंडपणे सर्वात दुर्बळ आणि गरीब समाजाबद्दलची आपली कळकळ वारंवार सांगत असता आणि धार्मिक नीतिनिय़मांचे महत्व सत्तेपेक्षा कसे जास्त आहे याचा उद्घोषही सातत्याने आपण करता.

प्रतिक्रिया

हे नै जमलेय. त्यापेक्षा ते दुसरे विडंबन आलेय तेच मस्तंय

व्हिस्कीच्या बाटलीत इसबगोल?