"पुरोहिताचे भूत"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Sep 2014 - 10:03 am

एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
स्वभाव भित्रा व कशाची तरी सारखी काळजी करणे असा त्याचा स्वभाव असतो...गरीब असल्याने लग्न हि लांबले होते..
शेवटी ग्रहमान उच्चीचे येते व वयाच्या ४०-४२ वर्षी लग्न होते...३ मुले होतात..
आधीच गरिबी त्यात पोरवाडा या मुळे प्रापंचिक ओढाताणीने तो जेरीस आला असतो..व त्यांतून आपले पुढे कसे होणार या काळजीने तो खंगू लागतो..
त्यातच तो आजारी पडतो..अन बिछान्यावर पडल्या पडल्या व अश्या आजारात जर माझा मृत्यू झाला तर बायका पोरांचे काय होणार या विचाराने त्याच्या काळजात धडकी भरते..आजारातून बरा होतो पण काळजी काही पाठ सोडत नाही.
त्याचा त्याच गावत एक जिवलग मित्र रहात असतो...तो मित्र म्हणजे निडर बिन्धास तिकडम बाज व व्यवहारी असतो..
आपला पुरोहित मित्राला आपली व्यथा सांगतो.पंण मित्र हसतो व असे काही नसते म्हणून त्याला धीर देतो..
पण पुरोहित ला हे काही पटत नाही..त्याचे समाधान होत नाही..शेवटी मित्र एक युक्ती लढवतो व त्याला सांगतो.
आपल्या गावातली नदी ओलांडली की बाजूचे जे गाव लागते तिथे माझे नातेवाईक रहातात..आपण बाजूच्या गावाकडे धर्मकार्या साठी जातो असे तुझ्या घरी सांगू व मी तुझा नदी ओलांडताना पाय घसरला व अपघात झाला व त्यात तुझा मृत्य झाला अशी आवई उठवतो..नदिच्या पाण्यास ओढ असल्याने प्रेत वाहून गेले अशी थाप मारतो..यामुळे तुझ्या मृत्यू नंतर तुझा परिवार कसा चालतो ते पण तुला कळेल..तुझी माझ्या नातेवाई का कडे मी ४-५ महिन्या साठी सोय करतो व ८-१५ दिवसांनी चक्कर मारून तुझ्या परिवाराची हाल हवाल हि तुला सांगत जाईन...
यासाठी आपला पुरोहित तयार झाला तरी हि योजना सफल होईल ना? अशी त्याला काळजी असतेच..
नक्की होईल.मित्र त्याला म्हणाला व हि गोष्ट दोघातच गुप्त ठेवायची अश्या आणाभाका शपता दोघेही घेतात.
दुस~या दिवशी मित्र पुरोहिताच्या घरी येतो व पुरोहित बाजूच गावात धर्मकार्य असल्याने आम्ही जात आहोत ..सायंकाळ पर्यंत येईन असे असे बायकोस सांगितले..व दोघे घराबाहेर पडले....
ठरल्या प्रमाणे मित्राने त्याची सोय नातेवाईका कडे करतो..व मित्र गावाच्या दिशेने कुच करतो
दुपारी मित्र घरी पुरोहिताच्या आला..त्याला एकटाच आल्याने बायको म्हणाली तुम्ही सायंकाळी येणार होता अन असे अचानक दुपारीच कसे परतलात? अन हे कुठे आहेत?
यावर मित्राने रडवे तोंड करीत पुरोहिताचा नदी ओलांडताना पाय घसरला व अपघात झाला व त्यात मृत्य झाला....नदिच्या पाण्यास ओढ असल्याने प्रेत वाहून गेले अशी थाप मारली..
हे ऐकल्यावर पत्नी शोक विव्हल होते व रडण्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी पण जमा होतात..
शेवटी १३ दिवसाचे सुतक संपते..आधिच गरीबी पदरी ३ मुले यामुळे या बाईचे कसे होणार याची चिंता पण होतिचा..
पण गावचा धनी सावकार पुढे येतो व थोरल्या मुलास आपल्या कडे आश्रित म्हणून ठेवून घेण्यास तयार होतो..
गावच किराणा मालाचा दुकानदार बाईस पोळ्या लाटायला या असे सांगून जेवून खावुन काही रक्कम ठरवतो...तर गावचा पटील आपल्या शेतातील भाजी वीक असा प्रस्ताव देतो..
महिन्या भरातच पुरोहिताच्या बायकोची परिस्थिति एकदम सुधारते..
ज्या घरात एक वेळच्या जेवण्याची भ्रांत होती त्या जागी सुग्रास भोजन व भाजी विकून ४ पैसे खुळखुळू लागतात ..
मित्र व बायको दोघांनाही जाणीव असते की केवळ वैधव्य आले म्हणून लोक मागे उभे राहिले व परिस्थिती पालटली..
गावकरी अडचणीच्या वेळी आपल्या मागे उभे राहिले या मुळे तिचे मन भरुन आले...
मात्र त्या गावात पुरोहिताच्या जिवाची घालमेल होत असते..आपल्या बायकोने आत्महत्या तर केली नसेल ना असले विचार त्याच्या मनात येत असतात..
अश्यात त्याचा मित्र गावाकडून येतो व हा आल्या आल्या त्याला परिवाराचा हाल विचारतो..मित्र सारी कथा त्याला सांगतो व आपली बायका पोरे सुखात आहेत हे त्याला कळते..व त्यावर पुरोहित मित्रास गावास येऊन बायको पोरास भेटण्याची मनीषा सांगतो..
पण मित्र व्यवहारी असतो व अजून एक महिना जाऊ दे असे सुचवतो व वेळ मारून नेतो.शेवटी पुरोहित हि हो नाही करीत राजी होतो...
२ महिन्यात त्या बायको व मुलाबाळाची जेवण खाण कपडे लत्ते यात चंगळ सुरू होते...
महिन्या नंतर मित्र पुरोहिताला भेटतो..व सारा हाल हवाल सांगतो..ह्या वेळी मात्र मित्र या वेळी मी बायका पोरांना भेटणारच असा हट्ट धरून बसतो.
मित्र व्यवहारी व हुशार असल्याने विचार करतो की जर पुरोहित गावात आला हा जिवंत आहे कळल्यांवर तर जे लोक मदत करीत आहेत ते करणार नाहीत व बायका पोराना परत विपन्नावस्थेत दिवस काढावे लागतील...या वर तो विचार करतो अन मित्रास सुचवतो की "बघ तू या जगात नाही हे लोकाना माहीत आहे त्यामुळे तू जर असा गेला तर गोंधळ उडेल पण तुला हि बायका पोराना बघण्याची ओढ लागली हे पण मी समजू शकतो..आज पासून ४ दिवसांनी अमावास्या आहे..पूर्णं अंधार असेल तेंव्हा रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान तू घरी जा व भेट घे म्हणजे कुणास कळणार नाही..
पुरोहिताला ते पटते व अमावास्येच्या रात्रीची वेळ नक्की होते व मित्र पुरोहिताचा निरोप घेतो..
दुस~या दिवशी मित्र पुरोहिताच्या घरी जातो व बायकोस सांगतो की" मला काल स्वप्न पडले व स्वप्नात मित्र म्हणजे पुरोहित आला होता..तो भूत झाला असून तो मनुष्य रूप घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे..व इथेच रहाणार आहे....
आपला नवरा भूत झाला या कल्पनेने पुरोहिताच्या बायकोची बोबडी वळते व ति घाबरते..
यावर मित्र सांगतो की तुम्ही असे करा अमावास्येच्या रात्री ११.३०-१२ च्या दरम्यान तो रात्री येणार असे त्याने मला स्वप्नात सांगितले.तुम्ही व मुले दारा आड लपून बसा व तो आला की लाठ्या काठ्या केरसुण्यांनी त्याला बडवून हाकलून लावा..घाबरू नका"
या उपायावर ति राजी होते..
अमावास्येच्या रात्री पुरोहित लपत छ्पत आपल्या घराकडे येतो.व पत्नीस हाका मारू लागतो..
बायका व मुले तयार असतातच ति दार उघडते व पुरोहितास केरसुणी लाठ्यांचा प्रसाद देण्यास सुरवात करते..
आधीच भित्रा व घाबरट पुरोहित ह्या प्रकाराने घाबरतो व मी तुझा नवरा आहे असे सांगू लागतो..पण "माझा नवरा मेला आहे तू भूत बनून आम्हांस छळायला आला आहे असे म्हणत ति बदडायला सुरवात करते..
आरडा ओरडा ऐकून शेजारी पण जागे होतात व ते पण काठ्या घेऊन धावत येतात..
आधीच मार खाऊनं अर्ध मेला झालेला भेदरट पुरोहित शेजारी येत आहेत हे पाहून घाबरतो व पळ काढतो....
दुस~या दिवसापासून त्या बाईचे व मुलाचे जीवन परत आरामात चालू होते..
अमावास्या पौर्णिमा आली की गावात "पुरोहिताचे भूत" या गप्पा रंगतात..

कथा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

2 Sep 2014 - 10:07 am | स्पंदना

हायला!! चांगलीच गोची झाली.
:))

सुनील's picture

2 Sep 2014 - 10:14 am | सुनील

अकुंचा धागा उघडल्याचे सार्थक झाले! ;)

एक धम्माल चित्रपट बनू शकेल ह्या कथेवर. शेवट मात्र बदलून थोडा 'गोड' करावा लागेल!

विकास's picture

2 Sep 2014 - 8:49 pm | विकास

१०००% सहमत!

अनुप ढेरे's picture

2 Sep 2014 - 10:22 am | अनुप ढेरे

हा हा हा.
आपली माणसं सिनेमा आठवला. याच धाटणीची गोष्ट आहे. अशोक सराफ, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर वगैरे लोक आहेत.

किसन शिंदे's picture

2 Sep 2014 - 11:26 am | किसन शिंदे

हाहाहाहा.

लैच्च भारी स्टोरी. अकु रॉक्स!!

काळा पहाड's picture

2 Sep 2014 - 11:32 am | काळा पहाड

आधी आपण मोजींच्या कथेचे फॅन होतो. आता अकुंच्या कथेचे पण फॅन झालो.

विटेकर's picture

2 Sep 2014 - 12:04 pm | विटेकर

एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..

हा आता भूतकाळ झाला मिष्टर !
१. आता ब्राहमण गरिब नाहीत
२. ते आता गावातही रहात नाहीत.
आता कथेची सुरुवात अशी असायला हवी ..
नुकताच सिलिकॉन व्हॅलीवरुन परतलेल्या अमक्या तमक्याच्या नातवाने गावाकडे जमीन विकत घेतली आणि अधुनिक शेतीचे प्रयोग सुरु केले...
दिवस बदलले आता ! आणि ते ही विना आरक्षणाचे !

टवाळ कार्टा's picture

2 Sep 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

-९९९९९९९९९९९९९९९९

विटुकाका किती अपवाद दाखवु. 1 आणी 2 क्रमांकाला.
(गावात राहणारा) जेपी

विटेकर's picture

3 Sep 2014 - 10:16 am | विटेकर

अपवादानेच नियम सिद्ध होतो !!!
१. असे अपवाद असतीलच तर ते पुढच्या काही काळात गाव सोडतीलच कारण त्यांचे ८०-९०%हून अधिक नातेवाईक पुणे - मुम्बई आणि पल्याड पोचले आहेत.
२. गावात रहाणार्‍या ब्राह्मणांचे विवाह होणे दिवसेदिवस कर्मकठीण होत चालले आहे. कारण गावात रहायचेच असेल तर आता सहसा भिक्षुकी शिवाय दुसरा मार्ग उरला नाही. त्याची प्रतिष्ठाही आता ( निदान गावात तरी ) लयाला गेली आहे. अशा ठिकाणी मुलगी देण्यास कोणी धजावत नाही. दुसरा व्यवसाय अथवा शेती करणार्‍यासाठी लागणारी "मसल-पॉवर" आता ब्राह्मणांकडे उरली नाही. असे व्यवसाय जर ब्राह्मण करत असतील तर ते १-२ पिढ्यात गुंडाळतीलच.
३. आणि यावेळी पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तर १९४८ च्या जळीताची पुनरावृत्ती (किंवा तत्सम) होऊन उरले- सुरले गाव सोडून पळून जातील हे निश्चित !
४. जोपर्यंत समाजाला ब्राह्मणांची गरज होती तोपर्यन्त प्रथम शेती आणि नंतर शिक्षकी पेशा/ सरकारी नोकरी स्वीकारुन ब्राहमण गावात रहात होते. पण प्रथम जळीत आणि पाठोपाठ कुळकायदा आला आणि शेती व्यवसायातून ब्राहमण हद्दपार झाला. आरक्षणाने आणि राजकारणांच्या अतिरेकी हस्तक्षेपाने ब्राहमण शिक्षक/ सरकारी नोकरीतून ही हद्दपार झाले !
५. ब्राह्मणांनी गावात रहाणे आता असुरक्षित ही झाले आहे. गावचा पाटील, जो संरक्षक , तोच आता भक्षक झाला आहे. कोणाच्या जीवावर ब्राहमण आता गावात राहतील ? आधीचे अल्पसंख्यांक आता अति-अल्प झाले आहेत, स्वाभाविकतः ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होतीलच.
हे माझे निरिक्षण पश्चिम महाराष्ट्र मध्यवर्ती धरुन आहे पण अन्यत्र वेगळी स्थिती असेल असे वाटत नाही. गाव याचा अर्थ तालुक्याच्या ठिकाणापेक्षा/ बाजारच्या गावापेक्षा लहान गाव !
अर्थात असे घडले नाही तर मला आनंदच होईल. सर्व जाती - जमाती आप-आपले विहित व्यवसाय संभाळून ( पण जातीची उतरंड लाथाडून ) गुण्या- गोविन्दाने आप- आपल्या ठिकाणीच राहतील तो खरा सुदीन !

बाळ सप्रे's picture

3 Sep 2014 - 10:36 am | बाळ सप्रे

जरा ब्राह्मण- ब्राह्मणेतर सोडून कथा वाचून पहा!!

विटेकर's picture

3 Sep 2014 - 11:06 am | विटेकर

आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे.
कृपया , मी काय सोडून काय वाचावे असा सल्ला आपल्याला विचारायला येईन तेव्हाच सल्ला द्यावा ही विनंती.
अकारण भोचकपणा करु नये .

बाळ सप्रे's picture

3 Sep 2014 - 11:16 am | बाळ सप्रे

:-)

नानासाहेब नेफळे's picture

3 Sep 2014 - 11:36 am | नानासाहेब नेफळे

१९४८ चे जळीत फक्त प महाराष्ट्रात तेही सांगली मिरज भागात जास्त घडले, परंतु असे भासवले जाते कि आख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात ब्राह्मणांना झोडपले गेले. बहुतांश ठिकाणी मराठा व तत्सम लोकांनी ब्राह्मणांना आश्रय व अभय दिले होते.
कुळकायदाच्या आधिच ब्राह्मणांचे शहराकडे स्थलांतरण सुरु होते, शिक्षणाधारीत नोकर्या शहरी नीमशहरी भागात असल्याने ब्राह्मण तिकडे स्थाईक झाले, गावाकडच्या जमीन भाऊबंदांनी बळकावल्या, कूळकायद्यात गेल्या, बहुतांश जमीनी ब्राह्मणांनीच विकल्या. कष्टाची कामे करण्यात ब्राह्मण इच्छुक नसतात, त्यामुळे शेतीकडे ते कधीच लक्ष देत नव्हते, बामणाची शेती आणि पाटलाचं टकुरं कधीच पिकत नाही अशी ग्राम्य म्हण आहे. गावात राहणार्या ब्राह्मणाचे लग्न होत नाही याचे कारण ब्राह्मण मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा हे आहे, त्यासाठी गांधी काँग्रेस सोनीया राहुल जबाबदार कसे?
काँग्रेस/ राकाँ सरकारने जागतिकीकरणाच्या धोरणातून आयटी एज्युकेशन बँकीँग वा तत्सम 'ब्राह्मण एक्सक्लुजीव' क्षेत्रांचाच विकास केला आहे,त्याचा फायदा ब्राह्मणांच सर्वाधिक झाला आहे, अगदी परदेशात स्थाईक होण्यापर्यंत.
ब्राह्मण पाचटक्के असल्याने आरक्षणाने त्यांचे विशेष नुकसान झालेले नाही.

फक्त सांगली-मिरज नाय, सातारा-कोल्लापूर-पुणे इ.इ. बाकी प्रदेशातही कांड घडलेले होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2014 - 5:36 pm | llपुण्याचे पेशवेll

येस्स. अगदी पुण्यात पण. कोकणात वगैरे छोट्या गावांमधे सुधा २-३ मिलिटरी येऊन राहील्याची आठवण माझी आजी आजही सांगते.

सौंदाळा's picture

4 Sep 2014 - 6:08 pm | सौंदाळा

मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते. त्याच गावचे आमचे एक परिचित सांगतात.

प्रसाद गोडबोले's picture

4 Sep 2014 - 9:57 pm | प्रसाद गोडबोले

मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते.

तिकडे "राष्ट्रवादी" विचारांचे लोक नसतील तेव्हा *biggrin*

पोटे's picture

2 Sep 2014 - 1:41 pm | पोटे

सुंदर कथा

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 1:47 pm | मृत्युन्जय

मला तर आवडली ब्वॉ कथा, छान आहे.

कथेतील जातीवाचक तसेच आर्थिक परीस्थितीवाचक उल्लेख खटकला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Sep 2014 - 10:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला कथेतील नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि अव्यये खटकली ;-)

मला कथेतील नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि अव्यये यांच्या मध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा खटकल्या. :-))

श्रीरंग_जोशी's picture

3 Sep 2014 - 7:35 am | श्रीरंग_जोशी

व्यक्तिश: या कथेत मला काहीच खटकण्यासारखे आढळले नाही ही बाब फारच खटकली... :-(.

मस्त कथा. एखादी मराठी मालिकांसाठी लिहायचं मनावर घ्या आता.

त्या भित्र्या कथानायकाचं पुढे काय होतं?

विशाल चंदाले's picture

2 Sep 2014 - 7:07 pm | विशाल चंदाले

भारीच हो.

मराठे's picture

2 Sep 2014 - 8:02 pm | मराठे

चांदोबा मधे अशा गोष्टी असायच्या.
पुरोहोताच्या मित्राने त्याच्या बायकोशी संगनमत करून पुरोहिताचा मामा केला असा कायतरी मसाला भरायचा ना ष्टोरीत.

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 12:57 pm | समीरसूर

मग 'प्यासी बेवफाई' असा एक ब-दर्जा चित्रपटच निघू शकेल. पुरोहितच्या रोलसाठी चंद्रचूड सिंग, पुरोहिताच्या बायकोच्या रोलसाठी पूनम पांडे, पुरोहिताच्या मित्राच्या रोलसाठी ईम्रान हाश्मी यांना घेऊ या. गावचा पाटील प्रकाश राज, किराणामाल दुकानदार सोनू सूद असा नटसंच घेऊ या. चित्रपटाला शहरात घडवावे लागेल. खेड्याच्या पार्श्वभूमीचे चित्रपट चालत नाहीत. एका उच्चभ्रू सोसायटीत चंद्रचूड सिंग, पूनम पांडे आणि त्यांचे एक मूल राहत असते. प्रकाश राज हा सोसायटीचा चेअरमन आणि भागातला नगरसेवक असतो (ओरिजिनल पाटलाचा रोल). सोनू सूद एका मोठ्या सुपर स्टोअरचा देखणा मालक असतो. इम्रान हाश्मी शेअरब्रोकर असतो. चंद्रचूड सिंग एका सरकारी नोकरीत असतो असं दाखवू या. चंद्रचूडला सतत चिंता करण्याची सवय असते. एका पबमध्ये चंद्रचूड मनातली ही भीती इम्रानला सांगतो आणि तिथेच इम्रानच्या मनात एक प्लॅन तयार होतो. तो हळूहळू पूनमला वश करण्याचे प्रयत्न सुरु करतो. चंद्रचूड खानदानी श्रीमंत असतो. इम्रानला दुहेरी फायदा दिसतो. पूनमला वश करण्यासाठी तो सोनू सूदचा वापर करायला लागतो. चंद्रचूडला पूनमच्या मनातून घालवण्यासाठी इम्रान चंद्रचूडला काही चुका करायला भाग पाडतो. चंद्रचूड भोळा असल्याने तो त्या चुका करतो. उदा. पूनमवर संशय घेणे, तिचे चारित्र्य तपासून पाहणे, वगैरे. त्यामुळे पूनम नाराज होते. हळूहळू ती इम्रानच्या कह्यात जाते. इम्रान असाच गेम तिच्याकडून पण खेळतो. एक वेळ अशी येते की पूनम इम्रानच्या संपूर्ण कह्यात जाते. मग इम्रान हळूच चंद्रचूडला मृत्यूची खोटी बातमी पेरून पूनमची वफादारी तपासून बघण्याची युक्ती सांगतो. चंद्रचूड ऐकतो. मग नंतर काय होते? मध्येच सोनू सूद इम्रानचे भांडे फोडू अशी धमकी देऊन पूनमकडे नको ती मागणी करतो. चंद्रचूड गायब होतो. नंतर परत येतच नाही. इम्रान तशी सोय करतो. मग पुढे काय होते? बघा मोठ्या पडद्यावर 'प्यासी बेवफाई' मध्ये.

२-३ पावसातली गाणी टाकायची, एक सॉलीड आयटेम साँग्...वाह, अविनाशजी, क्या ष्टोरी लिखी है...

मिपाकर्स, करायचा का हा पिक्चर प्रोड्युस? ;-) आपण वाटलं तर अ-दर्जा बनवू. नट बदलायचे. पावसाचं एकच गाणं टाकायचं. बाकी मसाला कमी करायचा. हाय काय नाय काय्...क्या बोलते?

प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 1:02 pm | प्यारे१

=))
या खुदा!
अल्लाह करे आप जल्दसे जल्द नौकरी शुरु करे.
मेलो हसून हसून. आमची नोकरी जायची. बॉस चिडायला (खरा शब्द वेगळा आहे;) ) लागलाय.

बाळ सप्रे's picture

3 Sep 2014 - 1:12 pm | बाळ सप्रे

पिक्चर काढायचा की देउळ ??
एक काय ते ठरवा
:-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 1:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो ऑटकम महत्वाचा आणि तो केव्हाच ठरलाय ! देउळ, देवळातला देव, पिक्चर... ही सगळी टूल्स हैत. आउटकम महत्वाचा ! समझ्ये का नाय ?! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

ऑटकम नाय आउटकम, आउटकम ! :)

औट घटकेचाच असतो तो. असू द्या! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

औट घटकेचाच नाय हो. जरा आजूबाजूला बघीतलंत तर एकेका देवळाच्या/संस्थेच्या आउटकमामध्ये असंख्य विश्वस्त लोकांची सात पिढ्यांची कमाई झालेली दिसेल. :)

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 2:07 pm | समीरसूर

केले म्हणजे पैसा वसूल होण्याचे मार्ग मोकळे राहतात. देऊळ तयार झाले की पिक्चरमधले देवळातले सीन्स तिथेच घेता येतील. फक्त देऊळ आणि पिक्चर एकाच संस्थेचे आहेत हे गुपित ठेवायचं नाहीतर घोळ होईल. देवळात प्रवचनं आयोजित करून 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायला लावायचे. म्हणजे चित्रपटाची प्रसिद्धी होईल. प्रवचनकाराला ११११ रुपये एक्स्ट्रा द्यायचे ही टीका करण्याचे. भारतीय संस्कृती, परंपरा, स्त्रीचे पावित्र्य, षड्रिपू वगैरे वरून गाडी अलगद आजकालच्या चित्रपटांमुळे आपल्या संस्कारांना असणारा धोका या ट्रॅकवर आणायला सांगायची. तोपर्यंत 'प्यासी बेवफाई'चे पोस्टर्स रीलिज करून ठेवायचे आणि पूनम पांडेला एखादे धक्कादायक विधान, जसे की, "दुनिया में प्यास ही सबसे एहम जज्बा हैं...भले वो पानी की प्यास हो, कामयाबी की प्यास हो, कुर्सी की प्यास हो या फिर जिस्म की प्यास हो. 'प्यासी बेवफाई' में हम ने इसी प्यास की कहानी पेश की हैं. मै तो कहती हूं की हर परिवार को, बडे-बुजुर्ग को, बच्चे-बच्चे को यह फिल्म देखनी चाहिये ताकि उनको प्यास की एहमियत का जल्द से जल्द अंदाजा हो जाय" करायला लावायचे. ट्विटरवर ही कमेंट ताकून द्यायची. एक पूनम-स्टाईल व्हिडीओ युट्युबवर टाकून द्यायचा. हवा गरम झाली की कीर्तनकार बुवांनी देवळातल्या कार्यक्रमात 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायचे. म्हणजे मग दोन्ही बिझनेसेस मध्ये सिनर्जी निर्माण होईल. म्हणजे मग 'एक बिझनेस दुसरे बिझनेस की सीढी होता हैं' हे तत्व प्रसिद्ध करता येईल. मग याच तत्वावर आधारित दुसरा पिक्चर काढायचा "पायदान - स्टेप्स टू सक्सेस इन बिझनेस". कैसा लगा आयडिया? ;-)

समीरसूर ह्यांनी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग सुश्री पूनम पांडेचा अभ्यास करण्यासाठी केला असावा काय असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आहे एवढंच्च.
(हलकं घ्या)

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 2:31 pm | समीरसूर

सुट्टी नाही हो. कार्यालयात आहे. :-) सध्या थोडा मोकळा वेळ आहे इतकंच. :-) पूनम पांडेचं म्हणाल तर अभ्यास सगळ्यांचाच करून ठेवलेला बरा; कधी कामात येईल सांगता येत नाही.

सायेब, पायाची झेरोस पाठवने. देवळात लावू म्हंटो.

किसन शिंदे's picture

3 Sep 2014 - 2:27 pm | किसन शिंदे

कहर कहर.

=))

काय ती अफाट प्रतिभा.

या निर्माण होणार्या चित्रपटांची समीक्षाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आत्ता या धाग्यावरच लिहून टाका. रादर आपण त्याचे राईट्स फक्त तुम्हालाच देऊ.

जबरदस्त आहेत मुंगेरीलाल के 'हसिन' सपने... =))

मस्तच.

बाळ सप्रे's picture

3 Sep 2014 - 2:30 pm | बाळ सप्रे

_/\_

देवळात तुमच्याच पादुका ठेवुया !!

अजया's picture

3 Sep 2014 - 7:14 pm | अजया

:-))

अफाट! अशीच तडकती भडकती मसाला ष्टोरी पायजेल!
पण चंद्रचूड शिंग म्हणजे 'छोड आये हम वो गलिंयां' वाला ना? कुठे शोधायचा त्याला. त्यापेक्षा दुसरा कोणी चम्या चालेल का? आफताब शिवदासानी सध्या घरी पडीकच असतो म्हणतात. सस्त्यात पडेल.

प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 8:07 pm | प्यारे१

>>> सस्त्यात पडेल.

एकदम 'रस्त्यात सापडेल' असं वाचलं नि फॉक्कन फुटलो (कॉरा: धमु)

आम्हाला एक भूत असलेले पुरोहित माहीत आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2014 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा

बंदुकात्माhttp://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gifआगोबा!
@आम्हाला एक भूत असलेले पुरोहित माहीत आहेत>>> http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif

@प्यारे१ >>> :-/ .. :-/ .. :-/
@आम्हाला एक पुरोहित असलेले भूत माहीत आहे.>>> कोण...http://www.sherv.net/cm/emoticons/horror/flying-ghost-smiley-emoticon.gif कोण...ते!? :D :p :D

आमाला एका अत्रुप्त पुरोहिताचे मांडी घालुन उडणारे भुत माहीतीये

ताकाला जाऊन भांडे लपवून आणि वर भांडे का लपविता अशी निरागस पृच्छा करणारे तेच ते काय ओ?

नाखु's picture

3 Sep 2014 - 12:08 pm | नाखु

चवकशा का म्हूण?

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 12:17 pm | बॅटमॅन

ते त्या आत्म्यालाच ठाऊक ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2014 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

@मांडी घालुन उडणारे भुत माहीतीये>>> हल्कट पांडूऊऊऊऊऊ http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-541.gif
बेचिराख पांडू-ज्वालाआत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-556.gif

@ वल्लीदा-त्ये पुण्याला राहते काय ?

तुम्हाले कसं काय माहिती वो?

आम्हाला एक पुरोहित असलेले भूत माहीत आहे. ;)

मुक्त विहारि's picture

2 Sep 2014 - 10:40 pm | मुक्त विहारि

आवडली...

एस's picture

3 Sep 2014 - 12:00 am | एस

काय कथा आहे! वावावावा!! क्या बात है.. जबरदस्त! आवडली हां बरं का! :-)

खटपट्या's picture

3 Sep 2014 - 6:29 am | खटपट्या

मस्त कथा !!
"मंदिर काढा" चालूच आहे. आता एक "मालिका काढूया"
कथा लेखक, नट, नट्या, फायनान्सर, नेपथ्यकार, कॅमेरामन… कथेमधून पाणी टाकून पातळ करणारे असे सर्वजण आहेत.

चित्रगुप्त's picture

3 Sep 2014 - 8:08 am | चित्रगुप्त

यावर एक हिंदी पिच्चर काढूया. सध्या आमिर खान विद्या बालन सोबत एक पिच्चर करण्यासाठी ष्टोरीच्या शोधात आहे, अशी आतल्या गोटातली बातमी आहे. त्याला पाठवा ही कथा.
मागे आम्ही सोनाक्षी-सल्लू वाल्या सिणेमासाठी तीन भागातले कथानक सुचवले होते, तसा तीन भागातला पिच्चरही होऊ शकतो यावर.

चिगो's picture

3 Sep 2014 - 10:50 am | चिगो

मस्तच आहे कथा..

मराठी_माणूस's picture

3 Sep 2014 - 12:10 pm | मराठी_माणूस

हा जिवलग मित्र सुरवातीला मदत करतो , नंतर मात्र तो असा का वागतो ते स्पष्ट होत नाही . गावकरि मदत करणार नाहीत त्यावर तो मित्र वेगळा तोडगा काढतो असे दाखवले असते तर ते त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसे झाले असते तसेच त्याच्या मदत करण्याशी सुसंगत दिसले असते.

गावातल्या लोकांना आणि पुरोहिताच्या मित्राला पुरोहिताच्या बायकोच्या आरामाची आणि आयुष्याची चिंता. बिचारा पुरोहित जगो की मरो, की फर्क पैंदा है?

बाकी ष्टोरी आवडली. :-) अकारण चिंता खरोखर चितासमान होती है हे ठळकपणे बिंबवून गेली ही गोष्ट!

प्रसाद गोडबोले's picture

3 Sep 2014 - 2:38 pm | प्रसाद गोडबोले

शेवटी द्रव्येण सर्वे वशः !

यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः।
पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।।

दिपक.कुवेत's picture

3 Sep 2014 - 3:39 pm | दिपक.कुवेत

अश्या अफाट / छप्परफाडु कथा लिहिणं? टायटल वाचुन मला जिमोंचीच कथा वाटली. त्यांची "गावातलं भुत" हि कथा चांगलीच आठवतेय.

पैसा's picture

3 Sep 2014 - 4:34 pm | पैसा

गोष्ट आवडली. अकुंचा धागा म्हणून रामाचं नाव घेत घाबरत उघडला होता, पण गोष्ट आवडली आणि समीरसूरचं व्हेरिएशन पण!

आम्ही पण असेच करतो..

फक्त

जीमोंचे नांव घेत बिंधास्त वाचतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2014 - 5:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जियो मेरे अविकाका. स्टोरी थोडी सुखात्मिक पाहिजे होती.
मित्राचा 'कशावर' डोळा तर नै ना अशी शंका आली होती.

असो, काका असंच लेखन येऊ दे.

-दिलीप बिरुटे