वरुण राजाला सांगड

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
1 Sep 2014 - 1:08 pm

श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.

सांगड घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला
वादळ फोडून पाऊस बरसला.

गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.

वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?

झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
सांगड घालतो तुच्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

1 Sep 2014 - 1:17 pm | विवेकपटाईत

कवितेच्या जागी टाकायचं होत. चूक झाली.

पोटे's picture

1 Sep 2014 - 1:50 pm | पोटे

तुमचाही वरुणराजा झाला

कंजूस's picture

1 Sep 2014 - 4:40 pm | कंजूस

साकडं /सांगड ?

विवेकपटाईत's picture

1 Sep 2014 - 7:19 pm | विवेकपटाईत

लिहिताना चूक झाली, त्या वेळी लक्षात आलं नाही. धन्यवाद.