माझे स्वयंपाकाचे प्रयोग

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
30 Aug 2014 - 7:19 pm

1) कोल्हापुरी चिकन मसाला.

रविवार निवांत बारा वाजेपर्यंत लोळून कंटाळा आला. मग मध्येच चिकन खायची हुक्की आली.
मनात आले की आज सुट्टी आहे तर हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा स्वतःच बणवुया . लगेचच बाजारातून सगळे समान घेऊन आलो. जसे की चिकन, सुहना मसाला, कोथिंबीर, कांदे, तीळ, ओले खोबरे ई. आज काहीही झाले तरी झणझणीत चिकन बनवायचे आणि मिपावर पाककृती टाकून प्रतिसादांचा पाऊस पाडायचा असे मनात ठरवून मी स्वयंपाक घराकडे वळलो. चिकन बनवण्यासाठी जे काही मसल्याचे वाटण करतात ते करत असताना त्यात ओले खोबरे घालावे लागते.. मी मुद्दाम थोडे जास्त खोबरे घातले... म्हणले पाहुया जरा नवीन प्रयोग करून.

जेव्हा चिकन शिजवून त्यात लाल तिखट घालायची वेळ आली तेव्हा त्यात अंदाजे 2 चमचे लाल तिखट घातले. पण चिकनला लाल तरी किंवा कट (कोल्हापूर वाल्यांना माहिती असेल) आला नाही.. पुन्हा अजुन 2 चमचे लाल तिखट टाकले.. तरी तेच. काही केल्या चिकन चा रंग म्हणावा तसा लाल होत नवता. शेवटी अजुन 2-3 चमचे लाल तिखट टाकले. आणि मग लाल रांग पाहायला मिळाल्याचे समाधान झाले. मी मनातल्या मनात हुश् केले. आणि थोडा वेळ गॅस चालू ठेवून बाहेर गेलो.
10 मिनीटनंतर एकदम लाल आणि तिखट आणि झणझणीत चिकन खायला मिळणार म्हणून एकदम खुशीत होतो.
चिकन चा पहिला घास खाल्ला...... आणि किचन कडे धावत जावे लागले.. कारण काय.???? अहो ते इतखे तिखट झाले होते की साखरेचा डबा शोधेपर्यंत जीभ पूर्ण जाळून जायची बाकी होती...!!!!! अजुन 2-3 घास जरी ते चिकन खाल्ले असते ना तरी दिवसभर टॉयलेट मध्येच राहावे लागले असते... माझी 2 तसांची मेहनत फुकट गेली. :( शेवटी थोडा विचार (आय टी वाल्यांच्या भाषेत रूट कॉज अनॅलिसिस )केल्यावर कळले की आपण नवीन प्रयोग करण्याच्या नादात ओले खोबरे अगदीच जास्त टाकले होते.. त्यामुळे लाल तिखट टाकल्यावर चिकन ला लाल रांग येत नव्हता. आणि चिकन ला रंग आणण्याच्या नादात आपण खूप च जास्त लाल तिखट टाकले होते

2) कांदा भजी

एकदा नाइट शिफ्ट सपवून घरी आल्यावर जाम भूक लागली होती. घरी काहीच शिल्लक नव्हते. सगळ्यात सोप्पा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणून मी कांदा भजी कार्याचा विचार डोक्यात आला. आणि मग काय….. कांदे पटापट चिरुन बेसन पीठ वागेरे... ते सगळे काही करून कढई मध्ये भजी सोडल्या... मस्त खमंग वास येत होता.
तेवढ्यात मला ऑफीस मधून एक महत्वाचा फोन आला. फोनवर बोलत असताना भाजी करपुन जाऊ नयेत म्हणून मी गॅस बंद केला. आणि फोन वर बोलायला लागलो. बोलता बोलता 15-20 मिनिटे कधी होऊन गेली ते कळलेच नाही. बोलणे संपल्यावर स्वयंपाक घरात जाउन पाहतो तो काय....!! भजी टुम्म फुगलेल्या. कढईतले सगळे तेल गायब. मी आ वासून फक्त पाहातच राहिलो. भज्यांचे वड्यात रुपांतर झाले होते. शेवटी चमचा घेतला आणि त्याने दाबून दाबून सगळे तेल बाहेर काढले. परंतु काहीच उपयोग नाही झाला. भजी आता खाण्याच्या लायकीच्या राहिल्या नव्हत्या. मी फक्त त्या खमंग वासानेच थोडे पोट भरले आणि राहिलेले पोट भरण्यासाठी चिरमुरे आणि फारसाण यांचे डबे शोधू लागलो. :)

अजूनही बरेच किस्से आहेत. पण हे दोन मात्र नेहमी आठवतात. आता स्वयंपाकघर आणि माझी क्वचितच भेट होते. कारण तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे. त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " :)
तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा.

पाकक्रियाअनुभव

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

30 Aug 2014 - 9:17 pm | माझीही शॅम्पेन

सध्याच ब्राझील वास्तव्यात असताना फ्लॉवरची भाजी खाण्यची (दुर)बुद्धी झाली , अपार्टमेंट वर येता येता रेड चिली (रेड पेपर) ची पूड आणली होती , झणझणीत .करावी म्हणून थोडी(?) जास्तच टाकली गेली , घर भर खत्रड वास भरून राहिला होता , मित्रांनी अति-उत्साहात चव घेतली तरी त्याची बोबडीच वळाली नाका-कानतुन त्याचा जो धूर निघाला ते विचारता सोय नाही
नंतर भाजीतील सर्व पाणी काढल , फेकून दील , दोन बटाटे टाकले तरी डोक्याला तिखट ज़ाळ लागलाच !!! :)

मुक्त विहारि's picture

30 Aug 2014 - 10:20 pm | मुक्त विहारि

परवाच कूकरमध्ये भात करायला टाकला...

अन मिपा उघडून बसलो.

अशावेळी जे व्हायचे तेच झाले...भात पार करपून गेला.

तो करपलेला भात परवडला पण असता, पण करपता-करपता कूकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह पण घेवून गेला.

बादवे,

चुकुन माकून कधी यानबूला आलात तर प्रेशर कूकर घेवू या.इथे प्रेशर कूकर अजिबात मिळत नाही.

कुंदन's picture

7 Sep 2014 - 7:24 pm | कुंदन

लुलु नाही का तिक्डे?

बहुगुणी's picture

30 Aug 2014 - 10:31 pm | बहुगुणी

१. अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"!

२. कांद्याची पातीची पातळ भाजी ?

हे अर्थात खूप जुने लेख आहेत, त्यानंतर मिपाला भेटी देऊन देऊन आणि स्ययंपाकघरात बरेचदा 'सुपरव्हाइज्ड' प्रवेश केल्याने परिस्थिती बरीच सुधारली आहे!

प्यारे१'s picture

31 Aug 2014 - 3:13 am | प्यारे१

>>>>तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे.
बाप्पू, हा मूळ मुद्दा आहे तर....
हार्दिक अभिनंदन.

>>>>त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " Smile
घ्या. ऐश करुन घ्या. हे दिवस फार नसतात. काही मिन्टांच्या स्वप्नांसारखे असतात.

>>> तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा.
कशाला हिरमोड करायचा तुमचा? ;)

रेवती's picture

31 Aug 2014 - 7:22 am | रेवती

हा हा. अभिनंदन हो! लग्न झाल्याबद्दल आणि किचनला जीवदान दिल्याबद्दल!

स्पंदना's picture

3 Sep 2014 - 6:21 am | स्पंदना

बाप्पु मी अगदी सिरियसली सांगते. कारण आज जरी,"अग ऐकलस का....." असलं तरी थोड्याच दिवसात त्याच ,"अरे ऐकलस का..." होणार आहे हे ध्यानात घ्या.
तर काय सांगत होते...कोल्हापुरी रश्श्याचा लाल्भडक रंग.....त्यासाठी आधी बाजुला एका छोट्या अथवा फोडणीच्या भांड्यात २चमचे तेल तापवुन घ्या. अगदी धुर येउ दे. मग गॅस बंद करुन तिखट पावडर जेव्हढी हवी तेव्हढी मोजुन घ्या. जरा तेल थंड होउ द्द्या अन मग र्त्या तेलात हे तिखट टाका. जमल तर घराबाहेर पळा नाहीतर ठसकत तेथेच उभे रहा. तिखट थोडे हलवुन शिजलेल्या चिकन मसाल्यावर टाका. बहुत अच्छा रंग आयेगा. और आपके जीवन मे भी रंग लायेगा...

सुप्पर आयटीवाल्याची बायको
अपर्णा

एस's picture

3 Sep 2014 - 1:10 pm | एस

फोडणीत थोडीशी साखर घालायची. तिखटाला मस्त लालभडक रंग येतो.

पैसा's picture

3 Sep 2014 - 5:03 pm | पैसा

मस्त! लेख आवडला! लग्न केल्याबद्दल अभिनंदन! थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच!

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2014 - 3:19 am | प्रभाकर पेठकर

थोडे दिवस थांबा, मग स्वयंपाकात आणि गृहकृत्यात एक्सपर्ट व्हालच!

आम्ही आमच्या जखमा झाकून ठेवतो आहोत, कोणी तरी ह्यांच्या हातातून तो मिठाचा सट तेव्हढा काढून घ्या बरं..!

दिपक.कुवेत's picture

7 Sep 2014 - 12:49 pm | दिपक.कुवेत

थोडक्यात काय तर तुमचं नविन लग्न झालय आणि तुमच्याकडे "किस्से" आहेत. पण थोड्यात दिवसात त्या किश्श्यांच्या कथा होतात कि नाहि ते पहा....