तपस्या

जयनीत's picture
जयनीत in जनातलं, मनातलं
27 Aug 2014 - 7:47 pm

अमका सांगतो एक
तमक्याचे ठोकताळे दुसरेच

खमका करतो दावा छातीठोक
घडते प्रत्यक्षात वेगळेच

प्रारब्ध माझे अधर अनिश्चित
खडतर काळ प्रतीक्षेचा

नाही विचलीत मी अपराजित
प्रण मनात घोर तपस्येचा

फळतील माझे प्रयत्न भगीरथ
घेईन वेध भविष्याचा

शोध सुरुच सतत अविरत
सिद्धहस्त ज्योतिष्याचा

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

27 Aug 2014 - 8:44 pm | सस्नेह

सिद्धहस्त ज्योतिषाचा शोध लागल्यावर मलाही कळवा.

जयनीत's picture

28 Aug 2014 - 5:48 pm | जयनीत

नक्कीच. तुमचा नंबर पैला.
एकदा त्यांचा पत्ता मिळाल्यावर सा-या जगाला सांगून अखिल मानव जातीवर अनंत उपकार करून समाजाचे ऋण वगैरे फेडून प्लस मध्ये राहण्याच्या विचारात मी आहे.
( पण हे शिक्रेट सध्याच कुणाला सांगू नका )

पोटे's picture

28 Aug 2014 - 9:42 am | पोटे

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ

– बहिणाबाई चौधरी

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

बहिणाबाईंचे बोल, थोडकेच पण मनाला भिडणारे. अतिशय नेमके

सन १८८० ते १९५१

मराठी साहित्याचा स्वर्णीम कालखंड….वगैरे वगैरे

साहित्याच्या क्षितिजावर अनेक दैदिप्यमान तारे तळपत होते…. इत्यादी इत्यादी

काळात अनेक शिलेदार मराठी साहित्याचे कधीही भरून न येणारे नुकसान करून अन कधीही न भरून येणारी पोकळी वगैरे निर्माण करून अनंतात विलीन होत होते…. अरे रे! च च च

विविध संमेलनामध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता हार तुरे अर्पण होत होते…. वाहवा वाहवा

ह्या कशा बद्दलही तक्रार नाही.
फक्त खंत इतकीच कि ह्याच काळात बहिणाबाई होऊन गेल्या अन त्यांची कुठेही दखलही नव्हती कारण गावरान भाषा.
त्यांच्या फक्त ६१ कविता वाचल्या त्याही त्यांच्या मुलाने अन भाच्याने उतरून ठेवल्या म्हणून.
बहिणाबाईंच्या लेखनाबद्दल काय बोलाणार? इतकं सहज सुंदर आणि अर्थपूर्ण लेखन अतिशय दुर्मिळ.

फक्त एकच म्हणू शकतो

माय मराठीची
होती प्रेमाने भरवत
भूक लेकराची छोटी
गेलं वाहून अमृत

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 10:10 am | प्रभाकर पेठकर

जयनीत,

नाही विचलीत मी अपराजित
प्रण मनात घोर तपस्येचा

फळतील माझे प्रयत्न भगीरथ
घेईन वेध भविष्याचा

यशस्वी जीवनासाठी आणखिन काय पाहिजे? प्रयत्नांती परमेश्वरही भेटतो म्हणतात. हिम्मत हारू नका. आपलं नशिब स्वतःच घडवा.

कविता आणि त्यातून प्रसवलेले विचार आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.

बहुगुणी's picture

28 Aug 2014 - 10:14 am | बहुगुणी

आवडली

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:53 am | मदनबाण

हेच म्हणतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

सुधीर's picture

28 Aug 2014 - 11:00 am | सुधीर

कविता आवडली! बहिणाबाईंची कविताही अगदी भिडणारी!!

आतिवास's picture

28 Aug 2014 - 12:56 pm | आतिवास

कविता आवडली.
हे कशाचं विडंबन आहे, ते मात्र कळलं नाही):-)

मिपावर रुसून गेलेला एक जुना आयडी आठवला...

गवि's picture

28 Aug 2014 - 9:02 pm | गवि

छान आहे.

a

बॅटमॅन's picture

1 Sep 2014 - 5:03 pm | बॅटमॅन

ही आमची क्षयझ.

आमचा हिच्यावर फार जीव.

हे राहिलं काय ओ गवि?

जयनीत's picture

1 Sep 2014 - 4:59 pm | जयनीत

प्रतिसादा साठी सर्वांना धन्यवाद.