सिग्नल - लघुकथा

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
26 Aug 2014 - 11:32 am

सिग्नल पडला तशी त्याने बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवली.त्याच्या मागोमाग एक दोन बाईक्स येउन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबल्या. पण 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रमाणे जसं वेळ जात होता तसं येणारी वाहणं क्रॉसिंग पार करत होती. एका काकांनी त्याच्या उजव्या बाजूने जाऊन त्याच्या समोरच बाईक लावली.एक मुलगी, ती आली तिथून तिला उजवीकडे वळण शक्य नसल्याने डाव्याबाजूला वळून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येउन थांबली. अस करत अर्धे अधिक लोक झेब्रा क्रॉसिंग वर आले. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली.
ह्या लोकांना नियम पाळायला काय होतं? जे कोण अधिकारी लोकं असतील त्यांना हि ह्या सगळ्या बद्दल काहीच वाटत नाही का? एवढी लोकसंख्या,बेकारी आहे . मानसं घ्या आणि लावाना कामाला, करा दंड वसूल, तोच त्यांचा पगार. कोणी एखादा तरी अधिकारी आहे का? ज्याने नियमाबद्दल एखाद्या भागामध्ये, शहरामध्ये वचक ठेवलाय त्याने मनाशीच पडताळून पाहिलं. पण कोणी आढळला नाही. नशीब त्याला वाहतुकीचे काटेकोर नियम पाळणाऱ्या एक, दोन व्यक्ती तरी ठावूक होत्या.
विचारात असतानाच त्याने पहिलं कि सिग्नल सुटायला ८,९ सेकंद राहिलेत. पुढच्या एक दोन गाड्या निघाल्या. अन त्यानंही बाईक चालू करून गेअर टाकले.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

26 Aug 2014 - 12:05 pm | अनुप ढेरे

खरं, हे असले ७-८ सेकंद आधीच जाणारे लोक डोक्यात जातात. सिग्नलला वाहनांचा गर्दीतून वाकडी तिकडी गाडी काढून झेब्रा क्रॉसिंगवर थांबण्यात काय मजा येते लोकांना काय माहित!

सस्नेह's picture

26 Aug 2014 - 12:22 pm | सस्नेह

ही कथा आहे ?

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2014 - 12:40 pm | दिपक.कुवेत

फक्त धाग्याकर्त्याने कथेमधल्या "त्याची' बॅकग्राउंड हिस्ट्रि म्हणजे तो विवाहित कि अविवाहित, मग त्यायोगे येणारे प्रॉब्लेस, त्याची आर्थीक-सामाजीक स्थीती, मग सीग्नलवर नित्यनेमाने भेटणारी माणसं, त्यात त्याची भावनीक गुंतागुंत ई. ई. ह्या सगळ्या गोष्टिंना फाटा दिलाय ईतकचं. मला आवडली हो कथा. छान भट्टि जमलीये (पण नेमकि कशाची???)

हह्हह्हाहाअहाहाहाहाहाहाहाहाहा !
कत्तल ! +१

टवाळ कार्टा's picture

26 Aug 2014 - 12:50 pm | टवाळ कार्टा

"मामा" राहिले की...ते झाडामाधे/टपरीच्या पलिकडे दबा धरुन बसलेले असतात ;)

वेल्लाभट's picture

26 Aug 2014 - 2:28 pm | वेल्लाभट

डोक्क्क्यात जातात हे. हाच भारत आहे सर. फेस इट. पण मी त्याच्यासारखा जात नाही. मी मागच्याला ठणाणा करायला लावतो. मागचा लालबुंद होतो. पण मी समोर हिरवा दिसला की आणि कीच वाहन पुढे नेतो. असं सगळ्यांनी (सूज्ञांनी) करावं असं आग्रहाने सांगतो.

पोस्ट वाचताना सहज एक शाळेतलं वाक्य आठवलं ज्यावर आम्ही जाम हसायचो. 'रामाणे बान मारला' ! न/ण बघा की राव. मैत्रीपूर्ण सल्ला बरं का.

विशाल चंदाले's picture

26 Aug 2014 - 3:52 pm | विशाल चंदाले

धन्यवाद, पुढे लक्ष्यात ठेवतो.

सुबोध खरे's picture

26 Aug 2014 - 9:08 pm | सुबोध खरे

शेवटी कितीही झाले तरीही
माणव हा अपुर्नच

आतिवास's picture

26 Aug 2014 - 3:09 pm | आतिवास

कथेतून जे काही सांगायचा प्रयत्न आहे, ते माझ्यापर्यंत पोचलं नाही.

विशाल चंदाले's picture

26 Aug 2014 - 4:02 pm | विशाल चंदाले

अतिवास ताई, काही लोकं असे असतात त्यांना नियम पाळायचे असतात पण बाकीच्यांचं बघून ते हि नियम पाळत नाहीत.हेच दाखवायचं होतं. आणि एकामुळे बऱ्याच इतर लोकांवर परिणाम होतात हेही.
मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय हि आमची कमतरता; तेव्हा क्षमस्व आणि धन्यवाद.
बाकी वेल्लाभट यांचच अनुकरण करावं लागणार बहुदा.

>>मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंय हि आमची कमतरता; तेव्हा क्षमस्व आणि धन्यवाद.

थोडं तपशीलवार लिहीत चला पुढल्यावेळेपासनं, बाकी आपोआप जमून जाईल.

'क्षमस्व' वगैरे नाही हो, मला समजलं नाही - इतकंच!
बाकी लोक म्हणताहेत त्यानुसार थोडं विस्ताराने लिहा पुढच्या वेळी.
शुभेच्छा पुढील लेखनासाठी.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2014 - 9:20 pm | प्रभाकर पेठकर

दुसर्‍याने केला आहे म्हणून आपल्या गुन्ह्याचे समर्थन होत नाही. कोणी कितीही हॉर्न वाजवू दे, रहदारी नियंत्रक हिरवा झाल्याशिवाय मी तरी गाडी काढीत नाही. तुम्ही नियंत्रक हिरवा व्हायच्या आत गाडी पुढे नेलीत हा गुन्हाच आहे. इतरांनी केले म्हणून, किंवा मागचा हॉर्न वाजवित होता म्हणून ह्या सबबी लंगड्या आहेत.