झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
18 Aug 2014 - 8:04 pm
गाभा: 

आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.

त्यानंतर झीनं आपल्याच झालेल्या गतवर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण सुरु केले . पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून आम्ही सुरुवातीला ते पहिलेही पण त्याच त्याच कार्यक्रमाच्या विनोदांवर हसू ही येईना हो …मग हळूहळू ह्याच आणि अश्याच कार्यक्रमांचे रेलचेल सुरु झाली. दिवसाच्या वेळापत्रकात एक तरी पुरस्कार सोहळा नित्यनेमाने दिसू लागला. दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे झीनं ५ मराठी सिनेमे दाखवणे अपेक्षित होते. मराठी सिनेमा हे कुबेराच्या खजिन्यासारखे आहेत. रोज कितीही पाहिले तरी संपणार नाहीत एवढे विषय आणि कलाकृती आहेत त्यात…पुरस्कार सोहळा घुसवल्यामुळे आपसूकच काही सिनेमे बाद करण्यात आले. कवटी तेव्हाच सरकली होती पण म्हटले जाऊ दे … नंतर त्यांना त्यांची चूक उमजेल. पण झाले उलटेच…. दिवसेंदिवस झीनं मनमानी सुरूच ठेवली. काही ठराविक, रटाळ आणि साचेबद्ध सिनेमे परत परत दाखवायला लागले जणू काही प्रेक्षकांनीच त्यांना तशी गळ घातली असावी. हे चित्रपट असे आहेत कि त्यांचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा परत तो चित्रपट पाहण्याचे धाडस करणार नाहीत (सूज्ञ वाचकांच्या मनात एव्हाना त्या चित्रपटांची यादी केव्हाच घोळायला लागली असेल तेव्हा नमनाला घडाभर तेल नकोच !!)

तर असे हे सिनेमे पाहून पाहून मेंदूची कल्हई निघायला लागली. रात्रंदिवस घातलेला हा रतीब पाहून मन पार विटून गेलं होतं…. तशातच सध्याचे जिथे तिथे घुसणारे आणि अभिनय करणारे "दाक्षिणात्य" नटसम्राट यांच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे वठलेल्या मनाला नवीन पालवी फुटली. आशेचा एक धूसर किरण दिसू लागला. वाटलं की आपली मागणी देवामार्फत झीच्या अधिकाऱ्यांच्या मेंदूपर्यंत पोचली असावी पण कसचे काय…. ह्यावेळी काय घेऊन आले तर "सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे जे इतर टुकार चायनल आधीच भरमसाट वेळा दाखवत आहेत तेच मराठी माणसांच्या गळ्यात मारणे सुरु झाले आहे. आता मी शब्दबंबाळ न होता एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो…. इतके चांगले आणि वैविध्यपूर्ण मराठी सिनेमे जे तुम्ही अजून ही दाखवायची तसदी घेतली नाहीत ते मेले होते का जे आम्ही आता "रुद्रादेवी", "आर्य एक प्रेमवीर" असले टुकार सिनेमे पहायचे? त्यातले काही चांगले असतीलही पण आता तो विषयच नाही.विषय असा आहे की झीने ते आमच्या माथी आम्हाला न विचारता का मारावेत ? इथे राग प्रेक्षकांना गृहीत धरण्याचा आहे. मराठी चित्रपटांना कल्पनादारिद्र्य आलंय का? आजही असे कितीतरी छान मराठी चित्रपट आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आम्ही सोहळ्यात पाहतो पण ते आमच्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. झीला जर मराठीचा खरच कैवार घ्यायचा असेल तर त्यांनी असे चित्रपट मराठी माणसांपर्यंत पोचवावेत आणि आपल्या मराठीपणाचा दाखला द्यावा आणि सौधींडीयन तमाशे ताबडतोब बंद करावेत !! असले टुकार उद्योग करायला इतर चायनल आहेत…झीने तो कित्ता गिरवण्याची गरजच काय ? तेव्हा झी …. वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब नाही.

प्रतिक्रिया

त्यांचा धंदा आहे तो. त्यांनी काय दाखवावे आणि काय दाखवू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
आपल्याने पाहवले जात नसेल तर हातातील रिमोटने चॅनल बदलावे. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Aug 2014 - 8:24 pm | माम्लेदारचा पन्खा

हेच चाललंय हो सगळीकडे…. तो दूरचित्रवाणी संच काय पेटवायचा का आता??

हरकत नाही. फक्त मोकळ्या जागेत, लहान मुले, अपंग अथवा आजारी व्यक्ती, ह्यांना लांब ठेवून 'तशेच' जवळपास कुणी नसताना हा प्रयोग करता येईल.

पेटवण्यासाठी विशेष इंधन मिळत असल्यास त्याचाही उपयोग करावा.

- जनहीतार्थ जारी.

आदूबाळ's picture

18 Aug 2014 - 8:16 pm | आदूबाळ

"सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे

ऐला हो?

वर्जिनल सिंघम दाखवला का हो डब करून? त्याचं हिंदी डबिंग बरंच हास्यस्फोटक आहे. मराठी अजून भारी असेल.

पैसा's picture

18 Aug 2014 - 9:44 pm | पैसा

+१ अगदी हेच्च!

सुहास झेले's picture

18 Aug 2014 - 11:29 pm | सुहास झेले

इंग्रजी सिनेमे पण डब करून दाखवले होते काही... बॅटमॅन वगैरे वगैरे.... त्याचे भाषांतर ऐकून, स्फोटकांचे नवनवीन प्रकार अनुभवता आले असते ;-)

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 7:21 am | कैलासवासी सोन्याबापु

मला "ओशन्स १२" मराठी पाहुन घेरी आलेली !! त्यात ही वेस्ट कोस्ट च्या अ‍ॅक्सेंट ला अनुसरुन भाषा ही नाही !!!

ब्रॅड पिट जॉर्ज क्लुनी ला " डॅनी आता तु तुरुंगात वगैरे जाणार आहेस" असे काहीसे बोलला की ही माणसे बेलाजियो लुटणार की नानापेठेत प्लॅनिंग करुन बालेवाडीचे ऑर्किड लुटणार हेच कळेनासे होते!!!

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Aug 2014 - 9:47 am | लॉरी टांगटूंगकर

==))

सुहास..'s picture

21 Aug 2014 - 12:03 pm | सुहास..

पंखा शेठ , सध्या प्रत्येक च्यानलवर एक लाईन लिहुन येते , आपल्याला च्यानल विषयी वा त्या कार्यक्रमाविषयी आक्षेप असल्यास संस्थळावर नोंदवावा :)

शेवटी आईने मला काल की परवा एक जुना होणार सून त्या घरची चा एक एपि. पहायला लावला. त्यात एक मुलगी गणपतीच्या देवळात जाऊन गोग्गोड संवाद म्हणत होती व एका घरी रक्षाबंधनाचा कारेक्रम चालू होता. त्यात एक सशक्त बाई पळत होती व तिला मिळालेली भेटवस्तू मिळवायचा प्रयत्न करत होती. अर्धा एपिसोड पाह्यल्यावर कांपुटरात डोके घातले. मालिका अशा असतील तर शिनेमे कशे असतील याची कल्पना आली. जुन्यांबद्दल काही म्हणायचे नाही ते चांगले असणार पण यांनी दाखवायला हवेत ना!

चक्क अर्धा एपिसोड पाह्यलात म्हणजे भारीच धीट हो !! मी तर फेसबुकावर झी मराठीच्या पेजवर लिहून आलो होतो ही एक तद्दन टुकार सिरीयल आहे म्हणून.

रेवती's picture

19 Aug 2014 - 4:13 am | रेवती

हेच ते! तुझा अंदाज असा चुकायचा होता तर!
अनेकजण ती मालिका नियमीतपणे 'विनोदी' मालिका म्हणून पाहतात.

नंदन's picture

19 Aug 2014 - 3:08 am | नंदन

त्यात एक मुलगी गणपतीच्या देवळात जाऊन गोग्गोड संवाद म्हणत होती व एका घरी रक्षाबंधनाचा कारेक्रम चालू होता. त्यात एक सशक्त बाई पळत होती व तिला मिळालेली भेटवस्तू मिळवायचा प्रयत्न करत होती.

=)) मेलो!

एका मराठी मालिकेत तर "अगं बडीशेप कुठेय? - तुला म्हैतीय ना अण्णांना जेवल्यावर बडीशेप लागते ते - शोधाशोध - बरं केलं बाई आणलीस ते - का हो अण्णा? - अगं जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली नाही तर जेवल्यासारखंच वाटत नाही - मग आळीपाळीने पाच-सहा बायकांचे कृतकृत्य-सुजट-क्लोजअप चेहरे" हा शीन (बहुधा संवादलेखकांना अजून काही न सुचल्याने) चांगली दहा मिनिटं ताणला होता, त्याची आठवण झाली :)

रेवती's picture

19 Aug 2014 - 4:19 am | रेवती

अगदी हेच! त्या जानूच्या मालिकेतही रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहताना चार मेंटेन्ड फिगरवाल्या जावांचे अस्सं सासर सुरेख बाईवाले चेहरे होते.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2014 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर

>>>> मेंटेन्ड फिगरवाल्या जावांचे.....
कित्ती ती जळजळ.....

बॅटमॅन's picture

19 Aug 2014 - 2:50 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

अचूक पकडलेत हो =))

उपरोधानं लिहीलं असेल हो, नाहीतर त्या चार काकवा मेंटेंन्ड फिगरवाल्या असतील तर ऋजुता दिवेकरने एव्हाना 'लुज युअर वेट' पुस्तकं लिहीणं बंद करायला हवं!! ;)

प्यारे१'s picture

19 Aug 2014 - 3:13 pm | प्यारे१

'झिरो' ही सुद्धा फिगरच आहे असं आम्ही मानतो.

आपल्याला वर्कआऊट करायला कंटाळा येतो यावर पांघरुण घालण्यासाठी वरची ओळ चान चान आहे. ;)

प्यारे१'s picture

19 Aug 2014 - 3:26 pm | प्यारे१

अगदी!

बॅटमॅन's picture

19 Aug 2014 - 3:41 pm | बॅटमॅन

त्यावरून तो क्वोट आठवला-

I am in shape. Round IS a shape!!!

अहो काका, काय हे? त्या सूडने ओळखले की! एका फ्रेममध्ये चारजणींना माववणे हेच मोठे कौशल्याचे काम आहे.
बादवे, देवाच्या क्रिपेने मी 'अबब' गटात मोडत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2014 - 1:03 am | प्रभाकर पेठकर

*lol* *LOL*

>>>> देवाच्या क्रिपेने मी 'अबब' गटात मोडत नाही.

*lol* 'अबब' गटातले 'मोडत' काय, 'वाकतही' नाहीत. *LOL*

शिद's picture

18 Aug 2014 - 8:29 pm | शिद

मागणी तसा पुरवठा. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 8:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

माज्याकडं टीवीच नाय !!!!!

मुक्त विहारि's picture

18 Aug 2014 - 11:53 pm | मुक्त विहारि

तुमच्या कडे भरपूर वेळ दिसत आहे.

इथे आम्हाला मिपाचेच लेख वाचण्यासाठी पण वेळ मिळत नाही.

बादवे,

त्या टी.व्ही.ला डी.व्ही.डी. प्लेयर जोडा आणि तुम्हाला आवडतील ते सिनेमे बघा.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2014 - 12:13 pm | पिलीयन रायडर

+१

झी टॉकीज वर चांगले पिक्चर लागत नाहीत हा काय विचार करायचा विषय आहे का?

मुक्त विहारि's picture

20 Aug 2014 - 12:39 am | मुक्त विहारि

+ १

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Aug 2014 - 9:24 am | माम्लेदारचा पन्खा

डिव्हीड्यांची लैब्र्री सांगा की चांगली …

विकत घिऊन यक डाव पाहिली की कंटाळा येतोय आक्षी !!

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 12:26 am | मुक्त विहारि

तुम्ही राहता कुठे?

डोंबोलीला यायला जमत असेल तर २ टेरा बाईटची हार्ड डिस्क घेवून या.

आमचे धाकटे चिरंजीव देतील कॉपी करून.

मोप सिनेमे मिळतील.

बिंधास र्‍हावा.

टवाळ कार्टा's picture

31 Aug 2014 - 12:07 pm | टवाळ कार्टा

मी आणेन कट्ट्याला आलो की

मुक्त विहारि's picture

3 Sep 2014 - 12:26 am | मुक्त विहारि

सिनेमे की हार्ड डिस्क?

सिनेमे आणणार असशील तर कुठले?

आम्ही खानावळीत जेवत नाही, हे तुम्हाला ठावूक नाही काय?

हार्ड-डिस्क आणणार असाल तर कुठली? म्हणजे कुठल्या कंपनीची?

नवी कोरी हार्ड-डिस्क असेल तर उत्तम आणि जुनी असेल तर क्रुपया त्यात व्हायरस नाही, ह्याची खात्री करून घेणे,

तुमच्या हार्ड-डिस्कच्या व्हायरस मुळे आमचा संगणक बिघडला तरी चालेल, पण आपल्या मैत्रीत खंड पडणार नाही......

टवाळ कार्टा's picture

3 Sep 2014 - 8:13 am | टवाळ कार्टा

हार्ड डिस्क आणेन...व्हायरस फ्री (म्हणजे व्हायरस नसलेली :) )

कंजूस's picture

19 Aug 2014 - 2:23 am | कंजूस

ये हुई काम की बात ।
तुम्ही पाहत नसाल परंतु सेट टॉप बॉक्स आणि त्यातले सिमकार्ड चानेलवाल्यांना अचूक माहिती देते की कितीजण सूनबाई आणि रुद्रादेवीकडे डोळे लावून बसले आहेत ते .

झीचा दर्जाच खालावलाय सगळ्या बाबतीत.त्यांचे न्युज पासुन सिनेमापर्यंत सगळेच भिकार झाले आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Aug 2014 - 12:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कोण झी??
धन्यवाद!!

ही च्यानेले म्हणजे डब करणार्या आणी भाषांतर करणार्यांसाठी रोजगार हमी योजना ! हे एक नवीन क्षेत्र उदयास येऊ पहात आहे. उदा :हिराईनीने नवीन ड्रेस घातल्यावर हिरो म्हणतो ' हा तुझ्याबरोबर चांगला जातो !
आणि आपल्यासारखे लोक विसरता जी टीव्हीला एक बंद करण्याचे बटण असते !.
अर्थात काही निर्मात्यांच्या घरी जाऊन (त्यांचे) डोके फोडण्याचा पर्याय असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते

>>> निर्मात्यांच्या घरी जाऊन (त्यांचे) डोके फोडण्याचा पर्याय असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते

काय संबंध? निर्माते आपलं (म्हणजे त्यांचं) काम इमानदारीत करतात. त्यांच्यासाठी पैसे मिळवणं हे एकच काम असतं ते हे लोक 'व्य व स्थि त' करतात. आपण आपलं रिमोट कंट्रोल वापरायचं काम करायचं ना 'व्य व स्थि त'. ते नाही करत म्हणून त्रास.

बाकी रेवाक्का ला 'वेल मेन्टेन्ड फिगर' म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की??

'होणार सून मी त्या (की ह्या) घरची' ही मालिका पाहण्याची नामुष्की आमच्यावर आलेली आहे. एकेकाळी चवळीच्या शेंगा असलेल्या मराठी नायिका सध्या भरताच्या वांग्याएवढ्या झाल्यात एवढंच म्हणू इच्छितो.
-भोपळा प्यारे

धन्या's picture

19 Aug 2014 - 3:28 pm | धन्या

एकेकाळी चवळीच्या शेंगा असलेल्या मराठी नायिका सध्या भरताच्या वांग्याएवढ्या झाल्यात एवढंच म्हणू इच्छितो.

*lol*

नंदन's picture

19 Aug 2014 - 4:02 pm | नंदन

भरताड भरतीचे वानगीदाखल उदाहरण :)

प्यारे१'s picture

19 Aug 2014 - 4:07 pm | प्यारे१

कोट्याधीश नंदन. _____/\___
पण भरताड म्हणवत नाही. सगळ्या चांगल्या कलाकार आहेत. कलेचं 'अंग' आहे सगळ्यांना.
जरा दोन चार मालिका मिळाल्या की एकदम सर्वार्थानं सुसाट सुटतात.

इरसाल's picture

19 Aug 2014 - 4:13 pm | इरसाल

भरताचे वांगे ते पण बामणोदचेच.......

इरसाल's picture

19 Aug 2014 - 4:14 pm | इरसाल

तिकडचा टिपीकल शब्द (वांग्यांच्या बाबतीतला)लिहायचा राहिला म्हणुन हा नवा प्रतिसाद.
बामणोदचे गोलगिटिंग भरताचे वांगे.

काही निर्माते तर इतक्या भिक्कार सिरीयल्स बनवताहेत की त्यांना थांबवण्याचा हा एकच पर्याय वाटतो. प्रेक्षकाला ईतका बुद्दु समजताहेत की बास. कधीतरी मार खाण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहेच. कधीतरी राज ठाकरे एखादा एपिसोड पहातील अशी प्रार्थना आपण करु या !

धन्या's picture

19 Aug 2014 - 7:07 pm | धन्या

तुम्ही माझी संध्याकाळ बनवलीत. :)

हा प्रतिसाद या धाग्यासोबत छान जातो.

आदूबाळ's picture

19 Aug 2014 - 8:36 pm | आदूबाळ

हे काय चाल्लंय समजून घेण्यासाठी माझी मदत करा प्लीज...

हिंदीतून मराठीत डब झालेल्या जाहिराती बघत चला, असा प्रश्न पडणार नाही.

एक शाम्पूच्या अ‍ॅडचं उदाहरण, लेकीची आईस म्हणते, "हिला बांधून ठेवू का मोकळी सोडू, मोकळी सोडू. पण एका अटीवर, केस गळण्याला परवानगी नाही"

अशा जाहीराती पाहण्यापूर्वी "विमा ही आग्रहाची विषयवस्तू" घेतलेली आहे ना याची खात्री करावी. ;)

चौथा कोनाडा's picture

20 Aug 2014 - 9:11 pm | चौथा कोनाडा

आमच्या ऑफिसातील एका फटाकडीला "विमा" असं नाव पडलंय ! कारण बरयाच 'रसिकांच्या" मते ती आग्रहाची "विषय-वस्तू" आहे.

रेवती's picture

19 Aug 2014 - 10:10 pm | रेवती

येस्स!

बबन ताम्बे's picture

21 Aug 2014 - 2:29 pm | बबन ताम्बे

तो झुंज मराठमोळी नावाचा श्रेयस तळपदेंचा टुकार शो अजुन चालू आहे का हो?
काय ते सहभागी लोकांचं मराठी !

अहो प्यारे१जी, राखलेली फिगर असेल तर तसे बोलायची वेळ येत नाही ना! ;) आता हे लोक ज्या क्षेत्रात काम करतात त्यात शरीरयष्टी पर्फेक्ट नाही तरी बेताची बरोबर हवी असे माझे मत. हिरविनीची फिगर योग्य हवी म्हणताना बाकीच्या पात्रांना सुटायला परवानगी असते असे नाही.......हे म्हणताना आधी मी जरातरी बरी तब्येत राखून असायला हवे याची जाणीव आहे.

बाळसं बाळगून असलेल्यांच्या चरबीसाठी 'फेमिनाईन रीलिफ फंड/ दुष्काळ निवारण निधी' असं गोंडस नाव आहे.

मित्रहो's picture

19 Aug 2014 - 1:06 pm | मित्रहो

सिरीयल्स ज्याला बघायच्या असतील त्याने युट्यूबवर बघाव्या म्हणजे बंद करण्यासोबत फॉरवर्ड देखीन करता येतात.

मराठीचे गुणगान गाण्यासाठी झी चा सर्वसेवा हा काही मराठी माणूस नाही आहे आणि मराठी माणसांकडे ना मुसलमानांसारखा धर्मांतपणा आहे की जेव्हा अमेरिका आफगाणिस्तानातील मुसलमांनावर हल्ला करते तेव्हा येथे भारतातील मुसलमान अमेरिकन वस्तुवर बहिष्कार घालतो ना साउथवाल्यासारखे भाषाप्रेम की जेथे मातृभाषा व्यतिरिक्त इतर भाषा फाटयावर मारल्या जातात.

नशीब समजा भोजपुरी सिनेमा डब करुन दाखवत नाहीय.

भोजपुरी सिनेमा डब करुन दाखवत नाहीय

का नाही दाखवत खरं तर? लय भारी असतात.

तुषार काळभोर's picture

19 Aug 2014 - 3:37 pm | तुषार काळभोर

व्हु'ज टॉकिंग!!

मराठीचे गुणगान गाण्यासाठी झी चा सर्वसेवा हा काही मराठी माणूस नाही आहे आणि मराठी माणसांकडे ना मुसलमानांसारखा धर्मांतपणा आहे की जेव्हा अमेरिका आफगाणिस्तानातील मुसलमांनावर हल्ला करते तेव्हा येथे भारतातील मुसलमान अमेरिकन वस्तुवर बहिष्कार घालतो ना साउथवाल्यासारखे भाषाप्रेम की जेथे मातृभाषा व्यतिरिक्त इतर भाषा फाटयावर मारल्या जातात.

फार माजलेत लेकाचे. जाऊद्या तुम्ही. तुम्हीच अशी एखादी मराठी अस्मिता वगैरे जपणारी दुरदर्शन वाहिनी सुरु करा आता.

सकाळी भक्तीसंगीताच्या चित्रफिती, दुपारी नाटके, सायंकाळी अशोक्स्राफ, लक्ष्या आणि म्हयेश कोटारेचे पिच्चर आणि रात्री महाराष्ट्राच्या कलागुणांना वाव देणारे म्हागुरु, स्वप्निल जोशी यांचे रीयालिटी शो. हाय काय आनी नाय काय. आपली अस्मिता आपणच जपायला हवी ना शेवटी. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2014 - 7:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते म्हागुरु डोक्यात जातात....स्वप्निल जोशीचं मराठी दिव्य आहे. मक्याचे चित्रपट डोक्याची मंडई करतात.

काळा पहाड's picture

19 Aug 2014 - 8:42 pm | काळा पहाड

की जेव्हा

की जेथे

ही प्रति़क्रिया एखाद्या इंग्रजी प्रतिक्रियेचा अनुवाद आहे का हो?

>>ही प्रति़क्रिया एखाद्या इंग्रजी प्रतिक्रियेचा अनुवाद आहे का हो?

आयडी बघा, MP लिहीलंय. तिकडे असं हिंदाळलेलं मराठी चालतं म्हणे.

सूडजी, हा प्रकार इकडेही काही लोक करतात.

>>सूडजी, हा प्रकार इकडेही काही लोक करतात.

हे बाकी खरं हो !! धन्या'जी!!

पैसा's picture

20 Aug 2014 - 4:18 pm | पैसा

काय चाललंय रे धनाजी संताजी!

पूर्वी मी बैटमैन चा पंखा होतो. आता धन्या आणि सूड चा बी पंखा झालोय !!

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Aug 2014 - 4:24 pm | llपुण्याचे पेशवेll

निलुशेठ, सहमत आहे तुमच्याशी. फक्त एखाद्याने भाषाप्रेम वगैरे म्हटले की त्याची टर उडवायची. बस्स. तुमचे निरीक्षण बरोबर आहे. मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय ओढणार. चालायचंच.

NiluMP's picture

19 Aug 2014 - 3:30 pm | NiluMP

हो खरंच की म्हणून मराठी सिनेमासाठी मुबईत सिनेमागृह मिळत नाहीत.

सध्या मराठीत वर्षाला शेकडो चित्रपट तयार होतात. त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच चित्रपट गल्ला जमवण्यात यशस्वी होतात. बाकीचे अर्थातच डब्यात जातात. ठराविक यशस्वी चित्रपट विकत घेण्यासाठी सगळे वाहिन्यावाले धडपडतात. डब्यात गेलेल्या चित्रपटांचे निर्माते पैसे वसुल करण्यासाठी ठराविक रकमेच्या खाली चित्रपटाचे हक्क वाहिन्यांना विकत नाहीत आणि ती रक्कम मोजायला वाहिन्यावाले तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक 'पुरस्कार प्राप्त' चित्रपटसुध्दा या वाहिन्यांवर कधीच येत नाहित. मग तेच ते चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवले जातात.

च्यानेल्सवर सिरीयल्सच्या दरम्यान जाहिरातींचे ब्रेक्स असतातच. त्या व्यतिरिक्त खाली एक पट्टी सरकत असते. त्यात परत केंव्हापदद्याच्या मधे वरच्या किंवा बाजुच्या कोपर्यात मधेच एखादे चित्र झळकते. जवळ जवळ अर्धा पडदा झाकला जातो. या वर काही दाद मागता येईल का? शेवटी आपण अमुक इतके पैसे देऊन जाहिरातींचा ब्रेकचा वेळ देतोच त्यात परत आपल्या बघण्याच्या आनंदांवर असे विरजण घातले जाते. मला तर ही प्रेक्षकांची फसवणुक वाटते,.

भाते's picture

19 Aug 2014 - 8:36 pm | भाते

कुठल्याही वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा/मालिकेचा अधिकृत वेळ ३० मिनिटे असतो. कार्यक्रम/मालिका नंतर/काही वेळाने तुनळी वर २०/२२ मिनिटांत बघायला मिळते. (पुढली २ मिनिटे शिर्षक गीत, कालच्या भागात, पुढे काय यांसाठी) म्हणजे २० मिनिटांसाठी १० मिनिटे जाहिराती असतात. (५०%).
शिवाय कार्यक्रम/मालिका चालु असताना अक्षरश: कुठेही (वरती, खालती, सगळे कोपरे इ.) झळकणाऱ्या जाहिराती छळवाद करायला असतातचं. जाहिरातीमधुन इतका बक्कळ पैसा कमवुनदेखिल पुन्हा त्या केबल वाल्याला दर महिना काहीशे रुपये द्यायचे!
जाहिराती पध्दल तर न बोललेलेच बरे! मुळ हिंदी जाहिरातीमध्ये अर्धे इंग्रजी अर्धे हिंदी शब्द असतात. भाषांतर (?) करणारे फक्त हिंदी शब्दांचे भाषांतर करतात. त्यामुळे अर्धी मराठी अर्धी इंग्रजी जाहिरात ऐकावी लागते.

तुमचा अभिषेक's picture

20 Aug 2014 - 3:10 pm | तुमचा अभिषेक

सिंपल लॉजिक आहे
त्यांनी चोवीस तास वेगवेगळे कार्यक्रम दाखवले तरी तुम्ही २४ तास त्यांचाच चॅनेल लाऊन बसणार नाही. मग ते नवनवीन कार्यक्रम दाखवून एक्स्ट्राचे पैसे का गुंतवतील. सिनेमांचे हक्क फुकट तर मिळत नाही किंवा कार्यक्रम फुकट तर बनत नाहीत. त्यामुळे मग प्रत्येक चॅनेल असे धंदे करतेच.

सोनीवर बघावे तेव्हा (मी नाही बघत) सीआयडी आणि त्यांचाच छोटा भाऊ सेटमॅक्स वर बघावे तेव्हा (हे देखील मी नाही बघत) सुर्यवंशम चालू असतेच ना .. आता वर्षभर आयपील खेळता येत नसल्याने त्यांना मग उर्वरीत वेळेत अशी वेळ मारून न्यावीच लागते.

मित्रहो's picture

20 Aug 2014 - 5:31 pm | मित्रहो

या बदलामागे पण काही ठोस कारणे असतील हे नक्की, याआधी झीने बरीच चांगले मराठी कार्यक्रम दिलेत. गंगाधर टिपरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट इत्यादी. मी माझा अंदाज बांधतोय
1. हल्ली आवड बदललीय आणि लोकांना हेच आवडते ही मानसिकता. सध्या हिंदीत चालणारे चित्रपट, किंवा हिंदीतल्या मालिका बघितल्या तर झीचे काही चुकतेय असे वाटत नाही. आपण प्रेक्षकच असा आभास निर्माण करतोय.
2. विशिष्ट प्रकारचा शहरी मघ्यमवर्गीय सोडला तर साऱ्यांनाच लाउड इमोशन आवडतात हा ग्रह. माझ्या प्रेक्षकांना जर मी हे दिले नाही तर ते हिंदीकडे वळतील ही भिती. जमानाच झगमगतेचा आहे. त्याता संवेदनशील भावनांना विचारतो कोण.
3. लोकांना कंटाळा येत नाही, आला तरी ते एकदा सवय लागली कि ते बघतच राहतात. ज्यांना बघायचे नसते ते तसेही बघत नाही. त्यामुळे ताेचतोचपणा आला, रिपिट केले तरी चालते ही भावना. तेंव्हा कमी खर्चात हे करता येते.
4. कदाचित झीमराठीमधे काही आंतरीक बदल झाले असतील किंवा होत असतील. झीचे सर्वेसर्वा आधीही तेच होते आताही तेच आहेत.
5. झीचा चित्रपट थेटरात चालू असताना झीने चांगला चित्रपट जर टिव्हीवर दाखविला तर त्या थेटरातल्या चित्रपटाचे मार्केट जाते.
6. दहा वाइट गोष्टी दाखवून एक चांगला शो केला कि त्याला मिळनारा प्रतिसाद हा कल्पनेपलीकडला असतो. उदा. एका लग्नाची दुसरी गोष्ट.

-मित्रहो

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Aug 2014 - 9:26 am | माम्लेदारचा पन्खा

लई भारी………… १ लंबर !!

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2014 - 11:30 am | प्रमोद देर्देकर

अहो लोकांना आताशा कुठल्याही नातेवाईकांकडे जायला होत नाही. ७ ते १० हा मालिकंचा वेळ.
त्या हिंदी असोत कि मराठी असोत सगळे जण मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या इडियटबॉक्सच्या समोर बसतात.

अशा वेळी आपल्याकडेही कोणी कडमडयला नको असे वाटते.
पुर्वी मोठी माणसे पत्ते, कॅरम खेळायचे तर बायका शेजारणीशी गप्पा मारत मारत रात्रीचा स्वयंपाक करायच्या. आताशा चित्रच पालटले आहे.
आणि पेठकरकाका आता त्या टी.व्ही वरिल मालिकातल्या बायड्यांबरोबर घरोघरातल्या बायकांची पण हालत कशी झाली आहे त्या करिता सध्या चे.पु. वर प्रसिध्द असलेले एक चित्र इकडे डकवतो.
टॉ.व्ही. स्लिम झाले तर बायड्या प्यारे१ ने म्हंटल्या प्रमाणे भरताच्या वांग्याएवढ्या झाल्यात...

1

>>बायड्यांबरोबर घरोघरातल्या बायकांची पण हालत कशी झाली आहे

हे लिहीताना पुरषांनी स्वतःच्या पोटाचे घेरही बघावेत एकदा. ;)

कवितानागेश's picture

21 Aug 2014 - 4:03 pm | कवितानागेश

तीव्र सहमती! ;)

शिद's picture

21 Aug 2014 - 4:08 pm | शिद

हाहाहा...सहमत.

-बिअर बेली वाला ;)

सूड's picture

21 Aug 2014 - 6:08 pm | सूड

>>बिअर बेली वाला

असं चारचौघात लिहू नये, आम्ही लिहीलंय का? ;)

बीयरची बी तरी खाल्लीय का तुम्ही कधी? ;)

>>बीयरची बी तरी खाल्लीय का तुम्ही कधी?
आता तुम्ही बोललातच म्हणून स्पष्ट बोलतोय हो, आम्ही आमच्या सपाट पोटाबद्दल लिहीलंय का असं म्हणायचं होतं!!

आता झायरात झायरात म्हणणार्‍यांना योग्य तेथे मारण्यात येईल. ;)

मित्रहो's picture

21 Aug 2014 - 8:20 pm | मित्रहो

मॉनिटरची साइज कमी होत गेली आणि पुरुषांचे घेर वाढत गेले. जॉब्स तू चुकला रे तू मिनी आणला, पॅड आणला आणि आमची वाट लावून गेला.

धन्या's picture

21 Aug 2014 - 8:36 pm | धन्या

कित्ती कित्ती सुंदर...

अन्नू's picture

27 Aug 2014 - 4:34 pm | अन्नू

आत्ताशी जरा मिपावर आल्यासारखं वाटलं!