जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
15 Aug 2014 - 4:16 pm

(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे).

मनीं लोचनी श्री हरी तोची पाहें.
जनी जाणता भक्त होऊनी राहें.
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा.

समर्थ रामदास म्हणतात ज्याच्या मनांत व लोचनांत म्हणजे आंत व बाहेर श्रीराम. तोच त्याला सर्वत्र दिसत असतो. अंतर्बाह्य रामरूप भरून गेल्यामुळें त्याला ज्ञानीही म्हणावें व भक्तही म्हणावें किंवा ‘जाणता भक्त’ म्हणावे त्याची बैठक बसलेली असते. त्याचा ठिकाणीं ज्ञान व भक्ती एकरूप झालेली असतात. तो पूर्ण ज्ञानी असून सगुणांचे प्रेम व साधनाचा क्रम दोन्ही राखून असतो. तो सर्वोत्तम भक्त धन्य होय. ((मनोबोध: ४७)

समर्थ स्वत:ला श्रीरामाचे ‘दास’ म्हणायचे. पण दास कसा ‘जाणता’ असायला पाहिजे. पण श्रीरामाचा जाणता दास म्हणजे कोण? हा प्रश्न समोर येतो. उदाहरण. मी सकाळी उठून श्रीरामाचे नाव घेतो, सतत रामनामी माळा हातात घेऊन राम नाम जपत राहतो, श्रीरामाचे स्वरूप सतत डोळ्यांसमोर असते, शिवाय रोज श्रीरामाच्या देवळात जातो व रामनवमीचा व्रत आणि भंडारा ही करतो. मी श्रीरामाचा दास आहे का? उत्तर नाही. केवळ प्रभूचे ध्यान करणे म्हणजे ‘प्रभू भक्ती नाही’. समर्थांनी म्हंटले आहे ‘गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा’ जाणता भक्त केवळ श्री रामाची पूजा अर्चना करून थांबत नाही अपितु प्रभू रामचंद्राने दाखविलेल्या मार्गावर चालतो. अर्थात त्यांचे ‘मनसा वाचा कर्मणा’ अनुकरण करतो. समर्थ रामदास श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर आयुष्य भर चालले आणि मनाचा श्लोकाच्या माध्यमातून तोच मार्ग आपल्या शिष्यांना दाखविला

आता प्रभू रामचंद्र कसे होते. समर्थ म्हणतात ‘नसे अंतरीं कामकरी विकारी उदासीन तो तापसी ब्रह्मचारी’ श्री राम सर्व प्रकारच्या कामवासने पासून मुक्त, परस्त्रीला माते समान मानणारे, शिवाय सदा प्रिय बोलणारा, ‘सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा’ त्रिवाचा सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा’ श्री राम सत्यवादी होते पण कसे नम्र आणि रुचकर बोलणारे होते. आपल्या मधुर बोलण्याने त्यांनी परशुरामाचा क्रोध शांत केला होता. आपल्या माता-पिताच्या आज्ञापालन हेतू त्यांनी आनंदाने वनवास स्वीकारला. दृढ निश्चयी श्रीरामाने तारुण्यात अरण्यवास स्वीकारला.

श्रीरामांच्या काळी जवळपास गंगेच्या दक्षिणे पासून तर समुद्रापर्यंत भरतभूमी वर लंकेच्या राजा रावणाचे राज्य होते. अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. विरोध करणार्यांचा नायनाट करणे हेच राक्षसी धोरण होते. जंगलात राहणारे वनवासी, भिल्ल, शबर, वानर इत्यादी रोज मरण पाहत जगत होते. दंडकारण्यात आल्यावर श्रीरामाने ही परिस्थिती पहिली. सगुणांची सेवा हीच ईश्वरी सेवा. दीन-दुबळ्या लोकांचे दुख दूर करण्याचा बीडा त्यांनी उचलला. शबरीचे उष्टे बोर खाणे’ याचा अर्थ वनवासी समाजाला श्री रामचंद्राने आपले मानले असा असा होतो. वानर राज सुग्रीवला आपले बंधू मानले. तेथील राक्षसांचा संहार करून वनवासी जनतेला राक्षसी अत्याचारापासून मुक्त केले. साहजिक रावणा बरोबर संघर्ष अनिवार्य होता. यात श्रीरामाची कुठलीही स्वार्थ बुद्धी नव्हती म्हणून रावणाचा वध करून बिभीषणाला ‘धर्मानुसार राज्य करण्यासाठी’ लंकेचे राज्य सौपविले.

समर्थांच्या वेळी ही महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती. मोगली आणि आदिलशाही अत्याचाराने प्रजा त्रस्त होती. लोकांना आपापल्या धर्मानुसार वागून कर्म करणे कठीण झाले होते. श्रीरामाच्या भक्तीत रंगलेल्या समर्थांनी रामराज्याचे स्वप्न महाराष्ट्राच्या भूमीवर पाहिले. रामभक्त हनुमाला आपला आदर्श मानले. श्री हनुमंताचे वर्णन करताना तुलसीदास म्हणतात:

‘बिद्यावान गुनी अति चातुर.
राम काज करिबे को आतुर.
भीम रूप धरि असुर सँहारे.
रामचंद्र के काज सँवारे.’

समस्त शास्त्रांचे ज्ञान, गुणी चतुर आणि श्रीरामाचे कार्य ‘दुष्ट असुरांच्या संहारास सदैव तत्पर राहणारे’ असे रामभक्त हनुमान होते. समर्थांनी हनुमानाचे अनुकरण केले. लहानपणीच सन्यास घेतला. १२ वर्ष तप केले अर्थात समस्त शास्त्रांचा गहन अभ्यास केला आणि रोज १००८ सूर्य नमस्कार करून शरीर ही बलवान केले. समर्थ मृदभाषी, बोलण्या सारखे चालणारे होते. लोकांना ओळखून त्यांच्या करून योग्य कार्य संपादित करवून घेण्याचा गुण होता. आपल्या सारखे असेच लाखों शिष्य त्यांनी महाराष्ट्रात घडविले. समर्थांनी आपल्याच मुखाने म्हंटले आहे ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे’. सारांश, समर्थांनी जनतेला जागृत करून ‘रामाचे कार्य पूर्ण करण्यास प्रेरणा दिली. या निष्ठावंत समर्थ शिष्यांच्या सहयोगाने, ज्या वेळी देशांत अन्य भागात मंदिरांचा विध्वंस होत होता. समर्थांनी महाराष्ट्रात समर्थ संप्रदायच्या मठांची स्थापना केली, जाती-पातीचा कुठलाच भेदभाव न ठेवता मठांवर योग्य शिष्यांची नेमणूक केली. देशच्या उन्नतीत स्त्रियांचा ही बरोबरीचा वाट असतो असा त्यांचा विश्वास होता म्हणून अत्यंत विश्वासाने त्यांनी स्त्रियांना ही मठांचे दायित्व सौपविले. समर्थ काळाच्या मानाने पुष्कळ पुढे होते. त्या काळचा एक पोर्तगीज लेखक कॉस्मे डी गार्डा लिहितो ‘समर्थांच्या मठांमध्ये कुठला ही भेद-भाव नाही. युद्धात घायाळ मुस्लीम सैनिकाला ही इथे आसरा मिळतो’. समर्थांच्या मनात कुठल्या ही धर्म संप्रदाय विषयी द्वेषभाव न्हवता. समर्थांच्या कार्यामुळेच प्रजा गुणसंपन्न आणि बलवान झाली. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली. हे सांगण्याची गरज नाही.

समर्थांनी आपल्या बोलण्या आणि वागण्याने समर्थांचा दास कसा असतो दाखविले. गुलामीच्या अंधारात खितपत पडलेल्या दीन-दुर्बल जनतेला स्वराज्याचा सूर्य दाखविला आणि श्रीरामाचे कार्य पूर्ण केले. समर्थांनी म्हंटले आहे: स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होतसे. बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार झाला.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा ‘जाणता भक्त होय’. असा भक्तच भगवंताचा सर्वोत्तम दास असतो. आज स्वतंत्रता दिवस आहे, आपण ही श्री रामाने दाखविलेल्या मार्गावर चलण्याचा प्रयत्न करून, देशात रामराज्य स्थापनेचा प्रयत्न करू जेथे कुणी ही दुखी नसेल.

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी

सुंदर लेखन! छान लिहिले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींची श्रीरामभक्ती अवर्णनीय आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.

नानासाहेब नेफळे's picture

19 Aug 2014 - 4:54 pm | नानासाहेब नेफळे

छान लेखन. रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली.

प्यारे१'s picture

19 Aug 2014 - 4:58 pm | प्यारे१

जौ द्या हो.
>>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे

'तुम्ही' एवढं मान्य केलंत ते तरी काय कमी आहे?
स्वराज्य बनलं तरी सुराज्य बनायला काय त्रास पडतो ते आज दिसत आहेच की.

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 12:29 pm | प्रसाद गोडबोले

नेफळे ,
तुकारामांचा कालखंड काय ?
शिवाजी महाराजांचा कालखंड काय ?
त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ?

हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 12:29 pm | प्रसाद गोडबोले

नेफळे ,
तुकारामांचा कालखंड काय ?
शिवाजी महाराजांचा कालखंड काय ?
त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ?

हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2014 - 2:02 pm | श्रीगुरुजी

>>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली.

अरे माईसाहेब, तू नेहमीप्रमाणेच आपला ब्रिगेडी प्रोपागंडा सुरू केलास. आयुष्यात कधीतरी सुधार रे.

नानासाहेब नेफळे's picture

21 Aug 2014 - 11:29 am | नानासाहेब नेफळे

समर्थ व शिवाजी यांची भेट १६७२ ला झाली, त्याआधी रामदास तिर्थाटनात मग्न होते. नाशिक येते बारा वर्षे तपस्या केल्यांनंतर १६३२ला समर्थ चौदावर्षाच्या वनवास/ भारत भ्रमणासाठी निघुन गेले,शिवाजी १६३२ला दोन वर्षांचे होते, तेव्हा इतक्या लहान मुलाला जाता जाता समर्थांनी प्रेरणा दिली असणे शक्य नाही ,शिवाजींच्या वाढीच्या काळात जेव्हा शिवाजी खर्या अर्थाने जिजाउंच्या संस्कारात घडले तेव्हा समर्थ महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर होते, तिकडून मोबाइल्द्वारे स्वराज्याची प्रेरणा दिली असे म्हणायचे असेल तर त्याकाळात मोबाईल होते हे आधी तुम्हाला सिद्ध करावे लागेल.
समर्थ जेव्हा महाराष्ट्रदेषी परतले तेव्हा १६४७ उजाडले होते, शिवाजिंनी १६४५ लाच तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचा पाया घातला होता ,पूढेही समर्थ शिवाजी भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही ,भेट थेट १६७२ ला झाली,व त्याचा उल्लेखही समकालीन बखरीत नाही ,पेशवाइतल्या कागदपत्रात आहे.मग रामदासांनी शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली असा निष्कर्ष काढणे चूकीचे नाही काय!

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2014 - 1:04 pm | श्रीगुरुजी

अरे माईसाहेब,

उगाच ब्रिगेडी जो खोटा आणि जातीयवादी प्रचार करतात तो इथे लिहू नकोस. तू जे काही लिहिले आहेस ते कोठे वाचलंस? खेडेकरने गरळ ओकली आहे त्या पुस्तकात का कोकाटेच्या पुस्तकात आणि ब्रिगेडच्या इतिहासाच्या पुस्तकात?

नानासाहेब नेफळे's picture

21 Aug 2014 - 1:36 pm | नानासाहेब नेफळे

गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2014 - 9:03 pm | श्रीगुरुजी

>>> गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा.

माईसाहेब, तू सारख्या तुझ्या ब्रिगेडी पिचकार्‍या टाकतो आहेस. जरा १९९० पूर्वीचे कोणत्याही इतिहासकाराचे ऐतिहासिक लेखन, त्यावर आधारीत ऐतिहासिक कादंबर्‍या, श्री समर्थ रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची उपलब्ध असलेली अनेक अस्सल पत्रे, आणि तेही मान्य नसेल तर निदान काँग्रेस सरकारने जी इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार केली होती ती वाचून बघ.

तू इथे जो खोटा इतिहास सांगत आहेस तो काँग्रेसच्या पाठिंब्याने फोफावलेल्या आणि सोकावलेल्या आणि उन्मत्त झालेल्या संभाजी ब्रिगेड नामक फॅसिस्ट संघटनेने १९९० नंतर लिहिलेला प्रोपागंडा आहे. त्यांनी असे का केले याची कारणे उघड आहेत.

नानासाहेब नेफळे's picture

21 Aug 2014 - 9:23 pm | नानासाहेब नेफळे

१९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात. जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे.
कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?
अशा तथाकथित इतिहासकारांना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यानंतर त्यांनी कसा पळ काढला हे तुम्हाला ठाऊक असेलच.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2014 - 1:20 pm | श्रीगुरुजी

>>> १९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात.जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे.
अरे माई,

प्रमाणीकरण करणारे स्वतः इतिहास संशोधक व अभ्यासू हवेत. खेडेकर, कोकाटे, पोळके हे अभ्यासू किंवा इतिहास संशोधक नाहीत. त्यांच्याकडे कोठून आली अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे? ते एका अत्यंत जातीयवादी असलेल्या फॅसिस्ट संघटनेशी संबंधित आहेत. त्यांची एका विशिष्ट जातीच्या द्वेषाने भरलेली पुस्तके म्हणजे प्रमाणीकरण असे समजत असशील तर धन्य आहे तुझी. जयसिंगराव गायकवाड, पांडुरंग बलकवडे, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरूंदकर, गजानन मेहेंदळे इ. संशोधकांपेक्षा खेडेकर, कोकाटे, पोळके इ. चा अभ्यास जास्त व सखोल आहे असे मानणे हे महामूर्खपणाचे लक्षण आहे. १९९० नंतर शिवरायांचे गुरू असलेले श्रीसमर्थ रामदास स्वामी, शिवरायांचे अजून एक गुरू दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फाशी गेलेले चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे इ. विरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन द्वेषमूलक लिहिण्याची एक लाट आली. ब्रिगेडचा उदय याच काळात झाला. वरील नावे पाहिली तर त्यांच्याविरूद्ध का द्वेषमूलक लिहिले जात आहे याचा लगेच अंदाज येतो. याचीच परिणीती भांडारकर संस्थेवर हल्ला करणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणे, त्यांचे संदर्भ इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकणे, बाबासाहेब पुरंदर्‍यांवर शाई टाकून त्यांचा उल्लेख बाब्या असा करणे, दादोजी कोंडदेवांचा उल्लेख दाद्या असा करणे अशा अनेक फॅसिस्ट घटनांमध्ये झाली. ब्रिगेड ज्या पक्षाचं पिल्लू आहे तो पक्ष महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

>>> कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

एक्झॅक्टली! कोणतीही इतिहासाची पदवी नसलेले खेडेकर, कोकाटे सारखे मत्सरी जातीयवादी एका विशिष्ट जातीविरूद्ध अत्यंत असभ्य लेखन करतात, सत्ताधारी पक्ष त्यांच्या मागे उभा राहतो आणि इथले तुझ्यासारखे त्यांचे जातबंधू त्यांच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

नानासाहेब नेफळे's picture

22 Aug 2014 - 2:34 pm | नानासाहेब नेफळे

एक्झॅक्टली, गुरुजी या मुद्द्यावर मी आपल्याशी सहमती दर्शवतो.
फक्त इतिहास संशोधक म्हणुन तुम्ही दिलेली नावे चूकीची आहेत.
रणजित देसाई हे लेखक होते, इतिहास अभ्यासक नव्हे
पुरंदरे स्वतःला शिवशाहीर म्हणवतात त्यामुळे ते इतिहास अभ्यासक वा संशोधक ठरत नाहीत. त्यांचा स्वतःचाही असा दावा नाही ,त्यामुळे तुम्ही ते संशोधक आहेत असा दावा करायचे प्रयोजन कळले नाही.
जयसिंगराव गायकवाड नावाचा कुठलाही अभ्यासक राज्यात नाही ,कदाचित जयसिंगराव पवारांविषयी आपण बोलता आहात, आपण ज्या पवारांना संशोधक म्हणत आहात त्यांनी पुराव्यानिशी दादोजी कोँडदेव शिवाजिंचे गुरु नाहीत असे सिद्ध केले आहे, त्यावर तरी विश्वास ठेवणार का? दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते.
गजानन मेहंदळेच्या बाबतीत आपल्याशी सहमत ,ते एक चांगले अभ्यासक आहेत.
बाकी खेडेकर कोकाटेला त्यांच्या घरचेही इतिहास अभ्यासक म्हणत नसतील, मी कशाला त्यांना इतिहास अभ्यास म्हणेन.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2014 - 10:16 pm | श्रीगुरुजी

>>> दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते.

आता लक्षात आलं का या कमिटीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत हे तथाकथित संशोधन कसं मान्य केलं ते? कमिटीत अजून कोण कोण होते ते सांगता का जरा?

आणि पांडुरंग बलकवडे यांचं काय? ते अजूनही दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत या मतावर ठाम आहेत. गजानन मेहेंदळे, कुरंदकर इ. संशोधकांचेही हेच मत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2014 - 1:36 pm | प्रसाद गोडबोले

रामदास अन महाराजांच्या भेटीचे आम्ही बघुन घेवु हो ... तुम्ही तुकारामांचा कालखंड आणि त्यांची शिवाजी महाराजांशी झालेली भेट ह्यावर बोला ...

पोटे's picture

16 Aug 2014 - 11:22 am | पोटे

बुडाला औरंग्या पापी ?

कधी हो? निवांत ९५ वर्षे जगून आनंदात मेला.

श्रींचं राज्य १८१८ ला बुडालं.

औरंग्याचा वंशज १८५७ ला देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढुन तुरुंगात जाऊन मेला.

विवेकपटाईत's picture

16 Aug 2014 - 12:12 pm | विवेकपटाईत

औरंगजेबच्या नंतर चे बादशाह केवळ कठपुतली होते. मुहम्मद शाह रंगीला अर्थात सन १७२४ पासून लाल किल्यावर ही राज्य चालविण्याची लायकी नव्हती. दिल्लीत त्या काळातल्या नदीवर कपडे धुण्याचा वाद दोन धोबी घेऊन बादशाह समोर आले, तर बादशाह म्हणाला नदीलाच विचार मी काय करू शकतो. लहानपणी ऐकलेली कथा आहे. (मी स्वत: जुन्या दिल्लीत राहत होते) १७६७ ते १८०५ पर्यंत चे बादशाह शिंदे सरकारचे पेन्शन वर जगत होते. बाडा हिंदुराव, ताल कटोरा गार्डन,गौरी शंकर मंदिर, मराठी राज्याच्या अनेक खुणा दिल्लीत आहेत. नंतर ब्रिटीशांच्या. मेरठच्या शिपाई कालेखान यांनी दिल्लीवर कब्जा करून बादशाहला हिंदुस्तानचा बादशाह घोषित केले. त्याची इच्छा असो व नसो बादशाह एक प्रतिक होता म्हणून बेचार्याला तरुंगात दूर देशी मारावे लागले.

पोटे's picture

16 Aug 2014 - 1:54 pm | पोटे

कधी मराठे पेन्शन खायचे कधी बादशा खायचा. चालायचंच . पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ?

नदीचा प्रसंग सुरसच आहे. बादशाने त्याची बुद्धीमत्ताच सिद्ध केली. नदीकाठी कुणी कुठे बसायचे या विषयावरुन भांडणारे ते दोघे कोणत्या धर्माचे होते? समजु शकेल काय? इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत.

नामधारी वगैरे काही का असेना. जो मनुष्य देशासाठी तुरुंगात गेला आणि मेला तो आम्हाला तुम्च्या हिंदु देवासमानच आहे. आणि त्याचा वंश त्या पौराणिक वंशा इतकाच आदरणीय आहे.

उगा जिथे तिथे म्लेंछ घुसडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाचे भक्तीभावाने स्मरण करावे आणि भवसिंधु तरुन मोक्षास प्राप्त व्हावे.

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 12:23 pm | प्रसाद गोडबोले

पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ?

>>>
मुद्दा १ : औरंगजेबानंतर दिल्लीचे राज्य नाकर्त्या वंशजांमुळे मोडकळीला आले ऐतिहासिक सत्य आहे .
मुद्दा २ : तुम्ही ज्यांचा बै असा एकेरी उल्लेख केलाय त्या झाशीची राणी पेन्शनसाठी लढल्या त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे ? "मी माझी झाशी देणार नाही " हे त्यांचे वाक्य कैक ठिकाणी नोद केलेले आहे त्यावरुन त्या स्वतःच्या झाशी साठी लढल्या असे म्हणता येते .

धागा काय , तुमचा प्त्रतिसाद काय ?

इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत.

धर्माचा आणि बुध्दीचा काय संबंध ??

ही असली भडखावु विधाने करणार्‍यांवर संपादक मंडळाने कारवाई करावी अशी विनंत्री करीत आहे.

पोटे's picture

20 Aug 2014 - 3:05 pm | पोटे

अभ्यास वाढवा . आपोआप उत्तरे मिळतील.

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले

त्यापेक्षा चिखलफेक करायच्या आधी तुम्ही संदर्भ दिलेत तर बरे होईल ...

पोटे's picture

20 Aug 2014 - 3:39 pm | पोटे

फारच कटकट करता बुवा !

http://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%...

झाशीच्या राणींना इंग्रजांकडुन खर्चासाठी रक्कम मिळत असे. म्हणजे काय ? पेन्शनच ना ? पण त्यांच्या नवर्‍यांनी इंग्रजांकडुन जे कर्ज घेतले होते, त्याची कटौती करण्यास राणीबाइंचा नकार होता. राजाच्या मृयुत्युनन्तर या प्रकरणातुन तसेच राज्य खालसा प्रकरणातुन संघर्षाची ठिणगी पडली.

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 3:57 pm | प्रसाद गोडबोले

ह्यात कुठेही त्या पेन्शनसाठी लढल्या असे म्हणलेले नाहीये .

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2014 - 6:10 pm | प्रसाद गोडबोले

ह्या इथे पोटे ह्यांनी उत्तर दिले नाहीये , ह्याचा अर्थ हा पाँट आपल्याला सर झाला असे मानावे का ?

पोटे's picture

21 Aug 2014 - 6:44 pm | पोटे

झाशीचे राज्य राणीच्या सासर्‍याने की नवर्‍याने इंग्रजांकडे गहाण टाकले होते.

शिवाय नवर्‍याने इंग्रजांकडुन कर्जही घेतले होते.

राज्य गहाण असले तरी राजाची वंशावळ नामधारी राजा असणार होती. पण फक्त पुरुष वंशावळ. जर एखाद्या पिढीत राजा पुत्राविना मेला तर राज्य पूर्णपणे इंग्रजांचे.

इंग्रज त्या राज्यात व्यापार करुन पैसे मिळवत होते. काही वाटा राजालाही दिला जात असण्याची शक्यता आहे.

झाशीच्या राजाचे निधन होण्यासुमाराला त्यांचा जिवंत पुत्र नव्हता. अ‍ॅक होता तो मेला. त्यामुळे राजाराणीने पुत्र दत्तक घेतला.

पण हा दोन चार दिवसांचा दत्तक पुत्र बाप मेल्यावर इंग्रज कशाला कन्सीडर करतील ? तो इंग्रजांचे कर्ज कसे फेडणार ? त्यामुळे इंग्रजांनी दत्तक पुत्र नामंजुर करुन वंश तुटला असे मानुन दिलेल्या कर्जाला तारण म्हणुन राज्य ताब्यात घ्यायची तयारी केली.

कर्ज नवर्‍याने घेतले. त्याच्या मोबदल्यात झाशी ऑलरेडी इंग्रजांअना दिलेली होती. नवरा मेल्यावर पुत्र नसला तree मला वारस माना ही राणीची इच्छा होती. पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती.

म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी , पण त्यावर नवर्‍याच्या कर्जाचा बोजा मात्र नको. कर्जाची रक्कम इंग्रजांनी राज्यात व्यापार वगैरे करुन भरुन काढावी अशी राणीची अपेक्षा.

यातून संघर्ष झाला .

म्हणजे नवर्‍याने कर्ज घ्यायचे आणि बायकोने तारण मालमत्तेवरला अधिकारही सोडायचा नाही आणि कर्जाचीही रक्कम फेडायची नाही.

आमचे सासुसासरेही असेच करायचे. सासरा शेताचा सातबारा ब्यान्केत घालुन कर्ज आणायचा . कर्ज फेडायचे नाही. मग वसुलीला माणुस दारात आला की सासु रणचंडिका होऊन म्हणायची मई मेर्या खेत नही दुंगी .. की ब्यान्कवाले गायब ! अर्थात पुढे शेतकरी कर्जमाफीत सगळे कर्ज माफच झाले हा भाग वेगळा.

या प्रकाराला देशप्रेम म्हणावे अशी तुमची अपेक्षा असेल तर आमच्या सासुमॉ का भी पुतळ्या शेत के बांध पे उभारना चाहिये नै का ?

:)

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2014 - 7:10 pm | प्रसाद गोडबोले

पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती.

>>> इथं पर्यंत एक वेळ ठीक... विवादास्पद पण ठीक... असे म्हणता येईल पण

म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी

डायरेक्ट येवढी मोठ्ठी उडी ? कर्ज फेडणार नाही ह्याचा अर्थ पेन्शन द्या असा काढायचा ? आँ ? काय राव फेकता जरा जपुन फेकत चला इथे तुमचे बीग्रेडी क्राऊड नाहीये यड्यासारखं मागं मागं यायला ... सारासार विचार करुन अभ्यासपुर्वक अनुमान काढणारी लोकं आहेत ...

बाकी तुमची सासु आवडली बरं का आपल्याला !!

आणि हो , उड्या छोट्या मारत चला ... मोठ्ठ्या उडीच्या नादात चड्डी फाटेल राव ...सांभाळुन उडी मारा !

पोटे's picture

21 Aug 2014 - 7:17 pm | पोटे

राज्याची नामधारी वारस व्यक्तीला वार्षीक तनखा / पेन्शन होतीच. कर्जाचा हप्ता कापुन ती अगदी नगण्यच शिल्लक रहात होती. म्हणजे इंग्रजांनी पेन्शन नाकारली असे म्हणण्याइतपत ती नगण्य होती. म्हणुन तर राणीचा त्याला विरोध होता. एक्झॅक्ट आकडे नेटावर शोधावेत . मिळतील.

पोटे's picture

21 Aug 2014 - 7:11 pm | पोटे

इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच.

याउप्परपण तुम्ही पाँट जिंकलात असे तुमचे म्हणणे असेलच तर असो बुवा.

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2014 - 7:17 pm | प्रसाद गोडबोले

इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच.

तुम्ही जरा मॅकॉलेमेड परधार्जिण्या शिक्षणपध्द्तीतल इतिहास शिकला असाल तर तो आमचा दोष नाही

मॅकॉलेचा चष्मा घातलेले नेहरुंसारखे लोकही पहिल्यांदा शिवरांयांचा उल्लेख दरोडेखोर असाच करत होते ... पण नंतर त्यांना अक्कल त्यांनी तो चष्मा बाजुला काढुन ठेवला अन जाहीर माफी ही मागितली !
तसेच तुमचा चष्मा (जर कधी उतरला तर) उतरल्यावर तुम्हालाही सद्बुधी प्राप्त होईल :)

तोवर शुभेच्छा :)

पोटे's picture

21 Aug 2014 - 7:27 pm | पोटे

तुम्हालाही शुभेच्छा.

पोटे's picture

16 Aug 2014 - 3:01 pm | पोटे

मराठे आणि इंग्रज यांच्या खुणा आहेत.

डोळे उघडुन बघा. यांच्याही खुणा आहेत.

http://en.m.wikipedia.org/wiki/Bahadur_Shah_Zafar_Marg

प्यारे१'s picture

16 Aug 2014 - 12:28 pm | प्यारे१

उत्तम लेख.
जय जय रघुवीर समर्थ!

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 12:25 pm | प्रसाद गोडबोले

जय जय रघुवीर समर्थ !!

vikramaditya's picture

17 Aug 2014 - 4:19 pm | vikramaditya

जगातील सगळे management guru जे आता सांगुन राहिले आहेत ते रामदास स्वामींनी फार पूर्वी सांगीतले.
लेख वाचुन आनंद वाटला.
परंतु, प्रभु श्री रामचंद्र, श्री हनुमान, भक्ती हे परवलीचे शब्द बघुनही अजुन मानाचे गणपती इथे अवतीर्ण झालेले नाहीत. ह्या एतिहासिक घटनेची पण नोंद घेउया.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Aug 2014 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा ‘जाणता भक्त होय’

वरील एका वाक्यात बरेच काही सांगुन गेला आहात.

खरतर सगळाच लेख वाचनिय, स्मरणिय आणि अनुकरणिय आहे.

पैजारबुवा,

आयुर्हित's picture

22 Aug 2014 - 9:20 pm | आयुर्हित

खुप अप्रतिम लेख. वाचुन खुप बरे वाटले.
पैजारबुवांचा सारांशसाठी १००% सहमती.
धन्यवाद.

समर्थांचे विचार म्हणून वाचायला छान आहे. :)

पोटे's picture

19 Aug 2014 - 6:42 pm | पोटे

जगी धन्य तो दास अल्लाखुदाचा.

पैसा's picture

19 Aug 2014 - 8:19 pm | पैसा

आवडले.

पोटे's picture

20 Aug 2014 - 2:29 am | पोटे

अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या.

..........,.........

रामाचं नाव घेऊन इतके खोटे नका हो बोलू.

१. लंका ही देवांची रिझर्व ब्यांक होती. तिथे देवांनी संपत्ती ठेवली होती. लंकेचा राखणदार म्हणुन कुबेर काम पहात असे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. रावणाने पराक्रमाच्या जिवावर देव व कुबेर यांना हरवले. गोरगरीबाना लुटुन त्याने लंका भरली नव्हती.

२. सीता ( व त्याआधी वेदवतीचा विनयभंग ) ही प्रकरणे सोडली तर रावणाने कुठल्याही स्त्रीकडे वाइट नजरेने पाहिले नाही.

३. यद्न करणारे व न करणारे यांच्यात सांस्कृतिक संघर्ष होता.

४. पण स्वतः रावण यजुर्वेदी कुळातील असल्याने रावण वैदिकांचा शत्रू कधीच नव्हता. लंकेत नित्य वेदपठण व्हायचे असे रामायणातच लिहिल आहे.

पोटे's picture

20 Aug 2014 - 10:58 am | पोटे

भक्तीप्रद लिहायचे असेल तर तसे खरे लिहा.

इतिहास लिहायचा असेल तर तोही खरा लिहा.

कधी खोटी भक्ती मग दोन ओळी खोटा इतिहास ... ये ऐसा घोडा चतुर घोडा चतुर नै करने का. एकपे रहना.

जालिय प्रवचन आवडले. आमचे एक मित्रवर्य डिट्टो याच शैलीत लिहितात. :)

प्यारे१'s picture

21 Aug 2014 - 5:14 pm | प्यारे१

>>> आमचे एक मित्रवर्य डिट्टो याच शैलीत लिहितात.

लिहायचे म्हणा. भूतकाळात. आता नाही लिहीत.

लिहायचे म्हणा. भूतकाळात. आता नाही लिहीत.

असं आहे का? श्रीरामाची ईच्छा.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

पोटे's picture

21 Aug 2014 - 5:44 pm | पोटे

फारच अपेक्षा बुवा ! समर्थाचिया सेवकाकडे कोण कशाला वक्र नजरेने बघेल ? एक लंगोट , छाटी दंड कमंडलु इतकं पहायला साधी दृष्टी पुरते की !

प्यारे१'s picture

21 Aug 2014 - 5:49 pm | प्यारे१

अरे लब्बाड. माहितीये की तुम्हाला. आणखी काय ठाऊक आहे सांगा बरं.

पोटे's picture

21 Aug 2014 - 6:01 pm | पोटे

म्हाइत नसायला काय झालं ? आमचा जन्मच दासनवमीच्या मुहुर्तावर झालाय !

टवाळ कार्टा's picture

21 Aug 2014 - 9:08 pm | टवाळ कार्टा

या आयडीमुळे हे आठवले =))

फारच बाळबोध विचार करता तुम्ही.

मार्क ट्वेन's picture

21 Aug 2014 - 10:06 pm | मार्क ट्वेन

अमक्याने शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि तमका महाराजांचा गुरू होता ही विधानं मला नेहमीच हास्यास्पद वाटत आली आहेत. रामदासांचं एक अध्यात्मिक गुरू, तत्ववेत्ता, संतकवी म्हणून जे काही कर्तृत्व असेल ते असेल, पण उगाचच 'त्यांनी महाराजांना स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं' म्हणून त्यांचं स्टॅटस अपग्रेडेशन करायचं कारण मला दिसत नाही. राजे अनेक संत, बाबा, फकीर, पीर यांचा सन्मान करत, त्यात रामदास, तुकारामही आले. वर नानासाहेब आणि पोटे यांनी जे काही लिहिलं आहे ते निदान विचार करण्यासारखं वाटतं आहे. त्याचा प्रतिवाद झालेला दिसत नाही, उलट आक्रस्ताळेपणा आणि नेम-कॉलिंगच झालेलं दिसतं आहे. 'रामदासांनी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली, किंवा गेलाबाजार मार्गदर्शन केलं' याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल. (राजांवर स्तुतीपर कवनं करणं (बुडाला औरंग्या पापी) म्हणजे प्रेरणा देणं नव्हे, ती तर कवी भूषणने सुद्धा केली होती) आता हे लिहिल्यामुळे मी ब्रिगेडी ठरत असेन तर ठरो बापडा.

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2014 - 11:30 pm | प्रसाद गोडबोले

याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल.

अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत हे फार छान वाटले . रामदासस्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२ साली झाली हे पुराव्याने शाबीत करता येते ... इव्हन नरहर कुरुंदकर ह्याम्च्या श्रीमान योगी च्या प्रस्तावनेतही त्यांनी हे मान्य केले आहे ( कुरुंदकराम्ची जात काय हे मला माहीत नाही पण कर आहे म्हणजे बहुदा ब्राह्मण त्यातही देशस्थ असावेत , आता तुम्ही ठरवा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ! )

१६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो .
पण ह्याचा अर्थ हा नव्हे की महाराज स्वामींना गुरुस्थानी मानत नव्हते , रादर संब्रमावस्थेत असलेल्या संभाजीमहाराजांना आवर्जुन सज्जनगडावर पाठवले होते महाराजांनी ! ( ना केळशीला ना देहुला ). राज्याभिषेकाचेही पहिले आमंत्रण स्वामीना आहे . अन २-४ अस्सल पत्रेही आहेत ! संभाजी राजांनी , समर्थांच्या वंशजांना छलतो म्हणुन जिजोजी काटकरला डोस दिल्याचेही पत्र आहे !

सो कन्क्लुजन हेच की हे बीग्रेडी जे अपप्रचार , रामदासस्वामींचा एकेरी उल्लेख अन औरंगजेबाचे हेर वगैरे.. करत आहेत तसा जर शिवाजी संभाजी महाराजांच्या काळात केला असता तर त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले असते !

बाकी तुकाराम महाराजांचा कालखंड १५७७ ते १६५० अन शिवबांचा कालखंड १६२७-१६८० आता दोघांच्या आयुष्यातील कालखंडाच्घा हिशोब मांडुन तुम्हीच ठरवा की त्यांची भेट कधी झाली असावी ते !

असो . ह्या लेखाचा तो विषय नाही . पण ह्या बीग्रेडी लोकांना ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालीये म्हणुन हे असले वादविवाद कटु करावे लागतात कारण "धटासी व्हाव्हे धट ! उध्दटासी उध्दट "असं समर्थांनी सांगुन ठेवलय तर " मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!" असं तुकोबांनी !!

असो आपण अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत ...खरंच आनंद वाटला ... मनुपुर्वक शुभेच्छा !!

)

मार्क ट्वेन's picture

22 Aug 2014 - 3:54 am | मार्क ट्वेन

१६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो .>>>

एवढं प्रांजळपणे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मला रामदासांना कमी दाखवायची इच्छा नाही. (अर्थात त्यांच्यासारख्या लोकोत्तर विभूतीचं मूल्यमापन करणारे आपण कोण?) फक्त एवढंच की 'महाराजांना रामदासांबद्दल आदर होता/असावा' एवढ्या सुतावरून 'श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.' किंवा 'शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली' असला स्वर्ग गाठण्याची गरज नाही. ब्रिगेडचे दावे जसे मूर्खपणाने भरलेले असतात तसेच एखादा संत केवळ विशिष्ट जातीचा होता म्हणून काहीतरी बादरायण संबध जोडून त्याला 'शिवरायांचा गुरू' वगैरे बिरूदं बहाल करणं मूर्खपणाचं आहे. 'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.

बाळ सप्रे's picture

22 Aug 2014 - 3:32 pm | बाळ सप्रे

'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.

+१

खरचं तुकाराम रामदास सावरकर टिळक आंबेडकर यांची जातवार वाटणी झालेली जाम डोक्यात जाते!! त्यांच्या विचारांशी कोणालाच देणंघेणं नसतं..
व्यक्तीच्या दैवतीकरणात जास्त रस असतो सगळ्यांना..

पैसा's picture

21 Aug 2014 - 10:59 pm | पैसा

लेखाचा विषय काय, चर्चा काय! काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे.

तुम्हा लोकांना रामदासांची शिकवण, कार्य याबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला काय होतं! तेच छत्रपती शिवरायांबद्दल. त्यांचं मोठेपण स्वतंत्रपणे मान्य करा की सायबांनो! सर्व जगात एकच राजा शिवाजी झाला. दुसरा शिवाजी ना जिजाबाईला तयार करता आला, ना त्यांच्या अनेक गुरूंना.

तसंच रामदासांनी जी व्यावहारिक शिकवण दिली ती त्या काळाच्या खूप पुढे होती. प्रपंच करा, शरीर सामर्थ्य कमवा, हे त्या काळात दुसर्‍या कोणत्या संताने सांगितलं होतं?

रामदास आणि शिवाजीची भेट झाली होती का नव्हती, कोण मोठा या सगळ्या चर्चेचं इथे काय प्रयोजन आहे? दोघांचेही कार्य एकमेकांना पूरक झालं एवढं मान्य करायला काय त्रास होतो कोणाला? हा इतिहास आहे हे पुरेसं नाही का?

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2014 - 11:41 pm | प्रसाद गोडबोले

पैसा ताई ,

काही लोक विशिष्ठ अजेंडा ठेवुन विशिष्ठ समाजा विरोधात विष कालवण्याचे काम करत आहेत , त्यांना उत्तर द्यायला नको का ? इथे रामदासस्वामींवर वाटेल ती टिप्पण्णी , तिकडे झाशीच्या राणीवर , सावरकर तर नेहमीचेच ठरलेले ... आजकाल तर टिळकही आलेत ह्या यादीत काय तर म्हणे "भटमान्य" ! (मागे तर मलाही एका ने डोस दिला होता ह्या इथे आपल्या मिपावर ... तेव्हा मला ह्या लोकांच्या यादीत जाऊन बसल्याचा आनंद झाला होता ही बात अलहिदा *biggrin* )

असा विशिष्ठ अजेंडा ठेवुन पोलरायझेशन करणार्‍यांच्या विचारांना विचारांनीच खोडुन काढावेच लागेल ... जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे ... असे आमचे स्पष्ट मत आहे.

पुण्यात्मा आणि पापात्मा ! दोन्ही कडे अंतरात्मा !
परी साधु भोंदु सीमा ! सांडुचि नये !!

पैसा's picture

22 Aug 2014 - 9:28 am | पैसा

प्रतिवाद जरूर करा! का नाही! विचारांचा प्रतिवाद विचाराने जरूर करावा. एवढंच नाही तर योग्य पुरावे समोर ठेवले तर ज्यांना फार माहिती नाही त्यांनाही त्यातले सत्य कळते.

मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. इथे पटाईतसाहेबांनी रामदासांची शिकवण लोकांपर्यंत पोचावी म्हणून धागा काढला. ज्यांना ते नको होतं असे काही टोळभैरव नको ते लिहीत बसले. आणि नको तो वाद झाल्यामुळे या टोळांचा हेतू साध्य झाला.

यापेक्षा रस्ता सोडून भरकटणार्‍या अशा पहिल्याच प्रतिसादावर जर "याचा प्रतिवाद मी दुसर्‍या धाग्यात करत आहे, तिथे येऊन काय ते लिहा" म्हणून दुसरा धागा काढला असता तर हा धागा सुरळीत चालू राहिला असता. आणि चुकीच्या विधानांचा (मग ती कोणाचीही असोत) समाचार घेतला गेला असता.

प्रतिवाद का करू नये म्हणून तू विचारलंस तसं हे टोळभैरव कधीही विचारणार नाहीत कारण त्यांचा हेतू आधीच साध्य झालेला असतो. त्यांना मदत करू नका एवढंच माझं म्हणणं.

अवांतरः

१) समर्थ रामदास स्वामी आणि शहाजीराजांच्या संबंधांवर बाळशास्त्री हरदासांनी एका पुस्तकात लिहिलेले आठवते.
२) झाशीच्या राणीबद्दल अनुदार उद्गार काढणार्‍यांनी बुंदेलखंडात जाऊन हीच विधाने करावीत. तिथे तिला मराठी/स्त्री/बामण म्हणून हिणवीत नाहीत. ती त्यांची अस्मिता आहे.
३) लोकमान्यांना भटमान्य म्हणणार्‍याचे बुद्धिवैभव पाहून थक्क आहे. या मूर्ख विधानाचा प्रतिवाद करायचीही गरज नाही. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे त्यांना ब्रिटिशांनी शिवी देण्यासाठी म्हटले आणि मवाळांनी 'तेल्यातांबोळ्यांचा पुढारी' असे उपहासाने म्हटले. ती दोन्ही बिरुदे त्यांना सर्वोच्च अभिमानास्पद ठरली. त्यांचं राजकारण आणि लिखाण याबद्दल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतभर आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर भरपूर लिखाण आणि संशोधन झालेल आहे. त्यांना भटमान्य म्हणणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार झाला. तेव्हा कोणाच्याही अपप्रचाराने इतिहास बदलत नसतो एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2014 - 10:40 am | प्रभाकर पेठकर

>>>>मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं.

अशा नविन धाग्यावर 'धागा भरकटविणारे' फिरकणारसुद्धा नाही ह्याची खात्री कोणी द्यावी?

पैसा's picture

22 Aug 2014 - 10:53 am | पैसा

ते येणारच! मात्र स्वतंत्र धाग्यावर जर कोणी बेछूट विधाने करत असेल तर निश्चित उघडा पडेल. पुन्हा दुसरा धागाही भरकटवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर सगळ्यांनीच अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.

अवांतराला माझ्याकडून पूर्णविराम. (ट्रोलिंगबद्दल कोणी दुसरा धागा काढायलाही हरकत नाही!)

-- जय जय रघुवीर समर्थ! --

नानासाहेब नेफळे's picture

22 Aug 2014 - 11:45 am | नानासाहेब नेफळे

अतिअवांतर-
1.शिव समर्थ वा शहाजी समर्थ भेटीचा दावा करण्यात गैर काही नाही परंतु त्यासाठीचे समकालीन पुरावे वा संदर्भ तरी द्याल की नाही!कुणीतरी त्यांच्या पुस्तकात असे असे लिहले आहे म्हणजे तेच खरे असावे असा समज करुन आपल्या इतिहासासंदर्भात धारणा तयार करु नयेत
2.झाशीच्या राणीचा पराक्रम थोरच होता, त्याविषयी शंका नाही, परंतु इंग्रज - राणी युद्ध का झाले याविषयीचे भाष्यच करायचे नाही असा याचा अर्थ नव्हे
3अ. तेली तांबोळी यांना विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात चर्चा चालू असताना 'तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?' असा उपहासात्मक प्रश्न विचारणारे कोण होते याची नोंद घ्यावी.
3ब. लोकोत्तर राजा शाहू छत्रपती यांच्या विरोधात वेदोक्त प्रकरणात आघाडी उगडणारे कोण होते व याकामी थेट इंग्रजांकडेच शाहूराजांच्या विरोधात अर्ज करुन धार्मिक असंतोषाचे वातावरण तात्कालीन मराठी प्रदेशात कुणी तयार केले याचा धांडोळा घेतल्यास स्वतःच्या धार्मिक जातीय राजकीय धारणा पुन्हा नव्याने मांडता येतील.

प्यारे१'s picture

22 Aug 2014 - 4:02 pm | प्यारे१

स्तुत्य सूचना पण सूचनेची अम्मलबजावणी होत नसेल तर पुढाकार घेऊन चर्चा हलवण्याचं काम संपादक मंडळानं करावं अशी मी विनंती करतो. अगदीच अवांतर पण काहीतरी भरीव असं असेल तर चर्चा हलवायला नि त्याचा नवीन धागा बनवायला चांगलं वाटेल. मूळ विषय केंद्रस्थानी राहून त्याच्या अनुषं गानं येणारे चांगले वाईट, योग्य अयोग्य (नकारार्थी शब्द होकारार्थींमुळं आले आहेत) पैलू चर्चिले जातील.

मागे या संदर्भात मी एक धागा काढला होता. http://misalpav.com/node/26244

काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. >>>>

आणि काही आयडी केवळ प्रचार करायला येतात ( त्यात अपप्रचार ही शामील आहे ) ..त्या विषयी ही असेच धोरण ठेवावे , किमान सर्वसमावेशक समानता तरी दिसुन येईल ...

मदनबाण's picture

22 Aug 2014 - 12:26 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)

@ संपदाक मंडळी
नतद्रष्ट माकडांच्या मुसक्या वेळीच आवळा,मग चांगल्या धाग्यावर धिंगाणा घालायला धजावणार नाहीत परत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

पोटे's picture

22 Aug 2014 - 3:20 pm | पोटे

या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही.

राजांनी आणि लोकांनी मिळवलेलं अखेर राजांच्या वारसांच्या खिशात गेलं . आज ते अब्जाधीश आहेत. आपण भिकार्डेच आहोत.

संस्थानिकांचं पण तसेच आहे. सगळे संस्थानिक इंग्रजांअकडुन पेन्शन खात होते आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या तिजोरीतुनही त्यांनी पेन्श्न खाल्लेली आहे.

त्यामुळे कोण कुठला शहेनश्।आ छत्रपती संस्थानिक ... आम जनतेचं पोट जनतेने स्वतःच भरलेलं आहे.

त्यांचे वारस मात्र गडगंज आहेत.

प्रसाद१९७१'s picture

27 Aug 2014 - 10:49 am | प्रसाद१९७१

या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही.>>>>>>>>+१००००००
इंग्रज येइ पर्यंत सामान्य जनतेच्या आयुष्यात त्या आधीच्या ६०० वर्षात काहीही फरक पडला नव्हता, राज्य कोणी का करे ना. कुठल्याही राजाने कुठल्याही प्रकारचे सामाजिक, System Changes, आर्थिक, शैक्षणीक, राजकीय, न्यायदाना संबंधीत बदल केले नव्हते. एखादा राजा थोडा चांगला, एखादा थोडा वाईट एव्हडाच काय तो फरक. आपले राज्य आणि स्वार्थ जपणे इतकाच एक कलमी कार्यक्रम.

राजकीय बदल : लोकशाही वगैरे,
शैक्षणीक बदल : शाळा वगैरे चालू करणे, जगातील नविन तंत्रज्ञान आणणे.
धार्मिक बदल : जाती व्यवस्था निर्मुलन, हिंदुं ना पुन्हा धर्म प्रवेश
न्यायदान : न्यायालये स्थापणे, लिखीत स्वरुपान आणि समान कायदा लागू करणे
आर्थिक : बॅंका, विमा कंपन्या चालू करणे ( युरोप मधे १५ व्या शतकातच चालू झाल्या ).
Systemic : नोकरशाही वगैरे ( चीन मधे २००० वर्षा पासुन UPSC सारखी परिक्षा घेउन अधिकारी नेमले जायचे )

पोटे's picture

1 Sep 2014 - 2:38 pm | पोटे

इंग्रज आणिमोघलदेखील.

भारताचा मुख्य विकास हा मोघल आणि इंग्रज यांच्या काळात झालेला आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Aug 2014 - 4:24 pm | मंदार दिलीप जोशी

लेखन आवडले. तुमचा ब्लॉग आहे का?

नेफ़ळ्यांचे बरेचसे प्रतिसाद पटले.