एक जुनी आठवण.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Aug 2014 - 4:55 pm

एक जुनी आठवण.
ब्रिटिश माणसाच्या रक्तात वक्तशीर पणा भिनलेला आहे
७१-७२ साल असेल..नोकरीला लागून १.१/२ वर्ष झाले असेल..
कंपनी नवा प्रॉडक्ट तयार करणार होती..त्या साठी इंग्लंडला जाण्या साठी माझी निवड झाली
त्या काळात परदेशगमन म्हणजे अप्रूप असायचे..
माझी पाहिलीच खेप(वेळ)..शिक्षण झाले अन लगेचच नोकरीला लागल्याने प्रवासाचा अनुभव नव्हता,,
इंग्लंड तिथल्या लोकल्स ट्रेन बद्दल माहिती घेत होतो..त्या वेगवान असतात इत्यादी
एक तर प्रॉडक्ट शिकून तो इथे तयार करून दाखवणे याचा ताण होता.
बाथ नावच्या गावात कारखाना होता,तिथे एका त्याच कंपनीतल्या एकाच्या परिवारात राहण्याची सोय झाली होती..
ट्रेनिंग सुरू झाले..व त्याचाच एक भाग म्हणून कोव्हेन्ट्री शहरात एका मशीनं टूल्स बनवणा~या कारखान्यात पण १ आठवडा जाण्याचा प्रोग्राम ठरला होता...
ट्रेन चा प्रवास होता... मित्र स्टेशनवर सोडायला आला होता..तिकिट काढलेले होतेच..पण मी अस्वस्थ होतो..
मित्राने ते ओळखले व "काय" असे विचारले?
मी त्याला मनातली बाळबोध भीती सांगितली " की गावाच्या नावाच्या पाट्या फलाटाच्या शेवटी असतात..ट्रेन फास्ट..गाव आले कळले नाही तर व भलत्याच ठिकाणी उतरलो तर परदेशात फजिती.."
त्या वर तो हसला व हातानेच थांब अशी खूण केली..तिकिट खिडकीवर गेला व आला व म्हणाला.
"फलाटावरल्या घड्याळाशी तुझे घड्याळ जुळवून घे कोव्हेंट्री स्टेशनवर गाडी ११.२६ मिनिटाने पोहोचते...घड्याळ बघ ११.२६ ला जे स्टेशन येईल तिथे उतर ते कोव्हेंट्रीच असेल..:"
त्याचा सांगण्यामुळे मनावरचे दडपण कमी झाले..
अर्थात नंतर गाडीत एक सहप्रवासी भेटला तो पण कोव्हेंट्री ला चा जाणारा होता...त्या मुळे प्रश्न आला नाही तो भाग निराळा...
कोव्हेंट्री आले मी उतरलो व फलाटावर पाहिले घड्याळात ११.२६ वाजले होते..
मनातल्या मनात ब्रिटिश वक्तशीर पणाला सलाम केला

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

14 Aug 2014 - 4:58 pm | कविता१९७८

खुप छान अनुभव . मस्त वाटलं वाचुन

गवि's picture

14 Aug 2014 - 5:32 pm | गवि

हैला.. भारीच..

...अशा मार्गाने मुंबईतल्या स्टेशनांचा ठिकाणा दिला तर नवखा मनुष्य नेमका कुठे उतरेल याच्या कल्पनेने मेंदूचे जाळीदार धिरडे झाले.

मेंदूचे जाळीदार धिरडे झाले.

जबरदस्त उपमा. :))

रुस्तम's picture

15 Aug 2014 - 4:06 pm | रुस्तम

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2014 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका वक्तशीरपणाची काय सुरेख आठवण सांगितली आणि तीही आजच्या दिवशी. डोळे भरुन आले. (आपल्या देशाची कोणाशी तुलना केली की मला असच होतं) अजुन आपल्याला किती दिवस लागतील सिष्टिमशी वेळा जुळवून घ्यायला काय म्हैती. पण, होईल सध्या अर्धा तास एकतास घड्याळी पुढे मागे कराव्या लागतात इतकेच.

-दिलीप बिरुटे
(आशावादी भारतीय)

कुंदन's picture

15 Aug 2014 - 5:53 pm | कुंदन

तुम्ही पी यम टी मध्ये रुजु व्हा अन् पुणेकरांना वाचवा.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2014 - 2:02 am | प्रभाकर पेठकर

खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ही. नुसती वाखाणून सोडून देण्या ऐवजी आपण ती अंगिकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. भारतिय रेल्वेच्या वेळापत्रकाशी आपली रेल्वे प्रामाणिक राहात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपल्या हातातील गोष्ट नाही ती. पण आपल्या हाती असलेल्या गोष्टीत तरी निदान आपण वक्तशिरपणा नक्कीच अंगिकारू शकतो. एखाद्याशी ठरवलेली वेळ पाळणे, दुसर्‍याच्या वेळेचा मान राखणं, शब्द पाळणं इ.इ.इ. गोष्टींची स्वत:लाच सवय लावून घेणं आपल्याला शक्य आहे. ते न करता आपण नुसतेच इंग्रजांचा वक्तशिरपणा वाखाणू लागलो तर तो एक दांभिकपणा ठरेल.

देशपांडे विनायक's picture

16 Aug 2014 - 10:04 am | देशपांडे विनायक

त्रास पाहिजे असेल तर १००% उपयोगी पडणारी सवय
'' एखाद्याशी ठरवलेली वेळ पाळणे, दुसर्‍याच्या वेळेचा मान राखणं, शब्द पाळणं इ.इ.इ.''

मार्मिक गोडसे's picture

16 Aug 2014 - 10:34 am | मार्मिक गोडसे

बिहार स्टेशन जवळ आले हे कसे ओळखायचे? सोप्पय. रॅकवरील आपली बॅग गायब झाली कि समजावे.......