WiFi राउटर विकत घेणे आहे - सल्ला हवा

देव मासा's picture
देव मासा in तंत्रजगत
12 Aug 2014 - 6:52 am

मला WiFi राउटर विकत घ्यायचा आहे. मुख्य वापर फक्त मोबाईल फोन साठीच करायचा आहे .
माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो ,
त्यातला महिन्याला,निम्मा सुधा खपत नाही.

१) माझा बजेट ८००ते १००० रुपयआहे .
२)माझा डेस्कटॉप कंप्यूटर आहे ( सीडी रोम नादुरुस्त आहे )
३)कंप्यूटर ओएस विंडोस एक्सपी
४)मी कॅबेल नेट वापरतो
५)राउटरचा उपयोग फक्त मोबइल फोन साठी करायचा आहे
६) घराचे एकून क्षेत्रफळ ५२५ स्क़वेर फीटस
७) माझा फोन HTC Desire x

८०० ते १००० रुपयात मिळणारे राउटर किती एरिया कवर करत असावे ?,
फ्लिप कार्ट वर ८०० ते १००० रुपयात जे राउटर आहेत त्यंची रेंज त्यांनी
स्पस्ट केलेली नाही . किंवा ती माला समजुन आली नाही (NETGEAR N150 )
माझा सीडी रोम नादुरुस्त आहे , राउटर इंस्टाल करताना मला सीडी रोम वापरावाच लागेल का ?
सीडी रोम न वापरता मला राउटर इंस्टाल करता येइल का ?
ठाण्यात राउटर ''वरयटी'' या दुकानात घेणे योग्य ठरेल का? मला इतर दुसरी दुकाने ठावुक नाहीत.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

12 Aug 2014 - 7:54 pm | कवितानागेश

आमचा डी-लिन्कचा चांगला सुरु आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2014 - 9:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्याकडे नेटगियरचाच कोणतासा एक मोडेम होता. साधारण २००७ मध्ये घेतला होता, आता त्याचं मॉडेल नंबर आठवत नाही; पण प्रतिमा आणि स्पेसिफिकेशन पाहता जुन्या काळात आमच्याकडे होता त्यापेक्षा हा बराच जास्त चांगला असावा असं दिसतंय.

तुमच्या ५२५ स्क्वे फुटाच्या घरात नेटवर्क रेंजची अडचण येऊ नये.

राऊटर इन्स्टॉल करावा लागत नाही. कंप्यूटरवर ब्राऊजरमध्ये 192.168.0.1 (किंवा 192.168.1.1 किंवा तत्सम) URL वापरून राऊटर सेटप करायचा असतो. रिसेट करण्यापासून अगदी त्याचे फ्रीक्वेन्सी बँड्स बदलण्याची वेळ आली तरीही ते करता येतं. फोनवरून मी कधी केलेलं नाही, त्यामुळे होईल का नाही हे माहित नाही. पण कंप्यूटरला सीडीरॉम नसला तरी फरक पडत नाही.

ठाण्यात अजूनही काही दुकानं असतील तर चौकशी करा. मुंबईत इतर उपनगरांमध्ये तुमचं किंवा घरातल्या इतर कोणाचं नेहेमीचं जाणंयेणं असेल तर तिथेही चौकशी करा. चार ठिकाणी किंमती पहा आणि जिथे स्वस्त आहे तिथून विकत घ्या. (आणि वाटलंच तर एकदा खात्री म्हणून राऊटर विकत घेताना दुकानदाराला सेटिंग्जबद्दल विचारून घ्या.)

विअर्ड विक्स's picture

13 Aug 2014 - 3:47 pm | विअर्ड विक्स

D -Link व TP - Link स्वस्तात मस्त.... router घेतांना ५० मी परीघ सुद्धा घरगुती उपयोगासाठी भरपूर होतो... काही वेळेस online setting करतांना गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेस आपल्या cable वाल्याला पटवून फुकटात install करून घ्यावे. मी स्वतः या फुटकळ कामासाठी अडीचशे रुपये मोजले आहेत.

अजून एक आगाऊ सूचना - स्वतः install करत असाल तर त्या उपकरणा वरील wi - fi चिन्हाने डोळे फडफडवले कि समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. अन्यथा तो डोळा सताड उघडा राहिला कि आपण install करण्यात आडवे पडलात म्हणून समजा.

lamington रोडला एक चक्कर टाका online खरेदीपूर्वी....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Aug 2014 - 5:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डी-लिन्क ६०५, १५०० रुपये. चांगला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Aug 2014 - 5:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि दुकानातुन घेण्यापेक्षा फ्लिपकार्ट वरुन घ्या.

मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १०००रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही .
आणि हापिसच्या पत्त्यावर मागवावी तर आमच्या हापिसात तशी सोय नाही .

किसन शिंदे's picture

14 Aug 2014 - 11:52 am | किसन शिंदे

>>>> माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो ,<<<

कुठचे केबल नेटवर्क? वन अ‍ॅन्ड वन ब्रॉडबॅन्ड का??

अविनाशकुलकर्णी's picture

14 Aug 2014 - 4:41 pm | अविनाशकुलकर्णी

डी लिंग बेस्ट आहे..पण तो इन्स्टोल करताना बी एस एन एल च्या माणसाला बोलवा १५० रु घेतो..पण सारे सेटिंग व्यवस्थित करतो..बाकि आपली मर्जी

आशु जोग's picture

14 Aug 2014 - 4:57 pm | आशु जोग

हे पहा बरे

http://www.flipkart.com/d-link-dir-600m-n150-wireless-router/p/itmdtg79y...

आणि घेतल्यावर सुद्धा कमेंट टाकायला विसरू नका...

धन्या's picture

14 Aug 2014 - 8:18 pm | धन्या

माझ्याकडे एयरटेल फोर जी कनेक्शन (वायरलेस मॉडेम) आहे. मलाही बरेच दिवसांपासून राऊटर घ्यावासा वाटत आहे. मात्र फोर जी वायरलेस मॉडेमला कंपॅटीबल राऊटर मिळेल का याची खात्री नाही. जालावर थोडी खोदाखोद करण्याचा प्रयत्न केला मात्र जे वाचलं ते पार वरुन गेलं. त्यामुळे तो नाद सोडला.

कुणी फोर जी वायरलेस मॉडेमसाठी राऊटर वापरला आहे का? असल्यास कोणता? माझेही बजेट १००० च्या आसपास आहे. अगदीच आवश्यक वाटल्यास १२०० पर्यंत वाढवू शकतो.

आगाऊ धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

14 Aug 2014 - 10:28 pm | पिवळा डांबिस

मोबाईल फोनला राऊटर कशाला लागतो? तो तर ग्लोबल सॅटेलाईट सिस्टमवर चालतो ना?
कंप्यूटर, लॅपटॉप, आयपॅड वगैरेसाठी वायरलेस राऊटर लागणं हे समजू शकतो, पण मोबाईलला?
जाणकारांनी आमचे शिक्षण करावे ही विनंती....

श्रीरंग_जोशी's picture

14 Aug 2014 - 10:37 pm | श्रीरंग_जोशी

कदाचित त्यांना घरी असताना चतुरभ्रमणध्वनी वायफाय वर चालवायचा असेल.

एकुलता एक डॉन's picture

15 Aug 2014 - 2:24 am | एकुलता एक डॉन

http://www.snapdeal.com/product/tplink-150mbps-wireless-n-router/640563

कसा आहे सांगु शकेल?

देव मासा's picture

16 Aug 2014 - 6:17 am | देव मासा

किसान शिंदे : एवढे मला कळत नाही DSL म्हणतात तेच असावे कनेक्शन , २एमबीपीएस स्पीड मिळतो बाकी .
आपले नेट कनेक्शन dsl आहे कि ब्रॉडबॅंड ते ऑनलाइन कसे तपासून पाहता येयील .काही वेबसाईट माहित असतील तर सांगा असेल तर सांगा .

आशु जोग:तुम्ही जो फ्लिपकार्ट वर जो राऊटर दाखवला आहे तों बारा वाटत आहे , माझ्या बजेट मध्ये सुधा आहे .
आज ठाण्याला वारय्टी दुकानात जाउन पाहतो मिळतो का तिथे D-Link DIR-600M N150

पिवळा डांबिस: मी तळ मजल्यावर राहतो तिथे एरटेल नेटवर्क फारसे दाट नाही , त्यात २G किवां ३G नेट
चालवणे फार कठीण आहे , शिवाय हौसेपोटी राऊटर घेत आहे असे समजा .
बाकी आजचाच मुहूर्त पकडतो राऊटर विकत घेण्य साठी

किसन शिंदे's picture

16 Aug 2014 - 7:18 am | किसन शिंदे

व्हरायटीमध्ये जाऊ नका, तो प्रचंड महागडा आहे.

धर्मराजमुटके's picture

16 Aug 2014 - 1:22 pm | धर्मराजमुटके

तुमच्याकडे आलेले कनेक्शन जर टेलिफोन पिन सारखे असेल (RJ 11 Type) तर तुम्हाला ADSL 2+ राउटर लागेल.
मात्र जर केबल नेट असेल तर तुम्हाला ब्रॉडब्यन्ड राऊटर लागेल. या प्रकारच्या राउटरमधे एक WAN पोर्ट व ४ LAN पोर्ट असतात. दोन्ही प्रकारच्या पोर्टचे रंग वेगवेगळे असतात. ( ४ LAN पोर्ट एका रंगाचे व १ WAN पोर्ट वेगळ्या रंगाचा). तुम्हाला केबलनेट वाल्याने दिलेली केबल ही WAN पोर्ट मधे लावा. तुमच्या संगणकाची केबल कोणत्याही एका LAN पोर्ट मध्ये लावा. वायफाय सेटींगमधे बदल करावे लागतील.
बहुधा केबलनेट हे तुमच्या संगणकाच्या LAN पोर्टच्या म्याक आयडीबरोबर हार्ड कोअर केलेले असते त्यामुळे डायरेक्ट राउटरमार्फत इंटरनेट चालणार नाही. केबलवाल्याची मदत घ्यावी लागेल.

भाते's picture

17 Aug 2014 - 12:08 pm | भाते

माझ्याकडे केबलनेट आहे. त्यामुळे मी केबल मॉडेम आणि वाय फाय राउटर वापरतो. दोन्ही वापरल्यामुळे नेटच्या वेगात काही फरक पडतो का?
केबल मॉडेमला जाड काळी वायर आहे आणि केबल मॉडेम ते वाय फाय राउटर वेगळी बारिक वायर आहे. केबल मॉडेम काढुन डायरेक्ट वाय फाय राउटर वापरणे शक्य आहे का? केबलवाल्याने याला नकार दिला होता.

धर्मराजमुटके's picture

27 Aug 2014 - 11:13 am | धर्मराजमुटके

केबल मॉडेम आणि त्याला जोडलेल्या वाय फाय मॉडेममुळे वेगात काही फरक होत नाही.
खुप जुन्या केबल मॉडेमवर बीएनसी कनेक्टर (आपण सेट टॉप बॉक्सला वापरतो तशी) असेल तर तसा इंटरफेस असलेला वाय फाय राउटर मिळणे अवघड आहे. मात्र जर केबलनेट चे कनेक्शन आरजे४५ या प्रकारचे (म्हणजे तुम्ही मोडेम ते राउटर ज्या प्रकारची केबल वापरले आहे तसे) असेल तर डायरेक्ट वायफाय वापरता येऊ शकते.

फारएन्ड's picture

16 Aug 2014 - 8:26 am | फारएन्ड

बीएसएनएल ची सुविधा आहे का तेथे? असेल तर त्यांचा ही मिळतो (म्हणजे त्यांच्याशी संबंधित कंपनीचा). मी वर्षभर वापरला होता ऑफिसच्या कामाला दिवसभर. राउटर व सर्विस दोन्ही चांगले आहे.

मार्मिक गोडसे's picture

16 Aug 2014 - 10:02 am | मार्मिक गोडसे

ठाण्यात एमटिएनएल ची सुविधा आहे.

भाते's picture

16 Aug 2014 - 1:11 pm | भाते

दोन वर्षांपासुन आयबॉल बॅटनचा '१५०एम' वायरलेस एन राउटर वापरतोय. तेव्हाची किंमत रु. १२००/- फक्त. वापरायला अगदी सोप्पा.
लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल एकाच वेळी वापरता येतात.

आशु जोग's picture

17 Aug 2014 - 12:08 am | आशु जोग

मला एक विचारायचे आहे सर्वांनाच.

वाय-फाय हे फक्त वायरलेस लॅन पुरते मर्यादित आहे ना ? मोबाइलचे स्वतःचे इंटरनेट ही त्याहून वेगळी गोष्ट आहे ना...

राउटरचा उपयोग फक्त मोबइल फोन साठी करायचा आहे

असे त्यांनी म्हटलेलेच आहे

शेवटी व्हरायटीमध्ये जाऊन आशु जोग यांनी दाखवलेला राउटर घेतला D-Link N 150 DIR-600M
किसान शिंदे म्हणाल्या प्रमाणे खरच महागडा आहे तो ''व्हरायटी '' दुकान वाला , राउटर साठी १०५० रुपय मोजावे लागले .
हे वरचे २०० रुपय अधिक मोजण्याचे कारण . मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले
१००० रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही, शिवाय मला इतर दुकाने ठाउक नाहीत
घरी येउन २-३ तास राउटर कन्फिगर करण्याचा प्रयत्न केला . पण काही जमले नाही
३-४ वेळा आधी केलेली सेटिंग रिसेट केली , पुन्हा नव्याने प्रयत्न केला तरी जमले नाही
शेवटी वैतागून केबल वाल्याला फोन केला , तो येतो म्हणाला पण २५० रुपय चारजेस लागतील म्हणाला .
त्याला देतो म्हणालो तसा तो आला ,डी-लिंकचा राऊटर पाहुन वैतागला.
डी-लिंकचा का घेतला , याचे खूप प्रोब्लेम्स असतात म्हणाला , नेटगेर घ्या हा रीप्लेस करून असा
सल्ला दिला , सामोरच्या घरात सुद्धा हाच राउटर आहे त्यांच्या साठी मला सतत इथे चक्रा माराव्या लागतात
असही सांगितले , ५ मिनटात राउटर कन्फिगर करून मला काळजीत टाकुन २५० रुपय घेउन तो निघून गेला .
राउटर या घडी पर्यंत तरी तरी व्यवस्थित चालतोय . माझ्या ५२५ क्षेत्रफळाच्या घरात सगळीकडे उत्तम रेंज मिळत आहे .
घराबाहेरही दार बंद करून wifiच्या २ कड्या दाखवतोय , बघू पुढ काय होतय ते .
आणखी एक … राउटर कन्फिगर करण्या साठी राउटरच्या बॉक्स वर डी -लींकचा हेल्पडेस्क नंबर आहे असे दुकानदाराने सांगितले होते .
पण तो नंबर काही लागला नाही

कोणत्याही कंपनीच्या प्रॉडक्टचे निदान वायफाय राऊटरचे काहीही प्रॉब्लेम्स नाहीत हो. प्रॉब्लेम्स असतात ते अशी डिव्हायसेस कॉन्फीगर करणार्‍यांच्या तांत्रिक माहितीचा आणि क्षमतेचा अभाव असणार्‍यांचे. एकदा त्याचे कॉन्फीगरेशन व्यवस्थित झाले आहे म्हटल्यावर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता कमीच. तुम्ही स्वत:हून काही किडे करत नाहित तोपर्यंत :) सध्याच्या कॉन्फीगरेशनचा ब्याकप घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात काही अडचण आली की तुम्ही स्वतःच तो दुरुस्त करु शकाल. मात्र जर हार्डवेअरचे संकट आले तर राउटर दुरुस्त करणे किंवा तो बदलून घेणे एवढेच तुमच्या हातात असेल.
कोणतीही गोष्ट घेताना त्याचे सर्विस सेंटर घराच्या किंवा ऑफीसला जाणायेण्याच्या मार्गाजवळ आहे ना याची प्रथम खात्री करा. नाहितर आजची ५० रु. ची बचत उदया महागात पडते. बहुदा कोणताही विक्रेता त्याच्याकडून विकत घेतलेली वस्तु जर बिघडली तर बदलून / दुरुस्त करुन देत नाही.

विलासराव's picture

17 Aug 2014 - 12:15 pm | विलासराव

हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. माझ्या मॅनेजरला फोन करुन माहीती घ्या.
९३२४६३०६४३.

अट एकच माहिती घ्या ,माल अजिबात घ्यायचा नाही योग्य वाटला तरी. तरीही घेतलात आणी फरवणुक झाली तर माझी जबाबदारी नाही. असे होत नाही तरीही. कारण जाहीरात करणे माझा उद्देश नाही.

माझं नाव सांगा, त्याला त्याच्या वेळेप्रमाणे उत्तर द्यायला अवधी द्या.

विलासराव's picture

17 Aug 2014 - 12:18 pm | विलासराव

तुम्ही तो घेतलेला दिसतोय मी नंतर पाहिले . असो.

काही अडचण येत असेल तर विनामुल्य सल्ला विचारा. आमची सेवा घेउ नका.

आशु जोग's picture

18 Aug 2014 - 5:59 pm | आशु जोग

देव मासाजी
डी-लिन्कला फार काही सेटींग करावे लागत नाही

दुसरी गोष्ट

४ वायर्ड कनेक्शन्स आणि इतर वायरलेस कनेक्शन्स टेस्ट करून घ्या

सामान्यनागरिक's picture

19 Aug 2014 - 12:31 pm | सामान्यनागरिक

या साठी मिपावर यवढा काथ्याकुट ? तुमच्या नाक्यावरच्या संगणक टपरीवर जा आणी घेऊन या. हल्ली हजार बाराशेच्या वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही.
जमाना बडा खराब है हल्ली !

वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही.

काकांची कुणी रे झोपमोड केली !

मदनबाण's picture

26 Aug 2014 - 9:29 pm | मदनबाण

मी डी-लिंकचे DSL-2730U हे मॉडेल टाटा क्रोमा मधुन घेतले, सेटींग स्वतःच केले.वायफाय आणि लॅनचे दोन्ही सेटींग केले.
आता काही महत्वाच्या गोष्टी :-
१} राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलुन स्वतःचा पासवर्ड सेट करा.
२} राउटरची सेटिंग सेव्ह करुन ठेवा. ही सेटींग XML फाईलच्या स्वरुपात असते. कधी काही झोल झाला किंवा तुमच्या राउटर वरील सेटींग मधे गडबड झाली तर या कॉनफिगरेशन फाइलचा वापर करुन राउटर परत सुस्थीतीत आणता येतो.
३}ATM PVC configuration मधली VCI व्हॅल्यु लक्षात ठेवा. प्रत्येक सर्व्हीस प्रोव्हाडरची ही व्हॅल्यु वेगळी असते.BSNL ची ३५ आणि एमटीएनएलची ३२ आहे.
४}राउटरचा UPnP प्रोटोकॉल ऑप्शन बाय डिफॉल्ट एनेबल असेल तर तो डिसेबल करुन टाका. हे असे करण्यास का सांगतो आहे त्याचे कारण खालच्या २ दुव्यां मधे दिले आहे.
Disable This Buggy Feature On Your Router Now To Avoid A Serious Set Of Security Vulnerabilities
HTG Explains: Is UPnP a Security Risk?
५} सर्व्हीस प्रोव्हाडर ने दिलेले प्रायमरी आणि सेकंडरी डीएनएस वापारायचे नसतील तर गुगलचा ओपन डीएनएस वापरु शकता. गुगल डीएनस :- ८.८.८.८ /८.८.४.४ शिवाय इतरही ओपन डीएनएस उपलब्ध आहेत.
राउटरवर जितकी किडाकांडी करुन पाहता येइल तितकी पहा,मास्टरी मिळालीच म्हणुन समजा. अर्थात वरती सांगितल्या प्रमाणे आधी चालु स्थिती मधले सेटींग स्वेव्ह करुन मगच हा उध्योग करावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

हे सगळ्यात महत्त्वाचे. नाहीतर आपल्या वायफाय कनेक्शनचा पासवर्ड कुणाला माहित नाहिये या गैरसमजूतीत तुम्ही असता मात्र जर वाय फाय डिव्हाईसचा डिफॉल्ट पासवर्ड बदललेला नसेल तर त्यात घुसून कुणीही तुमचाअ पासवर्ड पाहू शकतो आणि त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

धर्मराजमुटके's picture

27 Aug 2014 - 11:23 am | धर्मराजमुटके

मात्र त्याला त्यासाठी एकदा तरी तुमच्या नेटवर्कमधे वायर्ड नेटवर्कद्वारे एन्ट्री करावी लागेल किंवा Hacking ची कला अवगत असावी लागेल. पासवर्ड शक्यतो कॉम्प्लेक्स ( सहज न ओळखता येण्याजोगा) असावा.

इथे २ पासवर्डचा संबंध येतो.
१} राउटरचा स्वतःचा डिफॉल्ट पासवर्ड
२} जो वायफाय सेटअप केला आहे त्याचा पासवर्ड {जो मोबल्यावरुन टाईप केल्यावर वायफायला कनेक्ट होउन नेटवर्क अ‍ॅक्सेस मिळतो.}
आता पहिला पासवर्ड हा राउटरच्या कंपनीचा बाय डिफॉल्ट पासवर्ड असतो... जो शक्यतो admin हा असतो,किंवा इतरही असु शकतो...ते मॉडेल किंवा कंपनीवर अवलंबुन असते.जालावर शोध घेतल्यास अशा डिफॉल्ट पासवर्ड ची यादी सहज मिळेते.त्यामुळे राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलणे फार महत्वाचे आहे.वायफाय पासवर्ड सेट करण्यासाठी सुद्धा विविध सुरक्षा पद्धती आहेत, त्यातली जी हवी ती वापरावी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2014 - 6:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे डिलिंक DSL-2750U हे राऊटर आहे. गेली तीन वर्षापासून वापरतो.
मोबाईलसाठी २५ फुटापर्यंत चांगली रेंज देते. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

6 Oct 2014 - 7:05 pm | कपिलमुनी

Wi-Fi राऊटर ची रेंज किती असते ? २०-२५ मीटर पर्यंत रेंज असणारे Wi-Fi राऊटर कोणास माहीत आहेत का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Oct 2014 - 9:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डी-लिंक एन-३०० घ्या डोळे झाकुन. आरामात ३०-३५ मी. पर्यंत रेंज मिळते.