बोले तो ...!!!

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
31 Jul 2014 - 4:57 pm
गाभा: 

काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते.

त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका..

1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही.

2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे..

3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव...

4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून...

5) ह्या..!! रोज रोज काय italian खायचे म्हणून आज Indian food च बनवले..

6) चार्ली रेड का !!! छान वास आहे. मला आता अरमानीचा कंटाळा आला आहे.

7) मला ईमेल कर मी घरी जाऊन वॉश घेतला की निवांत पाहीन माझ्या आय-पॅडवर...

8) आजकाल रिक्षावाले फार माजूरड्यासारखे चालवतात. कालच माझ्या होंडा सिटीला एकजण धडकणार होता..

9) खूप काम आहे राव...घरनं पण ऑफीसची भांडी घासतोय...उगाच प्रमोशन accept करून मॅनेजर झालो. त्यापेक्षा सिनीयर टिममेट होतो तेच बरे होते.

10) आमची ही फारच भारी बिर्याणी बनवते. परवा कमिशनरसाहेबांनी तर चारदा मागून खाल्ली.

11) अय्या किती मोठी झाली ग ही...!! शी बाई...!! उगाच यांच्याबरोबर स्वीडनला राहीले. त्यामुळे तुझ्या मुलीचे बालपण मिस केले ना मी...

12) काल अण्णांचा आवाज बरोबर नाही लागला मैफीलीत...त्यापेक्षा राहूल देशपांडे बरेच उजवे गायला. अण्णा स्वतः मला म्हणाले की आता त्यांना रिटायर व्हायला हरकत नाही.

(नेहमीप्रमाणे हे एक गंमत म्हणून घ्या... कोणालाही टारगेट केलेले नाही येथे...).

प्रतिक्रिया

सह्यमित्र's picture

31 Jul 2014 - 5:03 pm | सह्यमित्र

हा अनुभव बर्याच वेळेला आलेला आहे.

हाडक्या's picture

31 Jul 2014 - 5:03 pm | हाडक्या

चला .. मी पयला..

बाकी चालू द्या.. :)

सह्यमित्र's picture

31 Jul 2014 - 5:10 pm | सह्यमित्र

*yahoo*
तुमच्या आधी मी !!

योगी९००'s picture

1 Aug 2014 - 11:50 am | योगी९००

प्रत्येक धाग्यावर मी पयला प्रतिक्रिया देतो..मराठी वाचायला वेळ आहे कोणाला?...माझ्या सेक्रटरीला सांगून ठेवलेय की नवीन लेख पडला की "मी पयला" असे पडलेच पाहिजे, नाहीतर तुझे appraisal ताजऐवजी कोठल्यातरी ३ स्टार हॉटेलमध्ये घेईन. (म्हणजे appraisal घेणार म्हणजे घेणारच...फक्त जागा बदलीन).

आनन्दा's picture

1 Aug 2014 - 4:05 pm | आनन्दा

देव करो आणि तीच तुमचे अ‍ॅप्रायझल न घेवो :ड

ह.घ्या हे वे सा न ल.

चिगो's picture

12 Aug 2014 - 10:40 am | चिगो

अरे व्वा.. छानच आहे की तुमची "अप-रेझल"ची पद्धत. :D 8)

सह्यमित्र's picture

31 Jul 2014 - 5:08 pm | सह्यमित्र

वैताग आला बाबा सारखा विमानाने प्रवास करुन

आजकाल मी एस टी ने कमी आणि विमानाने जास्त फिरतो.

मराठी कथालेखक's picture

31 Jul 2014 - 5:19 pm | मराठी कथालेखक

शतकी धागे काढून काढून कंटाळा आला ; आता त्या पेक्षा इतरांचे धागेच निवांत वाचत रहावे म्हणतोय ...

त्याचं काय आहे न…की समोरचा त्यांना हवा तसा प्रश्न विचारत नसतो काही केल्या…ह्यांचा जीव इथे वर खाली…. बर माहिती तर सगळी द्यायची असते इत्थंभूत, पण फक्त स्वतःविषयी (थोडक्यात स्वताचे तुणतुणे वाजवून दाखवायचे असते !) पण समोरचा ह्यांना हव्या त्या मुद्द्यावर येत नसल्यामुळे ह्या अशा प्रकारातून त्यांना तो विषय त्यांना हवा तसा फिरवायचा आणि असं काहीतरी वेचक/ वेधक/दिलखेचक बोलावंच लागतं …इलाज नाही हो त्याला …

बरं झालं साधंच जेवण केलं . रोज रोज हॉटेलमधल high calary फूड खावून कंटाळा आला .

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 5:27 pm | कवितानागेश

पूर्वीचं मिपा राहिलं नाही बघा. आमच्यावेळेस आम्ही......... ई.ई. ;)

रामपुरी's picture

31 Jul 2014 - 9:59 pm | रामपुरी

१२) ने एका फाSSSर जुन्या मिपाकराची आठवण झाली.

रामपुरी's picture

31 Jul 2014 - 10:03 pm | रामपुरी

मी मुलींकडे बघतही नाही पण (जीन्स पँट आणि लूझर शर्ट परीधान केल्याने) त्याच माझ्याशी बोलायला येतात.

तुमचा प्रतिसाद वाचून मिपाचा हा प्राचीन लेख आठवला. *ROFL*

तुषार काळभोर's picture

1 Aug 2014 - 4:03 pm | तुषार काळभोर

चेसुगुचा लेख असणार.

शिद's picture

1 Aug 2014 - 4:32 pm | शिद

बरोबर. *biggrin*

लेखापेक्षा प्रतिसादच मनोरंजक आहेत.

चिगो's picture

12 Aug 2014 - 10:44 am | चिगो

जीन्स नाही हो.. "गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट" हवी त्याकरीता.. ;-)

मार्क ट्वेन's picture

31 Jul 2014 - 10:50 pm | मार्क ट्वेन

Mazhyaa Ipad Air varoon marathi lihita yet nahiye koni help karel ka pls!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

१. पैशाचं आपल्याला काही वाटत नाही. परवाच अमुक एवढे दिले एका संस्थेला. निनावी बरंका. नाव करुन करायचं काय नाहीतरी?

२. अहंकार, मीपणा वगैरे अजिबात नाही हो आपल्याला. परवा एका कार्यक्रमात गेलेलो. स्टेजवरुन बोलावणं आलं राजांनी पाहिल्याबरोबर. पण म्ह्टलं इथंच बरंय. कार्यक्रम रंगात आलेला असताना आपल्यामुळं कशाला उगाच त्रास. शेवटी जेवायला नेलंच.
३. पाऊस. भयाण पाऊस. २० घरांची वाडी. वीज नाही, घरं पडायला आलीत. मंडळाची पोरं आणि मी. आणलंय शक्य तेवढं. जमेल. (फोटोसहित)

४. थँक्स गॉड! बेस्ट डे ऑफ माय लाईफ. (फोटो आहेच)

हा हा, मस्त! वाचत राहीन, पण आपण सगळेचजण अनवधानाने काही ना काही बोलून जात असतो. आठवले तर लिहीन.
एकदा एकांकडे गेल्यावर (त्यांनी बोलावले म्हणून) घरच्या सधन मालकिणबाईनी सगळ्यांपुढे चहा ठेवला व "मी आणि माझी मुलगी आज शॉपिंग स्प्रीवर आहोत" असे म्हणून निघून गेल्याचे अंधुकसे आठवते. अगदी (मराठी) शाळकरी असल्याने मला काहीच समजले नव्हते. तसेही त्यावेळी शॉपिंगला जाणे हे मध्यमवर्गात फारसे प्रचलित नव्हते. नस्ते खर्च कमी करण्याकडेच कल असे (आणि तसे करताना कधीकधी अतिरेक होई.) तर स्प्रीवर कसे जाणार? ;) त्यावेळी हे लोक खूपच श्रीमंत आहेत एवढेच जाणवले होते.

बहुगुणी's picture

1 Aug 2014 - 12:17 am | बहुगुणी

पब्लिक मध्ये वाटण्यासाठी conversation pieces म्हणून भरपूर खाद्य मिळणार आहे, तेंव्हा हा धागा वाचत रहायला हवा :-)

[8 हा क्रमांक टाईप करून कंस दिला की 8) ही स्मायली तयार होते हे कळलं ;-) ]

रेवती's picture

1 Aug 2014 - 3:56 am | रेवती

8)

पहिल्यांदा अशी स्मायली जमली. धन्यवाद बहुगुणी!

योगी९००'s picture

1 Aug 2014 - 4:15 pm | योगी९००

रेवती,

मला ही थोडा धन्यवाद द्या... माझ्या नकळत झालेल्या चुकीमुळे ही गोष्ट कळली...

८)

योगी९००'s picture

1 Aug 2014 - 4:17 pm | योगी९००

८) लिहीले की स्मायली तयार होत नाही 8 आणि ) केले की 8) तयार होते.

रेवती's picture

1 Aug 2014 - 4:23 pm | रेवती

धन्यवाद योगी९००.

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2014 - 1:59 am | प्रभाकर पेठकर

हल्ली कोणी विचारलं नाही तरी मी युरोपातील रस्ते, तिथली शिस्त आणि भारतातील रस्ते आणि आपली बेशिस्त ह्यावर, उगाच येताजाता उसासे सोडत असतो. कांही जणं गळाला लागतात आणि युरोप सहलीचा तपशिल विचारतात. 'आम्हालाही कधीचं जायचं आहे पण पैशाची गणितं जमत नाहीत.' वगैरे ऐकवतात. तेव्हढंच बरं वाटतं. त्यात नवल काय वाटून घ्यायचं? खरं ते बोलायला लाज कसली?

ऋषिकेश's picture

1 Aug 2014 - 9:42 am | ऋषिकेश

+१
डिट्टो
त्यातही खर्च किती आला या प्रश्नाची तर मी वाटच पाहत असतो :P

मार्क ट्वेन's picture

1 Aug 2014 - 2:11 am | मार्क ट्वेन

एका मैत्रिणीचं मुक्ताफळ - 'ए मला तुझ्या गाडीवर ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करायला देशील? नाही, माझ्या नवर्‍याची बीएमडब्ल्यु आहे म्हणून!'

तुम्ही पण मागायची मग तिच्या नवर्‍याची गाडी प्रॅक्टीस करायला! हाकानाका!

स्रुजा's picture

1 Aug 2014 - 5:19 am | स्रुजा

*lol*

फारएन्ड's picture

1 Aug 2014 - 9:19 am | फारएन्ड

यशोधरा *biggrin*

मदनबाण's picture

1 Aug 2014 - 7:00 am | मदनबाण

अ‍ॅड्रॉइड ? हे काय असत ? माझ्याकडे आयफोन आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jenny from the Block {lyrics} :- J LO

खटपट्या's picture

1 Aug 2014 - 9:26 am | खटपट्या

मग तुम्ही विचारा "आयफोन ? कोणत्या कंपनीचा ?"

कपिलमुनी's picture

1 Aug 2014 - 3:28 pm | कपिलमुनी

बाकी ठीकै ओ
पण

शेपूच्या भाजीत चीझ
योगी९००'s picture

1 Aug 2014 - 4:12 pm | योगी९००

शेपूच्या भाजी वर लक्ष देऊ नका...ते मी सहज म्हणून लिहीलेयं..

काल मी द लिला मध्ये होतो/होते त्यावर जोर देवून बोला मग तेथे तुम्ही काही का खाईना....ऐकणार्‍या आधीच गप्प झाला असतो...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Aug 2014 - 3:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बर्‍याच वेळा लोक नकळत बोलून जातात. त्यात वट वगैरे काही असेल का? वाटत नाही.
सगळेजण सारखे नसतात.

आपल्या घराची किंमत १ कोटी झालिय. शाटमारी! आपण कोणाला घाबरत नाय आता.

(अरे पण शहाण्या , तु ते घर विकणारेस का? लुंगी,बनियन घालून मरेपर्यंत तिथेच रहाणारेस.)

हे निदान काहीतरी बोलणे झाले हो, नाहीतर अगदी सहज म्हणल्यागत "काय किमती वाढल्यात घरांच्या, आता आमच्या या दहा लाखाच्या मठीची किंमत १ कोटी झालीये, काय महागाईचे दिवस आलेत."

धन्या's picture

1 Aug 2014 - 5:10 pm | धन्या

हे परफेक्ट.

इरसाल's picture

1 Aug 2014 - 4:45 pm | इरसाल

मौर्याला खाल्ले पण स्वीसच्या "ला फोन्तेनेला" ची चव नाय त्याला. ( हे खरेच आहे बरं)

गवि's picture

14 Aug 2014 - 11:54 am | गवि

पण पण पण.. या धाग्यात अपेक्षित असलेल्या वाक्यांना जरा वेगळा टोन असतो..

म्हणजे वर म्हटलेल्या स्विस ला फोन्तेनेलाची चव नाही या ऐवजी..

अर्रे इतालीत रोमा फिरेन्सेत आणि नापोली व्हेनिसात सगळीकडे खाल्लेल्या पिझ्झांपेक्षा आपल्या नाक्यावरच्या "सत्कार"मधेच पिझ्झा ब्येष्ट वाटतो मला..

अशा टाईपमधली कायतरी.. ;)

कविता१९७८'s picture

1 Aug 2014 - 5:05 pm | कविता१९७८

हो असे कमेंटस बर्‍याचदा ऐकलेत

आम्ही कधी काकांकडे गेलो की आमचा चुलत भाउ लगेचच त्याच्या बायकोला सांगतो , " अगं कालच जो ११ लाखाचा चेक आलाय तो जरा दाखव बघु" दर वेळी अमाउंट बदलते पण वाक्य तेच.

वामन देशमुख's picture

1 Aug 2014 - 5:17 pm | वामन देशमुख

अहो तुम्हाला सांगतो, परवा एक गंमतच झाली,
मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं!

मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! - हे भारीच!

रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो?

ह्या धाग्यावर परत यावं लागणार हे खरं.

वामन देशमुख's picture

2 Aug 2014 - 12:11 pm | वामन देशमुख

नाही हो सखी, ला मेरिदिअन हे इथलं!

योगी९००'s picture

4 Aug 2014 - 5:12 pm | योगी९००

@वामनपंडित...
परवा एक गंमतच झाली,
मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं!

जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. म्हणून सखी ताईंनी तुम्हाला रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? असे विचारले असावे.

तुम्ही कदाचित उदाहरण म्हणून जगजीतसिंगाचे नाव घेतले आहेत . पण सखी यांचा गैरसमज झाला असावा.

जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. - म्हणुनच विचारले, अर्थात इथे कोणीही प्रसिद्द व्यक्ती उदाहरण म्हणुन चालुन जाऊ शकते, म्हणुनच गैरसमजही नाही :)

वामन देशमुख's picture

14 Aug 2014 - 10:33 am | वामन देशमुख

@योगी ९०० स्पष्टीकरणाबद्धल धन्यवाद.

@सखी आपलं, "रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो?" हे मला योगी ९०० यांचं स्पष्टीकरण वाचेपर्यंत खरंच कळलं नव्हतं! हा धागाच फेकाफेकीचा होता म्हणून मी आपला एक किस्सा फेकला!

आता माझं रच्याकने: आमच्या "परवा"चा अर्थ या धाग्यावर मिळेल: http://www.misalpav.com/node/21247

स्वप्नांची राणी's picture

1 Aug 2014 - 5:18 pm | स्वप्नांची राणी

+१ कविता!!

मला पण लिहायचेत काही नमुने...पण परांजपे मधे घर बूक करतेय, लिहितेच मग. ८०,०००,०००.०० ट्रन्सफर लिहिल कि हे बँकवाले पण तिन-तिनदा वेरीफीकेशन मागतायेत..

रेवती's picture

1 Aug 2014 - 6:29 pm | रेवती

हा हा हा.

यातून आइफोन कंपनीपण सुटली नाही .कोणाला मेसेज एसेमेस करायचा तर त्यांच्या अॅपमधूनच की आपोआपच 'सेँट फ्रॉम आईफोन'चे चुंगम त्याबरोबर चिकटून जाते .मार्केटिंगच्या लबाडीशिवाय वेगळे काही नाही त्यात .

वामन देशमुख's picture

2 Aug 2014 - 12:15 pm | वामन देशमुख

'सेँट फ्रॉम आईफोन'
सगळ्याच कुम्पण्या करतात असं.
"सेंट फ्रॉम अमुकतमुक फोन" ही एक default signature (?) असते आणि आपल्याला बदलता येते.

मलाही लिहायचंय, पण कोथरुडात बंगला कधी घेताय म्हणून बिल्डर सक्काळपासून चारदा फोनवतोय च्यायला. आता माणसानं फोन घ्यायचा का कामं करायची? तरी बरं नरिमन पॉइंटला परवाच दोन फ्लॅट घेतले.

>>>>>> नरिमन पॉइंटला परवाच दोन फ्लॅट <<<

अभ्यास वाढवा.. ;)

मी अमेरिकेतून परत आल्यावर "मी युएसला होतो तेव्हा..." पुन्हा पुन्हा म्हणत असे हे आठवले. ;)

रेवती's picture

1 Aug 2014 - 7:35 pm | रेवती

हो हो, मी स्विडनहून आल्याआल्या आपण भेटलो तेंव्हा आमच्या नव्या बंगल्यात भेटायाला आल्यावर तुम्ही म्हणाल्याचे आठवते आहे खरे! माफ करा, त्या दिवशी आम्हाला डायमंडच्या खरेदीला जायचे असल्याने आपले फारसे बोलणे झाले नाही. ;)

धन्या's picture

1 Aug 2014 - 7:38 pm | धन्या

हरकत नाही.

आम्ही पुढच्या महिन्यात सुदानला जाणार आहोत. तेव्हा आम्हाला आमच्या मित्राच्या छोटया मुलीसाठी तनिश्कमधून शॉपिंग करायची आहे. तेव्हा वेळ काढून तुमच्या घराकडे चक्कर टाकू.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Aug 2014 - 7:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

धनाजीरावांशी बाडीस...पण ते बोलताना होतेच "सहजपणे":))

केदार-मिसळपाव's picture

1 Aug 2014 - 8:01 pm | केदार-मिसळपाव

मी आपला सेकंड-हँडवाल्या दुकानातुन वापरलेला लाकडी पलंग विकत घेत होतो तर आमची ही म्हणाली की आहो, आपल्या शेदार्‍यांनी घर सोडतांना आत्ताच एक जुना पलंग बाहेर आणुन ठेवलाय. तुम्ही लगेच घरी या तो आत आणुन ठेवायला.

आणि हे ही सहजपणेच बर्का..

मीटरमध्ये बसत नाही. काफीया चुकला आहे.

केदार-मिसळपाव's picture

1 Aug 2014 - 8:17 pm | केदार-मिसळपाव

अहो आम्हाला आमची १ वर्ष जुनी ऑडी चालवुन आता कंटाळा आला, पुढच्या महिन्यात बीएमडब्ल्यु ५ सिरीझ घेणार आहोतच, पण म्हंटले की उद्या पोर्षची टेस्ट-ड्राईव्ह घेवुन बघुया. तुमच्याकडे उद्या नक्की आलो असतो हो, पण तुमच्या घरासमोरचा रस्ता फारच छोटा आहे. आणि तुमच्या पार्किंग मधे नाही ना बसणार पोर्ष. पुढे वेळ काढुन नक्की चक्कर टाकु.

धन्या's picture

1 Aug 2014 - 8:20 pm | धन्या

खिक्क !!!

आम्ही पेठेत राहतो त्यामुळे आमच्या सोसायटीला पार्किंगच नाही.

मार्क ट्वेन's picture

1 Aug 2014 - 8:34 pm | मार्क ट्वेन

या लोकांची एक पेश्शल कॅटेगोरी म्हणजे 'रिव्हर्स स्नॉबरी' मारत फिरणारे लोक. आपण साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे पाईक कसे आहोत याचे मासले जातायेता दुसर्‍यांच्या तोंडावर फेकत हे लोक फिरत असतात.

- आजकाल इंग्लिश मिडियममधे साली सगळी ड्रायव्हरांची आणि भाजीवाल्यांचीच पोरं जातात. आमच्या हिंदुत्वला आम्ही सरस्वती मराठी मिडियममध्येच घातलं. तिथे कसं ब्रा.... आपलं... मराठी.... वातावरण असतं.
- हॅ!... आपल्याला त्या स्मार्टफोन आणि बिर्टफोनशी काही घेणंदेणं नाही. गेली नऊ वर्षं हा नोकिया वापरतोय.
- (पिणार्‍या मित्रांच्या घोळक्यात बसून शक्य तेवढ्या तुच्छतेने पहात) आपण ना, असलं काही कधी तोंडाला लावलं नाही आणि लावणार पण नाही.
- साले गठ्ठ्याने जाऊन तिकडे हमाली करतात. तुला सांगतो ९८ मधे मला युएसची परमनंट ऑफर दिलेली. पण मी गेलो नाही. काये ना आपला देश आपली संस्कृती आपलं यांव आपलं त्यांव......

भिंगरी's picture

2 Aug 2014 - 3:21 pm | भिंगरी

हवेत कशाला ते चोचले?
अहो हल्ली अपघात किती होतात विमानाचे,
त्यापेक्षा आपली मायबाप सरकारची लाल पिवळी बरी.

स्वप्नांची राणी's picture

2 Aug 2014 - 3:43 pm | स्वप्नांची राणी

हो ना ग...भिंगरी, केवढे वाढलेयत ना विमानांचे अपघात! मी कालच मुकेश ला फोन करुन सांगुन टाकल ' मला ईंडियात बोलावतोस तर चार्टर्ड पाठव, मी नाही बाई यायची एमिरेट्स्नी...बिजनेस क्लास असला म्हणून काय झालं'

अगदी अगदी. ;)क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात!

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 6:24 pm | प्यारे१

क्लास!

चिगो's picture

12 Aug 2014 - 11:02 am | चिगो

>> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात!

अक्षरशः "कातिल" जोक आहे हा.. =)) क्लासच.. 8) (ह्या स्मायलीशोधाबद्दल योगीराजांचे धन्यवाद.)

योगी९००'s picture

14 Aug 2014 - 8:40 am | योगी९००

धन्यवाद चिगो..

>> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात!
खरोखर क्लास आणि कातिल जोक आहे हा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2014 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

ओ, त्यांच्या चार्टर्ड इमानांना पकडलं होतं DGCA नं निवडणुकीच्या काळात सुरेक्षेचे नियम न पाळल्याबद्दल ! आमी बाबा आमच्या प्राय्वेट जेटनंच जातो. उगा आपला नीताचा नखरा नको ;)

फेरफटका's picture

12 Aug 2014 - 7:58 pm | फेरफटका

मला त्या उधार सुपिरिअ‍ॅरिटी पेक्षा हा असला नकली साधेपणा जास्त डाचतो. पहिल्या प्रकारात फक्त स्वतःचा मान मिरवणं ईतकाच भाग (बराचसा) असतो, पण ह्या दुसर्या प्रकारात समोरच्याला हिणवण्याचा भाग जास्त वाटतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2014 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजकाल या फाईव स्टार हाटीलात काय दम राह्यला नाय. त्यांचा इतका वीट आलाय की गेल्याच महिन्यात मुंबईला फेरी झाली की राह्यला मलबार हिलवर गेस्ट हाउसवाला मोठा बंगला घ्यायला लागला की हो.

मयुरा गुप्ते's picture

1 Aug 2014 - 9:03 pm | मयुरा गुप्ते

आमच्या कडे किनई...ह्या 'सहज' वाक्यापासुन सुरुवात होणारे प्रत्येक संभाषण अगदि वर दिलेल्या प्रतिसादांच्या अंगानीच जात असते.
त्यामध्ये आमचे हे, बबडा, बबडी, झालंच तर घरातील इतर सदस्य, वस्तु,घर, प्रवास,व्यापार अशी अतिप्रचंड व्याप्ती असलेले संवाद नेहमीच कानावर पडत असतात.
कधी कधी अवधानाने माझ्या कडुनही असं घडतच की... परदेशात फक्त दिड वर्ष राहुन,जेव्हा भारतात गेले तेव्हा भाजीवाला, इस्त्रीवाला ह्याना उगिचच आपलं येता जात 'सहजपणेच' थँक्यु वगेरे म्हणाले होते..त्यांच्या चेहर्‍यावरचे अपार भाव पाहुन पाय आणि डोकं खर्‍या अर्थाने मायभुमीवर उतरले होते.
-मयुरा.

प्रभाकर पेठकर's picture

2 Aug 2014 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या लहानपणी (साठच्या दशकात) असे एक वाक्य ऐकले होते.
घरी आलेल्या पाहुण्यांवर 'इंप' मारण्यासाठी नवरा आपल्या बायकोला म्हणतो, 'अग! त्या आपल्या गोदरेजच्या कपाटात गॅबर्डीनच्या सूट शेजारी शासकिनची (शार्कस्किन) पँट आहे नं त्याच्या खिशातल्या पाकिटातून एक रुपयाची मोड घेऊन ये.'

ह्यात गोदरेजच्या कपाटापासून गॅबर्डीनचा सूट ते शार्कस्किन (उच्चार शासकिन) पँट पर्यंत सर्व गोष्टी उच्चभ्रूंची निशाणी मानली जायची.

रेवती's picture

2 Aug 2014 - 5:55 pm | रेवती

हा हा हा.

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2014 - 3:12 pm | पिलीयन रायडर

मला लोक आपण कसे "तरल.. संवेदनशील.. सगळ्यांपेक्षा वेगळेच.. ऑफबीट जगणारे.. प्रत्येक गोष्टी मध्ये सामान्य लोकांपेक्षा वेगळाच विचार करणारे.. वगैरे वगैरे" आहोत असं बोलण्यातुन / देहबोलीतुन / लिखाणातुन वगैरे दाखवायचा प्रयत्न करतात तेव्हा भयंकर वैताग येतो..

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 4:34 pm | कवितानागेश

लहान मुलांचे जोक असतात न, "माझे बाबा किनै...." त्याचीच आठवण होतेय . :D

एक छोटा मुलगा: माझे बाबा किनै, इतके उन्चयत की एक हात वर केला सहज नारळ पाडतात.
दुसरा छोटा मुलगा: हे तर कैच नै. माझे बाबा तर इतके उन्चयत की एक हात वर केला तर विमानाला हात लागतो.
तिसरी छोटी मुलगी: माझे बाबापण खूप उन्चयत. पण ते असले चाळे करत नाहीत. ;)

उद्या कमिशनरकडे एक महत्त्वाचं हिअरिंग आहे म्हणून आज रात्री फार जागता येणार नाही. त्यात सकाळी सहाला उठून सातला टेबलटेनिसला जायचं असतं. नाही तर आज लिहीण्याचा सॉलिड मूड होता. येत्या दोन दिवसात नक्की लिहीन.

प्यारे१'s picture

12 Aug 2014 - 6:01 pm | प्यारे१

सांगायचं र्‍हायलं:
हा प्रतिसाद मिसळपाववरच एका ज्येष्ठ सदस्याकडून एका ख व मध्ये लिहीला गेलेला आहे. इस नाचीजने फक्त चोप्य पस्ते केला आहे. अर्थात सदरहू वाक्य 'खरंच खरं' असण्याचीच जास्त शक्यता आहे.

योगी९००'s picture

4 Aug 2014 - 5:22 pm | योगी९००

काल मीच असे बोललो..!!

काहीनी engineering कॉलेज यावर सल्ला मागितला होता. त्यावर मी महाराष्ट्रातील चांगल्या सरकारी महाविद्दालयाबद्दल बोलता बोलता म्हणालो की " महाराष्ट्रात engineering ची चांगली कॉलेज व्हि. जे. टी. आय, REC नागपुर, नांदेड चे गुरूगोविंदसिंग, COEP पुणे, कराडचे government college आणि माझे सांगलीचे वालचंद हिच आहेत. " यामुळे उपस्थित सर्वांना मी चांगले मार्क मिळवून आणि government कॉलेजमधून शिकलो हे कळले. बोलता बोलताच लक्षात आले की मी काय केले ते... आता मुद्दाम बोललो का सहज तोंडातून बोलले गेले ते सांगणे अवघड आहे.

सौंदाळा's picture

5 Aug 2014 - 10:48 am | सौंदाळा

जॉनी वॉकर, च्शिवाज रिगल घ्यायला लागल्यापासुन सिग्नेचर, अँटिक्विटि जमत नाही राव आता.
आणि बरोबर सुरमई/पापलेट फ्राय पाहीजेच १००० रुपये किलो झाले तरी सांगतो कोणाला? १.५/२ किलो लागतच आम्हाला दर रविवारी

चिगो's picture

12 Aug 2014 - 11:18 am | चिगो

साला, त्या इंडीयन / ब्लेंडेड तर जमतच नाही आपल्याला. सिंगल माल्टची "पॅलेट" साली वेगळीच असते.. ;-)

अरे योगी... मस्त आहे रे धागा.

अशी वाक्यं तर भरपूर ऐकू येतात पण .. परदेशात, विशेषतः अमेरिकेत अत्यंत सुखाने अन श्रीमंतीत सेटल झालेल्या पिढीचे बरेच प्रतिनिधी अधूनमधून इकडचा उसासा आला की एकेक प्रचंड हळवी कविता पाडतात..

त्यातली एखादी पाहिली तर ओळीओळीला हीच्च वाक्यं मिळतील.

म्हणजे कॉलेजात खिशात पैसे नसताना मारलेल्या कटिंग चहापुढे आजचे स्टारबक्स किंवा जे काय असेल त्यात कशी मजा नाही.

मित्रांबरोबर दळिद्री प्रकारे केलेल्या खानपानाची मजा आज ह्यात किंवा हिल्टनमधल्या बिझनेस लंचमधे नाही..

गावातल्या तरीत (होडीत) बसून खाडी पार करण्याची मजा फाईव्हस्टार क्रूझमधल्या प्रशस्त डेकवर पहुडताना आठवते आणि मन भरुन येते.

इ इ इ

हवा तेवढा पुरवठा.

आत्ता हाताशी नाही अशी एखादी कविता नपेक्षा दाखवली असती..

योगी९००'s picture

14 Aug 2014 - 2:44 pm | योगी९००

धन्यवाद गवि..!!

"आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही." हे आपल्याच शाळेच्या माझ्या वर्गातल्या एकाची orkut वरील खरड दुसर्‍या मुलाला लिहीलेली मी वाचली होती. लिहीणारा वर्गात एकदम ढ म्ह्णून प्रसिद्ध होता पण merchant navy मधील नोकरीमुळे त्याने जग पालथे घातले होते. ज्याला लिहीले तो वर्गातला एकदम हुशार होता पण रत्नागिरीतच एका कंपनीत काम करत होता. मुद्दाम खिजवण्यासाठी हे वाक्य टाकले गेले होते असे मला वाटले.

योगी९००'s picture

15 Aug 2014 - 10:38 am | योगी९००

आज कोठेतरी लंडन देखा पँरीस देखा हे गाणे ऐकले आणि या धाग्याची आठवण झाली.