सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे?

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 1:28 pm

सरकार हे श्रीमंतांवर अन्याय करून गरीबांना फायदे पोहोचवत आहे असा एक आर्थिक युक्तिवाद आहे. म्हणजे करसवलती, दरसवलती, कल्याणकारी योजना, इत्यादीमधून वैगेरे. या मतावर मुद्देसूद अशी चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
-----------------------
१. सर्वसाधारणपणे या चर्चेकरिता गरीब म्हणजे कोण नि श्रीमंत म्हणजे कोण हे सांगावे लागेल. साधारणतः ज्यांना सरकारी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सवलतींचा, कल्याणकारी योजनांचा थेट फायदा मिळतो ते गरीब अशी व्याख्या पुरेशी ठरावी. आपापल्या कुवतीप्रमाणे कमावणार्‍या नि खाणार्‍या, कोणती सवलत न घेणार्‍या वा कल्याणकारी योजनेचा फायदा न घेणार्‍या अशा गरीब लोकांविरुद्ध तक्रार असण्याचे कारण नाही.
२. इथे कोणत्याही प्रकारचे प्रतिपादन करणाराच्या दृष्टीने मानवी मूल्यांच्या प्राधान्यांचा क्रम मांडण्याची आवश्यकता भासू शकते. म्हणजे एखादी सरकारी निती वा कृती कोणते मानवी मूल्य कोणत्या अन्य मूल्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असे ठरवल्याशिवाय योग्य कि अयोग्य ते सांगता येत नाही. म्हणजे एका ठिकाणी स्वातंत्र्य समतेपेक्षा महत्त्वाचे असे म्हटले असेल तर झाडून सगळीकडे तसे म्हणायचे.
३. परंपरांचा वा नियमांचा वा स्थितींचा लेगसी/ वारसा हा एक मोठा इश्श्यू चर्चेत येतो. वारश्यांचे कोणतेही खापर अँटी-गरीब लॉबीवर (वा विरुद्ध लॉबीवर) फोडायचे नाही असा संकेत पाळू. केवळ आजचे अधिकृत व्यवस्थाजन्य नियम नि त्यांची न्याय्यता इतकाच स्कोप ठेऊ.
४. भारताचे (नि सगळ्याच राज्य, स्थानिक सरकारांचे) कोणत्या तरी एकाच वर्षाची बजेटस वापरू. २०११-१२ ची. म्हणजे संभ्रम जास्त होणार नाही.
--------------------
चर्चा करण्याच्या दोन पद्धती असू शकतात.
१. 'सरकारचे पैसे गरीबांना का जात आहेत?' म्हणून उदा. लाडली, इ योजना चूक म्हटल्यास ती कशी योग्य आहे हे गुणात्मक, मेरिट बेसिसवर प्रतिवाद करून पटवणे.
२. सरकारचे पैसे इतर क्ष मार्गे श्रीमंतांना कसकसे जात आहेत नि ते कसे समाजात व्हिजिबल नाही, ते पैसे कसे लाडली, इ योजनेच्या बजेटपेक्षा जास्त आहेत, हे सांगणे.
सबब धाग्याचा उद्देश क्रमांक २ प्रकारचे लॉजिक वापरणे हा आहे. (अर्थातच ज्यांना रुची आहे ते क्रमांक १ प्रकारचे लॉजिक वापरू शकतात, किंवा १ चे रुपांतर २ मधे करू शकतात, पण तो मूळ उद्देश नाही. सरकारी नितींचा सामाजिक परिणाम हा विषय नाही. थोडक्यात फक्त सध्या कोणाला जास्त थेट फायदा होतोय हा विषय आहे.)
----------------------
चर्चेत
१. गरीब व श्रीमंताची राजकीय कर्तव्ये व हक्क
२. गरीब व श्रीमंताची सामाजिक कर्तव्ये व हक्क
३. गरीब व श्रीमंताची आर्थिक कर्तव्ये व हक्क
४. गरीब व श्रीमंताची न्यायिक कर्तव्ये व हक्क
असे विषय असू शकतात. नि म्हणून कोणावर किती अन्याय होतोय. हा चर्चेचा गाभा असेल.

जास्तीत जास्त भर दोन्ही बाजूंचा हिशेब करण्यावर ठेऊ.
----------------------
आता पहिला प्रश्न विचारतो-
१. गरीब व श्रीमंत यांच्या राजकीय कर्तव्यांत नि हक्कांत प्रचंड अन्याय आहे असे आपणांस वाटते का?

अर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

सरकार हे सर्वांचेच असते, ते फक्त कोणत्याही एका वर्गाचे असूच शकत नाही. म्ह्णुन,
सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे? च्या ऐवजी
योजना कुणासाठी? श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी? किंवा
बजेट कुणासाठी? श्रीमंतांसाठी की गरीबांसाठी? असे हवे.

मुक्त विहारि's picture

2 Aug 2014 - 11:45 pm | मुक्त विहारि

सम आर मोअर इक्वल...