सोनेरी फुलं आणि म्हातारा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 10:34 am

हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.

एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल. तो मटकन खाली बसला. बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या द्वाड मुलांचे काम असेल. त्यांना मनातल्या मनात असंख्य शिव्या मोजल्या. एक कोमजलेले निर्जीव सोनेरी फुल उचलून आपल्या काळजापाशी घट्ट धरले, अचानक म्हातार्याला छातीत कळ जाणवली.

आजोबा, कसं वाटतंय आता, एका सोनेरी फुलाच्या आवाजाने म्हात्याराने डोळे उघडले. बघतो समोर क्यारीत सोनेरी फुलं मस्त वाऱ्यावर डोलत आहेत. आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत, म्हातारऱ्याने, आपल्या प्रेमळ हाताने फुलांना गोंजारले आणि खात्री केली. नेहमीप्रमाणे फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो? एका फुलाने उत्तर दिले, आम्ही, मस्त आहोत आजोबा, आता कसलीच काळजी नाही, इथे कुणी आम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही थकले असाल आजोबा, फार लांबचा प्रवास झाला न! जरा निवांत पडा, तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो. नंतर आपण निवांत बोलू, भरपूर वेळ आहे, आपल्याकडे. म्हाताऱ्याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते.

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

वटवट's picture

31 Jul 2014 - 10:50 am | वटवट

क्यारी??

एस's picture

31 Jul 2014 - 11:34 am | एस

क्यारी म्हणजे हिंदीत ताटवा.

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2014 - 10:52 am | प्रभाकर पेठकर

चांगली आहे कथा. आवडली.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 11:37 am | कवितानागेश

आवडली कथा.

एस's picture

31 Jul 2014 - 11:47 am | एस

पण मला ही कथा अजिबात समजली नाही. तुम्ही ज्या तरलतेने लिहिलंय त्या पातळीला पोहोचण्याचा प्रयत्न करून मग निवांतपणे वाचेन पुन्हा एकदा. सध्या वाचनखूण साठवलेली आहे.

शुचि's picture

31 Jul 2014 - 7:07 pm | शुचि

:( आवडली. टचिंग आहे.

मदनबाण's picture

31 Jul 2014 - 10:30 pm | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

काळजी करू नका. शेवटच्या पॅराग्राफपर्यंत पोहोचायला खूप खूप वर्षे आहेत अजून.

असेच लिहीत रहा !

आतिवास's picture

31 Jul 2014 - 10:28 pm | आतिवास

कथा आवडली.

psajid's picture

1 Aug 2014 - 12:00 pm | psajid

कथा आवडली.

सस्नेह's picture

2 Aug 2014 - 4:06 pm | सस्नेह

असं वाटतं

यशोधरा's picture

2 Aug 2014 - 8:25 pm | यशोधरा

इथे म्हंजे स्वर्गात का? लांबचा प्रवास वगैरे वाचून वाटते आहे तसे.