कस्टमर केअर - एक गंडवणे

धन्या's picture
धन्या in काथ्याकूट
29 Jul 2014 - 4:05 pm
गाभा: 

काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर."

फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला. मला ऑफीसरशी बोलण्यासाठी पैसे पडतील हे एक दाबून मान्य केल्यावर फोन लागला.

मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे.
कके वरची मुलगी: सर तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?

तिने माझं म्हणणं ऐकलंच नव्हतं सवयीने "तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?" असं विचारुन मोकळी झाली होती.

मी: (मनातल्या मनात, भवाने) मी सिम हरवला आहे म्हणतोय तर त्याच नंबरवरुन कसा बोलेन?
कके वरची मुलगी: सॉरी सर. पुन्हा सांगता का?
मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे.
कके वरची मुलगी: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी पोस्टपेडला ट्रान्स्फर करते. कृपया लाईनवर राहा.

बयेने मला लाईनवर राहायला सांगितले खरे मात्र तीन चार मिनिटे लाईनवर राहूनही कुणी उत्तर दिलंच नाही. मी वैतागून फोन कट केला आणि पुन्हा लावला. पुन्हा एकदा एक दाबा, दोन दाबाचे सोपस्कार पार पाडून मी त्यांच्या माणसापर्यंत पोहचलो. त्या मुलाला माझा प्रॉब्लेम सांगितला.

कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. पोस्टपेडसाठी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यावर कॉल करा.

त्य दादाने नंबर दिला. मी कॉल केला. पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरु झाले. मी ती दाबादाबी करत मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत पोहचलो. फोन अटेंड करणार्‍या मुलाला माझी समस्या सांगितली.

कके वरची मुलगा: सर आता आमच्या सिस्टीमचे अपग्रेडेशन चालू असल्यामुळे सिस्टीम डाऊन आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही नांव आणि नंबर देऊन ठेवा आणि दोन तासांनी फोन करा.

नांव आणि नंबर देऊन ठेवण्यापलिकडे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.

मी दोन तासांनी फोन केला. यावेळी थेट पोस्टपेडचा नंबर लावला. पुन्हा एक दाबा, दोन दाबाचा मंत्र सुरु झाला. मी स्टार सिक्सने मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत गेलो.

कके वरची मुलगा: सर तुम्ही याआधी चार वेळा कॉल केला होता. हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल.

मी पोस्टपेडवाला नंबरच डायल केला होता हे सांगायच्या आत त्याने फोन ठेवला. त्याने बहुतेक नुकतंच डॉ. रमा मराठेंचं "रंग सुखाचे" पुस्तक वाचलेलं असावं. साखर, किराणा मालाचे दुकान आणि पेट्रोल पंपाचे उदाहरण त्याच पुस्तकात आहे.

मी हताश, हतबल आणि हतबद्ध. त्याने फोन चालू ठेवला असता तर त्याच्या पुढच्या सात पीढयांना तो शिकवू शकेल इतकं मानसशास्त्राचे ज्ञान मी त्याला दिले असते. पण त्याने फोन फोन ठेवला होता. सिम ब्लॉक कारावाच लागणार होता त्यामुळे मी पुन्हा एकदा उरले सुरले अवसान गोळा करुन मी पुन्हा एकदा थेट पोस्टपेडचा नंबर डायल केला. दाबादाबीचे सोपस्कार पार पाडून मी हव्या त्या पर्यायाला गेलो.

कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी तुम्हाला पोस्टपेड डीपार्टमेंटचा नंबर देतो.

माझ्या सहनशक्तीचा अंत पाहीला जात होता. पण यावेळी मात्र मी "आलीया भोगाशी का घ्यावी माघार" म्हणून जे घडेल त्याला सामोरे जायचे ठरवले. तो मुलगा त्याचा "पोस्टपेड"चा नंबर सांगत होता. हा तोच नंबर होता जो पोस्टपेडचा थेट नंबर डायल करुन दाबादाबी करत मी त्याच्यापर्यंत पोहचलो होतो. लहानपणी मुखोद्गत असणारी घरातील सार्‍यांचा सत्कार करणारी सारी शब्दमौक्तिके त्याच्यावर उधळावीत अशी प्रचंड ईच्छा झाली होती. मात्र मला माझ्या ध्येयाप्रत जायचे असल्यामुळे मी तो मोह आवरला.

मी: मित्रा तू जो पोस्टपेडचा नंबर सांगितलास तोच नंबर डायल करुन तुझ्यापर्यंत आलोय.
कके वरची मुलगा: असं का? थांबा मी पाहतो. मी तुमचा डेटा चेक करेपर्यंत लाईनवर राहा. तुमचे नांव आणि ब्लॉक करायचा आहे तो नंबर सांगा.

मी त्याला नाव आणि नंबर सांगितला. त्याने माझा सिम ब्लॉक केला. मी डुप्लिकेट सिम मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते विचारुन घेतले.

कके वरची मुलगा: अजून आपली काय सेवा करु शकतो सर?
मी: झाली एव्हढी सेवा खुप झाली.
कके वरची मुलगा: धन्यवाद सर. आपला दिवस शुभ होवो.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

29 Jul 2014 - 4:15 pm | प्यारे१

अच्चा, असं जालं तर!

- स्प्यारे ;)

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2014 - 4:19 pm | पिलीयन रायडर

मी तर सरळ त्यांच्या ऑफिसला जाऊन सिम ब्लॉक करुन नवीन सिम घेतलं होतं.. पण एकंदरीत इअतर विविध कारणांसाठी मलाही अगदि अस्साच अनुभव आहे..
बिलामध्ये गडबड तर नेहमी करतात.. कितीही कंप्लेट टाकल्या तरी त्यावर कारवाई नाही.. म्हणुन मी आता मेल करते.. त्यात शेवटी "जोवर ही समस्या सुटत नाही तोवर बिल भरणार नाही..आधीच सांगते..आणि जास्त त्रास झाला तर ग्राहक कोर्टात जाईन" असा बोल्ड मध्ये लिहीते (मोबाईल ते गाडी.. सगळीकडे हा उपाय हमखास उपयोगी पडतो.. मेल करणे जास्त सोपे आहे..)

कामं नक्की होतात..

प्रचेतस's picture

29 Jul 2014 - 4:23 pm | प्रचेतस

प्रीपेड वापरणे हां उत्तम पर्याय. पोस्टपेड तसंहि लै महाग जातं.
बाकी आमचं परवाच आकाशवालीशी झालेलं बोलणं आठवून डोळे पाणावले.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2014 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा

@आकाशवालीशी झालेलं बोलणं>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

आगोबा नेहमीच्या दुष्ट शैलीत http://www.sherv.net/cm/emoticons/playful/pull-out-tongue-smiley-emoticon.gif बोलत होता! त्यातले एक वाक्यः- तुम्चं प्रॉडक्ट टुकार आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

किसन शिंदे's picture

29 Jul 2014 - 4:31 pm | किसन शिंदे

=)) =))

अशा प्रसंगी जेवढं शांत राहून काम करता येईल तेवढं बघायचं. फ्रस्ट्रेट होऊन आपणच आपली मनःशांती गमावून बसतो. समोर बोलणार्‍या मुलाला किंवा मुलीला त्याने काहीही फरक पडत नाही.

येप!! शक्य तितक्या शांत आवाजात एक-दोन शालजोडीतले हाणावेत. त्यांना कळले की नाही यापेक्षा आपण ते दिले याचं आपल्याला समाधान असतं.

नानासाहेब नेफळे's picture

29 Jul 2014 - 4:46 pm | नानासाहेब नेफळे

खात्रीने सांगतो, ही" एअरलेट" नावाची कंपनी असणार ,2G इंटरनेटची सेवा अशी देतात की ह्यांची.......
करावी वाटते.

धन्या's picture

29 Jul 2014 - 4:52 pm | धन्या

होय. एयरलेटच आहे.

किसन शिंदे's picture

29 Jul 2014 - 5:49 pm | किसन शिंदे

यरटेल नि आयड्यात काडीमात्रही फरक नाही.

थोडयाफार फरकाने सार्‍या सर्वीस प्रोव्हायडर्सची हीच कथा असणार आहे. प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याईतका वेळ आपल्याकडे नसतो. कस्टमर केअरमध्ये फोनवर बोलणारी मुलं निर्ढावलेली असतात. त्यांच्य स्वयंचलीत उत्तर प्रणालीत दाबादाबी करुनच ग्राहकाचे अर्धे त्राण निघून जाते. उरलेले त्राण ही कस्टमर केअरमधली मुले/मुली घालवतात.

"हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. :(

किसन शिंदे's picture

29 Jul 2014 - 6:06 pm | किसन शिंदे

सध्याचं काम करण्याचं ठिकाण तेच आहे, त्यामुळे हे असे अनुभव रोज येतात.

”अरे भोत बकबक कर रहा था, दिमागकी माभेन एक हुई." एखाद्या 'गरम' संवादानंतर हेडसेट काढून तो पोरगा बाजूच्या पोराला सांगत असतो.

काहीजण निर्ढावलेले काॅल म्युटवर टाकून तोंडावर रुमाल ठेऊन खूखू हसत असतात समोरच्याला चिडलेला पाहून. रोजच्या फ्लोर राऊंडला हे असं काही ना काही ऎकायला, बघायला मिळतंच.

प्यारे१'s picture

29 Jul 2014 - 6:06 pm | प्यारे१

>>>> "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला.

ग्राहकानं श्या घालू नयेत म्हणून केलेलं एक नाटक ते.
तुम्ही 'जास्त' बोलू नका, तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय अशी गर्भित धमकी.

आतिवास's picture

30 Jul 2014 - 11:42 am | आतिवास

"बाबा रे/बाई ग, तू याबद्दल काही करू शकत नाहीस, हे मला माहिती आहे. पण कॉल रेकॉर्ड होतो आहे म्हणजे सिनीअर मंडळी हा संवाद ऐकण्याची शक्यता आहे. मी आता पुढे जे बोलणार आहे, ते सिनीअर लोकांसाठी आहे, कृपया तू त्याला उत्तर देत बसू नकोस" असं म्हणून शांतपणे ऐकवते मी - अर्थात फक्त आपल्या मनाचं समाधान ;-)

ही" एअरलेट" नावाची कंपनी असणार

लेख वाचून हाच प्रतिसाद देणार होतो. सेम टू सेम अनुभव आले आहेत. १ दाबा...२ दाबा...प्रकरण जाम डोक्यात जातं.

नानासाहेब नेफळे's picture

29 Jul 2014 - 6:02 pm | नानासाहेब नेफळे

तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी नेटवर्क आहे, आमचा एशिया आणि आफ्रिक्येच्या १९ देशात कारोबार आहे ,एअरलेट निवड्याबद्दल आपला धन्यवाद....." एकाच वेळी कस्टमर आणि मराठी दोघांची करुन टाकतात...
रिसेप्शनिश्ट बाया तर फार म्हातार्या ठेवल्यात ,गेंगाण्या आवाजात' मागील मेन्युत परत जाण्यासाठी १दाबा, तिकडे जाऊन ५ दाबा, हे दाबा ते दाबा, फक्त दाबतच रहा... एकदा तर टोमणा मारायचा मोह झाला होता ,परंतु गाढव आडवा आला...
कस्टमर एक्झ्युकेटीवला फोन म्हणजे तर एक मोठाच व्याप असतो,लाईन जोडल्यानंतर आपला कॉल आम्ही रेकाँर्ड करत आहोत, हे आधी ऐकावे लागते.
मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो...
|ईति एअरलेट कथा सुफळसंपुर्ण|

मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

बॅटमॅन's picture

30 Jul 2014 - 2:49 pm | बॅटमॅन

नेफळेबुवा रॉक्स =)) =)) =)) =))

एक नंबर _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2014 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे यार ! धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता. बाकी, तुम्ही काहीही काम सांगा फक्त कष्ट्मर केअर वाल्यांशी बोलायला नका सांगू !

धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता.

तो फोन आहे सर. हापिसात क्यामेरावाला फोन वापरता येत नसल्यामुळे एक साधा फोन वापरत होतो तो हरवला. दु:ख एकाच गोष्टीचं त्या फोनमध्ये माझा प्रायमरी नंबरवाला सिम होता. दहा ठीकाणी रजिस्टर्ड केलेला. आता त्यांच्या गॅलरी किंवा तत्सम कार्यालयात जाऊन डुप्लिकेट सिम घ्यावे लागनार.

नगरीनिरंजन's picture

29 Jul 2014 - 5:00 pm | नगरीनिरंजन

फार हार्डवर्किंग आहात; शॅडोवर्कही चिकाटीने करता.

सुहास झेले's picture

29 Jul 2014 - 5:11 pm | सुहास झेले

हा हा हा .... सहानभूती ;-)

चौकटराजा's picture

29 Jul 2014 - 5:50 pm | चौकटराजा

लहानपणी आपला राग व्यक्त करायचं आमचं एक वाक्य होतं . " असे मला एक रायफल व पाच गॉळ्या दिल्या ना तर मी
अमुक अमुक ला उडवीन पयल्या छूट " असे ते वाक्य होते. भारतातील " शिक्षण" विषयातील तथाकथित तज्ञ , आपली निवडणूक पद्धतीचे निर्माते , व हे कॉल सेंटर वाले माझ्या हिटलिस्टवर त्या लहानपणीच्या वाक्याच्या धर्तीवर आहेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Jul 2014 - 6:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अशा वेळेला चार शिव्या घालून मोकळेे व्हावे. आपला राग व्हेंटआउट होतो.

किसन शिंदे's picture

29 Jul 2014 - 6:29 pm | किसन शिंदे

प्रतिसादाचा उपास सुटला समजायचा का हो विमे सर? :-)

सुहास झेले's picture

29 Jul 2014 - 10:16 pm | सुहास झेले

ऑ... ऐकावे ते नवलंच. हे कुठले व्रतवैकल्य आहे की काय किसनद्येवा ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Jul 2014 - 1:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

खरड केली आहे. बघुया किती दिवस राहते तुमच्या वहीत :-)

तुमचा अभिषेक's picture

29 Jul 2014 - 6:42 pm | तुमचा अभिषेक

सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल.

सहसा विनोदी वा आगाऊ कुठल्याही सदरात मोडणारी उत्तरे ते लोक देत नाहीत.

आणखी एक शंका (कोणीही दूर करा) - आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?

किसन शिंदे's picture

29 Jul 2014 - 6:47 pm | किसन शिंदे

फोन एकाच व्यक्तीकडे जात नाही. त्यावेळी जो मुलगा 'आॅन'काॅल नसेल त्याच्या सिस्टमवर जातो. काल फ्लो जास्त असेल तर वेटिंग ठेवतात.

आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?

"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते.

चौकटराजा's picture

29 Jul 2014 - 7:28 pm | चौकटराजा

"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते.
हे असं सातवाहनाच्या काळात नव्हतं ! एका शिळेवर एक कके आणि धवा यांचे पॅनेल आहे. त्यात धवा च्या चेहर्‍यावर
समाधान सपस्ट दिसते आहे.

सातवाहन काळातील गोष्टच वेगळी होती काका. तेव्हा कस्टमर केअरला दर्पण सुंदरी असायच्या. :)

प्रचेतस's picture

29 Jul 2014 - 7:44 pm | प्रचेतस

दर्पण सुंदरी ह्या सातवाहनकाळात नव्हे तर नंतरच्या राष्ट्रकूट, चालुक्य काळात सुरु झाल्या. =))

धन्या's picture

29 Jul 2014 - 7:46 pm | धन्या

नाही?

मग सातवाहनकालीन सुंदर्‍या नट्टापट्टा करताना चेहरा कशात पाहायच्या?

प्यारे१'s picture

29 Jul 2014 - 7:48 pm | प्यारे१

चाहनेवाले की आँखो में ;)

ती शिळा वीरगळ होती का गधेगाळ ओ काका?
नाय, समाधान दिसतंय म्हणून म्हणतो मी.

चौकटराजा's picture

29 Jul 2014 - 7:57 pm | चौकटराजा

शिळेत संदेश असा मिळत आहे की धवाने मोबाईल घेतला हे मोठे वीराचे लक्षण आहे असे शिल्पकाराला म्हणायचे आहे. व त्याने तो हरवला हा गधे पणा केला आहे असा शिल्पकाराचा निष्कर्ष आहे. शिल्पकार देखील आध्यात्म व व्यवहार यांची कशी मस्त सांगड शिल्पात त्याकाळी घालत असत पहा !

धन्या's picture

29 Jul 2014 - 7:59 pm | धन्या

प्रणाम घ्यावा काका. __/\__

प्रचेतस's picture

29 Jul 2014 - 8:02 pm | प्रचेतस

मग धवांच्या चेहर्‍यावर निर्विकार भावच हवेत ओ. समाधान का दिसतंय म्हणतो मी. =))

चौकटराजा's picture

29 Jul 2014 - 8:08 pm | चौकटराजा

आध्यात्माचे वैशिष्ट्य हे असते की सुखासीनते पासून अलग होतानाही काही चान चान दिसले की चर्येवर समाधान दिसते.
सातवाहनाच्या काळात व्हिडू फोन फोन होता. तिच्या दर्शनाने धवा यांच्या तील दार्शनिक जागा झाला. परिणाम समाधान !
अगदी सर्वार्थाने दिव्य अनुभव !

प्रचेतस's picture

29 Jul 2014 - 8:12 pm | प्रचेतस

अगागागागा _/\_

कवितानागेश's picture

30 Jul 2014 - 10:34 am | कवितानागेश

"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. >>
आपण सगळ्यात आधी ज्याच्याशे बोललो त्याचे नाव विचारुन ठेवायचं, लक्षात ठेवायचं आणि फोन त्याच्याकडेच ट्रान्सफर करा. माझं बोलणं झालय. 'अमुकामुक' माझाच प्रॉब्लेम सॉल्व करतोय' अशी माहिती आपण त्यांना द्यायची. ते फोन देतात. परत परत रामकहाणी सांगत बसावी लागत नाही. मी नेहमी हेच करते.

यशोधरा's picture

29 Jul 2014 - 6:46 pm | यशोधरा

अरेरे! एक फोन सांभाळता येत नाही तुम्हांला!

फोनचं कै नै हो तै. ती सारी मोहमाया आहे.
फक्त सिमचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तो ब्लॉक करण्यासाठी सारा खटाटोप. :)

यशोधरा's picture

29 Jul 2014 - 6:58 pm | यशोधरा

LOL! सिम नाही का मिथ्या?

सिमही आहेच मात्र ते जर "सत्य का ग्यान" न झालेल्या माणसाच्या हातात पडलं तर ते त्रासदायक ठरू शकते.

अहो मिथ्या वस्तू काय ग्यान करवून देणार? तुमचा (मिथ्या) भ्रम तर नाही? ;)

देशपांडे विनायक's picture

30 Jul 2014 - 10:38 am | देशपांडे विनायक

अस कस अस कस

MOBILE हरवलाय आणि खटाटोप चाललाय सिम BLOCK करण्याचा

आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी !

मी: मला अनवाँटेड नंबर वरून मेसेज येतायत
कके: मेसेज डिलिट करू नका
मी: ठिके, पुढे?
कके: मेसेज बाॅक्स फुल झाला की आपोआप मेसेज थांबतील, धन्यवाद !

वेल्लाभट's picture

29 Jul 2014 - 6:56 pm | वेल्लाभट

वेड लावतात हे कके वाले. त्यांच्या काही डोक्क्क्यात जाणा-या गोष्टी.

१ नेमकं बोलत नाहीत. पाल्हाळ लावतात
२ (गाईडलाईन्स नुसार) उसनी औपचारिकता आणून बोलतात. उदा: जी क्या मै अमूक जी से बात कर रहा हू? क्षमा चाहूंगा की आप को होल्ड पे रखा... जी क्या मै क्रिपया आपका मोबाईल नंबर जान सकता हूं? (सखाराम गटणे ची आठवण होते... म्हणव्वंसं वाटतं साल्या माणसासारखं बोल ना)
३ ठरल्याप्रमाणे प्रश्न विचारत जाताना लॉजिक सोडतात. वरील पोस्ट मध्लं उदाहरण. सिम हरवलंय; तर त्या नंबर वरून कसा बोलेल तो माणूस????
४ मराठी सिलेक्ट करूनही समोरचा माणूस हिंदीतच बोलतो. इथे मात्र मी फुल उतरवतो त्यांची. सोडत नाही. 'क्षमा चाहूंगा मै मराठी नही बात कर सकता' असंही म्हणायला लावलंय एकाला.
५ मुळात चालता बोलता कके वाला वाली लाभणं हेच दुर्मिळ असतं. औटोमेटेड व्हॉईस रिस्पॉन्स इज सो फ्रस्ट्रेटिंग

सामान्यनागरिक's picture

29 Jul 2014 - 9:39 pm | सामान्यनागरिक

ईंग्रजीच आंधळेपणाने मराठीकरण ( किंवाहिन्दीकरण)केल्यामुळे आपल्या हे असे संवाद ऐकावे लागतात. हे भाषांतर कोण अ करते हेशोधाअवे लागेल. या लोकांना हिन्दी किंवा मराठीचे जुजबी माहिती असणारे लोक मिळत नाहीत का?
शेवटी अश्या लोकांना सुधरवायला राज ठाकरे सारखे पार्श्वभागावर चटके देणारेच पाहिजेत.

या निमित्ताने एक अफलातून मराठी भाषांतर आठवले : विमा ही आग्रहाची वस्तू आहे.

म्हणजे काय ? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2014 - 1:20 am | डॉ सुहास म्हात्रे

विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. :)

vikramaditya's picture

29 Jul 2014 - 7:06 pm | vikramaditya

व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम आल्यापासुन कंपनीचे सगळे अधिकारी ह्या यंत्रणे मागे लपतात आणि पोपट्पंची करण्या-यांना पुढे ढाल म्हणुन वापरतात.

काही वेळा या सिस्टीमच्या मागे लपलेल्या माणसांपर्यंत पोहचता येत नाही.

उदा. तुम्हाला बिलातील तफावतीच्या संदर्भात विचारण्यासाठी ककेला फोन केलात तर ही पोपटपंची करणारी सिस्टीम तुम्हाला तुमच्या बिलाची देय रक्कम ऐकवून तुमची बोळवण करेल. अशा वेळी जाणून-बुजून बोलणार्‍या माणसांपर्यंत घेऊन जाणारा चुकीचा पर्याय निवडावा लागतो.

धमाल मुलगा's picture

29 Jul 2014 - 7:17 pm | धमाल मुलगा

तुझ्याबद्दलचा आदर दुणावला भावा. मोबाईल कंपन्यांनी चालवलेली कॉल सेंटर्स ही 'कस्टमर केअर' नसून 'कस्टमर टॉर्चर' आहेत असं माझं मत आहे.

फोन करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा इमेल टाकणं जास्त परवडतं. बरं, मेल केलेलं असल्यामुळं सिमचा गैरवापर झालाच तरी आपली जबाबदारी ती नाही. त्यांचे ते निस्तरतील. अशा भानगडीत पहिल्यांदा इमेल करणं आणि लगेच त्यांच्या दुकानात जाऊन समक्ष सिम ब्लॉक करणं हेच उत्तम. निदान डोक्याची मंडई तरी होत नाही.

रेवती's picture

29 Jul 2014 - 7:37 pm | रेवती

हम्म........ खरच वैताग! एकदा इथल्या एकानं असं केलं होतं पण जुनी गोष्ट असल्यानं फार्सं आठवत नाहीये. तुम्हीही काही दिवसांनी हे विसरून जाल. ;)

केअरफुली कस्टमरना गंडवलेलं का ह्या ककेवाल्यानं?

(जीव जाईस्तोवर कंठ दाबून धरणारा तो जीवश्च कण्ठश्च मित्र च्या चालीवर.)

हॅहॅहॅ... लयं जुने दिवस आठवुन राह्यले बघा ! त्ये काळी रिलायंन्सच कर दो दुनिया मुठ्ठी मे ची जायरात सारखी लागायची... त्ये काळी एका सरदारजीने त्यांच्या कॉलसेंटरला फोन करुन त्यांचा बाजार उठवल्याची ऑडियो फाइल लयं सर्क्युलेट झाली व्हती.
सगळ्यात जास्त त्रास कॉलसेंटर मधे काम करणार्‍या मुलींना होत असावा... त्यांना काय काय प्रश्न विचारले जातात याची फक्त कल्पना केलेलीच बरी !
बाकी तू-नळीवर अश्या { म्हणजे शिव्या-शाप देणार्‍या } व्हिडीयोज उपलब्ध आहे... आत्ताच एका गुज्जुच्या रिलायन्स प्रेमाचा व्हिडीयो ऐकुन आलो. ;)

जाता जाता :-
एक वेगळा कॉल...

आजची स्वाक्षरी :- Toxic { Britney Spears }

सुहास झेले's picture

29 Jul 2014 - 10:22 pm | सुहास झेले

हा हा हा ... अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया सपोर्टचे दिवस आठवले. हा कॉल ऐकून बघ ;-)

.
.

आवाज हाॅवी मँडेलचा वाटतोय जो अशा प्रकारचे प्रँक्स करण्यात पटाईत आहे... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2014 - 1:28 am | डॉ सुहास म्हात्रे

लय भारी ! जै महाराष्ट्र !!

तिमा's picture

29 Jul 2014 - 7:55 pm | तिमा

ह्या सगळ्या प्रकारांना कंटाळूनच मी त्यांचं प्रीपेड घेतलं. तेंव्हापासून त्यांच्याशी संपर्क आला नाही आणि बिल ही
कमी झालं.

संचित's picture

29 Jul 2014 - 8:04 pm | संचित

माझे पोस्ट्पेड सिम बंद करायचे होते तेव्हाही असाच त्रास झाला होता. शेवटी मी प्रयत्न करणे सोडुन दिले. ३ महिने मला त्याचे बिल येत रहिले. मी अधुन मधुन बंद करण्यासाठी call करत होतो. प्रत्येक वेळेला वैताग येऊन सोडून द्यायचो.
३ महिन्यांनी घरी कोर्टाची नोटीस आली, बिल भरण्यासाठी. शेवटी उगाच २ महिन्याचे बिल जास्त भरावे लागले. त्यासाठी परत customer care शी भांडलो. ते पैसे देण्यासाठी तयार झाले. ५-६ महिने झाले तरी अजून पर्यंत तो चेक घरी पोहोचला नाही.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jul 2014 - 8:26 pm | प्रभाकर पेठकर

कधी वापरलं नाही. परंतु, आपल्या हरवलेल्या भ्रमणध्वनीचं सिम कार्ड परस्पर ब्लॉक करणारी अ‍ॅप नेटवर मिळतात. आपला सर्व डेटासुद्धा घरबसल्या डिलीट करता येतो. (बॅकअप, वेळोवेळी, घेवून ठेवावा.) फक्त तो भ्रमण्ध्वनी आणि सिम कार्ड वापरात असावे लागते. एकदा जरी वापरताना दिसले तरी वरील उपाय करता येतात.
कस्टमर केअरच्या कचेरीतून सिम लॉक करण्याच्या लेखी अर्जावर त्यांची स्वाक्षरी घेऊन, त्याची प्रत आपल्या तक्रारीला जोडून, स्थानिक पोलीसात तक्रार देणं आणि अशी तक्रार केली असल्याची त्यांची पावती घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील कारवाई पोलीस खाते करते. पुढे ते सिम/भ्रमणध्वनी एखाद्या बेकायदेशीर कामात वापरला गेला (खंडणी धमक्या, बॉम्बस्फोट, स्मगलिंग, अश्लिल कॉल्स इ.इ.इ.) तरी आपण सुरक्षित असतो. पोलीस तक्रार जरूर जरूर करावी.

भाते's picture

29 Jul 2014 - 8:51 pm | भाते

मी ककेवाल्यांशी बोलताना इंग्रजी भाषा पर्याय निवडतो. कदाचित मी त्यांच्यापेक्षा चांगले इंग्रजी बोलू शकतो हा माझा (अति) आत्मविश्वास असावा. "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे.
एकदा ककेवाल्यांशी बोलुन काम झाले नाही तर सरळ मेलवर माझी समस्या लिहुन शेवटी ठळकपणे "जर पुढल्या २४ तासांत माझ्या शंकेचे निरसन झाले नाही तर "मी तुमच्या वरिष्ठांशी संपर्क करेन" (escalation)असे लिहितो." बहुतेक वेळा "आम्ही पुढल्या ७२ तासांत आम्ही तुमची समस्या सोडवू" असा प्रतिसाद येतो. पण शेवटचे वाक्य वाचल्यावर काही वेळातच (झक मारत) त्यांचा प्रतिसाद येतो.

मी तुमच्या वरिष्ठांशी संपर्क करेन" हे वाक्य ह्मखास कामास येत !

याहून भयानक टेक्निकल सपोर्ट वाले असतात. मला एकदा मायक्रोसोफ़्ट टेक्निकल सपोर्ट चा भयानक अनुभव आलेला आहे.

कोणत्या मायक्रोसोफ़्ट प्रोडक्ट टेक्निकल सपोर्ट सोबत भयानक अनुभव आला तुम्हाला ?

मायक्रोसोफ़्ट टेक्निकल सपोर्ट - विंडोज २००८ टर्मिनल सर्वर. केस समजावून सांगायला ३० मिनिटे लागायची. आणि हे प्रत्येक वेळेला करावे लागायचे. कारण प्रत्येक वेळेला नवीन माणूस फोन वर यायचा. एकूण आठ कॉल झाले. एक एक कॉल दोन तासांचा असायचा. एका कॉल मध्ये केस सोल्व होत नाहीच…….

हो आता असच म्हणायची वेळ आली कोणालाही फोन करा आधी जाहीरात ऐकावीच लागती !
एखाद्या यूनीनॉर यूज़र ला फोन लावला की यूनीनॉर ची एखादी स्कीम ऐकावी लागते आणि मग रिंग जाते.. ( भले आपला मोबाईल त्या कंपनीचा असो वा नसो/ आपल्याला किती ही तातडीचे काम असो ) आणि कहर म्हणजे आधी फक्त यूनीनॉर चे असे चाळे चालायचे आता या आठ दिवसात डोकोमो पण त्याच बघून शिकलाय..

तुषार काळभोर's picture

30 Jul 2014 - 5:34 pm | तुषार काळभोर

आमच्या कंपनीत सगळे कॉम्प्युटर लेनोव्होचे आहेत. एकदा एका लॅपटॉपच्या keys अडकत होत्या, म्हणून वॉरंटी रिपेअर/रिप्लेससाठी फोन केला. सगळा मामला ऐकवल्यावर, तो बहाद्दर मला बायस अपडेट करावी लागेल, असं सांगू लागला. त्याला सांगितलं, की हा हार्डवेअरचा इश्यु आहे. तर त्याचं उत्तर होतं " आय अंडरस्टँड, बट आय हॅव टू फॉलो द प्रोसिजर"

नाखु's picture

30 Jul 2014 - 5:54 pm | नाखु

"हवा शेपुट" वाले जास्तीच डोक्याची मंडई करतात.
अगदी त्यांच्या कस्ट्मर रिलेशन हाफिसात पण कस्ट्मर हा सगळ्यात दुर्लक्षीत प्राणी हाच अनुभव.

प्रभो's picture

30 Jul 2014 - 6:32 pm | प्रभो

ईमेल करवा ए उत्तम

धन्या's picture

30 Jul 2014 - 7:30 pm | धन्या

संध्याकाळी घरी गेल्यावर सविस्तर ईमेल केला. तासाभरात त्यांचे उत्तरही आले. इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन.

प्यारे१'s picture

30 Jul 2014 - 8:34 pm | प्यारे१

>>>>>> इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन.

गप की ए माणसा!
एक तर नको तिथं व्हिज्युअलायजेशन होतं आम्हाला नि त्यात ही असली वाक्यं???

धन्याच्या छापील उत्तराच्या प्रतीक्षेत. ;)

एअरलेटवाले प्रीपेड असले तरी पोष्टपेड करू का म्हणून सत्रादा पिडतात भो****चे. कष्टमर केअरला सांगून ब्लॉक केले पायजे.

सुबोध खरे's picture

30 Jul 2014 - 7:37 pm | सुबोध खरे

सगळे फोन वाले तसेच आहेत. उडदा माजी काळे गोरे.
फोन हरवल्यावर मी तडक त्यांच्या ग्यालरीत गेलो. सीम ब्लॉक करून लगेच दुसरे सिम कार्ड ५ मिनिटात घेऊन आलो ४९ रुपये भरून. कोणत्याही कस्टमर केर( !)ला फोन करण्यापेक्षा इमेल करावी. २४ तासांनी अपिलेट ओथोरीतीला त्याची कॉपी सकट मेल पाठवावी आणी अजून ४८ तासांनी मला पोर्ट आऊट करायचे आहे अशी मेल पाठवावी. बरेच कके वाले आपणहून फोन करून आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे.
गेल्या काही वर्षात मी तीन वेळेस पोर्ट आउट केले आहे. सुरुवातीचे एक वर्ष चांगले जाते. स्कीम मुळे फोन स्वस्त पडतो. महाग व्हयला लागला किंवा सेवा दर्जा खालावला कि दुसर्याकडे.
ज्या कंपनीची ग्यालरी जवळ आहे ती कंपनी स्वीकारा. हेलपाटे घालण्यात वेळ जात नाही.

एसमाळी's picture

30 Jul 2014 - 7:45 pm | एसमाळी

सगळ्यात भयानक
bsnl. अर्धा तास तर thanks for contact us एकु येते. नशिबात असल्यास कुणीतरी बोलत.

अत्रन्गि पाउस's picture

30 Jul 2014 - 9:43 pm | अत्रन्गि पाउस

वालीला स्वीडन ला रोमिंग चार्जेस विचारले तर तिने सुदानचे सांगायला सुरुवात केली...स्वीडन स्वीडन म्हटल्यावर म्हणाली कुठे आहे हे ....म्हटले युरोपात ...युरोप कुठल्या देशात ....अहो युरोप 'खंड' आहे अनेक देश आहेत युरोपात त्यातला एक स्वीडन...तुम्हाला यु के म्हणायचे आहे का?? ...अहो मला युरोपच म्हणायचे आहे ...पण मग सुदान युरोपातच आहे .. स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक....
कट केला शेवटी मि फोन भोग असतात हो शेवटी....

मधुरा देशपांडे's picture

30 Jul 2014 - 10:11 pm | मधुरा देशपांडे

सेम असाच अनुभव. बहुतेक एचडीएफसी बँक. मी पहिले जर्मनीतील संपर्क क्रमांक विचारला तर उत्तर मिळाले वेबसाइटवर आहे. घ्या. आता पहिले तिकडे न शोधता तुला कशाला फोन करेन ना मी. पण असो. मग म्हणाली की सिंगापुरचा आहे. सांगु का? म्हटले की अहो ताई, जर्मनी नसेल तर युरोपातला द्या. मग म्हणाली युएसचा आहे. शेवटी उत्तर मिळाले की मी देते सगळे. (चार देश) तुम्ही ट्राय करुन बघा तुम्हाला कुठ्ला हवा तो. मी पण फोन कट केला वैतागुन.

स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक....

हा हा हा...जबरीच.

आता कोणी विचारले की कुठे असतोस म्हणून तर मी पण "सुदान" ला असतो असेच सांगेन; तेव्हढच आपल्याला बोलायला सोप्पं आणि ऐकण्यार्‍याला सुद्धा. :)

बाप्पू's picture

30 Jul 2014 - 11:59 pm | बाप्पू

कस्टमर केअर च्या बाबतीत मला तरी वोडाफोन आणि त्यानंतर एअरटेल "बरे" वाट्तात.
बाकि आयडिया, रीलायन्स डोकोमो फारच भंगार आहेत या बाबतित.

देशपांडे विनायक's picture

31 Jul 2014 - 9:42 am | देशपांडे विनायक

शिंग मोडून घुसलो पण पस्तावा सुरु झाला

२९ मे २०१४ ला रुपये १५०००/- खर्च करून LENOVO MOBILE घेतला

निरनिराळी APP शिकत बसलो .

मराठीतून SMS करू लागलो

NET BANKING जमू लागले

संध्याकाळी हातात पेपर न घेता कुठे कोणता सिनेमा आहे हे सांगून बायकोकडून कौतुक

करून घेतले

पण आज सकाळी MOBILE चालू केला तर काहीच दिसेना

DISPLAY PROBLEM

AMAZON कडून MOBILE घेतला आहे

आणि आता वर आलेल्या प्रतिसादांचा अनुभव घेणे सुरु झाले आहे

हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ?

आपल्या उत्तराच्या अपेक्षेत आहे

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2014 - 10:47 am | प्रभाकर पेठकर

>>>>..... बायकोकडून कौतुक करून घेतले .....

>>>>हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ?

व्वा! ७२ वर्षांनी का होईना, जमलं तुम्हाला....अभिनंदन.

रेवती's picture

31 Jul 2014 - 7:12 pm | रेवती

भारी. :)

पंधरा हजाराचा फोन वाया गेला ही भावना मनाला सतावणारी नसेल तर असे अनुभव नाही घेतलेत तरी चालण्यासारखे आहे. :)

हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ?
सहमत. हे अनुभव आता घ्यायला लागू नयेत. यासाठी डॉ. खरे म्हणतात ते पटले. जवळचे दुकन शोधल्यास तिथे जाणे सोपे पडेल. त्याच्यासमोर फोन ठेवून काय झालय ते बघ रे बाबा म्हणाता येतं. फक्त तो मनुष्य फसवणारा निघू नये म्हणजे झालं.

बाप्पू's picture

31 Jul 2014 - 6:24 pm | बाप्पू

युनिनौर इतके बंडल छाप नेटवर्क कोणत्याही इतर कंपनीचे नसेल....... साल्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहावी असे वाटते ...

आपण कोणत्याही युनिनौर नंबर ला फोन करा..

(बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक)
"अब युनिनौर के XX रुपये के रेचार्ज पार पायीये XXXX एस टी डी आणि लोकल मिनिट्स फ्री. "

टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..
टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..

(पुन्हा एकदा बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक)
द नंबर यु आर ट्रएंग टू रिच इज आउट ऑफ कवरेज एरिया प्लीज ट्राय लेटर.....
Now get unlimited local uninor calls free on a recharge of XX
अब पयिए अन लिमिटेड लोकल युनिनौर कौल बिलकुल फ्री सिर्फ XX के रेचार्ज पर पुरे XX दिनो के लिये.

साले हराम** *****.. ******
एक तर फोनला कवरेज देत नाही वर आणि इतर लोकांना एवढा वेळ तुमची जाहिरात आणि ते सुगम संगीत ऐकवताय काय..??? जहिरात आणि ते टुक.. टुक ऐकण्याच्या गोंधळात आपणा जवळपास २-३ मिनटे गमावून बसलेलो असतो...

देशपांडे विनायक's picture

31 Jul 2014 - 6:31 pm | देशपांडे विनायक

जुन्या पिढीला नवी पिढी वाया गेली असे वाटण्याचे हे एक कारण आहे

वाया घालवण्याचे त्यांना सोयर सुतकच नसते

पैसा's picture

31 Jul 2014 - 10:25 pm | पैसा

एअरटेल आणि टाटा इंडिकॉमवाल्यांशी भांडून डोक्याचे केस पांढरे झालेत. परवा फोन शिफ्टिंग करताना आपल्या बीयश्नेल चा अनुभव.

शिफ्टिंगचा अर्ज दिल्यावर साहेबाने सांगितलं तुमचा फोन लगेच कट करतो. पण नवीन जागेत शिफ्ट करायचं काम लाईनमन करणार. त्याचा नंबर देतो त्याच्याशी बोला.

त्याला फोन केला तर सुरुवातीला २/३ वेळा त्याने घेतला. आता पावसामुळे कंप्लेंट्स खूप आहेत. तुमच्या घराजवळपास आलो की करून टाकतो म्हणाला. नंतर त्याचा फोन सतत आव्टाप्कवरेजेरिया. साहेबाला फोन केला तर तो सांगतोय, मी त्याला आठवण करतोच आहे.

८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. तिथून थेट घरापर्यंत वायर होतीच आधीची. मात्र तिला जोडकाम आहे. बदलून टाकूया म्हणून गेला तो गेलाच. परत ८ दिवस गायब. एका भलत्याच नंबरावरून फोन केल्यावर सापडला. आणि हलकट सांगतो काय, वायर संपलीय. लगेच त्याच्या साहेबाला फोन करून विचारले, सगळ्या बीयसएनेलातल्या वायरी संपल्या काय? तो म्हणे, आमचं काम हे असंच चालतंय. तुम्हाला घाई असली तर नंबर सरेंडर करा आणि टाटाकडे जावा. मेल्याने हे सुरुवातीलाच सांगितलं असतं तर आधीच टाटा फोटॉन घेतलं नसतं का?

मग माझं डॉकं सटकलं. नवर्‍याला म्हटलं कोण ऑफिस इन चार्ज इंजिनिअर असेल त्याच्या डोक्यावर जाऊन बसूया चल. बीएसएनेलाच्या हापिसाच्या गेटात पोचलो तर हा लाईनमन धावत आला. "ओ, ही बघा वायर. तुमच्या घरीच निघालोय. चला" म्हणे. आम्ही त्याच्या पाठोपाठ आलो, तर हा पुन्हा नाहीसा. शेवट शनिवारी दुपारी ४.३० ला फोन चालू झाला. इंटरनेट सोमवारी म्हणे. ते त्या दिवशीही नाहीच झालं. ईदीची सुटी झाली आणि मग काल एकदाचं ब्रॉडबँड सुरू झालं. १५ तारखेला अर्ज दिल्यावर काल ३० ला फोन नीट सुरू झाला. तेही सतत पाठपुरावा करून.

आता कानाला खडा. पुन्हा घर हलवताना लँडलाईन फोन सरेंडर करून टाकणार. ३जी महाग पडलं तरी चालेल. अर्थात त्यांचे नेटवर्क मिळाले पाहिजे ही अट आहेच. आणि सध्यातरी आयडिया सोडता कोणाचेच नेटवर्क धड नाहीये. पण मिपावर यायचं तर दुसरा काही इलाज नाही! *dash1*

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

@८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. >>> *lol* अत्यंत वैट्ट खपल्या गेलो आहे! *lol* पैसा ताई लाईनमनच्या मागे जसे..आंम्ही वावरात चतुर पकडायला गवताचे झाडू घेऊन मागे पळायचो..तसं पळातानाचं चित्र आलं =))

लाईनमन:- अहो..थांबा थांबा..आलोच २ दिवसात

पैसाताई:- थांब..मेल्या..थांब..हुट हुट..आता सापडला! =)) खांबावर चढून बसतोस काय!? =))

पैसा's picture

31 Jul 2014 - 11:21 pm | पैसा

देवाशप्पथ! तो एक पाय कंपाउंड वॉलवर आणि एक पाय खांबाला टेकवून असा हुच्च स्थानावरून आमच्याशी बातचीत करत होता, म्हणून सुरक्षित अंतरावर होता! =))

धन्या's picture

1 Aug 2014 - 12:03 am | धन्या

आव्टाप्कवरेजेरिया

बर्मग्ठीव्काला भाऊ सापडला. :)

बाकी तुमची बीयेशेनेल जोडनी बदलाची चित्तरकथा जबराच. फोनाफोनी करुन तुम्हाला जोडनी करुन अजून एखादा महिना घालवला असता त्यांनी. प्रत्यक्ष कार्यालयात गेलात हे बरे केलेत.

पैसा's picture

1 Aug 2014 - 10:01 am | पैसा

<<बर्मग्ठीव्काला<<

हे त्यातलंच आहे भौतेक!

बहुगुणी's picture

1 Aug 2014 - 2:26 am | बहुगुणी

अरेरे, काय करावं इंटरनेटा
धावाधाव लाईनमनच्या पाठी
किती जीवाचा आटापिटा
एका मिपावर येण्यासाठी ;-)

पैसा's picture

1 Aug 2014 - 10:02 am | पैसा

भारी कविता!

छ्या... तुम्ही जून्या पीढीतील लोकं कशालाही कविता म्हणता. ही तर चारोळी होती.
इतका साधेपणा दाखवलात तर ककेवाले तुम्हाला आरामात गुंडाळतील. :)

खबो जाप's picture

1 Aug 2014 - 11:08 pm | खबो जाप

ह्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकदा कॉल करणे आणि जे झाले त्याचा एक निबंध लिहिणे आणि साईट वर contact us नावाचे पेज असते त्यावर जे काही इमेल असतील (ह्यात बर्याच वरिष्ठ लोकांचे मेल मिळतात) त्या सगळ्या इमेल वर पाठवणे, आणखी एक करणे त्या कंपनी चे ज्या काही सोशल साईट असतील तिकडे कॉपी पेस्ट करणे एवढ सगळ करायला ज्यास्तीत ज्यास्त १०-१५ मिनटे लागतात २ तासात स्वत कॉल करतात; काम झालंच म्हणून समजा
उदाहरणार्थ
मी केलेला उपाय
खालील निबंध जेट एअरवे च्या सगळ्या मेल वर(http://www.jetairways.com/EN/IN/AboutUs/CorporateCommunications.aspx) आणि फेसबुक पेज वर टाकला २ तासात स्वत कॉल;सगळे पैसे परत; वर आणि दहा वेळा सॉरी आणि आम्हाला सोडून जावू नका न गडे चा मेल *biggrin*
"How and why Jet Airways is in profit? my experience.......
Hi Team,

I (jet privilege #XXXXX booked ticket for round trip from Singapore to Mumbai onward and return (Ticket # XXXXX PNR XXXXX attached herewith).
In ticket passengers name I misspelled my wife name as ACBDF instead ABCDF .
I called customer care for correction in name and agent said there is no way for correction and I need to cancel the ticket and re book again.
I cancelled it, (refund receipt attached)
But while re booking I got error message that same information is already in system (screen shot below and attached) and I was not able to book it again.
Once again I called customer care and told whole story, but surprisingly agent said that there was no need to cancel the ticket
and he can correct spelling mistake; he transferred my called to another senior level agent who was ready to correct spelling mistake and once I told that I already cancelled the ticket, He immediately took round-turn and said information from first agent is connect and
he can not change name. Due to this I lost around 470 SGD in the booking and more importantly I lost faith in Jet Airways as an professional service.
Please check and revert where it went wrong. So that I can continue to travel with your service.

Today morning I called again for same error, your agent is saying we can not help for this and you need to write mail to clear the error.
When I asked system should clear the information automatically; he replied there is no way to clear and if you wish to travel by jet airways you must need to send mail to info@jetairlines.com (which is wrong email id correct one is info@jetairways.com). and wait for 24 Hrs.
I told that I already sent mail after getting this error 2 times (ह्याला खोटेपणा म्हणत नाहीत *biggrin* ), but still I did not received replay and if I need to wait for 24 Hrs again, it may happen that flight will get book fully, his reply is if you want send a mail or you can opt for other airline service.

I am afraid next booking will be last booking with Jet Airways which I am doing unwillingly because I have done my booking and need to do my wife's booking in same flight."

एसमाळी's picture

2 Aug 2014 - 7:24 pm | एसमाळी

शंभरीकडे ढकलत आहे.

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 9:08 pm | प्यारे१

आणि हा गोल!