आज ती अनाथ होती.....

निश's picture
निश in जे न देखे रवी...
29 Jul 2014 - 12:17 pm

पाहुन घटना ती ही मी ही सुन्न होई.
ऐक भुकेल पोर भाकरीसाठी श्वानाशीही झगडा घेई.

माय होती बाजुस त्याच्या ती ही धाय मोकलुन रडी.
पोराची भुकेची तडफड त्या माउलीस सहन न होई.

गेल्या सालामध्ये ती भरल्या घरची मालकीण होती.
शेतात सोन पिकवणार्‍या शेतकरी राजाची राणी होती.

अचानक दैवाने सुखी संसारात दुष्काळाच विष कालवल
उभ्या शेतातल पिक पाण्याविना शेतात करपल.

धन्यानेही खचुन जाउन धनीपण संपवल.
आयुष्य संपवल त्याने, पण बायको लेकरास जन्मभर रडवल.

सगेसोयरानीही मग पाठ फिरवली.
सावकारानेही मग घरावर जप्ती आणली.

भरल्या घराची अशी आता राखरांगोळी झाली.
लेकरासंगे तिने मग शहरात रस्त्याकडेला चुल मांडली.

आज तिच माय धाय मोकलुन रडत होती.
लेकरास मात्र श्वानदंशाचीही भिती नव्हती.

पोटाची भुक वेदनेपेक्षा मोठी होती.
देवानेही आज त्यांच्याकडे फिरवली पाठ होती.

शेतकरी माय असुनही आज ती
ह्या जगात अनाथ होती.
ह्या जगात अनाथ होती.

कविता

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

29 Jul 2014 - 12:30 pm | वेल्लाभट

आशय चांगला आहे; पण रचना.... मुक्तछंद असेल तर हरकत नाही

कविता१९७८'s picture

29 Jul 2014 - 12:34 pm | कविता१९७८

आवड्ली

कविता१९७८'s picture

29 Jul 2014 - 12:34 pm | कविता१९७८

आवड्ली

प्रचेतस's picture

29 Jul 2014 - 6:01 pm | प्रचेतस

अंतर्मन हेलावून टाकणारी कविता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jul 2014 - 9:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली.

ऐक भुकेल पोर भाकरीसाठी श्वानाशीही झगडा घेई

:(

ह भ प's picture

30 Jul 2014 - 11:12 am | ह भ प

चांगला आशय.. आवडली..

तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार

धन्या's picture

1 Aug 2014 - 8:02 pm | धन्या

कवितेचा आशय चांगला आहे. काहीसा मन हेलावणारा. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरीत्र आणि त्यावर बनवलेला चित्रपट यांची आठवण झाली.

पण रचना पार गंडली आहे. "रडी" हा शब्द रडणे या क्रियापदाचे नेमके कुठले रुप आहे हा प्रश्न पडला आहे.

- धनुर्हीत