विडंबन - धोबिचा कुत्रा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
26 Jul 2014 - 9:03 am

बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.

गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.

घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.

घर का ना घाट का
धोबिच्या कुत्र्या सारखा
भुंकत-भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.

विडंबन

प्रतिक्रिया

तिमा's picture

26 Jul 2014 - 11:03 am | तिमा

यांत तुम्ही ज्याला 'रावण' म्हटले आहे त्याचे समर्थक येतील हो तुमच्यावर चालून!

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jul 2014 - 3:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

कस्लं भारीय.....पहीले मला वाटलं की न जमलेली कविता आहे.पण तिमांचा प्रतिसाद बघुन ट्युब पेटली

वाईची लैच वाईट अवस्था झालीया!

प्यारे१'s picture

28 Jul 2014 - 8:21 pm | प्यारे१

>>> वाईची

???

आमच्या गावाचं नाव आलं म्हणून जरा प्रश्ण पडला.

एसमाळी's picture

28 Jul 2014 - 8:29 pm | एसमाळी

नारायण(राणे) नारायण(राणे)

ते असं लिहायचं असतं : नारायण(राणे)नारायण(राणे)

येथे तिमा ह्यांनी बघा काय सल्ला दिला आहे? :)