रस्ता - रस्सा

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
24 Jul 2014 - 9:15 pm
गाभा: 

दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले ..
काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ...
आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य ..
तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिकसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही"
तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे)

(प्रोक्षण - प्रक्षोण)
Continental - Contentinental

असो

प्रतिक्रिया

एक डॉक्टर बरं का डॉक्टर बोलायचे - काही नाही थोडा वीकनेसपणा आलाय =))

अत्रन्गि पाउस's picture

24 Jul 2014 - 9:26 pm | अत्रन्गि पाउस

*biggrin*

प्यारे१'s picture

24 Jul 2014 - 9:53 pm | प्यारे१

१. व्हाया चिपळूण मार्गे!
२. अबोव्ह देणे. (बोलणार्‍याचा तकिया कलाम)
३. वरलोड झालं. (जेवल्यावर एका अशिक्षित काकूचा वाक्प्रचार)
४. एक लेडीज बाई आहेत.

पक्या's picture

24 Jul 2014 - 10:16 pm | पक्या

डुलकी - डुकली /डुकला , लायटिंग -लाईट्निंग , इलाज - विलाज,

चिकटणे - चिटकणे , ताटली - थाटली , मॉडर्न - मॉर्डन , चपला - चपल्या

कवितानागेश's picture

24 Jul 2014 - 10:39 pm | कवितानागेश

बादली की बालदी?

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 10:54 pm | प्रसाद गोडबोले

अंतरंगी पाऊस की अन्त्रन्गी पाऊस ?

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 10:41 am | अत्रन्गि पाउस

अंतरंगी नाही हो
*pardon*

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 10:46 am | प्रसाद गोडबोले

अत्रन्गि हा शब्द रॉर्म्बर्टं इतकाच अवघड आहे म्हणायचे तर =))

तुमचा अभिषेक's picture

24 Jul 2014 - 11:01 pm | तुमचा अभिषेक

नेहमी गोंधळ उडतोच ..

तरी बरे मी सिविल ईंजिनीअर आहे.. ;)

भिंगरी's picture

24 Jul 2014 - 11:12 pm | भिंगरी

काचेच्या ग्लासात सरबत दे
दप्तर्-दक्तर

रमेश आठवले's picture

25 Jul 2014 - 1:30 am | रमेश आठवले

मराठी मालिकात हे शब्द बरेच वेळा वापरले जातात-
दवाखान्यात admit (admitted ) आहे.
मी panic ( panicky ) झाले.
गुजराथी दुकानात बरेच वेळा फ़िक्ष (fixed) किमत असे बोर्ड लावलेले सापडतात

असंका's picture

25 Jul 2014 - 4:01 pm | असंका

१. दवाखान्यात अ‍ॅडमिट(अ‍ॅडमिटेड) आहे. मराठीत बोलतानासुद्धा ed लावायला पाहिजे?

२. मी पॅनिक(पॅनिकी) झाले (/झालो) . मराठीत बोलताना कशासाठी विशेषणाचे इंग्रजी व्याकरणाचे नियम लागू करायचे?

उलट असे दुसर्‍या भाषेचे नियम पाळणे म्ह्णजे जास्त हास्यास्पद होइल.उदा. फोन चार्ज झाला - फोन चार्ज्ड झाला.

रमेश आठवले's picture

25 Jul 2014 - 10:00 pm | रमेश आठवले

मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्या असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.

रमेश आठवले's picture

25 Jul 2014 - 10:06 pm | रमेश आठवले

मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्यावा असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.

धाग्याचा विषय आपल्या मते काय आहे? आपण बहुधा "इंग्रजी शब्दांचा चुकीचा वापर" ह्या धाग्याबद्द्ल बोलत आहात!

कारण ह्या धाग्याचा विषय प्रचलित शब्द वेगळ्या पद्धतीने वापरणे असा आहे. अ‍ॅडमिट होणे, पॅनिक होणे हे शब्द मी अ‍ॅडमिट्टेड होणे, पॅनिकी होणे यांच्यापेक्षा जास्त वेळा ऐकले आहेत. माझ्यादृष्टीने, अ‍ॅडमिट ऐवजी अ‍ॅडमिटेड आणि पॅनिक ऐवजी पॅनिकी असं म्हणणं प्रचलित शब्दांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरणं होइल.

रमेश आठवले's picture

25 Jul 2014 - 1:34 am | रमेश आठवले

चिटकवले की चिकटवले

बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो
रिवर्ट साठी "रिवर्ट back"
नुकसान = नुसकान
विदर्भातले मित्र पडला च्या ऐवजी पल्डा बोलतात

अगोचर's picture

26 Jul 2014 - 2:25 am | अगोचर

बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो

ते व्याकरणच्याच नियमाप्रमाणे आहे असे वाटते ... "अ" हे एक मात्रेचे अक्षर असले तरी ते "भ्या" ह्या जोडाक्षराच्या आधी आल्यामुळे त्याला २ मात्रांइतका भर दिला जातो उदा. "पुण्य" मधला "पु". पण उच्चाराचा हा नियमही मोडला जातो (उदा पुण्याला जाताना )

टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया तसा उच्चारू देत पण आमचे बाबा टारजेटच म्हणतात.
पचडीतील च हे अक्षर चहाटळ या शब्दात जसे उच्चारले जाते तसे म्हणण्याऐवजी चहामधील चचा उच्चार माझे मामा करतात.
आई बाबा असे म्हणायला शिकवले तरी आमचा मुलगा ऐ बाबा असेच म्हणतो.

बॅटमॅन's picture

29 Jul 2014 - 5:30 pm | बॅटमॅन

या शब्दाचा उच्चार करताना तेलुगुभाषिक चहावाला चच उच्चारतात. कन्नड किंवा इन जण्रल दाक्षिणात्य ब्याकग्रौंड असल्यास तसे साहजिक आहे.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 10:45 am | अत्रन्गि पाउस

आणि आता पाटी (पाठी) येऊ नाका फुडेच (पुढेच) जा

मुक्त विहारि's picture

25 Jul 2014 - 12:04 pm | मुक्त विहारि

माझ्या डोक्यात हेडेक सुरु झाले...

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी

अष्ट्याहत्तर !

काही खानदानी चित्पावन मंडळी "असं कराचं नाही", "नीट जेवाचं", अंथरूण खाली घालाचं", "वाईट बोलाचं नाही" अशी वाक्ये उच्चारतात.

खटपट्या's picture

25 Jul 2014 - 1:03 pm | खटपट्या

चव्वेचाळीस की चवरेचाळीस ?
एकोणीस की एकोणावीस ?

काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते

होय अगदी खरे आहे! आपलेच पहा ना- सामान्यपणे लोक 'अर्थ लक्षात येतो नाही' असं नाही म्हणणार-'अर्थ लक्षात येत नाही' असे म्हणतील.

का आपण आपलाच मुद्दा स्पष्ट करायला असं थोडंसं विचित्र लिहिलं आहे? अर्थ कळला. पण खरंच डोळ्याला फार खटकले...

त्या प्रसिद्ध "...eats shoots and leaves" सारखाच हा घोळ आहे. ;-)

"...अर्थ लक्षात येतो, नाही असे नाही..."
हो ना? :-)

खरंच की!! हे नव्हतं लक्षात आलं. तुम्ही म्हणताय ती दुरुस्ती केल्यावर मग ते वाक्य ठिक दिसतंय..!!

आणि हे eats shoots leaves म्हणजे ते पुस्तक इतरांच्या शुद्धलेखन/व्याकरणावर टिका करत असताना, त्यातच काही चुका निघाल्या त्याबद्दल बोलताय का आपण(-गूगल वर कळलं- नाहितर असं काही पुस्तक आहे हेही मला अत्तापर्यंत माहित नव्हतं?)

नाही हो. हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. स्वल्पविराम किंवा तत्सम व्याकरण चुकल्यावर होणारी गल्लत त्या पुस्तकात छान मांडली आहे.

पांडा हा प्राणी झाडांची पाने व कोवळे कोंभ खातो असे ध्वनित होण्याऐवजी काहीतरी वेगळेच (पांडा खातो, ... आणि जातो) होऊन बसते. :-)

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 2:59 pm | अत्रन्गि पाउस

क्षमस्व ! :)

लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून चार वाक्य लिहून धागा काढलात. त्यात तीन चूका?-

१. (हे वरती आधीच चघळून झालंय.)

२. दुसर्‍या लिहायच्या ऐवजी दुसर्या

३. "कितीही वेळा सांगितले तरी उपयोग शून्य" ऐवजी "कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य" (तरी/तर)

एस's picture

25 Jul 2014 - 3:54 pm | एस

;-)

धन्यवाद. हे माझं चुकत होतं हेच मला माहित नव्हतं.

नित्य नुतन's picture

25 Jul 2014 - 1:54 pm | नित्य नुतन

आजच चेपू वर एका तरुण मुलाच्या निधनाची बातमी होती फोटूसकट आणि वर लिहिले होते ....
अंतकरणात विलीन ....
वाचल्यानंतर ५ मिनिटे मूळ शब्द काय आहे हे आठवण्यात गेली...

पिलीयन रायडर's picture

25 Jul 2014 - 2:09 pm | पिलीयन रायडर

- "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज मध्ये पहिल्यांदा वाचला तेव्हा पासुन डोक्यात "डायफ्रॅगम" (diaphragm) असाच बसला आहे..
- तसंच काही लोक "तू माझ्यासाठी हे करशील का?" मध्ये "का?" गाळुन टाकतात, आणि नुसतंच "माझ्यासाठी हे करशील" अशी आज्ञा सोडतात..
- "ला" वगैरे प्रत्यय जोडताना शेवट आकारान्त करत नाहीत.. हिंदीसारखं नुसतंच शब्दाला प्रत्यय जोडतात.. (कोपरला लागलं टाईप)
- माणसं "भेटतात", वस्तु "मिळतात"...
- मी "आली", "गेली"....
- आव्हान - आवाहन
- हजारो आहेत अशी उदाहरणं.. किती लिहीणार...

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 3:03 pm | अत्रन्गि पाउस

रेमंड मिल्स मध्ये असतांना विशिष्ट कापड शोधतांना 'क्वालिटी भेटली शेड भेटायची आहे' हे नेहेमीचे वाक्य अगदी पहिल्यांदा ऐकले तेव्हा आम्ही आयटी वाले हसून हसून कोल्माडायचे बाकी होतो.. *lol*

धन्या's picture

29 Jul 2014 - 5:36 pm | धन्या

दक्षिण रायगड आणि उत्तर रत्नागिरीमध्ये बोलल्या जाणार्‍या मराठी बोलीभाषेत "भेटणे" हा शब्द "मिळणे" किंवा "सापडणे" अशा अर्थीही वापरला जातो.

उदा. काल माजा मोबायील सांडला*. कदीपस्ना सॉदताय पन आजून भेटत नाय.

* इथे हरवला अशा अर्थी. तथाकथित प्रमाण मराठी या शब्दाचा अर्थ लवंडणे, उलटणे असा होतो.

हरवलेली वस्तू "गावत नाय/गवसत" नाय असेही म्हणतात
आणि सापडल्यावर "गावली/गवसली"

"गवसणे" म्हणजे भुताने पछाडणे किंवा भारणे अशा अर्थानेही वापरतात

सूड's picture

25 Jul 2014 - 2:31 pm | सूड

'मी त्याला/तिला as a friend म्हणून सांगितलं'...

सुख्खे कपडे, काश असं झालं असतं..

काचेच्या ग्लासात सरबत दे>>> यात काय चुकीचं आहे?? *aggressive* ग्लास प्लॅस्टीकचा, थर्माकोलचाही असू शकतो.

ट्रॉफिक, 'तुमची' मदत करू का?, एमटीनलची लाईन 'व्यस्त' आहे असे चुकीचे शब्द/ वाक्प्रचार मराठीत सर्रास रुळू लागले आहेत.

काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत. मलाही त्यात काय चूक आहे नाही कळलं. त्यांना बहुतेक काचेचा पेला अपेक्षित असेल.

पण " 'तुमची' मदत करू का?" यात काय चूक आहे, ते नाही कळलं?

बाळ सप्रे's picture

25 Jul 2014 - 4:08 pm | बाळ सप्रे

तुम्हाला मदत करु का? असं म्हणतात..
तुमची मदत करु का ? हा हिंदीचा प्रभाव.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Jul 2014 - 3:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

खिसा=खिचा
पश्चिम=पच्चिम,पच्छिम
रबर=रबड,लबड

शंभरातले नव्वद गॅरेजवाले "ऑटो" ऐवजी "अ‍ॅटो" लिहितात..

पंचत्वात विलीन ऐवजी पंचतत्वात विलीन.
मानस सरोवराचं मानसरोवर.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 3:50 pm | अत्रन्गि पाउस

पंचत्व हे बरोबर ???
मला असे वाटायचे कि पंचतत्वात म्हणजे (पंच महाभूतात ह्या अर्थी) विलीन ....
*crazy*

पंचतत्वात हा शब्दच योग्य आहे. पंचत्व = याचा अर्थ वेगळा होतो.

बाळ सप्रे's picture

25 Jul 2014 - 4:20 pm | बाळ सप्रे

स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व याप्रमाणे पंचत्व..
जीवाचे पंचमहाभूतापासून निर्मिलेले असणे म्हणजेच त्याचे पंचत्व.

पंचतत्व या शब्दाशी अर्थाने व उच्चाराने साधर्म्य अगदीच अयोग्यही नव्हे पण व्याकरणासंबंधी पुस्तकातून 'पंचत्वात' असाच शब्द्प्रयोग ऐकलाय..

आपला पंचत्वाचा वेगळा अर्थ ऐकण्यास उत्सुक आहे..

असंका's picture

25 Jul 2014 - 4:30 pm | असंका

वा गो आपटे आणि ह अ भावे यांच्या विस्तारीत शब्दरत्नाकरानुसार-

पंचतत्वे= पाच मुख्य तत्त्वे- पंचमहाभूते.

पंचत्व= देहातील पाच तत्त्वे निरनिराळी होणे. मरण.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 4:35 pm | अत्रन्गि पाउस

वादे वादे जायते तत्वबोध: म्हणतात ते हे असे....
चला ....आणि आता तुमच्या डोक्याचा हेडेक गेलेला दिसतोय...

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 4:39 pm | अत्रन्गि पाउस

अमुक एक ठिकाण कुठे आहे असे विचारल्यावर पत्ता सांगितला तो असा (काल्पनिक)

हे SSSS इथून असे सरळ जा स्ट्रेट, पुढे एक गोलाकार सर्कल लागेल, त्याच्या सेंटरला मध्यभागी जो पुतळा आहे त्याच्या पाठीच्या मागून लेफ्टला डावी कडे वळा आणि रस्त्याच्या शेवटी एंड आहे तिथे हे ठिकाण आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jul 2014 - 3:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुण्यात अजुन एक डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे पत्ता सांगताना "ईथुन वर जा" "तिथुन खाली जा" असे सांगतात....आयला सांगणार्‍यालाच "वर" पाठवावेसे वाटते.अरे सरळ सांगा ना इथुन डावीकडे/उजवीकडे,अमुक चौकाकडे वगैरे

अन्या दातार's picture

29 Jul 2014 - 4:04 pm | अन्या दातार

आणखी एक प्रकारः
जागा: कोणताही पीएमटी स्टॉप.
अमुक अमुकला जाणारी बस कधी आहे असे विचारले की स्ट्यँडर्ड उत्तर - आत्ताच गेली.
&^%$#*(()&^%#%%^ आता गेलेली बस मी काय पळत जाऊन पकडू का? पुढच्या बसचं सांग की *****

खटपट्या's picture

15 Aug 2014 - 10:36 am | खटपट्या

हैद्राबादला जर "ये रस्ता किधरकू जाता?" असे विचारले आणि समोरच्याला माहित नसेल तर तो उत्तर देतो "क्या है कि"

हैद्राबाद मध्ये "क्या है कि" = मालूम नाही

अनंत छंदी's picture

29 Jul 2014 - 1:59 pm | अनंत छंदी

"भयंकर सुंदर मराठी" नांवाचे द. दी. पुंडे यांनी लिहिलेले एक भयंकर सुंदर मराठी पुस्तक आहे.

alokdream's picture

14 Aug 2014 - 1:53 am | alokdream

अड्नरि बस - ordinary bus :)