बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
24 Jul 2014 - 3:25 pm

बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव

फोटो इथे
http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/m2
पाहा .
साहित्य :
भिजवून मोड आणून सोललेले वाल उर्फ बिरड्या/डाळिंब्या एक वाटी ,
मसाल्यासाठी: लसूण चटणी ,
किसलेले सुके खोबरे भाजून ,
लाल तिखट ,हळद ,मिठ .
तेल .
मिसळीत टाकण्यासाठी :
कांदा ,लिंबू ,फरसाण ,बारीक शेव ,तळलेला पोहे चिवडा ,कोथिंबीर ,भावनगरी इ०.
कृती :
१)बिरड्या थोड्या पाण्यात शिजायला ठेवा .
२)अर्धवट शिजल्यावर त्यातील थोड्या घेऊन मसाल्याबरोबर कुटा/वाटा .त्याला थोड्या तेलावर भाजा .
३)वरील मिश्रण अगोदर शिजत असलेल्या बिरड्यात सोडून उकळले की झाली मिसळ तयार .
४)तरीचे प्रमाण ,दाटपणा आणि तिखटपणा क्र २ मधील जिन्नस कमी जास्त करण्यावर बदलतो .

सूचना :
अ)लसूणचटणीऐवजी सर्व खोबरे घेतल्यास चव वेगळी येते .
ब) 'अ'प्रमाणे करून चिंच गूळ घातल्यास साधे बिरडे होईल पण मिसळीसाठी चालणार नाही .
क)नेहमीची ओले खोबरे घातलेली उसळ केल्यास तळलेले पोहे ,बारीक शेव आणि भावनगरी वापरावी .(गिरगाव ,डोंबिवलीत गोविंदाश्रमात मिळायची .)
ड)मसाल्यात कांदा वापरलेला नाही .

मिपावर पूर्वी एक धागा आला होता पण परत एक उजळणी केली आहे .

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

24 Jul 2014 - 3:49 pm | दिपक.कुवेत

स्वरुपात आवडतं सो मिसळ सुद्धा आवडली गेली आहे. एक विनंती....एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर फोटो पण ईथेच डकवत चला कि! हे म्हणजे वरातीमागुन घोडे...आधी पाकृ नुसतीच वाचायची, मग दुसर्‍या पानावर जाउन फोटो पाहायचे, मग परत ईथे येउन प्रतिसाद द्यायचा. वाईच जरा शॉर्ट्कट मेथड करा राव!!!

एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर फोटो पण ईथेच डकवत चला कि!

असेच म्हणतो. ऑफिसमध्ये साईट बॅन असल्या कारणाने फोटो पाहता येत नाहीत.

बाकी, मिसळीचा हा नवा प्रकार वाचतोय/ऐकेतोय. एकदा करुन पहायला हवा.

स्पा's picture

24 Jul 2014 - 3:51 pm | स्पा

लय भारी

अजया's picture

24 Jul 2014 - 4:06 pm | अजया

गोविंदाश्रमातली खाल्ली आहे,मस्तच असते.करून पाहाते.

प्रचेतस's picture

24 Jul 2014 - 4:22 pm | प्रचेतस

जबरी

अनन्या वर्तक's picture

24 Jul 2014 - 8:13 pm | अनन्या वर्तक

मला वाटते काही पारंपारिक पदार्थ हे फक्त त्या त्या ऋतू मधेच बनवले गेल्यास त्याची लज्जत आजून वाढते. श्रावानात आजी आणि आई डाळिंब्याची उसळ बनवणारच आणि लहान असताना वाल सोलावयाचे काम आम्हा सगळ्यांना वाटून दिलेले असायचे. फोटो आणि पाककृती एकदम मस्त.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2014 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

बिरड्याची नविनच पाकृ आहे ! वालांचा प्रकार म्ह्णजे नक्कीच मस्त लागणार !! करून (करवून :) ) खाल्ला जाईल.

रॉजरमूर's picture

16 Aug 2014 - 8:58 pm | रॉजरमूर

काय हे कंजूस राव फोटो धाग्यावर टाकायला कसली कंजूसी करता ..........

उगा सगळ्यांना द्रविडी प्राणायाम करायला लावता राव तुम्ही .

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2014 - 1:27 am | प्रभाकर पेठकर

डाळींब्या भरपूर आवडतात. पण डाळींब्या + पाव हे समीकरण कांही केल्या मनाला पटत नाही.

डाळींब्या रसदार कराव्यात, पूर्ण शिजतील पण मोडणार नाहीत अशा असाव्यात. रसाचे २-४ घोट घेऊन ऊन ऊन भातात डाळींब्या कालवून खाव्यात, सोबत रश्श्याचे घोट चालू ठेवावेत. तृप्त मनाने आपोष्णी घेऊन पानावरून उठावे. बाहेरच्या खोलीत पंखा भर्रर्रर्रर्र लावून मस्तपैकी थंडगार लादीवर उघडी पाठ टेकून झोपावे.

संध्याकाळपर्यंत रस्सा संपून नुसत्या डाळींब्या उरलेल्या असतात. त्या एका वाटीत घेऊन त्यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकून एक वेगळाच स्वाद अनुभवावा आणि 'एक मस्तपैकी चहा गं जरा' अशी (घाबरत-घाबरत) स्वयंपाकघराच्या दिशेने फरमाईश फेकावी.

मिसळपावसाठी पहिली पसंती पांढर्‍या वाटाण्यांच्या तिखटजाळ उसळीलाच.

पटतंय .पांढरे वाटाण्यांची चव खासच .गोविंदाश्रममध्ये डाळिंब्यांचीच मिळायची पाव नसायचा .एक प्रयोग करून पाहिला .गौरीच्या जेवणात काळे वाटाणे उसळ ,पुऱ्या आणि खीर असते .भुरुभुरू पाऊस पाहत खायचे .तिथे काळे वाटाणेच पाहिजेत .
नेहमीच्या पांढऱ्या वाटाण्याच्या तरिचेही प्रयोग केले आहेत परंतू अगोदरच्या एका मिसळीच्या धाग्यावर बरेच वाटण झाले आहे .

रॉजरमूर साहेब मी जुनीच गाडी वापरतो 007 छाप नाही .
फोटोंसाठी फोटोबकेट साईट फार उपयोगी पडते .चार पाच अकाउंटस उघडून माझे सर्व फोटो अपलोड करतो .पब्लिक अथवा प्राइवेटचा पर्याय आहे .अॅल्बम बनवता येतात .लिंक पाठवली की कोणालाही दिसतात लॉग ईन न करता .शिवाय मिपालेखनात संपादन नसलेतरी बदल करता येतात परस्पर अॅल्बममधले फोटो बदलले अथवा वाढवले तरीही लिंक तीच राहते .छोट्या मोबाईलमधूनही काम भागते . कंजूस नावाला जागले पाहिजे ना ?असो .

कंजूस's picture

2 Sep 2014 - 8:38 am | कंजूस

तयार मिसळ

कंजूस's picture

2 Sep 2014 - 8:41 am | कंजूस

p6तयार मिसळ.

पैसा's picture

2 Sep 2014 - 9:56 am | पैसा

डाळिंब्या मस्त! पण मिसळीत कशा लागतील माहित नाही!

कंजूस's picture

2 Sep 2014 - 1:41 pm | कंजूस

१)एक वाटी डाळिंब्या, तिखट.
p

२) लसूण चटणी, भाजलेले सुके खोबरे, तिखट, हळद.
p

३) थोड्या अर्धवट शिजलेल्या डाळिंब्या, अधिक मसाला कुटून अथवा वाटून.
p

४)तीनमधले कुटलेले जिन्नस थोड्या तेलावर भाजून घेतल्यावर.
p

५)चारमधले मिश्रण अगोदर शिजत असलेल्या डाळिंब्यात टाकून उकळल्यावर झालेली मिसळ.
p

६)तयार.
p

मुक्त विहारि's picture

3 Sep 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि

डाळिंब्या हा आमचा आवडता प्रकार.