कटी पतंग

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
23 Jul 2014 - 1:18 pm

तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्‍याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्‍या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्‍या डायवरला मिळाली. तो तिला पळवू लागला तोच विरुद्ध दिशेने जीपमधून एक बाप्या आला. त्याने डायवरशी फायटिंग करुन तिला सोडवली. तिच्याच सांगण्यावरुन एका म्हातार्‍याकडे पोचली. त्याचा मुलगा पतंग उडवत असताना गच्चीवरुन पडून मेला होता. कटलेल्या पतंगीला आधार पाहिजे होता. तिनं सांगितलं, तुमचा मुलगा जी शेवटची पतंग उडवत होता ना, तीच मी! झालं, म्हातारा द्रवला. मुलाची आठवण म्हणून त्याने तिला घरांत ठेवून घेतली. पण तिला उडवणारं कोणीच नव्हतं, म्हणून ती सारखी फडफडायची.

आता ज्या बाप्याची पतंग कटली होती त्याने तेंव्हापासून पतंग उडवणेच बंद केले होते. योगायोग म्हणजे, त्यानेच तिला वाचवले होते आणि तो म्हातार्‍याच्या घराजवळच रहात होता आणि म्हातार्‍याकडे त्याचं येणंजाणं पण होतं. आता या कटलेल्या पतंगीला बघितल्यावर ते आणखीनच वाढलं. ही कटी पतंग आपण कधी एकदा उडवतो असं त्याला झालं होतं. पतंगीची पण मनातून तीच इच्छा होती. पण हा बाप्या कोण आहे हे तिला कळलं होतं त्यामुळे ती डबल फडफडायला लागली होती. पतंगी दु:खी का ते बाप्याला कळत नव्हतं. तिला बरं वाटावं म्हणून त्यानी तिच्यासमोर आरडीची कितीतरी गाणी म्हटली! पण ती आणखीनच फडफडायची. शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने किशोरच्या आवाजात गाणे न म्हणता मुकेशचा आवाज काढून आरडीचं गाणं म्हटलं. तरी काही उपेग नाही.

इकडे चळतवाल्या पतंगियाचे सगळे पतंग संपले असावेत बहुधा. म्हणून तो हिच्या मागावर आला होता. तिला त्रास देत होता. त्यामुळे शेवटी पतंगीने एकदम लताच्याच आवाजात एक जबरी गाणं म्हटलं. ते इतकं जबरी होतं की आजुबाजूचा पालापाचोळा उडायला लागला. बाप्यालाही ते ऐकू गेलं.बर्‍याच घडामोडी घडल्या. बाप्याने चळतवाल्याला हाकलून दिले. म्हातार्‍याला पटवून दिले की तुझ्या मुलाची आठवण म्हणून नुसती ठेवून दिलेली ती पतंगी दु:खाने फडफडती आहे. ती अशी खुंटीवरच फाटून जाईल. त्यापेक्षा मी तिला नवीन कणी बांधतो आणि मुक्त आकाशांत बदवतो, म्हणजे तिला मजा येईल. (स्वतःला मजा येईल हे न सांगण्याइतका तो धूर्त होता) आता तो म्हातारा पुन्हा द्रवला.(हिंदी सिनेमे फार बघितल्याचा परिणाम!)

अशा तर्‍हेने, ज्याची पतंग कटली होती त्यालाच ती परत मिळाली आणि सर्व लोकांची 'मुरादें' पुरी झाली. अशा आपल्या पतंगी न कटोत आणि कटल्या तरी त्या तुम्हाला परत मिळोत या सदिच्छेने ही चित्तरकथा संपवतो.

आमचे या विषयातले गुरु, 'फारएंड' साहेबांना समर्पित!

कथामौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jul 2014 - 2:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

आता कटी पतंग बघितलाच पाहीजे
अवांतर-मी पयला

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jul 2014 - 2:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

वाक्यावाक्याला बेक्कार हसतोय :))

>>पण तिला उडवणारं कोणीच नव्हतं, म्हणून ती सारखी फडफडायची.>>>>

>>ही कटी पतंग आपण कधी एकदा उडवतो असं त्याला झालं होतं. पतंगीची पण मनातून तीच इच्छा होती>>>>

आणि खालील वाक्यासाठी साष्टांग -/\-

>>त्यापेक्षा मी तिला नवीन कणी बांधतो आणि मुक्त आकाशांत बदवतो, म्हणजे तिला मजा येईल. (स्वतःला मजा येईल हे न सांगण्याइतका तो धूर्त होता)>>

>>अशा आपल्या पतंगी न कटोत आणि कटल्या तरी त्या तुम्हाला परत मिळोत या सदिच्छेने ही चित्तरकथा संपवतो.

हे लैच आवडलं. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 2:30 pm | टवाळ कार्टा

भारी ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 3:25 pm | टवाळ कार्टा

दोन दोन पतंगी कटी घेउन फिरतात काही \m/ ;)

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 3:31 pm | प्यारे१

अवघड आहे.
क्रिप्टीक का काय म्हणतात ती पतंग कथा!
वाचता वाचता 'ये शाम मस्तानी' वगैरे आठवलं आणि आशा पार राख झाल्या.

ही कथा जिमो नी लिहीली असती तर?
( एक शंका. तिमा तुम्ही चुकून जिमो या आयडीने लॉगैन करायच्या ऐवजी तिमा या आयडीने लॉगैन करुन कथा पोष्टकेली असा सौंशय येतोय

कवितानागेश's picture

23 Jul 2014 - 5:05 pm | कवितानागेश

हे काये?? =))

तिमा's picture

23 Jul 2014 - 6:46 pm | तिमा

ही 'कटी पतंग' या हिंदी सिनेमाची एका वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिलेली कथा आहे.

यशोधरा's picture

23 Jul 2014 - 6:47 pm | यशोधरा

ही कटीपतंगची इश्टुरी आहे? त्या सिनेमातली गाणी छान आहेत :)

आतिवास's picture

23 Jul 2014 - 7:36 pm | आतिवास

:-)

मस्तच , कस्स काय जमतं ब्वा तुम्हाला ?

अशी श्टुरी सांगीतली, आन ती बी शार्ट मध्ये!! म्हंजे आयकणार्‍यान ऐकायच काय आन समजायच काय?
तरीबी उगा मिपाकर हुश्श्शार म्हनुन हो!!

केदार-मिसळपाव's picture

24 Jul 2014 - 2:10 pm | केदार-मिसळपाव

तांत्रिक आणि गुढ भाषेत लिहिलेला लेख, त्याबद्दल कौतुक आहे कारण तुमचा हेतु साधा झाला आहे. समझनेवालेको समझ गया है असेही दिसतेय.
प्रामाणिकपणे सांगतो मला अजिबात ठो म्हणता ठो कळाले नाही.
लहानपणी मराठीच्या पुस्तलकात होते तसे ससंदर्भ स्पष्टीकरण करुन सांगा की कोणीतरी. अगदी व्यनी केलात तरी चालेल.

अत्रन्गि पाउस's picture

24 Jul 2014 - 9:25 pm | अत्रन्गि पाउस

म्हणतोय मी पण

तिमा's picture

25 Jul 2014 - 2:19 pm | तिमा

@केदार,
याची ओरिजिनल स्टोरी वाचण्यासाठी वाचा,
http://en.wikipedia.org/wiki/Kati_Patang

वरील गूढ कथेतल्या पात्रांची ओळख अशी:
बाप्या = राजेश खन्ना
कटी पतंग = आशा पारेख
चळतवाला पतंगिया = प्रेम चोप्रा
म्हातारा = नाझिर हुसेन

आता टोटल लागतीये का पहा.

- तिमा

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2014 - 3:11 pm | अत्रन्गि पाउस

साष्टांग नमस्काराची स्मायली पायजे बुवा ....
सध्या इथूनच...लेखाला लेखकाला अन त्या सर्व्यांना ज्यानला हे पयल्या झटक्यात कळले

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jul 2014 - 6:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लैच भारी वो...

दोनदा वाचल्यावर नक्की काय आहे ते समजले. खट्टी पतंग!

रुपी's picture

24 Jul 2014 - 11:45 pm | रुपी

शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने किशोरच्या आवाजात गाणे न म्हणता मुकेशचा आवाज काढून आरडीचं गाणं म्हटलं. >>> *lol*

खरं तर सिनेमा पाहिला तेव्हा आवडला होता, पण तरी हे वाचायला फार मजा आली.

अवांतरः
असंच एकदा सकाळमध्ये सिलसिला बद्दल वेगळ्या द्रुष्टीकोनातून कुणीतरी लिहिलं होतं. ़जया बच्चनने साकारलेलं पात्र कसं स्वार्थी आहे वगैरे वगैरे.

तुमचा अभिषेक's picture

24 Jul 2014 - 11:48 pm | तुमचा अभिषेक

मस्त पटकथासार

खटपट्या's picture

25 Jul 2014 - 2:40 am | खटपट्या

मस्त !!!

सुंदर सुंदर पतंगी फक्त दुरून बघून आस्वाद घेणारा खट्पट्या !!!

सस्नेह's picture

25 Jul 2014 - 10:29 am | सस्नेह

कटी पतंग ची कणी कापून पार लोळवलय.
*lol*

पैसा's picture

30 Jul 2014 - 9:36 pm | पैसा

कटी पतंग शिणेम्याची खरीखुरी प्रामाणिक कथा!