रश्श्याचे नामकरण

भिंगरी's picture
भिंगरी in काथ्याकूट
23 Jul 2014 - 12:33 am
गाभा: 

आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला.
अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो.
पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली.
तेंव्हा आणखी शब्द मिळाले,
'अंगापुरता रस्सा'
'थपथपित
'दाटसर'
'जाडसर'
असेच आणखीही शब्द असतील
जाणकारांनी माहिती द्यावी.
आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

प्रतिक्रिया

नानासाहेब नेफळे's picture

23 Jul 2014 - 1:35 am | नानासाहेब नेफळे

लपथपितच योग्य शब्द आहे.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 2:24 pm | प्रसाद गोडबोले

इतर शब्द जातीयवादी आहेत का ? =))

प्रभाकर पेठकर's picture

23 Jul 2014 - 1:41 am | प्रभाकर पेठकर

कुठलाही शब्द ज्याच्या वापराने भाजीच्या रंगरुपाची कल्पना येईल तो योग्य.
अजून कांही शब्द आहेत जसे, 'दबदबित' आणि 'लिप्त'.

शुचि's picture

23 Jul 2014 - 11:16 pm | शुचि

हे शब्द ऐकले होते.

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 1:43 am | प्यारे१

'पळीसांड' चालेल काय?

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2014 - 2:03 am | अत्रुप्त आत्मा

@पळीसांड>>>. *ROFL* अरे काय चाल्लय काय !?
शब्दांची अशी हेळसांड योग्य नव्हे! =))

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 2:29 am | प्यारे१

शब्द माहिती नाही की बळंचकर सुरुय?

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2014 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा

चालू द्या! _/\_

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 12:18 pm | प्यारे१

ठीके.

पुढच्या वेळी तुमच्याशी बंद दाराआड ४५ मिनिटे चर्चा करुन परवानगी असली तरच प्रतिसाद टंकत जाईन. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 4:01 pm | टवाळ कार्टा

कडी आणि खिडक्यापण लावा =))

नो पर्सनल सजेशन्स प्लिज. बा द वे तुम्ही येणार का 'जॉईन' व्हायला? ;)

-टवाळाशी टवाळ ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 5:26 pm | टवाळ कार्टा

हा हा हा ... नक्को

भाजीला अंगाबेत रस्सा किंवा अंगाबरोबर रस ठेवणे हे पुस्तकात वाचलय.

सरभरीत रस्सा, असं माझी आई म्हणते, बाकी लबलबित म्हणजे ओवरकुक्ड वांगे, चिकन इत्यादी इत्यादी.

धाग्याचे शीर्षक वाचून वाटले कि लेखकाने काल्पनिक पाककृती तयार करून कल्पनेतच कसलातरी रस्सा बनवलाय आणि त्या रस्स्याला नाव देण्यासाठी मिपाकरांना कामाला लावलं आहे. ठिक आहे, "गिचगिचीत रस्सा" हे नाव चालू शकेल.

आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.

वामन देशमुख's picture

23 Jul 2014 - 11:40 am | वामन देशमुख

आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.

दाट रस्सा असेल तर अंगरस्सा म्हणा, हरकत नाही; पण तो दाट रस्सा अंगवस्त्रावर... आपलं ते हे, अंगावरच्या वस्त्रावर पडू देऊ नका म्हणजे झालं!

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jul 2014 - 2:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

रस्सा "दाट अंगवस्त्रावर" असं वाचलं आणि जरा गोंधळ झाला :)

रस्सा पातळ असेलतर 'शेरवा' आणी घट्ट असेल तर 'सरभरीत'
.

इरसाल's picture

23 Jul 2014 - 11:25 am | इरसाल

आंगलाई रस्सा

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2014 - 12:10 pm | अत्रुप्त आत्मा

फदफदीत =))

धन्या's picture

23 Jul 2014 - 2:23 pm | धन्या

भदभदीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2014 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान माहितीपूर्ण धागा आणि प्रतिसाद.

-दिलीप बिरुटे

दया आयडी के पिछे कुछ तो गडबड है. ;)

सूड's picture

23 Jul 2014 - 3:55 pm | सूड

सरसरीत!!

कवितानागेश's picture

23 Jul 2014 - 4:38 pm | कवितानागेश

पाणचट!

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 4:51 pm | प्रसाद गोडबोले

रस्स्स्स्स्स्स्स्स्स्सा

किती पातळ आहे त्यावरुन मधील स वाढवत जावा

खटपट्या's picture

24 Jul 2014 - 2:19 am | खटपट्या

थपथपीत !!! सपसपीत !! ओरपून खाण्यासारखे !!!

सुबोध खरे's picture

24 Jul 2014 - 9:54 am | सुबोध खरे

अरेच्च्या,
मी पहिल्यांदा "रस्त्याचे नामकरण" वाचले. धागा उघडून पाहतो तर काय अगदीच पचपचीत

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2014 - 11:41 am | श्रीगुरुजी

या रश्श्याला "थुलथुलीत" हे नाम कसे वाटते?

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 11:49 am | प्रसाद गोडबोले

या रश्श्याला "थुलथुलीत" हे नाम कसे वाटते?

>>> अंहं ...थुलथुलीत हा शब्द ठेरीलाच शोभुन दिसतो *biggrin*

राही's picture

25 Jul 2014 - 2:22 pm | राही

दाटसर, जाडसर
पातळसर...उतळसर, चिखलसर, दहीसर, अमृतसर......

रमेश आठवले's picture

15 Feb 2016 - 7:11 am | रमेश आठवले

लथपथित

सुनील's picture

15 Feb 2016 - 9:54 am | सुनील

आमच्याकडे त्याला सुरबूस असेही म्हणतात.

पक्षी's picture

15 Feb 2016 - 10:34 am | पक्षी

बुलबुलीत

पांथस्थ's picture

18 Feb 2016 - 12:57 pm | पांथस्थ

आमच्या घरी वापरला जाणारा शब्द - 'अंगापुरता रस्सा'

गवि's picture

18 Feb 2016 - 1:07 pm | गवि

पळीवाढ रस्सा.