पहाटे येणारी नर्स

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Jul 2014 - 12:54 pm

हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या धर्तीवर माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नासा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्या वर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नाही. सकाळची वाट फण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल” मनात म्हणायचो किती तुकडे होणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिच्या कडे पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला

कथाविचार

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2014 - 2:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आदित्य बिर्ला हॉस्पिटल :)

तुषार काळभोर's picture

19 Jul 2014 - 3:41 pm | तुषार काळभोर

नोबेल अन् सह्याद्री.... सगळं फुटकळ!!
आयला....माणसानं असं र्‍हायला पायजे. ४ दिस झाले असतील नसतील आपरेशनला, यांच्या प्रतिभेला पाझर फुटायला लागले!!

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2014 - 4:10 pm | टवाळ कार्टा

+११११११११

वाडीचे सावंत's picture

19 Jul 2014 - 4:42 pm | वाडीचे सावंत

मानल राव तुम्हाला ....

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2014 - 4:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

पोस्टऑप पिरियडमध्येही तुमच्या प्रतिभेला धुमारे फुटत आहेत म्हणजे तुम्ही लवकरच खडखडीत बरे होणार असा प्रोग्नोसिस दिसत आहे ! शुभेच्छा !! ;)

असेच लिहीत रहा आणि लवकर खडखडीत बरे व्हा ! :)

मुक्त विहारि's picture

19 Jul 2014 - 7:40 pm | मुक्त विहारि

झक्कास...

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2014 - 9:16 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! पुन्हा 'कार्यरत' झाल्याचे वाचून आनंद झाला.

>>>> या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या.

केरळी नर्सेस खुपच सेवाभावी असतात. त्या मानाने मराठी नर्सेस मध्ये एव्हढी सेवाभावी नर्स मिळणं नशिबाचा भाग असतो हा माझाही अनुभव आहे. मराठी मामा आणि मावश्या (दिनानाथ मंगेशकर रुग्णालय) बर्‍यापैकी उर्मटच भेटले. असो.
तरीपण एकंदरीत रुग्णालयातलं वातावरण, आपण रुग्ण असताना, फारसं उत्साहवर्धक नसतच. त्यातून रात्री, गोळ्या घेऊनही, झोप येत नसेल आणि मिनिट मिनिट पहाट होण्याची वाट पाहावी लागत असेल तर होणारा मानसिक त्रास अवर्णनियच म्हणावा लागेल.

धन्या's picture

19 Jul 2014 - 11:38 pm | धन्या

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला

अतिशय हृदयस्पर्शी काव्य.

खटपट्या's picture

20 Jul 2014 - 12:01 am | खटपट्या

वा साहेब. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलंय !! मस्त खडखडीत बरे होऊन या

प्यारे१'s picture

20 Jul 2014 - 2:09 am | प्यारे१

ही बायपास नसून हार्ट 'ट्रान्सप्लान्ट' असावी बहुतेक!

चित्रगुप्त's picture

20 Jul 2014 - 3:46 pm | चित्रगुप्त

वा विवेकचूडामणीश्री. खरे रसिक आहात.
लवकर पूर्ण बरे होऊन लेखनाला लागा. शुभेच्छा.

विवेकचूडामणी >> कोल्हटकरांचे पुस्तक का

असो

कुठेतरी एका लेखकानी लिहीलय...
तो लिहीत असे पुढे लेखन त्याचे व्यसन बनले.
त्याचा मुलगा दगावला. त्याला चितेवर पेटवलेले असतानाही त्याच्या मनात मात्र या सगळ्या अनुभवावर लिहायच्या लेखाची जुळवाजुळव चालू होती...

चित्रगुप्त's picture

20 Jul 2014 - 10:14 pm | चित्रगुप्त

विवेकचूडामणी :
http://www.khapre.org/portal/url/pages/i080114213253/view

आशु जोग's picture

21 Jul 2014 - 12:58 am | आशु जोग

ओके

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2014 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/spiritual/spiritual-tree-smiley-emoticon.png

मदनबाण's picture

20 Jul 2014 - 5:56 pm | मदनबाण

हा.हा.हा... मस्त ! :)
लवकर टुणटुणीत होउन मिपावर रुजु व्हा. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- EnUchimandai... :- Vettaikaran

मितभाषी's picture

20 Jul 2014 - 8:18 pm | मितभाषी

:)

arunjoshi123's picture

20 Jul 2014 - 11:33 pm | arunjoshi123

शुभेच्छा.

बाकी सर्व मनातले विचार आहेत.

अस्सं होय? आठवतं. आठवतं. आपले सुपुत्र आपलं मिपावरचं सारं लेखन वाचतात असं म्हणालेले. :)

सर्जरी झालीये (किंवा होणार आहे) हे माहित नव्हते. आता लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा! केरळी नर्सेस चांगल्या असतात हे मीही ऐकून आहे. जर रात्री झोप येत नसेल तर पेशंटला वाचनाची परवानगी नसते का?असेल ते असो, तुम्ही मात्र लवकर बरे व्हा!