विजयोत्सव!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
16 Jul 2014 - 3:37 am

.

१५ जुलै २०१४... बर्लिनचे ब्रांडेनबुर्ग गेट माणसांनी गच्च फुलले होते, हातात जर्मनीचे झेंडे,गळ्यात झेंड्याच्या रंगाच्या प्लास्टिकफुलमाळा, अंगात जर्मनीचा शर्ट.. आणि ओसंडून जाणारा उत्साह !
विजयी टीमला घेऊन येणारे लुफ्तहान्साचे 'सिगरफ्लिगर फॅनहान्सा' जेव्हा ब्रांडेनबुर्ग गेटच्या वरुन बर्लिनच्या टेगेल विमानतळाकडे जाताना दिसले तेव्हा सार्‍या चाहत्यांनी हात उंचावून जल्लोश केला. लवकरच प्रतीक्षा संपणार होती.

.
विमान जमिनीला लागले ,शिडीच्या बाहेर अभिनंदनपर स्वागताचे होर्डिंग लावले होते.
हातात विश्वकरंडक घेऊन फिलिप लाम बाहेर आला. त्याच्यापाठोपाठ एकेक करुन सारे जण.. सगळ्यांनी जर्मनीचा खेळतानाचा पोषाख घातला होता आणि गळ्यात सुवर्णपदकं..
.

बर्लिन विमानतळावरचे कर्मचारी आणि एक स्पेशल मर्सिडिझ ट्रक तेथे ह्या चमूसाठी तत्पर होता. ट्रकवर लिहिले होते १९५४ ,१९७४, १९९०, २०१४!

.
टेगेल विमानतळाच्या बाहेर आणि रस्त्यावर लोकांनी विजयी वीरांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. लामपासून लोवपर्यंत सारेजण त्या उघड्या ट्रकमधून आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होते. त्यांच्या जल्लोशात टाळ्या वाजवून, हात उंचावून सामील होत होते. बर्लिनच्या विमानतळावरुन ट्र्क ब्रांडेनबुर्ग टोअर कडे निघाला. हजारो चाहते तेथ केव्हापासून वाट पाहत होते. एक भव्य मंच तेथे उभारला होता. दोघे निवेदक आले आणि त्यांनी संघ तेथे पोहोचल्याची घोषणा केली. एकच जल्लोश झाला.. डॉइशलांड.. डॉइशलांड!
बर्लिनचे मेयर क्लाउस वोवेराइट ह्यांनी सर्वांचे स्वागत केले आणि गोल्डनबुकात स्वाक्षर्‍या करण्याची विनंती केली. जग्गजेत्यांनी सुवर्णाक्षरे कोरली आणि सारे ब्रांडेनबुर्गच्या स्टेजकडे निघाले.

.

स्टेजवर सर्वात आधी आले लोव आणि त्याचे सहकारी.. हातात फूट्बॉल..स्टेजवर आल्याआल्या सगळ्यांनी फूटबॉल प्रेक्षकात भिरकावले. पुन्हा एकच जल्लोश झाला. "तुम्हा सर्वांच्या सपोर्टशिवाय आम्ही येथे नसतो.हा आपल्या सगळ्यांचा विजय आहे, आपण सगळे विश्वजेते आहोत." योगी लोवने असं म्हणताच लोकांचा जल्लोश शिगेला पोहोचला.

.

३-४च्या गटात जर्मनीचे खेळाडू अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने मंचावर येत होते, प्रेक्षकांमध्ये फूटबॉल भिरकावत होते. हात उंचावून अभिवादन करत होते, विजयगाणी म्हणत होते,म्हणायला लावत होते.नाचत,उड्या मारत होते.प्रेक्षकांशी,चाहत्यांशी संवाद करत होते. बॉयटिंगने प्राउड बर्लिनर असल्याचा घोष केला तर मेर्टसाकर म्हणाला आम्हाला आमच्या परफॉर्मन्सचा आभिमान आहेच आणि आमच्या ह्या चाहत्यांचाही तेवढाच अभिमान आहे.
क्लोजं आल्यावर चाहत्यांनी टाळ्या आणि जल्लोशाने त्याला अगदी भारावून टाकले. टोनी क्रूझने तर "मिरो क्लोज, मिरो क्लोजं .. यु आर द टॉप मॅन..." असे गाणेच म्हटले आणि प्रेक्षकांनाही म्हणायला लावले. ग्योटंझच्या विजयी गोलाबद्दल विचारणा केली असता तो इतक्या सहजपणे म्हणाला हे सगळं टीमवर्क होतं. आम्ही जिंकलो हे महत्त्वाचं.. शेवटी आले म्युल्लर,एरिक डुर्म, हुमेल्स आणि त्यांच्यामागे लपलेला फिलिप लाम! स्टेजच्या मध्यभागी आल्यावर सगळे बाजूला झाले आणि लामने ट्रॉफी उंचावली. जल्लोश आणि जल्लोश! १९९० मध्ये लोथर मथियासने उंचावलेली ट्रॉफी पाहिली आणि मी ही तेच स्वप्न पाहू लागलो. आज ते साकार झालं आहे असं भावूक होत लाम म्हणाला तेव्हा सारेच जण त्याच्या स्वप्नात आणि आनंदात सामील झाले. तेथे जमलेल्या चाहत्यांना पाहून सारी टीम भारावून गेली होती. त्यानंतर आली सगळी सपोर्ट टीम.

.

.

.

सगळे जण विजयगाण्यावर थिरकत असतानाच सोहळा संपला..

.

(फोटो - जाला वरुन साभार!)

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अगदी शिस्तीत झाला सोहळा .DW TV चानेलवर साडेचार (भा .वे .) वाजता Live पाहिला .

स्वातीताई, तुला तिथे असल्याने हे सारं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं असेल ना!

प्रभाकर पेठकर's picture

16 Jul 2014 - 9:27 am | प्रभाकर पेठकर

ह्याला म्हणतात विजयोत्सव. सर्व जर्मन नागरीकांना विशेषतः फुटबॉल खेळाच्या नवखेळाडूंना/नवतरूणांना अत्यंत प्रेरणादायी दिवस.

जर्मनीचे मनःपूर्वक अभिनंदन.

आणि हा जल्लोष मिपावर मुक्त उधळल्याबद्दल स्वातीला अनेकानेक धन्यवाद.

अजून काही दिवस तरी जर्मनीचा विजयोत्सव चालूच राहिल.
२०१६ च्या युरो कपाचे दावेदार असतील आता जर्मन्स.

मुक्त विहारि's picture

16 Jul 2014 - 9:41 am | मुक्त विहारि

धन्यवाद

अनुप ढेरे's picture

16 Jul 2014 - 10:17 am | अनुप ढेरे

व्वा... मस्तं!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2014 - 10:36 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/football/world-cup-text-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif

मधुरा देशपांडे's picture

16 Jul 2014 - 1:37 pm | मधुरा देशपांडे

मस्तच. अंतिम सामन्यापूर्वी माहौल कसा होता याविषयी थोडे इथे खरडले होते. अंतिम सामन्याला पब्लिक व्ह्यूइंग ला गेलो होतो तिथे हा जल्लोष अनुभवताना फार भारी वाटत होते. जेव्हा गोल झाला तेव्हा तर लोक त्या स्क्रीन च्या इतके जवळ गेले की आम्ही घरी येउन पुन्हा पाहिला गोल कसा झाला ते.

ऋषिकेश's picture

16 Jul 2014 - 1:59 pm | ऋषिकेश

हायला!
आमचं टैमिंग जरा चुकलंच नै? ;)

सूड's picture

16 Jul 2014 - 2:33 pm | सूड

मस्त !!

मस्तच झाला सोहळा... कर्णधार लाम ह्यास ४ जणांच्या मध्ये लपवून आणण्याची आयडिया भारीच एकदम.

ह्या सोहळ्याची थोडीफार झलक येथे बघण्यास मिळेल.

मनिष's picture

16 Jul 2014 - 4:45 pm | मनिष

आपल्या भारतीयांच्या क्रिकेटवेडासरखेच की हे सगळे! :-)

मस्त वृत्तांत! आपल्या २०११ची आणि सचीनची आठवण आलीच.