फ्राईड मटण चॉप्स

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
13 Jul 2014 - 9:25 pm

फ्राईड मटण चॉप्स
साहित्य----------
मटण चॉप्स---६
आलं लसूण पेस्ट २ लहान चमचे.
१० हिरव्या तिखट मिरच्या आणि एक कप निवडलेली कोथिंबीर यांची पेस्ट
३ अंडी फोडून चांगली फेटलेली
मीठ
रवा किंवा ब्रेड क्रम्स
तळण्यासाठी तेल.
कृती-----

मटण चॉप्स घेताना खाटकाकडून दाबून थोडे चपटे करून घ्यावे.
स्वच्छ धुवून त्यांना आलं लसणाची पेस्ट व मीठ लावून कोरड्या भांड्यात ठेवावे.
कुकरमध्ये हे भांडे ठेवून तीन शिट्या होऊ द्याव्या. कुकरची वाफ गेल्यावर चॉप्स बाहेर काढून थंड होऊ द्यावे.
आता त्याला हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे.
अंड्याच्या मिश्रणात चवीपुरते मीठ घालून त्यत चॉप्स बुडवून बाहेर काढावे.आता हे चॉप्स रवा किंवा ब्रेड क्रम्स मध्ये दोनही बाजूने घोळवावे
तव्यावर तेल टाकून तापल्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने खमंग तळावे
गरम गरम सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

13 Jul 2014 - 9:38 pm | अनुप ढेरे

फोटो???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2014 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो :(

-दिलीप बिरुटे

सुहास झेले's picture

13 Jul 2014 - 9:39 pm | सुहास झेले

पाककृती फोटोशिवाय? :(

भिंगरी's picture

13 Jul 2014 - 9:43 pm | भिंगरी

माझ्याकडे केमेरा नाही त्यामुळे कृपया फोटोची अपेक्षा करू नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2014 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपेक्षा वगैरे कै नै. पण कसं फोटो पाहिलं की जिज्ञासा जागृत होते की वरीजनल पाककृती कशी बनली असेल वगैरे.
आता तुम्हाला म्हणुन सांगतो मला पाककृती लिहिता येत नाही पण काल आमच्याकडे आषाढाची पुजा असते सात बोकुड कापले. आता त्या मटनाचे वाटे कसे करतात ते तुम्हाला फोटू पाहुन समजेल आणि तुमच्या मनात जिज्ञासा जागृत होईल. काय असतं हे प्रकरण म्हणुन पण मी तुम्हाला काय सांगणार नाही.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

भिंगरी's picture

13 Jul 2014 - 10:45 pm | भिंगरी

आषाढ पूजा म्हणजे गटारी का?

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 11:30 am | दिपक.कुवेत

आवडत नाहि ओ आपला पास. फोटो पाहुन कदाचीत नुसतं टेम्ट व्हायला होईल पण ईथे तो हि पर्याय नाहि *cray2*

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 11:42 am | प्रभाकर पेठकर

हाय कम्बख्त..! तूने मांसाहार कियाही नही।

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 11:44 am | दिपक.कुवेत

हमारे लिये फिलहाल तो चिकन और फिश हि काफि है|

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 11:48 am | प्रभाकर पेठकर

चॉप्सची छायाचित्रं पाहिजेतच.

पारंपारिक कॅमेरा नसेल पण हल्ली प्रत्येक भ्रमणध्वनीला कॅमेरा असतोच. त्याचा वापर करावा ही विनंती.

सुनील's picture

14 Jul 2014 - 2:07 pm | सुनील

फटू पायजेच!

अवांतर - हे चॉप्स दह्याबरोबर खाल्ले तर कसे लागतील?

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर

त्या दह्यात कोथिंबीर, मिरची, जीरं, पुदीना वाटून घालायचा, चवीला मीठ, मस्त लागतील.

गणपा's picture

14 Jul 2014 - 2:29 pm | गणपा

अगदी असेच बनवतो.

मुक्त विहारि's picture

14 Jul 2014 - 3:20 pm | मुक्त विहारि

तुमच्या हातची रेशीपी पण येवू द्यात.

(बाकी,

मटण चॉप्स, चिकन लॉलीपॉप आणि तळलेला पापड असला की थंडगार बियर ही हवीच.सुखाच्या आणि समाधानाच्या पलंगाचे हेच ते ४ पाय.)

संजय कथले's picture

14 Jul 2014 - 3:24 pm | संजय कथले

मुक्त विहारी मित्रांना विसरू नका ,..थंड बियर सोबत..

मुक्त विहारि's picture

14 Jul 2014 - 7:13 pm | मुक्त विहारि

जरूर..

जमल्यास आमच्या डोंबिवलीला (डोंबिवली, हेच मध्यवर्ती ठिकाण आहे, हे तुम्हाला ठावूक असेलच) कधी पण या.

संजय कथले's picture

15 Jul 2014 - 5:29 pm | संजय कथले

नागपूरला आल्यावर कळवा सावजी खुर मटन तुमची आतुरतेने वाट पाहत आहे...

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2014 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर

संजय साहेब,

सावजी खुर मटनची मस्त पाककृती टाका की आधी..

मुक्त विहारि's picture

15 Jul 2014 - 10:16 pm | मुक्त विहारि

नागपूरला आलो, की नक्की कळवीन.

आणि

तसेही गेल्या १०-१२ वर्षांत विदर्भात जाणे झालेले नाही.

पुढल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास जमवतो.

तोपर्यंत आमच्या नावाने एक-दोन बियरचे थेंब उडवलेत तर फार उत्तम.

पुन्हा मटण चॉप्स आणणे आले का आता. ;)

भिंगरी's picture

14 Jul 2014 - 4:16 pm | भिंगरी

ह्ये बगा मिपावाल,मी हाय शाकारी गेली पंदरा वर्स
त्याच्या आगुदार ह्ये सर्व परकार करत हुत्ये.
आता घरात बी आणत न्हाय,तव फोटू कसा आसल?
हा पर डोक्यात त्या रेशिपी हायत म्हनूनशान तुमच्यासाठी लिवते.
मी म्हनते मानसान उमजून घ्यावं
आता शाकारी रेशिपिचे फोटू भर्मनध्वनी वरून काढून कसे टाकायचे त्ये माझ्या टकुर्यात येत नाही.
तवा जरा माला मार्गदर्सन करा की.

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 4:16 pm | दिपक.कुवेत

ह्या चॉप्स मधे काहि मांस असतं का खाण्याजोगं? आय मीन वरील चित्रात तरी तसं दिसत नाहिये.

दिपकराव मटण ट्राय करुन सोडणार वाटत तुम्ही. :)
नायजेरियातले बकरे दुबळे असतात. ;)
खाटिकाशी ओळख असली तर भरलेले चॉप्सही मिळतात. पण हाडं फोडण्यात जी मज्जा आहे ती मांस चघळण्यात नाही राव.

संजय कथले's picture

14 Jul 2014 - 3:13 pm | संजय कथले

गणपा ...काय राव मस्त फोटू टाकला...वा तोंडाला पाणी सुटलाय बघा..