चलो काश्मीर....

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in भटकंती
13 Jul 2014 - 1:05 pm

नमस्कार मंडळि,

काश्मीर....भुतलावरील नंदनवन/स्वर्ग. खरं तर हे एक ईयर द राउंड डेस्टिनेशन म्हटलं तर वावगं ठरु नये. वेगवेगळ्या ऋतुतलं काश्मीर पहाणं हा नक्किच एक वेगवेगळा अनुभव असतो. एक वेळ आपली नजर तोकडि/थीटि पडेल ह्याच्या सौदर्यांपुढे....

असं एकलयं कि एप्रिल ते ऑगस्ट हा काश्मीर भेटिसाठि उत्तम ऋतु मानतात. एकदम योग्य हवामान, बहरलेल्या बागा, थोडासा उरलेला बर्फ....फॅमीली टुर च्या दृष्टीने एकदम अ‍ॅप्ट असा हा सीजन. पण माझ्या मते खरा जातीवंत भटका तोच जो ह्याच रुळलेल्या वाटा जरा वेगळ्या नजरेने बघतो. वेल आता जास्त पाल्हाळ न लावता आणि उत्सुकता अधीक न ताणता मुख्य मुद्द्याकडे येतो.

तर येत्या २५ डिसेंबर'१४ ते २ जानेवारी'१५ ह्या कालावधीत मी काश्मीर ट्रिप प्लॅन केलेय. उद्देश फक्त आणि फक्त बर्फ अनुभवणे आहे जो वरचा कालवधी बर्फासाठि एकदम पीक सीजन आहे. सध्या तरी मी एकटाच चाललोय पण जर कोणी ईच्छुक मिपाकर सोबत असेल/असतील तर अजुन मजा येईल. आत्तापर्यंत आपण सगळे एकदिवसीय कट्ट्याच्या निमित्ताने भेटत होतो आता जरा फुल टु धमाल पिकनीक होउन जौदे.

ब्रीफ टुर डिटेल्स खालील प्रमाणे:

१. माणशी ३०-३२ हजार खर्च अपेक्षीत आहे
२. वरील खर्चात दिल्ली-श्रीनगर-दिल्ली परतीचं विमान भाडं, हॉटेल स्टे विथ ब्रेकफास्ट अ‍ॅन्ड डिनर, ऑल ट्रान्सफर्स/पिक अप्स, साईट्सीईंग, ऑल हॉटेल, ट्रान्सपोर्ट, गव्हनर्मेंट टॅक्सेस ईनक्ल्युडेड आहेत
३. विमान भाडं आणि विमान प्रवास कुठुन सुरवात होतोय त्याने कॉस्ट कदाचीत खाली/वरती होउ शकते. मी कुवेत-दिल्ली असं तिकिट बुक केलय
४. स्टे डिटेल्सः १ रात्र हाउसबोट-श्रीनगर, १ रात्र गुलमर्ग, २ रात्री पहेलगाम आणि ३ रात्री परत श्रीनगर (पण ह्या वेळि हॉटेल मधे)
५. श्रीनगर हुन सोनमर्ग आणि युसमर्ग ह्या एकदिवसाच्या ट्रिप वरील खर्चातच समाविष्ट आहेत

वानगीदाखल एक यु ट्युबची आणि फोटोंची लींक देत आहे. ज्याने पोस्ट केली आहे त्या श्री. राजीव ह्यांच्याशी ईमेल नी बोललो आहे ज्याने माझा जायचा हुरप वाढला आहे. कुणी हा व्हिडिओ ईथे नीट पोस्ट करेल काय? माझ्याच्याने होत नाहिये.

Winter in Kashmir

फोटो लिंक: http://www.bcmtouring.com/forum/travelogues-north-india-f61/kashmir-heav...

अधीक माहिती हवी असल्यास व्यनी करा.

डिस्क्लेमरः थंडि सोसत असेल (कारण तापमान कधी कधी -४ ते -१० पर्यंत जातं असं एकलयं) तरच वरील टुरचा विचार करा अन्यथा जेव्हा फोटोसहित वर्णन येईल तेव्हा बर्फात खेळल्याचा आनंद मानुन घ्या *biggrin*

चला तर मग....येताय का??

प्रतिक्रिया

वाचतोय .एकदम धागा बदलला .छान .तू टुअर बरोबर जाणार असं दिसतंय .

कंजूस's picture

13 Jul 2014 - 1:41 pm | कंजूस

एक विचारायचं राहिलंच .तिकडच्या पाककृती कधी बघणार ?'होम स्टे ' घेतल्यास पारंपारिक प्रकार पाहता येतील असं वाटतं .यानंतर हैदराबाद ,चैट्टीनाड ,मंगळूर ,कोळ्हीकोड ,कूर्ग इत्यादी ठिकाणी भेट द्यावी लागणार .

संजय क्षीरसागर's picture

13 Jul 2014 - 2:16 pm | संजय क्षीरसागर

कधी काश्मिर पाहावासा वाटला तर मी `कश्मिरकी कली'ची (ओरिजिनल) सीडी लावतो! भन्नाट अँगल्स मधून घेतलेले शॉट्स, शम्मी-शर्मिलाचा प्रणय, आणि ओपीची एकसोएक गाणी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2014 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंजॉय करा ट्रीप. एकदा मलाही जायचं सालं काश्मिरला फक्त कधी ते माहिती नै.

-दिलीप बिरुटे

पण

काश्मीर.... नो वे...

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2014 - 8:14 pm | टवाळ कार्टा

खास आठवणी पुसायच्या नाहीयेत का? ;)

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 11:37 pm | मुक्त विहारि

आयला,

हे पाकडे आपल्याच बांधवांना काश्मीर मधून बाहेर काढतात असे ऐकिवात आहे....

खरे खोटे राम जाणे....

ट्रिपला शुभेच्छा, इथे गेल्या हिवाळ्यात सरसरीपेक्षा तिप्पट बर्फ पडले होते, त्यामुळे बर्फाचं अजिबात कौतुक राहीलं नाही. काश्मिर बघायचं आहे कधी ते माहीती नाही.

दिपकशेठ, सध्या खिशात तंगी आणि सुट्टीची शाश्वती दोन्ही मोठ्या समस्या माझ्यापुढे आ वासून उभ्या आहेत.
त्यामुळे सध्या काश्मिर काय तर गोवा सुद्धा जाता येणार नाही..

स्पा's picture

16 Jul 2014 - 9:54 am | स्पा

याच कारणाने लेह लडाख बाईक वरुन होता होता राहीलय

यशोधरा's picture

15 Jul 2014 - 9:37 pm | यशोधरा

काश्मीर सहलीला शुभेच्छा :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2014 - 10:17 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/ships/boat-smiley-emoticon.gif