"टी "

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 12:57 pm

असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो.

" जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन
करावा ।"

"अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. "

" तुझा आवाज बराच cheerful येतोय . काही चांगल तर घडल नाही न तुझ्या कारकुनी आयुष्यात ?"

" नाही रे बाबा ."

" आभार देवाचे . कलिंगा ला बसुयात. . अर्ध्या तासात पोहोंच ."

फोन कट .

हे हल्ली नेहमीचच झाले आहे. . "टी " पुण्यात पुन्हा वापस आल्यापासून आमच प्यायला बसण हल्ली फार वाढल आहे अस माझ्या बायकोच म्हणण आहे . ते खर असल्यामुळे मला प्रतिवाद करायला फारसा स्कोप नाहि. 'टी " ला माझी बायको असे म्हणते असे सांगितल्यावर तो चारमिनार चा झुरका घेत बायकाना पावसाळा कसा आकळत च नाही हि त्याची आवडती theory पुन्हा ऐकवायला लागतो. वास्तविक पाहता "टी " ने नुकताच beer चा तिसरा ग्लास संपवताना त्याच्या माजी प्रेयसीची पहिल्या पावसाशी तुलना करणारी कविता मला वाचून दाखवली असते. पण विरोधाभास आणि "टी " हे समीकरण मला माहित असल्याने मला याचे काही वाटत नाहि. आमच्या पहिल्या भेटी पासूनच तो असले भयंकर विरोधाभास घेऊन आदळत राहिला होता .

गरवारे होस्टेल मध्ये येउन काहीच दिवस झाले होते . आणि मला already खूप एकटे एकटे आणि असुरक्षित वाटायला पण लागले होते . असाच एका दुपारी मी बधिर होऊन घराच्या आठवणीचे कढ काढत असताना "टी " धाडकन रूम मध्ये आला . आणि मी अमुक तमुक म्हणून ओळख करून द्यायला लागला . त्याचे आडनाव जरी एका जुन्या ख्यातनाम कॉंग्रेस नेत्याचे असले तरी त्याच्या मते तो कट्टर संघाचा स्वयंसेवक होता . कुठली तरी भारीची jeans घालून आणि हातातल्या पेप्सी च्या कॅन मधून घुटके घेत घेत त्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये आल्याने माझे आयुष्य कसे बदलून जाइल यावर माझे प्रबोधन केले . भारी jeans घालणारा आणि पेप्सी पिणारा "टी " स्वदेशी जागरण मंचाचा कार्यकर्ता झाल्याचे पण नंतर कळले . म्हणजे "टी " आणि विरोधाभास हे नात आमच्या पहिल्या भेटि एवढ जुन.

नंतर " टी " अजून कळत गेला त्याच्या चक्रम पणाने . भारत -पाकिस्तान - बांगलादेश यांचे एकत्रीकरण झाल्याशिवाय मी केस वाढवणार नाही अशी प्रतिज्ञा करून त्याने डोक्याचा चकोट केला होता . जेंव्हा त्याच्या वडिलाना हे कळल तेंव्हा ते रागारागाने त्याला शोधायला आले तेंव्हा मीच त्याना तुम्हाला बघून "टी " स्टोर रूम मध्ये लपला आहे असे सांगितले होते. भारतामधून अल्पसंख्य जमातिना पूर्ण पणे नष्ट करण्यासाठी त्याने त्याच्या होस्टेल च्या रूम मध्येच 'झंझावात ' नावाची संघटना स्थापन केली तेंव्हा पहिल्या बैठकीला पण मी हजर होतोच.

"टी " च्या दोन महत्वाकांक्षा होत्या . पहिली म्हणजे भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आणि दुसर म्हणजे देशासाठी Oscar जिंकण . पहिली आकांक्षा पूर्ण होणे अवघड आहे हे कळल्यावर तो दुसरी पूर्ण करण्याच्या मागे लागला . Mass Communication पूर्ण करून त्याने मुंबई चा
रस्ता पकडला . मग रात्री अपरात्री त्याचे "आज मी नेहा धुपियासोबत Ferrari बसून फिरलो " ,
आज समीरा रेड्डी सोबत cocktail प्यालो, आज एक naked पार्टी ला गेलो होतो असे SMS यायला लागले. "टी" आगा पीछा न बघतो थापा मारतो हे माहित असल्याने आमच्या group मध्ये त्याला कुणीच गंभीरतेने घेतले नाहि.

एका मध्यरात्री "टी " ने फुल टल्ली होऊन फोन केला . रडवेल्या आवाजात बोलत होता ।

" ऐकून घे माझ . मला हि मुंबई मुळीच आवडत नाहीये . जीव घुसमटतो माझा इथे . अख्ख्या शहरात एक घाणेरडा वास येत असतो. नाही सहन होत मला तो . आणि केवढी ती दगदग . दिवस कधी संपतो ते कळतच नाही . मला पुण्यात यायचे आहे . I Hate this crowded dump city . "

"अरे पण तुझ्या field ला पुण्यात फारसा scope नाही . आणि तुझी बायको काय म्हणेल ?"

"ते मला माहित नाही . मला पुण्यात यायचं आहे . बस . तू मला मदत करणार आहेस. "

आणि खरेच "टी " त्याच चंबू गबाळ आवरून पुण्यात आला . अनेक लोकाना हि त्याची professional हाराकिरी वाटत होती . पण "टी " ठाम होता . मी पण माझा अंगभूत आळस सोडून या काळात त्याला बर्यापैकी मदत केलि. अगदी त्याला भाड्याचे घर शोधून देण्यापासून ते नौकरी शोधून देईपर्यंत . या काळात आमचे गोत्र अजून जमले . याला काही कारण होती . मधल्या काळात आमच्या group मधले बाकी मेम्बर्स व्यवसायिक दृष्ट्या बरेच पुढे गेले . मागे पडलेले असे आम्ही दोघेच. ज्याप्रमाणे नेमाडे कोसला मध्ये म्हणतात कि मागे पडलेल्या लोकांनी पण आपला एक समूह तयार करावा आणि पुढे गेलेल्यांना आपणही काही कमी नाहीत हे दाखवून द्यावे. अगदी तसच . "टी " तर मला अनेकदा तोंडावर बोलतो ," हे बघ तू आयुष्यात पुढ जावस अस मला मुळीच वाटत नाहि. तू पण पुढे गेलास तर मी एकटाच मागे राहील ना . आणि तुझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला १० ते ५ कारकुनी आयुष्यच ठीक आहे . कुठे दगदग करत बसतोस ." माझ्या पण "टी " बद्दल पण याच भावना आहेत , मी बोलून दाखवत नाही एवढंच .

"टी " जबरी वक्ता आहे . "टी " भन्नाट कवी आहे . पण "टी " महा आळशी पण आहे .त्यामुळे "टी " ने आता फ़क़्त १०-५ करून आयुष्य काढायचं असा अतिशय योग्य निर्णय केला आहे . पण आपण आता तिशीला आलो आहोत आणि आपल मोठ म्हणता येईल अस काहीच नाही हि जाणीव कधी कधी "टी " ला मधून मधून ढुश्या द्यायला लागते तेंव्हा "टी " मला भेटण्यासाठी फोन करतो. कलिंगा मध्ये २ ते ५ या वेळात happy hours स मध्ये खूप beer प्यायला मिळते म्हणून ऑफिस ला कलटि मारून आम्ही तिथे भेटतो . दारू पिण्यापुर्वीचा " टी " आणि नंतरचा "टी " यांच्यात फारसा गुणात्मक फरक नाही . कारण "टी " दारू न पिताच भयाण बडबड करतो .

"टी " ला स्वतः सोडून कशाबद्दलच प्रेम नाही . त्याला पनवेल बद्दल (त्याच जन्मगाव ) एक अढी आहे . त्याच कारण विचारलं असता तो असे म्हणाला होता कि पनवेल मध्ये इमारतींची दाटी आहे आणि त्यांच्या Flat मध्ये त्यामुळे मुळीच सूर्यप्रकाश येत नाही . त्याच बरोबर पनवेल नाव पण काही बरोबर नाही .

प्रचंड संवेदनशीलता आणि त्यातून आलेलं विलक्षण एकटेपण , हातातून वाळू निसटत चालली आहे हि खुपणारी जाणीव , सातत्य असणार्या कुठल्याही गोष्टीबद्दल एक आदरयुक्त कंटाळा, नौकर्या मधला धरसोड पणा आणि rat race मध्ये न धावता एक आळशी मनमुराद आयुष्य जगायचं या किमान सामायिक कार्यक्रमावर आमच्या मैत्रीच आघाडी सरकार चालू आहे आणि मुख्य म्हणजे ते खूप स्थिर आहे .

मध्येच "टी " ला काही तरी मोठ करण्याचा झटका येतो. मी लिहिलेली स्क्रिप्ट आशुतोष ला खूप आवडली आहे . मी त्याला भेटायला मुंबई ला चाललो आहे असे तो मला सांगतो . राधा कैसे न जले या लगान मधल्या गाण्यात कोरस मध्ये नाचणाऱ्या माणसाच्या हातात घड्याळ दिसत या तुमच्या मोठ्या blunder मुळे तुमच Oscar हुकल हे मी आशुतोष ला कस सांगणार आहे हे हि तो मला सांगतो . एकदा मी नवीन नौकरी साठी दुबई ला चाललो आहे असे सांगून त्याने मला पार्टी पण दिली होती . मी पण घेतली .

पण एका मुलाचा बाप झाल्यापासून "टी " बदलत चालला आहे . त्याच्या आत्मकेंद्री वर्तुळात एका नवीन परीघाने प्रवेश केला आहे . परवा कलिंगा मध्ये दारू पिल्यानंतर तो चक्क सिगरेट नाही प्यायला मुलाला आवडत नाही म्हणुन .

आता "टी " खरच पहिल्यापेक्षा अजून महत्वाचा वाटत आहे . प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडून frustration ला वाट देण्याची एक जागा हवी असते . माझ्यासाठी "टी " हि ती जागा आहे . त्यामुळे माझ्यासारखा प्रचंड ' highly anti social ' (बायको ने मला दिलेली पदवी ) माणूस पण त्याचा फोन आला कि तडक निघतो .

असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

जबरदस्त लिहिलंय. भलतंच आवडलं.

एक सांगायचं आहे - सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.

शुचि's picture

13 Jul 2014 - 6:49 pm | शुचि

असेच म्हणते.

संजय क्षीरसागर's picture

13 Jul 2014 - 1:54 pm | संजय क्षीरसागर

" हे बघ तू आयुष्यात पुढ जावस अस मला मुळीच वाटत नाहि. तू पण पुढे गेलास तर मी एकटाच मागे राहील ना . आणि तुझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला १० ते ५ कारकुनी आयुष्यच ठीक आहे . कुठे दगदग करत बसतोस ." माझ्या पण "टी " बद्दल पण याच भावना आहेत , मी बोलून दाखवत नाही एवढंच .

या परदर्शकतेचं नांव आहे : दोस्ती!

छान लिखाण आहे...खरंच आवडले! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2014 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वगत आवडलं.

प्यारे१'s picture

13 Jul 2014 - 7:32 pm | प्यारे१

छान लिहीलंय.

पण का कुणास ठाऊक सुरुवातीच्या ओळखीनंतरदेखील " .." ह्याच्या सततच्या वापरामुळं हा "टी" आपलासा वाटतावाटता लांब राहतोय.

एकदा एडीट करता येतंय का बघा बरं.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 4:01 am | प्रभाकर पेठकर

सहमत....

वपाडाव's picture

13 Jul 2014 - 8:33 pm | वपाडाव

जमलाय...

राही's picture

13 Jul 2014 - 9:23 pm | राही

व्यक्तिचित्रण छान जमले आहे.

खटपट्या's picture

13 Jul 2014 - 10:56 pm | खटपट्या

आवड्ला !!!

मृत्युन्जय's picture

14 Jul 2014 - 10:35 am | मृत्युन्जय

लै भारी . आवडेश

सौंदाळा's picture

14 Jul 2014 - 10:36 am | सौंदाळा

क्लास

सविता००१'s picture

14 Jul 2014 - 11:26 am | सविता००१

आवडेश

पिंपातला उंदीर's picture

14 Jul 2014 - 12:16 pm | पिंपातला उंदीर

सर्वाना धन्यवाद : )

मराठी कथालेखक's picture

14 Jul 2014 - 12:30 pm | मराठी कथालेखक

छान आहे.

प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडून frustration ला वाट देण्याची एक जागा हवी असते . माझ्यासाठी "टी " हि ती जागा आहे

पण हे काही कळालं नाही कारण वरती फक्त "टी" च व्यक्त होतानाचं वर्णन आहे. टी भेटतो तेव्हा तुम्ही काय बोलता हे पण लिहलंत तर तुमची टी बरोबरची केमिस्ट्री अधिक स्पष्ट होईल.

Maharani's picture

14 Jul 2014 - 12:40 pm | Maharani

Chan lihilay..aavadala..

पिलीयन रायडर's picture

14 Jul 2014 - 1:51 pm | पिलीयन रायडर

छान लिहीलय.. मराठी लेखक म्हणतात तसं तुम्ही नक्की "टी" समोर कसे व्यक्त होता ते समजत नाही म्हणुन तुमची " frustration ला वाट देण्याची एक जागा" टी कसा काय बनतो ते नीट उलगडत नाही.. पण छान लिहीलय..

अत्रे's picture

14 Jul 2014 - 8:52 pm | अत्रे

आहे.

सूड's picture

14 Jul 2014 - 9:02 pm | सूड

मस्तच !!

ब़जरबट्टू's picture

15 Jul 2014 - 9:30 am | ब़जरबट्टू

आवडले...

बाळ सप्रे's picture

15 Jul 2014 - 10:34 am | बाळ सप्रे

मस्त!
थोडासा नानू सरंजामे आठवला ..

बबन ताम्बे's picture

15 Jul 2014 - 11:22 am | बबन ताम्बे

आवडले.

पैसा's picture

1 Aug 2014 - 11:21 pm | पैसा

व्यक्तिचित्र आवडलं.