सत्याचा "बुरखा"फाश

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 7:59 am

नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल. खालील मुद्दे मात्र नक्की लक्षात घेण्यासारखे आहेत.

१. विशिष्ट धर्मियांचा अनुनय. (प्रकरण भाई रशिद, खिलाफत चळवळ, तुर्कस्तानच्या दोन मुल्लांनसाठी हजारो देशबंधुना तुरुंगात सडु द्यायचा अट्टाहास ई.ई.)
२. अत्याचार झालेल्या भगिनीवर्गाला दिलेले सल्ले.
३. स्वतःच महत्त्व कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारकांच्या शिक्षांमधे हस्तक्षेप नं करणं.
४. स्वातंत्र्य फक्त आणि फक्त गांधींमुळे मिळालं ह्याचं शालेय ईतिहासापासुन चालु असलेल पद्धतशिर ब्रेन-वॉशिंग.

धागा मला जुने वाद उकरुन काढायचे आहेत ह्या उद्देशानी काढलेला नाही. गांधीवादी असोत किंवा कट्टर विरोधक असोत, कृपया वाद टाळावा ही नम्र विनंती.

आफळे बुवा: गांधी भाग-१
Charudatta Aphale: Gandhi Part 1

आफळे बुवा: गांधी भाग-२

Charudatta Aphale: Gandhi part 2

आफळे बुवा: गांधी भाग-३

Charudatta Aphale: Gandhi Part 3

गांधींच्या म्हणण्याप्रमाणे "सत्यमेव जयते" म्हणतो. :).

वावरविचार

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

13 Jul 2014 - 11:19 am | खटपट्या

ऐकतोय !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jul 2014 - 10:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद. आपले काय मत झाले ते नक्की कळवा.

खटपट्या's picture

13 Jul 2014 - 10:28 pm | खटपट्या

तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे असेल तर काय म्हणावे कळत नाहीये…
त्यावेळच्या अत्त्याचाराच्या कथा ऐकून सुन्न झालोय
गांधीवाद्यांचे/गांधी प्रेमींचे याबद्दल मत ऐकायला आवडेल.

हाडक्या's picture

15 Jul 2014 - 9:00 pm | हाडक्या

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते.
तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ?

तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

शशिकांत ओक's picture

13 Jul 2014 - 10:58 pm | शशिकांत ओक

मित्रा,
महात्मा गांधीजींची आणखी एक वैयक्तिक शोकांतिका. मुलांची त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली दबून राहिल्याने झालेली घुसमट... बऱ्याच वेळी मी विमाननगरहून आगाखान पॅलेस समोरून जाताना आईला भेटायला आलेल्या मुलाला८- ८ दिवस तेथील फाटकात अडवले जात होते. कस्तुरबा बाहेर येऊन त्याला आत घेऊन गेल्या. नंतर हटवादीपणा करून मद्रासला असताना तो इस्लामी धर्मात गेल्या वर त्याला परत आणायला आईला तिथे जावे लागले होते. आदि आठवून वाईट वाटत राहते..

नेत्रेश's picture

14 Jul 2014 - 8:36 am | नेत्रेश

किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.
गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.

गांधीजींच्यामुळेच कदाचीत भारताची अवस्था पाकीस्तानसारखी झाली नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jul 2014 - 7:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.

नक्की. नुसती जबरदस्ती नाही, लादला गेलाय गांधीवाद.

किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.

गांधीवादाएवढं नक्कीच नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jul 2014 - 12:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गांधीवाद म्हणजे थोतांड वगैरे अप-प्रचार नेहमी करण्यात येतो.महात्मा गांधी ह्या व्यक्तीमागे ईतके लोक- केवळ भारतातलेच नव्हेत तर परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.
फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2014 - 2:39 pm | प्रसाद गोडबोले

फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

चला ,आता उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असल्या कविता मोडीत काढायला हरकत नाही हे पाहुन आनंद झाला !

बाकी

थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत ....हेही नसे थोडके ....!!

सुनील's picture

14 Jul 2014 - 2:55 pm | सुनील

थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत

चला, एका पार्टीच्या विचारसरणीत थोडी प्रगती झाली.

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार? ;)

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2014 - 6:03 pm | प्रसाद गोडबोले

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?

>>> पहिली पार्टी संपुर्ण मतपरिवर्तन होवुन दुसर्‍या पार्टीस सामील झाल्यावर !! :)

ऋषिकेश's picture

15 Jul 2014 - 3:15 pm | ऋषिकेश

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?

अहो त्यांनी गांधीवाद पूर्ण अंगिकारलाय बघितला नाहित?
विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

प्रसाद गोडबोले's picture

15 Jul 2014 - 3:42 pm | प्रसाद गोडबोले

विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

आँ ?

"शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते"

ह्या विचारसरणीचे क्रेडिट गांधींना ?

गांधीच्या आधीपासुन "शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते" ही विचारसरणी अस्तित्वात आहे ...किमान हिंदुंच्यात तरी ! अंगदशिष्टाई... कृष्णशिष्टाई वगैरेंच्या अभ्यास केलेला दिसत नाहीये बहुधा ! साम दाम दंड भेद हेही ऐकले नाहीये काय ? ह्यातही पहिल्यांदा "साम" म्हणजे सामोपचार आहे ! ह्यात गांधीगिरी काही नाही उलट गांधीगिरी म्हणजे केवळ ह्यातील पहिली स्टेप आहे :)

अवांतर : हिटलर आणि दुसरे महायुध्द झाले नसते तर गांधीनी विन्स्टन चर्चिल चे हृदयपरिवर्तन कसे केले असते हे पहायला मजा आली असती !

हाडक्या's picture

15 Jul 2014 - 9:00 pm | हाडक्या

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते.
तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ?

तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

प्रसाद१९७१'s picture

9 Sep 2014 - 2:51 pm | प्रसाद१९७१

परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.

त्यात काय विषेश हो. रजनिश च्या मागे सुद्धा भले भले गोरे लागलेच होते की.
आईन्स्टाईन ला काय जातय अमेरिकेत राहुन काहीतरी बोलायला, त्याला कुठे भोगायला लागणार होते? तो कुठला आकर्षीत होयला, २-४ ठीकाणी तोंडदेखले बरे बोलला तर लागली इथले काँग्रेस्सी नाचायला.

आणि युरोप अमेरिकेत पण अगदी कमी प्रमाणात असली तरी भारतातल्या सारखी निष्क्रीय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेतच की.

पुण्याचे वटवाघूळ's picture

14 Jul 2014 - 2:27 pm | पुण्याचे वटवाघूळ

मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती.

एकदा? जरा मिपाचा अभ्यास वाढवा अशी फुकटची सुचना देतो. मिपावर नथुराम विरूध्द गांधी, अस्तिक विरूध्द नास्तिक, मोदी विरूध्द केजरीवाल अशा विविध धाग्यांचे अनंतवेळा दळण झाले आहे :)

ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

मिपाकरांना आवडणार नाही, पण...

कोण आफळेबुवा?

धन्यवाद.

(आता आमची लायकी काढा. कीप देम कमिंग! :) )

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2014 - 2:40 pm | प्रसाद गोडबोले
बॅटमॅन's picture

14 Jul 2014 - 2:49 pm | बॅटमॅन

ळॉळ =))

अरे मला माहितीये आफळेबुवा कोण आहेत ते. असो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jul 2014 - 5:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एकंदरित पाहता आफळेबुवा मिपाकरांचे 'आपले बुवा' होणार हे निश्चित रे.

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2014 - 5:19 pm | प्रसाद गोडबोले

ळ चा ल होते हे माहीत होते ;) पण फ चा प होते हे आज नव्याने कळाले =))

प्यारे१'s picture

14 Jul 2014 - 5:28 pm | प्यारे१

आपले होणार की बुवा होणार गं माई आज्जी?

आदूबाळ's picture

14 Jul 2014 - 8:44 pm | आदूबाळ

ते सगळं जौंद्या. आफळेबुवा गातात बाकी मस्त. त्यांचा नाट्यसंगीताच्या वाटचालीवरचा एक कार्यक्रम आकाशवाणी पुणेवरून सादर व्हायचा तो फार भारी असे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jul 2014 - 9:59 am | पुण्याचे वटवाघूळ

असे सत्तावन्न आफळे बघितले आहेत आजपर्यंत तरीही गांधींच्या तत्वज्ञानाची महती सर्वदूर पसरलेली आहेच. अशा आफळ्यांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात उत्तम.

मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल या आशेने कित्येक दिवस रोज हा धागा उघडून बघत आहे. पण हाय रे दैवा!!

बाकी अली बंधूंबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मी गांधींना दोष देणार नाही. त्यांची चूक असलीच तर ही असेल की त्यांनी खिलाफत चळवळीबरोबर आघाडी केली. परंतु मला ही राजकीय अपरिहार्यता वाटते. आफळ्यांच्या कीर्तनावर धागा काढण्यासाठीच मी बराच सर्च केला होता, तेव्हा गांधींच्या या भूमिकेला माझ्या द्रुष्टीने योग्य ठरवणारे काही पुरावे माझ्या हाताला लागले होते. ते नेमके आता मिळत नाहीयेत, मिळाले की डकवतो.

बाकीच्या विषयांमध्ये मात्र आफळेंचे मुद्दे मला योग्य वाटतात. एक धोरणी म्हणून गांधी बर्‍याच वेळेस चुकले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल शंका यावी असे बरेच प्रसंग आहेत.
गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल तर बोलूच नये असे बरेच प्रसंग सांगता येतील. मला व्यक्तिशः तो गांधींमधल्या राजकारण्याचा पराभव वाटतो. त्यांनी आपल्या राजकारणातील भविष्यकालीन धोके ओळखलेच नाहीत. त्यांना काँग्रेसमधील जनरेशन-२ ने मोठे केले, आणि त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून घेतली असे माझे मत आहे. जसे आपल्या राळेगणसिद्धीच्या गांधींबद्दल झाले तसे.

बाकी गांधी त्यावेळेस असे का वागले हे सांगणे कठीण आहे. एव्हढे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून मिरवणारे टिळक, पण वेदोक्त प्रकरणात त्यांना देखील फटका बसलाच ना.

बॅटमॅन's picture

15 Jul 2014 - 3:09 pm | बॅटमॅन

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. =)) असो, चालायचंच.

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 3:11 pm | प्यारे१

आँ???

'वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला' म्हणजे नेमकं काय केलं?

फाळणी झाली नसती तर काय झालं असतं त्या अखंड भारतात? अगोदरच विभक्त मतदारसंघ इ.इ. चा धोशा चाललेलाच होता, टिळकांनी सांगितले की तेवढं घेऊन का होईना जर इंग्रजांशी लढणार असाल तर ठीके म्हणून. ते सगळं जर पुढं गेलं असतं तर त्रांगडं झालं असतं विचित्र. त्याजागी फाळणी झालेला का होईना, एक धर्मनिरपेक्ष भारत मिळाला हे गांधीजींचे मोठे क्रेडिट आहे. शेषराव मोर्‍यांच्या 'अखंड भारत का नाकारला' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकात ही भूमिका विस्ताराने आलेली आहे.

ऋषिकेश's picture

15 Jul 2014 - 3:22 pm | ऋषिकेश

+१
टि़ळकांच्यावेळी लखनौ करार करावा लागला होता, विभक्त मतदारसंघ होते. फाळणीनंतर लखनौ कराराच्याही मागे भारत आला. विभक्त मतदारसंघ रद्द झाले, धर्मनिहाय आरक्षण येऊ दिले गेले नाही (व ते भारतात थांबलेल्या मुसलमानांनाही नको होते).

मोर्‍यांचे लेखन ग्रेट आहे. कुरूंदकरांचेही या विषयाचे लेखन वाचनीय आहे.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jul 2014 - 3:53 pm | प्रसाद गोडबोले

धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे काय भाऊ ?

आज हिंदु मेजॉरिती मधे आहेत म्हणुन हा देश धर्मनिरपेक्ष आहे , इतर धर्मिय मेजॉरीतीत असलेला एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा
( आता लगेच तुर्कस्तान म्हणाल , पण तिथल्या खिलाफत चळवळीला मोडुन तो कमाल पाशा मुळे तो धर्मनिरपेक्ष आहे ...ज्या खिलाफत चळवळीला गांधीबाबा समर्थन देत होते ती हो =)) ) ,

धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !

बाकी अभ्यासासाठी : मिझोरम आणि नागालॅन्ड हे तुमच्या धर्मनिरपेक्ष भारतातील अधिकृत / डीक्लीयर्ड ख्रिश्चन स्टेट्स आहेत बरं का !!

धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का ;)

प्रसाद गोडबोले's picture

15 Jul 2014 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का

अं हं ! तेही क्रेडीट देता येणार नाही ! तेव्हाच क्लीन स्वीप फाळणी झाली असती ... हिंदु अ‍ॅबसोलुट मेजॉरीटीत आले असते तर तसे क्रेडीट देता आले असते ... देशाचा तुकडा तोडला ते तोडला शिवाय प्रॉब्लेम सोल्व्ह झाला नाहीच ...प्रॉब्लेम जिथल्या तिथेच !

कुठे आहे समान नागरी कायदा ? कुठे आहे सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? कुठे आहे अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई करायची धमक ? कुठे आहे आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवायची हिंम्मत ? कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ? कुठे आहे निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन करण्याची शक्ती ? येवढचं कशाला ...तर जो काश्मीर तुम्ही नकाशावर दाखवताना तो ही जिंकुन घेता येत नाही ह्याचे खरे कारण देशाबाहेर नाहे तर देशाआतच आहे!

मान्य करा राव , धर्मनिरपेक्षता आमच्यात आधीपासुनच होती ...अगदी सातवाहन काला पासुन ते १८५७ च्या जिहाद मधे खांद्याला खांदा लावुन लढे पर्यंत , गांधीचेकाही क्रेडीट नाही त्याबाबत !!

अवांतर : बाकी फाळणीविषयी क्लीनस्वीप फाळणी व्हाव्ही असे आंबेडकरांचेही मत होते असे ऐकुन आहे , कन्फर्म करुन कळवतो !

धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे. असो, बाकी वाईड बॉलबद्दल बोलायचे तर औरंगजेबाच्या कृत्यांबद्दल अकबराला शिव्या घालण्यापैकी आहे हे.

धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे.

ऑं? म्हणजे गांधींच्या समकालीन विरोधकांमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतीच की काय? अहो ज्या नथुरामने गांधींना मारले त्याचा इतिहास देखील धर्मनिरपेक्षतेचाच आहे, हां पण ती धर्मनिरपेक्षता आणि गांधी/ काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात फरक आहे. तुम्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत असाल तर मात्र आपला पास.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jul 2014 - 4:21 pm | प्रसाद गोडबोले

मात्र ती झाकोळू पाहत होती

>>> कुणामुळे ? हिंदुंमुळे ? फाळणीच्यावेळी भारत +पाकिस्तान अशी फाळणी झालीये ... भारत + हिंदुस्तान + पाकिस्तान अशी नाही ! ह्यावरुनच कळते की धर्मनिरपेक्षता कोणामुळे झाकोलत होती ते !

अकबराविषयी मते बनावताना जोधा अकबर ह्या चित्रपटाचा आधार घेवु नये !आअकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !
(मुघलांच्यात धर्मनिरपेक्ष म्हणता येईल असा एकच माणुस झाला तो म्हणजे दाराशिकोव्ह )!

अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !

भारीच. + १००.
अकबर हा पूर्वायुष्यात फार क्रूर होता. परंतु उत्तरायुष्यात त्याला प्रेषित व्हायची इच्छा होती असे ऐकून आहे. त्यातूनच हे सारे राजकारण झाले असावे.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jul 2014 - 4:54 pm | प्रसाद गोडबोले

ल्ज्याला तुम्ही वाईड बॉल म्हणता आहात त्या बद्दल अजुन थोडे ....

समान नागरी कायदा ?
सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ?
अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई?
आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा ?
तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट?
निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन?

ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ततहाकथित धर्मनिरपेक्ष भारतात करता येत नाहीत ह्याला एकमेव कारण आहे ... एका विषिष्ठ समाजाचा विरोध / रोष होण्याची भीति !

जर भारत खरच धर्मनिरपेक्ष असता तर त्याने नक्कीच असला विरोध न जुमानता न्याय ते केले असते !!

असो.

अवांतर: शेनवॉर्नचा एक अप्रतिम लेगस्पिन चेंडु आठवला ... बॅट्स्मॅनने वाईड बॉल म्हणुन सोडुन दिला तो टप्पा पडल्यावर जवळ जवळ ४५ अंश वळुन मिडल स्टंपवर आदळला ...बोल्ड ! *biggrin*

सोडा राव धर्मफर्मनिरपेक्षता ...आपण क्रिकेटची मॅच बघु :)

बॅटमॅन's picture

15 Jul 2014 - 5:13 pm | बॅटमॅन

याबद्दल नंतर कधीतरी. असो.

हाडक्या's picture

15 Jul 2014 - 9:01 pm | हाडक्या

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते.
तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ?

तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

आनन्दा's picture

15 Jul 2014 - 4:21 pm | आनन्दा

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?

असहमत.
बाकी चलू द्या.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jul 2014 - 4:26 pm | प्रसाद गोडबोले

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?

अहो आता कराची एयरपोर्ट बॉम्बब्लास्ट नंतर खुद्द पाकिस्तानही तालिबानशी लढायला अमेरिकेला साथ देईल अशी चिन्हे आहेत !
तुम्ही घ्या तुमचे पांघरुण ओढुन तोंडावर !
=))

आनन्दा's picture

15 Jul 2014 - 6:31 pm | आनन्दा

आक्षेप याला आहे हो...!

तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला

आनन्दा's picture

15 Jul 2014 - 3:30 pm | आनन्दा

बादवे,
माझ्या शरीराचे तुकडे होऊन मगच फाळणी होईल हे देखील त्याच गांधींचे वाक्य आहे ना? गांधींनी फाळणीला दिलेली मान्यता ही त्यांची राजकीय अप्रिहार्यता होती. आणि त्यानंतर मुस्लिम पाकिस्तानातून धर्मनिरपेक्ष भारतात येऊ इच्छिणार्‍यांची काळजी घेणे हेदेखील एक नेता म्हणून त्यांचे कर्तव्य होते, नाही का? थोडे गूगलून आणखीन थोडे दुवे देतो, जमले तर.

फाळणीबद्दल मला सावरकरांचे जास्त पटते. लोकसंख्येची शांततापूर्ण अदलाबदल झाली की मगच फाळणी करावी असे काहीसे त्यांचे मत होते बहुधा. हिंदू नेत्यांमध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम त्यांनीच मांडला बहुधा.

आनन्दा's picture

15 Jul 2014 - 4:13 pm | आनन्दा

बाकी गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल -

he pahaa

गोपीनाथ सहा बद्दल गांधींची मते इथे वाचायला मिळतील. याच गांधींनी अब्दुल रशीद चा भाई अब्दुल रशीद म्हणून सन्मान केलेला आहे, पुढच्या ६ महिन्यातच. त्याचे पुरावे हवे असल्यास सांगा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jul 2014 - 7:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. Lol असो, चालायचंच.

फाळणीनंतरच्या दंगलीत झालेल्या हिंदुच्या कत्तलीत हिंदुना शांत बसा असं म्हणणारे कोण होते? बलात्कारीत स्त्रियांना असाल तिथे सुखानी राहा किंवा तुम्ही विरोध करु नका असं सांगणारं कोण होतं? आता ह्याचे पुरावे नाहीत असं तुम्ही म्हणु शकत नाही.

हा धागा मुस्लिम विरोधी नाही. हा धागा हिप्पोक्रसी विरोधी आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्रांतीकारकांचे बळी जाऊ देण्याविषयी आहे. स्वातंत्र्याच सगळं क्रेडीट स्वतःला घेण्याला आहे. पद्धतशीर पणे पुढच्या पिढीच ब्रेन वॉशिंग करणार्‍या वृत्ती विरोधी आहे.

असो. चालायचचं. :)

विजुभाऊ's picture

15 Jul 2014 - 4:21 pm | विजुभाऊ

नरहर कुरुंदकरांच्या लेखनाबरोबरच कुरसुंदीकरांचे लेखनही वाचा तेवढाच अभ्यास होईल.
नेफळे नाना हे नेहमीच म्हणत असतात

बॅटमॅन's picture

15 Jul 2014 - 4:25 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

भारताने मिपा वाचूनच धोरणे ठरवली पाहिजेत या मताचा मी अलीकडे झालो आहे.

हाडक्या's picture

15 Jul 2014 - 8:59 pm | हाडक्या

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते.
तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ?

तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

आनन्दा's picture

15 Jul 2014 - 4:26 pm | आनन्दा

खिक्क.
बाकी धागा आता कुठे ग्रिप पकडू लागला आहे. त्याला ब्रेक लावू नका बर का! नाहीतर शतक कसे लागेल?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2014 - 5:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठो...ठो...ठो... कॉलिंग माईसाहेब... धागा त्रिशतकी करायला ह्ये क्ळ्क्ळीचे आमंत्रण दिस्ले नाय काय?

हाडक्या's picture

15 Jul 2014 - 8:59 pm | हाडक्या

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते.
तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ?

तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

बॅटमॅन's picture

16 Jul 2014 - 11:52 am | बॅटमॅन

हा ना, ते बाकी खरंच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2014 - 12:17 pm | प्रसाद गोडबोले

देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

प्रचंड !
गांधींना इतिहासाच्या अअभ्यासक्रमा घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !

आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा ...
हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा

चर्चिल , लिंकन ह्यांचा अभ्यास करावा देषाच्या साठी वट्टेल त्या लेव्हल ला जावुन विजय मिळवण्याची त्यांची वृत्ती पहावी .

अमेरिकेच्या स्वातंत्रयुध्दातील "स्व्तःचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य्जे आपल्याला वसाहत समजतात त्यांच्या विरुध्द युध्द पुकारणे "...आणि आपल्या इथल्या "अहो थोदे तरी स्वातंत्र्य द्या की" ह्या वृत्तींचा तुलनात्मक अभ्यास करावा ...

हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !

आपला आदर्श चाणक्य असला पाहिजे ... चाणक्य !

हाडक्या's picture

16 Jul 2014 - 2:52 pm | हाडक्या

@ प्रगो, या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

रच्याकने, (वादात न पडता) एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो? पंचाईतच की.. *biggrin*

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2014 - 3:08 pm | प्रसाद गोडबोले

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत

>>निराशावाद !इतके निराश होवुन नका हाडुकराव ... सत्याचा नेहमीच विजय होतो आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी ... फरक तो पडता है भै !एक उदाहरण देतो ...एक काळ असा होता जेव्हा लोकं डारविनला यड्यात काढत असत .... पण वारंवार चर्चांमुळे आता डारविनच योग्य होता हे लोकांना पतले आहे ...
जुने विचार विचारसरणी बदलालयला वेळ लागतो ... ह्या ५-५० वर्षात होणार्‍या गोष्टी नव्हेत ...थिन्क अबाऊट १००-५०० इयर्स होरायझन ! आपल्या म्हातारपणा पर्यंत "गांधी तुमच्या आमच्या सारखाच मातीचा माणुस होता त्यांच्या कडुनही चुका , गंभीर चुका झाल्या" इतके जर लोकांना पटले तरी खुप होईल !!

बाकी ...
तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?

ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी || भवभूति ||

हाडक्या's picture

16 Jul 2014 - 8:02 pm | हाडक्या

हाडुकराव

एवढा आदर पाहून सद्गदून आले हो. ;) . असो. निराशावाद नाही हो.

तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?

वाचलाय तो, पण त्याचा संदर्भ इथे देता येईल असे वाटत नाही. (context वेगळा आहे!)

आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी

म्हणजे दूसर्‍याची मते (ती सत्य नाहीत हे आधीच निश्चित आहे ना!) आपण विचारात घ्यायची नाहीत आणि आपण आपले घोडे दामटत रहायचे, असे काय ? ;)

मग चालू द्यात.

गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.!

(बादवे, सातार्‍याला कधी जाताय? पाऊस सुरु झालाय आता, ठोसेघरला पाणी वाढलेलं असणारे :) )

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2014 - 10:40 pm | प्रसाद गोडबोले

भवभुती म्हणतो की जे आमच्या विषयी काहीच्या बाही बोलत असतील त्यांना बोलुद्या कारण आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीये , आमचे विचार समजुन घेणारा कोणीना कोणीतरी समान धर्मा नक्कीच कुठे ना कुठे जन्माला येईल कारण काळ अनंत आहे अन पृथ्वीही विशाल आहे !!

धिस इज एक्झ्यॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से !

बाकी आपलेच घोडे दामटणे हा प्रकार गांधीवाद्यांनीच चालवलाय स्वातंत्र्यापासुन ... उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया किंव्वा दे दी हमे आजादी बिना ख्ड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ...वगैरे ऐकले नाही काय ? जणु काही एका काँग्रेस अन गांधी मुळेच देषाला स्वातंत्र मिळालय ... इतकच कशाला सोप्पं पहा ना आपल्या नोटेवर कोणा एका माणसाचाच चेहरा छापलाय नाही का ! एव्हन सौदी अरेबियाच्या नोटांवरही वेगवेगळ्या राजांचे फोटो असतात !!
सत्याची कास धरणे आणि आपलेच घोडे दामटणे ह्यातील फरक लक्षात आला का आता ?

अवांतर : गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! >>> कोणता प्रश्न ? मला जे इर्रीलेव्हन्ट वाटतं त्याच्या वर मी सहसा प्रतिसाद देत नाही ... अर्थात अफवाद :काश्मीर करायचा मुड नसला तर *biggrin* !!

एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो?

हा तो प्रश्न ..

आणि भवभूती जे म्हणतोय ते तुम्हाला लागू पडत नाही कारण दुसरी बाजू देखील हाच दावा करू शकते हे म्हणायचे होते. (आम्हाला थोडे फार संस्कृत समजतय वो तरी पण भाषांतराबद्दल धन्स.. :) )

तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.) पण हा आमचा मूळ मुद्दा देखील तुम्ही इर्रीलेव्हन्ट समजत असाल तर मग असोच..

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले

तुमचा मुद्दा फार अनक्लीयर आहे राव ... दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये ... जरा उलगडुन लिहिलत तर चर्छा करता येइळ !

दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये

हाच तर कळीचा मुद्दा आहे !

असो, एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो,

गांधींना इतिहासाच्या अभ्यासक्रमात घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !

हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच !

आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा...

हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा

'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना ! :)

हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !

'जग हे वॉरलॅन्ड आहे' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकतो.
तूर्तास या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असे दुसरी बाजू म्हणू शकते ना.!!

आता असोच..

बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.
त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा ..

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2014 - 10:33 am | प्रसाद गोडबोले

हे लॉगिक चुकीचे आहे कारण ...

हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच

गांधीद्वेष हा कोणत्याच अभ्यासक्रमातुन शिकवला जात नाही रादर गांधी हेच कसे स्वातंत्र्यसंग्रामातील मेन कॅरॅक्टर होते हे शिकवले जाते त्यांचा चुका कोठेच शालेय इतिहासातही गांधीवर ६-७ धडे त्यांच्या आधीच्या टिळक, दादाभाई वगैरेंवर १-२ आणि क्रांतिकारकांवर फक्त १ धडा आहे ... मग लोक स्वतःहुन हा माणुस इतका कसा काय देवासारखा असु शकतो मग फाळणी , खिलाफत चळवळीला सपोर्ट , पुणेकरारा आंबेडकरांना वेठीस पकडणे , ३ वेळा नेताजींन्कडुन काँग्रेस मधे हरल्यावर मागल्यादारुन पॉलिटिक्स चालवणे , श्रीयुत.जीनांना प्रधानमंत्री पद ऑफर करणे वगैरे गोष्टी अभ्यासात आल्यावर गांधी किती सामन्य माणुस होता हे लक्षात येते !
प्लीज नोट : सामान्यता लक्षात येणे म्हणजे द्वेष नव्हे !

'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना

अभ्यासवाढवायला आपण कधीही तयार आहे ! फक्त दुसर्‍याबाजुने फक्त कोणत्या रेफरन्स मधे अभ्यास वाढवावा हे सांगावे . पोकळ अहिंसेने अन नुसत्या उपासमारीने जगात काहीतरी घडले आहे अशी एक तरी घटना दाखवुन द्यावी ...आपण त्याचा सविस्तर अभ्यास करु !

त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा .

>>> माझा एक मित्र कटटर गांधीवादी आहे (सध्या आप साठी काम करत आहे.) त्याच्याशीही "दुसरे महायुध्द होवुन ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झाले नसते तर अजुन ५०-१०० वर्षे स्वातंत्य्र मिलाले नसते " ह्यावर एकमत झाले आहे !

असो अजुन कोणीही गांधीवादीशी चर्चा करायला आपली कधीही तयारी आहे !

हाडक्या's picture

18 Jul 2014 - 4:18 pm | हाडक्या

लॉगिक

हॅ हॅ हॅ .. लॉगिक चुकीचे असेल तर असू द्या हो, पण 'लॉजिक' किमान असावे तरी.

पुन्हा सांगतो की तुमच्या मुद्द्यांच्याबद्दल मी सहमत वा असहमत यावर काहीही भाष्य करत नाहीये.. हे मी आधीच स्पष्ट केलंय.

तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.)

माझा मुद्दा तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय' असा होता आणि आहे त्याकडे निर्देश करणारा होता.

बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.

तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.. *lol*

अवांतर : 'दुसरे महायुध्द झाले नसते तर' हा लई इंटरेष्टिंग चर्चा विषय होऊ शकतो असे वाटते आहे.. ;)

----
"It is not coincidence that rubbish and non-sense is usually used to justify Bullshits "
----

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2014 - 4:38 pm | प्रसाद गोडबोले

तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय'

हा माझा अभिनिवेश नाहीये , इतिहासाची पुस्तके चाळुन पहा म्हणजे कळेल की स्वातंत्र्याचा इतिहासा कोणाच्या अभिविषाने भरलेला आहे ते !

तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.

>>>
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! हे लोगिकही चुकीचे आहे ! तर्काधिष्टीत वादविवादात स्वतःचे मत मांडता आले नाही की लोक असल्या पळवाटा शोधतात .( आमचा मित्र गांधीवादी असला तरीही पळवाटा शोध्दणारा नक्कीच नाही ) ....

बाकी ह्यावरुन एक घटना आठवली :
आचार्यांनी जेव्हा वादविवादात बौध्दमतखंडन केले तेव्हा बौध्द भिक्कु असेच सिमिलर लाईन्स वर म्हणत होते र्की "मती दौर्बल्यमेतत न मत दौर्बल्यं " आमच्या मति दौर्बल्यामुळे आमचा पराभव होत आहे , हे आमच्या मताचे दौर्बल्य नव्हे ... पुढल्या पाच पन्नास वर्षात बौध्द धर्म पुर्ण नामशेष झाला मग त्यांना कलाले मती दुर्बल होती की मत ते *biggrin*

इथे घाई कुणाला आहे ? मी आधीच म्हणालो आहे की १००-५०० वर्षाच्या होरायझनचा विचार करा...गांधीचा पोकळ आदर्श(?)वाद पुसला जायला इतका वेळ तर नक्कीच लागेल ... कालोह्यं निरवधिर विपुलाच प्रूथ्वी !!

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते.
तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ?

तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

तुम्ही म.टा. वर पण प्रतिक्रिया देता का हो?

हाडक्या's picture

16 Jul 2014 - 2:33 pm | हाडक्या

हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स ऑफ ईंडिया' वर बहिष्कार आहे आमचा.

तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का? ;)

तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का?

अर्थात. एकच प्रतिक्रिया ३ वेळा टाकलीत म्हणून विचारले मी असे.

हाडक्या's picture

16 Jul 2014 - 7:31 pm | हाडक्या

हा हा हा .. अस्सं होय. वोके वोके.. कारण आम्ही दुसर्‍या प्रतिसादात दिले आहे..

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

अवतार's picture

15 Jul 2014 - 10:51 pm | अवतार

आणि त्या कृतीचे स्वत:ला सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ वेगळे.

सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ आणि वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण ह्यात मुख्य फरक म्हणजे -
पहिल्या पद्धतीत नेहमीच कोणातरी एका व्यक्तीवर किंवा गटावर सर्व अपयशाचे खापर फोडले जाते आणि ज्यांचा झेंडा खांद्यावर घेतला असेल त्यांना संपूर्ण निर्दोष ठरवले जाते.

तर दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती आणि गट यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडून तुलनात्मक विश्लेषण केले जाते.

गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले. मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !
ह्या कृतीचा अर्थ
ज्यांना कळतो त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही;
ज्यांना कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही;
आणि जे कळूनही न कळल्यासारखे दाखवतात त्यांना स्पष्टीकरणाने काही फरक पडत नाही.

सत्याच्या झेंड्याचा रंग हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो. म्हणूनच त्या रंगात इतर सर्व रंग सामावलेले असतात.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2014 - 11:41 am | प्रसाद गोडबोले

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !

मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !!!!!

असेल, असे पण असू शकेल.

बाद्वे,

"गांधी" नावाच्या सिनेमांत हा प्रसंग दाखवला होता का?

आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण या धाग्याचे शतक काही होत नाही. मी याबद्दल मिपाच्या अनुभवी सदस्यांचा जाहीर धिक्कार करतो.

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 2:57 am | प्यारे१

तसा अनुभव कमीच पण तरीही आमच्याक्डून हा प्रतिसाद हातभार म्हणून घेण्यात यावा.
धन्या-वाद... आपलं धन्यवाद! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 7:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धागा शतक व्हायसाठी काढलेला नाही.

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 11:24 am | मुक्त विहारि

जय गांधी... जय नेहरु...

नावातकायआहे's picture

19 Jul 2014 - 10:38 pm | नावातकायआहे

सगळ्यांचीच जय!
फ्क्त जय गांधी आणि जय नेहरुच का?

आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर "
किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :)
माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :-
गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे.
1
चारुदत्त आफळे किर्तन करताना.
2
बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल.
3

जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले.
{वाडीकर} :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Sep 2014 - 12:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल.
रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :)
यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :-
https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2014 - 12:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दुव्याबद्द्ल धन्यवाद :)

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 1:01 am | प्रभाकर पेठकर

आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2014 - 2:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.
अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :)
ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रसाद१९७१'s picture

9 Sep 2014 - 2:45 pm | प्रसाद१९७१

भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे.

१९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते.
राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते.

अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले.

जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये.
ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते!

(मिरजकर) बॅटमॅन.

रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते!
अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :)

बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ?
http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2014 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर

'9 hours to Rama' हा १९६३ सालचा चित्रपटही नथुराम गोडसे ही मध्यवर्ती भूमिका असलेला आहे.

अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2014 - 9:52 pm | प्रभाकर पेठकर

तू नळीवर आहे.

जोडणी: http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&u...