नायगारा - एक सुंदर रंगीत धबधबा

अमित खोजे's picture
अमित खोजे in भटकंती
1 Jul 2014 - 4:49 am

कोणीही न्यूयॉर्क ला आले कि त्यांची फिरण्याची ठिकाणे तशी ठरलेली असतात. न्यूयॉर्क शहरामधली ठिकाणे, उत्तरेला बॉस्टन, नायगारा धबधबा, थाउजंड आयलंड, तर दक्षिणेला फिलाडेल्फिया, वॉशिंगटन डी सी इत्यादी. त्यातल्या नायगारा ला मात्र माझे बर्याच वेळेला जाणे झाले. अगदी मोजायचे झाले तर ११ वेळा. मला स्वतःला फिरायची भारी आवड. ज्या नवीन ठिकाणी जाईन तेथिल आजूबाजूची ठिकाणे मी आवर्जून पाहायला जातो. शिक्षण आणि नोकरी निमित्ताने बर्यापैकी फिरणे झालंय. पण अजून काही हा छंद पुरा झालेला नाही.

आता न्यू यॉर्क मध्ये तशी बरीच मंडळी येउन फिरून गेली असणार. त्यांनी नायगारा बद्दल लिहिलेच असेल त्यामुळे आपण कशाला लिहायचे असा विचार करून आळसात लिहिणे टाळले. पण एकदा सहज म्हटले शोधून बघावे तर हा धागा सापडला.

परंतु यातले फोटो काही दिसले नाही. कुठेतरी वाचलेलं आठवलं कि गुगल वर फोटो अपलोड न करता मिसळपाव वरच टाकले कि ते आता दिसत नाहीत म्हणून. म्हटले ठीक आहे आता पहिले गुगलबाबा वर टाकावेत म्हणजे सर्वांना दिसतील.

असो. सुरुवात फारच लांबलचक झालीये उगाच.

तर मी राहतो तिथून नायगारा साधारण साडे चारशे मैल आहे. ८ तास ड्राईव्ह गाडीतला जी पी एस कोकलून सांगत होता. मध्ये विश्रांती घेत घेत साधारण ९ तास लागणार तर. बरोबर बायको आई बाबा भाचा एवढी मंडळी होती. सुट्टी काढणार नसल्याने शुक्रवार संध्याकाळी - रात्री प्रवास, शनिवारी धबधबा आणि रविवारी परत असा बेत ठरवला. मध्ये रॉचेस्टरला मित्र राहत असल्याने त्याच्याकडे उतरण्याचे ठरवले. रोणकोणकोमा - न्यू योर्क - स्क्रेंटन - बिंगहँमटन - सिराकुस - रॉचेस्टर आणि मग नायगारा असा प्रवास होता.

Map

मे महिन्यातला शेवटचा शुक्रवार असल्याने नेमका ऑफिस मध्ये पिझ्झा डे होता. तो मोह न आवरल्यामुळे डबा तसाच ठेऊन पोटोबा पिझ्झाने तृप्त झाले. संध्याकाळी लवकर ५.३० ला घरी आलो. आईने आणि बायकोने सगळे सामान भरूनच ठेवलेले असल्याने चहा पिउन निघायला फारसा उशीर होणार नव्हता. तेवढ्यात बायकोच्या नजरेस भरलेला डबा पडला.

"डबा परत आणला?"
"अगं हो! आज ना . . ऑफिस मध्ये ना . . " घाबरत घाबरत स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करणार तेवढ्यात तिने ओळखलेच..
"पिझ्झा खाल्ला असणार ऑफिसात! सांगून सांगून थकले आता. जरा त्या ढेरीकडे बघा! काही फायदा नाही त्या जिम चा. जातोच कुठे म्हणा आम्ही? आम्ही मेलीनं सकाळी सकाळी मर मर कामं करत तुम्हाला डबा करून द्यायचा आणि तुम्ही तिकडे पिझ्झे हाणायचे . . . " आणि मग पुढे जे सर्वांच्या घरी होते ते सर्व डायलॉग सुरु झाले. विशेष म्हणजे आज त्यात मातोश्रींनी हि भाग घेतला आणि आमच्यावर तोंडसुख घेतले. आम्ही त्या ऑफिस मधल्या पिझ्झाला आणि तो पिझ्झा आणणाऱ्या टीम ला खडे फोडत चहा संपवला. शेवटी तो परत आणलेला डबा गाडीत मी रात्रीचे जेवण म्हणून खायचा असा निर्णय सर्वानुमते घेऊन आम्ही प्रवासाचा श्री गणेशा केला आणि गाडी रस्त्याला लागली.

ShriGanesha

जाताना न्यू यॉर्क मधून जायचे असल्याने गर्दीत अडकणार याची खात्री होती. आणि जी पी एस ने दाखवलेला ८ तासामध्ये अजून २ -१ तासांची सहज भर पडणार याचीही कल्पना होती आणि तसेच झाले. वॉशिंगटन पूल आणि फोर्ट ली येथून जाताना किमान १:३० तास जेमतेम ५ मैल चे अंतर पार करण्यात गेला.

Traffic

Bridge

मात्र एकदा मुख्य रस्त्याला लागल्यावर फारसे कोणी मध्ये आले नाही.

Road hit

अपवाद टोल नाक्यांचा होता. न्यू यॉर्क मध्ये टोल फार महाग आहेत. अगदी $७.५ पासून ते $१३. ०० पर्यंत लुटायला कमी करत नाहीत. शहराबाहेर मग अगदीच २ ते ३ डॉलर चे टोल नाके आहेत. हे सर्व टोल भरून आम्ही पुढे निघालो.

Toll

दर ३ तासांनी विश्रांती साठी थांबायचे असा माझाच स्वतःला घातलेला दंडक असल्याने आम्ही २ थांबे घेतले आणि साधारण रात्री २ च्या सुमारास रॉचेस्टर ला मुक्कामी पोहोचलो. चांगलाच थकलेलो असल्याने मी ताबडतोब घोरायला सुरुवात केली. माझ्या शेजारी झोपलेला मित्र बिचारा रात्री बराचवेळ माझ्या घोरण्याने जागा होता. सकाळी उठल्यावर बायकोने फटकारले - "किती घोरत पडला होतात हो तुम्ही! आम्हाला अगदी आत पर्यंत ऐकू येत होते. त्या किरणची झोप झाली नाहीये बघा." आम्ही काय बोलणार? शांतपणे "चहा?" एवढाच प्रश्न विचारून ब्रश करायला पळालो.

नाष्टा झाल्यावर घराबाहेर येउन मस्त एक छान चक्कर मारून आलो. मित्राचे घर खरंच फार सुंदर होते. अगदी आपण चित्रातली घरे जशी काढून रंगवतो तसेच दिसत होते.

Toll

Toll

सगळ्यांचे आवरून झाल्यावर सकाळी १० ला नाश्ता करून निघालो ते दिड तासात नायगारा गाठले. पार्किंगसाठी $५ देऊन आम्ही सर्व ऑब्शर्वेशन टॉवरच्या दिशेने चालू लागलो. जाताना एका सुंदर बगीच्यातून जायचा रस्ता आहे.
इतक्यावेळा पाहूनसुद्धा त्या पांढर्या पाण्याच्या दर्शनाने मन कसे प्रफुल्लीत होऊन गेले आणि प्रवासाचा सगळा शीण एका क्षणात नाहीसा झाला.

नय्गरा

न

न

तिकिटे घेऊन आम्ही ऑब्शर्वेशन टॉवर वर जायला सुरुवात केली. उजवीकडे अमेरिका आणि कॅनडा यांना जोडणारा पूल दिसत होता आणि डावीकडे नायगारा धबधबा.

न

मेड ऑफ द मिस्ट

हे बोटीच्या फेरीचे नाव आहे. १८४६ मध्ये नायगारा नदीवरून उतारूंची वाहतूक करण्यासाठी छोट्या वल्ह्वणार्या बोटी होत्या. तेव्हा मोठ्या आकाराची हि बोट व्यावसायिकरीत्या चालवणे फायद्याचे ठरेल हे तिथल्या व्यावसायिकांना जाणवले आणि त्यांनी हि बोट सुरु केली. यामधून उतारू, टपाल, मध्यम आकाराचे मालाचे गठ्ठे हि वाहतूक चाले. १८४८ मध्ये नदीवर पुलाचे काम सुरु झाले आणि या धंद्याला उतरती कळा आली. पण हार न मानता या बोटीचे नवीन ब्रान्डिंग करून पर्यटनासाठी हिच वापर सुरु केला तो आजतागायत.

न

हा पुलवरुन घेतलेला फोटो.

न

बोटीत जायला तिथे असा धक्का तयार केला होता. पुलावरून उतरून खाली आले कि या रस्त्यावरून गोल चक्कर मारून त्या डावीकडच्या छोट्या घरात जायचे आणि तेथूनच बोटीमध्ये.
न

बोटीत चढायच्या अगोदर आम्हाला निळे निळे रेनकोट घालायला दिले. सगळ्यांना ते घालताना खूप मजा आली. कितीतरी दिवसांनी मला स्वतःला रेनकोट घालायला मिळत होता. अगदी शाळेची आठवण आली.
धक्क्यावरून जाताना .. त्या समोरच्या तंबूत रेनकोट वाटप चालू होते. छोटा धनु तर बोट बघून उद्याच मारू लागला. बोटीत बसून धबधब्याजवळ जायचे हि कल्पनाच त्याला पचनी पडत नव्हती.
न

हा तो ऑब्शर्वेशन टॉवर. या टॉवरवरून खाली यायला लिफ्ट आहे. काही सेकंदात आपण तळाशी पोचलेलो असतो.

न

आता आम्हाला धबधब्याचे वेध लागले.

न

तेथे पोहोचताना पाण्याचे एवढे तुषार उडत होते कि बहुतेकांनी कॅमेरा खिशात ठेऊन दिला. मी आपला लेन्स वरती हात ठेऊन जेवढे जमेल तेवढे फोटो काढत होतो. शेवटी हॉर्स शु च्या म्हणजे मुख्य धबधब्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर एक वेळ अशी आली कि सगळीकडे नुसते पाण्याचे तुषारच होते. मग तिथे एक व्हिडीओ घेतला. (व्हिडीओ इथे दिसत नसेल तर हि लिंक असू द्यात. http://youtu.be/4y1VGkQeZeY )

बोटीतून बाहेर पडल्यावर मग प्रचंड भूक लागलेली होती. आम्ही नायगारा बागेतून बाहेर पडलो आणि समोरच असलेल्या भल्या मोठ्या इमारतीच्या दिशेने चालू लागलो. ते एक मोठे हॉटेल होते. आणि तळमजल्यावर कॉन्टीनेन्टल जेवणाचे छोटे ठेले. ठेलेच म्हणायचे फक्त आतमध्ये होते. हे फक्त रोख पैसा घेतात. इथे क्रेडीट कार्ड चालत नाही. इथे जेवणाचे तसे बरेच पर्याय उपलब्ध आहेत इंडिअन चायनीज थाई वगैरे. आणि किंमत पण बर्यापैकी स्वस्त. $८ मध्ये भारतीय थाळी. त्यात भाजी दोन रोटी आणि वरण भात. दुपारच्या जेवणाला अगदी पोट भरून पुरले.

तेथून मग आम्ही मुख्य हॉर्स शु धबधब्याकडे जायला लागलो. गोट बेटावर जाण्याचा रस्ता या पुलावरून जातो. या बेटावर गाड्याही जाऊ शकतात.

न

एकंदरीत जागेचा अंदाज यावा म्हणून खालील चित्र जालावरून साभार. पुलावरून आम्ही 'गोट आयलंड' वर जाऊ लागलो. या छोट्याश्या बेटामुळेच नायगारा नदीचे दोन भाग आणि पर्यायी दोन धबधबे होतात. १) अमेरिकन फॉल्स २) हॉर्स शु फॉल्स. हॉर्स शु फॉल्स हा मुख्य धबधबा. येथेच वरील व्हिडीओ शूट केला आहे.

न

वरील चित्रामध्ये अमेरिकन फॉल्स च्या उजवीकडे जे पिवळ्या रंगात पट्ट्या दिसताहेत त्या म्हणजे 'केव्ह ऑफ द विंड्स' चा बोर्डवॉक. मुख्य बेटापासून खाली त्या पिवळ्या शिड्यांपर्यंत यायला त्यांनी एक बोगदा इंग्रजी एल (L) आकारासारखा खोदला आहे. ३ मजूर तो बोगदा हाताने १ वर्ष खोदत होते. अर्थात आपल्या मनात पहिला प्रश्न येणारच कि हाताने का? तर त्याचे उत्तर म्हणजे त्यांनी सुरुंग वापरला असता तर आजूबाजूच्या मातीच्या थरांना देखील धक्का पोहोचण्याची शक्यता होती. त्यातून नायगारा हे राष्ट्रीय पर्यटन स्थळ.

न

'केव्ह ऑफ द विंड्स' मध्ये जायचे म्हणजे आपल्या मुळशीच्या धबधब्याखाली जाऊन भिजायचा आनंद लुटण्यासाराखेच. इथे तुम्ही अमेरिकन धबधब्याच्या अगदी जवळ जाता. त्यांनी पिवळ्या रंगाचे रेनकोट दिलेले असतात पण त्यांचा काही एक उपयोग होत नाही. पाण्याचे तुषार सगळीकडे असल्याने इंद्रधनुष्याचे मात्र विलोभनीय दर्शन घडत होते.

न
--
न

न

न

न

जाताना आम्हाला सीगल पक्ष्यांची बरीच घरटी दिसली. पक्ष्यांनाहि माणसांचे फारसे काही वाटत नव्हते.

न

त्यातल्या बर्याच अंड्यांमधून पिल्ले पण बाहेर आली होती.

न

भरपूर भिजून झाल्यावर मग आम्ही टेरापिन पॉईन्टकडे मोर्चा वळवला. हा पॉईन्ट हॉर्स शु फॉल्सला अगदी लागून आहे. येथे फिरायला भरपूर मोठी जागा आहे. समोरच कॅनडा दिसतो.

रात्री नायगारा वरील रंगीत दिव्यांची उधळण बघायला यायला बहुतेक जाणकारांनी सांगितले होते त्यासाठी परत यायचे ठरवले. सुरुवातीला मला वाटले कि काय फक्त एखादा पांढरा फोकस टाकतील त्या सो कॉल्ड नाचणाऱ्या कारांज्यांसारखे. पण रात्री एक वेगळेच दृश्य आमची वाट बघत होते. ऑब्झर्वेशन टॉवर वर येउन आम्ही बघितले तर अगदी रंगांची मुक्त उधळण ज्याला म्हणणार तो प्रकार चालू होता. कॅनडाच्या बाजूने तीनही धबधब्यांवर रंगीत प्रकाशझोत सोडले होते आणि ते सारखे रंग बदलत होते.

न

न

हे समोरील कॅनडाचे दृश्य.

न

हे रंगीत पाण्याचे एवढे भव्य दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. आणि त्या तृप्तीतच आम्ही परत फिरलो. मी मनोमन निश्चय केला १२ व्या फेरीच्या वेळेस रात्रीचा नायगारा कधी चुकवायचा नाही.

प्रतिक्रिया

सुंदर चित्रे व वर्णन. ११ वेळा जायचे म्हणजे फार पेशन्स पाहिजे. रात्री रंगीबेरंगी प्रकाशझोत सोडल्यानंतर तुम्ही टिपलेले चित्र फारच चांगले आले आहे. स्कायलॉन टॉवरचेही सुरेख आलेय.

चौकटराजा's picture

1 Jul 2014 - 8:30 am | चौकटराजा

रात्रीचा नायाग्राचे फटू लय झ्याक ! हे स्लो शटरने काढताना ट्रायपोड लागतो.हे त्याशिवाय काढलेयत का ? नायग्राच्या धबधब्या मागो टनेल आपल्या समोर फॉल दिसतो या जागी गेला होता का ? तिथला फोटो इथे दिसत नाहीय म्हणून हा
प्रश्न !

एस's picture

1 Jul 2014 - 10:34 am | एस

शेवटचे तीन फोटो तर लय भारी आहेत. आवडला लेख.

अमित खोजे's picture

1 Jul 2014 - 10:16 pm | अमित खोजे

नाही हो. तुम्ही बहुदा कॅनडा च्या बाजूने जो टनेल आहे त्याची गोष्ट करत असाल.
मी फक्त अमेरिकेच्या बाजूनेच बघितलाय :(

किसन शिंदे's picture

1 Jul 2014 - 8:46 am | किसन शिंदे

वृत्तांंत आणि फोटो दोन्ही आवडले. रात्रीतल्या नायगराचा फोटो आणि हॉर्स शु फॉल्सचा विडिओ जबरदस्त आहे.

पैसा's picture

1 Jul 2014 - 9:50 am | पैसा

मस्तच लिहिलंय! फोटो पण सुंदर! तेवढे ते वॉटरमार्क जरा लहान करता आले तर बघा!

फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख.

अनुप ढेरे's picture

1 Jul 2014 - 10:17 am | अनुप ढेरे

छान आलेत फोटो. वॉटरमार्क खूप लहान झालेत. अजून मोठे करा. छान दिसतील फोटो.

अमित खोजे's picture

1 Jul 2014 - 10:21 pm | अमित खोजे

वॉटर मार्क वरून आम्हाला शिव्या बसणार याची कल्पना होतीच. :)
परंतु हे शेवटचे ३ फोटो या ट्रिप मधले नाहीयेत. हे मी पूर्वीच काढले होते आणि तेव्हा त्यांना वॉटर मार्क लावला होता. त्यांची ओरीजनल NEF फ़ाइल सापडताना नाकी नऊ आले. म्हटले जाऊदे असेच टाकूयात. ^_~

मधुरा देशपांडे's picture

1 Jul 2014 - 1:49 pm | मधुरा देशपांडे

रात्रीचे फोटो तर फारच सुरेख.

प्यारे१'s picture

1 Jul 2014 - 2:00 pm | प्यारे१

मस्त वॄ. छान फोटो.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jul 2014 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

मनमोहक रंगांची उधळण, निसर्गाचा लोभसवाणा रुद्रावतार आणि आपली लेखनशैली तिन्ही गोष्टींना मनापासून सलाम.

नायगाराचे दर्शन कॅनडाच्या तीरावरून घेतले आहे. तेही दिवसा. रात्रीचा नायगारा आता पुढच्या ट्रिप मध्ये. अगदी ठरवून.

अमित खोजे's picture

1 Jul 2014 - 10:22 pm | अमित खोजे

कराच अगदी. मी सुद्धा ११ पैकी फक्त ३ वेळा रात्रीचा नायगारा बघितलाय.
आता पुढच्या वेळेला मात्र नक्कीच रात्रीचा नाही चुकवणार

निखळानंद's picture

1 Jul 2014 - 2:21 pm | निखळानंद

भिजलो अगदी !! *good*

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jul 2014 - 2:33 pm | बिपिन कार्यकर्ते

फार सुंदर आहे नायगारा! तुमचे फोटोसुद्धा मस्त आहेत.

ही आमची भर...

Fall1

Fall2

उत्तम चित्रे. सुंदर वृत्तांत. न्यूयोर्क ते नायगारा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का?

अमित खोजे's picture

1 Jul 2014 - 10:29 pm | अमित खोजे

बरे झाले तुम्ही हा प्रश्न विचारला. माझ्या लेखामध्ये मी लिहिणारच होतो पण शेवटी शेवटी विसरून गेलो.

हि घ्या लिंक: http://www.gotobus.com/

न्यूयॉर्क वरून म्हणजे अगदी शिटी मधून हि बस निघते. सकाळी ६ ला. दोन दिवसाची ट्रीप असते. राहण्याचा खर्च त्यांचा. जेवण आपले. नायगाराच्या हिल्टन हॉटेलात उतरवतात. अगदी झकास. खाली त्यांची रेटची माहिती. तसे म्हटले तर अगदी स्वस्त. शिवाय दोघांवर तिसरा फुकट.
http://www.taketours.com/niagara-falls-ny/local-tours-from-new-york/

जेव्हा तिघंजण असाल तेव्हा तर नक्कीच या बसने जा. चायनीज लोकांनी चालवलेली हि सर्विस आहे. फक्त त्यांना दर माणशी आणि दर दिवशी टीप द्यावी लागते ती बघून घ्या.

राघवेंद्र's picture

2 Jul 2014 - 11:06 pm | राघवेंद्र

मी Amtrak ने हि सहल २८-३० जुन दरम्यान केली. रेल्वे प्रवास दिवसा करावा लागतो, थोडा कंटाळवाणा आहे पण आरामदायक आहे. तिकिट थोडे अगोदर काढल्यास One Way $62 पडते.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2014 - 2:44 pm | श्रीगुरुजी

सुंदर फोटो आहेत. फोटो बघून पूर्वस्मृती जागृत होउन नॉस्टॅल्जिक झालो. मी १९९५ मध्ये डेट्रॉईटमध्ये वास्तव्यास असताना सर्व कुटुंबियांबरोबर नायगरा कॅनडा व अमेरिका अशा दोन्ही बाजूने पाहिला होता (कॅनडाच्या व्हिसाची फी प्रतिमाणशी ५५-६० डॉलर्स होती. नुसत्या व्हिसासाठीच माझे जवळपास ३०० डॉलर गेले होते). अजूनही धबधब्याचे दृश्य डोळ्यांसमोर आहे. केव्ह ऑफ द विंड्ज व मेड ऑफ द मिस्ट या दोन्ही राईड घेतल्या होत्या. एकंदरीत सहल खूप खर्चिक होती, परंतु नायगरा धबधबा हा डोळ्याचे पारणे फिटविणारा आहे हे निश्चित!

अमित खोजे's picture

1 Jul 2014 - 10:42 pm | अमित खोजे

कॅनडाचा व्हिसा असूनही या न त्या कारणाने अजून एकदाही मी कॅनडाच्या बाजूने बघितलेला नाही. न्यूयॉर्क ते नायगारा अशी ट्रीप तसे म्हटले तर खर्चीक आहेच. आणि शिवाय माणसे जास्त असली कि दर माणसाचे प्रत्येक राईडचे तिकीटसुद्धा वाढते. पण तो धबधबाच एवढा सुंदर आहे कि हे सगळे पैसे अगदी सार्थकी लागतात.

आपल्याकडे असे स्पॉट का छान तयार करत नाहीत कोण जाणे .

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jul 2014 - 2:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

कामानिमित्ताने कॅनडाला २-३ वेळा जाणे झालेय त्यात एकदातरी नायगाराला भेट हा कार्यक्रम होताच.दिवसा /रात्री ,मेड ऑफ द मिस्ट बोटीतुन,हेलिकॉप्टरने आणि स्कायलॉन टॉवरवरुन कुठुनही हा मस्तच दिसतो आणि नायगारा फ्युरी ही फिल्म बघताना पायाखालची जमीन जेव्हा प्रत्यक्ष हादरते तेव्हा भले भलेही किंचाळुन मागे सरतात.माझ्यामते तरी कॅनडाच्या बाजुने नायगारा बघण्यात जास्त गंमत आहे.(शिवाय टोरांटो शहर बोनस म्हणुन बघता येतेच )

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2014 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आहेत फोटो आणि वर्णन. फार्फार पूर्वीच्या सफरीची आठवण ताजी झाली. धबधब्यावरची रात्रीची रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण विसरता विसरत नाही !

सूड's picture

1 Jul 2014 - 4:54 pm | सूड

मस्त!!

सखी's picture

1 Jul 2014 - 5:25 pm | सखी

छान फोटो आणि वर्णन! नायगरा खरचं अनुभववा, दिवसाचा आणि रात्रीचाही - न विसरता येणारा अनुभव.

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2014 - 5:55 pm | संजय क्षीरसागर

इतकं सुरेख आणि साधं प्रवास वर्णन, एकसोएक फोटो आणि विडिओ पाहून तुमच्या बरोबरच सहल करतोयं असं वाटलं. अनेक धन्यवाद!

अमित खोजे's picture

1 Jul 2014 - 10:46 pm | अमित खोजे

धन्स संजयजी. (शिकतोय हळू हळू मिपाचे शब्द :-D ) तसं म्हटलं तर माझे मिसळपाव वरचे फक्त दुसरे लेखन.
परंतु तुम्हाला आवडले हे पाहून आनंद वाटला! *YES*

इशा१२३'s picture

1 Jul 2014 - 8:20 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो!

मदनबाण's picture

2 Jul 2014 - 6:37 am | मदनबाण

वाह... सुंदर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल

देशपांडे विनायक's picture

2 Jul 2014 - 9:16 am | देशपांडे विनायक

अप्रतिम वर्णन आणि चित्रे !!

हे सारे पाहणे नशिबी असावे लागते नाहीतर माझा कोरा करकरीत पासपोर्ट चाळून

व्हिसा देणारी ती बाई '' पहिल्यांदाच देशाबाहेर जाता आहात तर इतक्या लांब कशाला

जाता '' म्हणाली नसती . '' जवळ कुठेतरी जाऊन या मग पुन्हा APPLY करा '' असे म्हणून

तिने माझ्या पांढऱ्या दाढीचा मन राखला .

प्रत्यक्ष पाहिलेला नाही.
आणि बहुतेक वेळा तेच ठराविक फोटो दाखवले गेले. पहिल्यांदाच व्यवस्थित माहिती कळली आणि फोटोही अतिशय उत्तम आले आहेत.
रंगांमधले सर्वात आवडले. लाँग एक्स्पोजर फार छान जमलं आहे.

अमित खोजे's picture

2 Jul 2014 - 10:05 pm | अमित खोजे

तेच तेच ठराविक फोटो मी सुद्धा पहिले आणि काढले सुद्धा होते. त्याचे कारण असे कि अमेरिकेमधून ओब्शर्वेशन टॉवर वरून फक्त एकाच कोनातून धबधबा बघता येतो. त्यात सुद्धा मुख्य हॉर्स शु धबधबा दिसतच नाही. त्यामुळे सगळ्यांचे अगदी सगळ्यांचे फोटो एकसारखेच येतात. माझे पण आले होते. या वेळेला मी मुद्दाम फेरीवर असताना टॉवरचे आणि केव्ह ऑफ द विंड चे फोटो काढले. आणि धाडस करून (कॅमेरासाठी हो. . पाण्याचे तुषार एवढे असतात कि कॅमेरा पूर्ण भिजून जातो. ) एक व्हिडियो पण रेकॉर्ड केला.

भाते's picture

2 Jul 2014 - 8:37 pm | भाते

माहिती सुरेख आणि फोटो अप्रतिम.

फोटो आवडले.
आमच्या सहलीची आठवण झाली

अमित खोजे's picture

4 Jul 2014 - 2:34 am | अमित खोजे

तुमचा लेख आत्ता वाचला. खूपच सुंदर लिहिला आहे तुम्ही तर. सगळ्यात पहिले जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हासुद्धा चायनीज माणसांच्या हाती स्वतःला सोपवूनच गेलो होतो. मजेशीर लिहिला आहे लेख तुम्ही. आवडला!

ऋषिकेश's picture

4 Jul 2014 - 9:51 am | ऋषिकेश

:) आभार

जुइ's picture

5 Jul 2014 - 3:57 am | जुइ

चार वर्षांपूर्वी आमच्या नायागरा सहलीदरम्यान हेलिकॉप्टर राइडमधून काढलेले काही फोटोज.