कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
26 Jun 2014 - 9:05 pm

माझे हवाईदलातील दिवस ब्लॉगची लिंक


“...बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्धरिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली...
...‘साहेब,अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला,15 ऑगस्ट, 26 जानेवारीअन पार्टीच्या वेळी ‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्यावेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश”म्हणून बोळवण केली जाते...’
...मलात्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली. नंतरच्यासर्व्हीसमधे कधी कधी मला माझे काम असेच बँड पथकासारखे, हवाई चढाईच्या कामापासूनदूर, लांबून ‘छान,वा वा, शाबाश’म्हटले की संपले असा खाक्याशी जुळणारे वाटले!
...तो रापलेला चेहरा, "सर,सैन्याचा बँड सुमधुर गाण्यांसाठी नाही, रणांगणातील भीषण कत्तलीच्या, प्रचंडआवाजाच्या व धुळीच्या डोंबामधून आपली सेना लढतेय. ‘तुम आगे बढो’याची जाणीव करून द्यायला उपयोगात आणला जातो.’ असा संदेश देऊन जातअसे.”

भाग- 1

कधीकधी आपण काय करतोय याचा परिणाम काय होईल याची शुद्ध नसल्याने मजेशीर घटना घडतात व अनेकांचे शिव्या शाप ऐकायला मिळतात. असा किस्सा माझ्याबाबत झाला नसेल तरच नवल!
त्याचे असे झाले...
मी नुकताच पायलट ऑफिसर म्हणून कमिशन मिळवून हवाईदलाच्या प्रेस्टीजस एयर फोर्स स्टेशन चंदीगडला पहिल्या पोस्टींगवर रुजू झालो. झाले असतील 2 आठवडे. मला माझ्या बॉसनी बोलावले. ‘यस्स सर’म्हणून मी सॅल्यूट ठोकून त्यांच्या समोर उभा राहिलो.
ते म्हणाले, ‘यंगमॅन, आजच्या ‘पीएडी-जीडीएक्सरसाईजमधे तुला भाग घ्यायला मी बोलावले आहे. गेट रेडी!...’
‘येस सर, मला काय अकौंटींग करायचे आहे?’ मी बुचकळ्यात पडून म्हणालो. मला पीएडी, जीडीही अक्षरे मुळात माहित नव्हती!अकौंट्समधे इतके शॉर्ट फॉर्म वापरले जातात त्यातील ते काही तरी असावेत असे मी मनात विचार करत होतो.
‘ऐसा है बेटे’,मल्याळी बॉस हिन्दीतून बोलायचा सराव करत असावेत असे ते बोलले, ‘एओसीनी मला एक ऑफिसर व काही एयरमनना एनिमी फोर्स तयार करायला सांगितले आहे. मीच पीएडीकमांडर आहे म्हणून तुला तो ऑफिसर करायचे मी ठरवले आहे. लीव्ह धिस सेक्शन एन्डरिपोर्ट टू मी इन ऑप्स रूम.’
‘राईटसर’,म्हणत बाहेर पडलो. कारण बॉस नेहमी राईटच असतो...!
मी सेफच्या चाव्या द्यायला माझ्यापेक्षा जास्त सीनियर फ्लाईट लेफ्टनंट [1]स्वामीनाथनला भेटलो तर त्याने नाक उडवून, ‘अब तुझे मुर्गा बनाया क्या? साल्ला, लास्ट टाईम मुझे उसने पकडा था...!’असे म्हणून माझ्यावर नस्ती आफत आली असल्याचे सूचित केले...
अंडरग्राऊंड ऑप्स रूमबाहेर मी येता येता मनात म्हणालो, ‘अस्से आहे काय पीएडी जीडी?म्हणजे... पॅसिव्ह एयर डिफेन्स व ग्राऊंड डिफेन्स!म्हणजे लढाईच्या धामधुमीत शत्रुच्या विमानांच्या हल्ल्या वेळी ट्रेंचमधे लपून बसायचे, शत्रू सैन्याला शक्यतो स्टेशनच्या आत प्रवेशाला मनाई करायला व आत आलाच तर विमाने आणि अन्य महत्त्वाच्या जागी शत्रूकडून हातगोळे वा अन्य शस्त्रास्त्रांच्यामुळे विनाशापासून दूर ठेवायचा शिस्तबद्ध प्रतिकार करायला येता यावा यासाठी मॉक ड्रिलचे नाटक करायचे व आपले वीकपॉईंट्स शोधून त्यावर उपाय योजना करायची...!
बाहेर उभ्या काही काही एयरमनना फ्लाईटमधे इन थ्रीज् उभे करून ब्रीफिंग द्यायला लागलो.म्हणालो की आत्ता मला ऑर्डर मिळाली आहे की तुम्ही माझे साथीदार आहात. मी तुमचा कमांडर आहे. आपण सर्व एनिमी फोर्स असून आपल्याला थ्री टनर ट्रकने स्टेशनच्या बाहेर सोडण्यात येईल. तेथून आपल्या लपत छपत आत शिरायचे आहे व नंतर वेगवेगळ्या स्वाड्रनची जी विमाने उभी आहेत ती, एटीसी टॉवर, सिग्नल सेक्शन, पैशाची जागा म्हणून अकौंट्ससेक्शन वगैर हाय व्हॅल्यू टारगेट्स शोधून ती जिंकायची आहेत. त्यासाठी आपल्याला लढाई करायची नाही फक्त मी देतोय त्या रंगीत खडूंनी त्या त्या टार्गेटवर फुलीच्याखुणाकरून ती आपण हातगोळे फेकून नष्ट केली आहेत असे दर्शवायचे आहे. बाहेरून काही अंपायर आलेत ते यावर निर्णय देतील व रिपोर्ट एओसीला (एयर ऑफिसर कमांडिग) देतील.
‘कोई शुबा या शक?’असे आर्मीत जवानांच्यावर ओरडून त्यांची संमती मिळवताना म्हणतात तसे मी ओरडून छाप पाडायला पुकार केला.
‘सर,खानेका क्या? एका पोट सुटलेल्या एयरमनची चिंता चेहऱ्यावरून दिसली.
‘इसका इंतज़ाम हो गया है... डोंट वरी’...
खरेतर मलाही काही माहीत नव्हते काय इंतजाम आहे ते!...पण ‘मोराल’महत्वाचे असे मी प्रिन्सिपल्स ऑफ वॉर मधे शिकलो होतो. त्याचा रट्टा कामी आला.माझ्या दिमतीला दिलेले 18जण व मी असे 19 जण होतो. त्यातला एकही चेहरा माझ्या माहितीचा नव्हता. असायचे कारणही नव्हते, एक तर मलाच येऊन दोन आठवडे झाले होते शिवाय जे एयरमन होते ते हवाईदलाच्या बँड पथकातले होते. त्यांचा अन् बाकी एयरमनचा संपर्क जवळ जवळ नसे. आपली वाजंत्री, आपले कडक युनिफॉर्म बरे, वर ‘सारे जहांसे अच्छा’ टाईप गाणी वाजवायचा सराव बरा असात्यांचा खाक्या असतो अर्थात हे मला नंतरच्या सेवेच्या अनुभवावरून समजले!...
तर असे मी व माझे एनिमी ट्रूप पॅक लंच घेऊन एका ट्रकनी 5-7 किमीवर आलो. एक अंपायरबरोबर आला होता. ‘बच्चे समझाना क्या करना है?डरो मत, एक्सरसाईज खत्म होने के बाद मुझे डायरेक्ट मिलना. किसीने बुलाया तो मत जाना’...‘यससर’म्हणून मी त्यांना सॅल्यूट ठोकला. ती कार दिसेनाशी झाली. एयरमनचा ट्रक त्यांना खाली सोडून निघून गेला. सगळे जण माझ्याकडे ‘अब क्या?’असे प्रश्नार्थक चेहरे करून पाहायला लागले.
त्यातल्या चीफी उर्फ फ्लाईट सार्जंटने मला म्हटले, ‘सरमैं ऐसे काम को जानता हूं। आप चिंता मत करो. मी व माझे साथी कुंपण कुठे तुटलेले आहे ते पाहून आलो आहे’. मला आश्चर्य वाटून मी म्हटले, ‘आपको कैसे पता?
‘साहेब,अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. आम्हाला अडगळीच्या जागेत लोकांपासून दूर जाऊन वाजवायला सांगितले जाते.कोणाला कर्कश्य वाद्यांच्या आवाजात गाण्यांचे तेच तेच सूर ऐकायला आवडणार? हिन्दी सिनेसंगीतातील गाणी मला वाजवायला मिळतील म्हणून मी हौसेनी घरचा बँड असतानाइथे आलो. आता इथे फक्त परेडच्या सरावाला,15 ऑगस्ट, 26 जानेवारी अन पार्टीच्या वेळी‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्यावेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश” म्हणून बोळवण केली जाते...’
मलात्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली. नंतरच्या सर्व्हीसमधे कधी कधी मला माझे काम असेच बँड पथकासारखे, हवाई चढाईच्या कामापासूनदूर, लांबून ‘छान,वा वा, शाबाश’म्हटले की संपले असा खाक्याशी जुळणारे वाटले!तेंव्हा तेंव्हा तो रापलेला चेहरा, ‘सर, सैन्याचा बँड सुमधुर गाण्यांसाठी नाही, रणांगणातील भीषण कत्तलीच्या, प्रचंड आवाजाच्या व धुळीच्या डोंबामधून आपली सेना लढतेय. ‘तुम आगे बढो’याची जाणीव करून द्यायला उपयोगात आणला जातो.’ असा संदेश देऊन जात असे.
‘ऐसे काम हम पहले भी करते आए हैं! दरवेळी असे आम्हाला असे सोडतात मग आम्हीही सरावाने कुठून आत जायला येता येईल याची पहाणी करायला बाहेर पडतो. काही वेळी तारा बाजूला करून ठेवतो कारण रात्रीच्या अंधारात युनिफॉर्मचे कपडे फाटले तर पुन्हा नवा देणार कोण?
याची पुढील आयुष्यात जाणीव ठेऊन एयरमन लोकांना फुकट युनिफॉर्म दिला जातो पण तो ठराविक काळानंतर, असे इक्विपमेंट अकौंट्समधून शिकून मी ऑडिट ऑब्जेक्शन काढायला तत्पर होत असे. काही केसेसमधे ते बाजूला ठेऊन खरोखरच काही कारणांनी युनिफॉर्म खराब झाला असेलतर त्यावरील ऑब्जेक्शन ओव्हररूल करून मी सँक्शन करीत असे.
‘सर लीजिये, लंच हम खा लेते है.पीएडी का सायरन कभीभी बज सकता है’म्हणत एका कॉरपोरलने आपल्या पुर्वानुभवाचा साक्षात्कार करून देत म्हटले. एयरमन मेसमधील बनलेल्या पॅक लंचचे कोरडे तुकडे पाण्याच्या घोटाबरोबर तोंडात ढकलत संपवले.
इतक्यात कमी-जास्त आवाज करणाऱ्या सायरनचा आवाज कानी आला. एकाएकी विमानांचे गडगडाटी आवाजजवळ आल्यासारखे झाले. दोन विमाने, त्याच्या पाठोपाठ आणखी दोन येऊन भर्ऱकन गेली व जाता जाता दोन दिशांना वळली. म्हणजे आमच्या कामातील हवाईहल्याची सुरवात झाली होती.आता आमच्या सारख्या शत्रूपक्षाच्या तुकडीला हवाईतळावर घुसून अफरातफरीकरून जितका विध्वंस करता येणे शक्य आहे तो करायचा प्लान अंमलात आणायची संधी आली होती. आम्ही3-4 जणांचे गट तयार केले. प्रत्येकाला टारगेट ठरवून दिले. मी विमानांच्यावर धावा बोलायला जायचा प्लान केला. खूप पायपीट केल्यावर सराईत एयरमननी एका ड्रेनेजच्या गटारापाशी ‘सर यहांसे चलते है’म्हणून आत जायचा मार्ग दाखवला. एरव्ही उंच उंच काटेरी तारा असलेले कुंपण पावसाचेपाणी जायला केलेल्या गटाराला काहीही बंधन करू शकत नव्हते. सर्व जणांनी आत प्रवेशकेला. मला ज्याची चिंता फार लागली होती ते काम फारच लीलया झाले असे वाटून आम्हीमजल दर मजल करत पुढे सरकत होतो. मधून मधून सायरनचे आवाज सांगत होते की एयर रेडएलर्ट दिला गेलाय नंतर पुन्हा जणू शत्रूची विमाने प्रचंड वेगाने येऊन येऊन माराकरून परतली की सर्व शांत असा ऑल बॅक टू नॉर्मल असा संदेश देत असे. त्यानंतर विविध टीम्स हवाईहल्यामुळे झालेल्या हानीला शोधायला, कॅजुएल्टीला स्ट्रेचर वरून न्यायलाव रनवे रिपेयर पार्टीला कामाला लावायला वेळ मिळत असे. कमांड हेड क्वार्टरमधे झालेल्या घटनेचा हानीचा अहवाल वरिष्ठांना सादर करायला झुंजत असे. टारमॅकवरील पार्ककेलेल्या विमानांचे रक्षण करायला अनेक एयरमनना तैनात केले गेले होते. काही विमानेहँगर मधे तर काही उघड्यावर पार्क केलेली असल्याने आम्हाला त्या सुरक्षा कर्मींना चुकवून विमानाच्या आसपास जायला दबा धरून वाट पाहत थांबावे लागत होते.
उन्हे कलली. जुलैची सडी गर्मी. खाकी युनिफॉर्मचा घामाने ओल्या टॉवेल सारखा झाला होता. होता होता अंधार झाला. आमच्या टीम्सशी माझा संपर्क राहिला नाही. मी 3 जणांना बरोबर घेऊन
दबा धरून पुढे पुढे सरकत होतो. एटीसी पाशी आलो. तिथून विमानाच्या येण्याजाण्यावर नियंत्रण करायचा टॉवर होता. दूरवर विमानांचे तांडे पार्क केलेले दिसत होते. मला तर त्यांचे प्रथम दर्शन होत होते. ज्यांनी आपल्या देशाचे रक्षण करायचे त्या विमानांचा विनाश करायला मी आलोय याची जाणीव होऊन मला खजील व्हायला झाले.
...

[1] हा नंतर एयर व्हाईस मार्शल म्हणून अकौंट्स ब्रांच प्रमुख झाला. पण पदावर असताना अकाली निधन पावला.

मांडणीमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान अनुभव लिहीताना एकदम थांबलात... क्रमश: लिहायला विसरलात का?

शशिकांत ओक's picture

26 Jun 2014 - 11:22 pm | शशिकांत ओक

मित्रा , लेखाच्या सुरवातीस भाग १ दर्शवून ते सूचित केले आहे.

पुढे काय झाले याची उत्सुकता लागून राहिली आहे.
येवूद्या !!!

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 6:29 am | मुक्त विहारि

पुभाप्र

वा वा, क्या बात है! उत्सुकता चांगलीच ताणत नेली हां साहेब? पुढचं कधी?

छान अनुभव.पुढचा भाग लवकर टाका.

भडकमकर मास्तर's picture

27 Jun 2014 - 10:59 am | भडकमकर मास्तर

छान सुरुवात ... :) पु भा प्र

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2014 - 11:14 am | प्रभाकर पेठकर

रोमहर्षक. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

शशिकांत ओक's picture

27 Jun 2014 - 9:51 pm | शशिकांत ओक

सादर केलाय...

शशिकांत ओक's picture

27 Jun 2014 - 9:51 pm | शशिकांत ओक

सादर केलाय...

अनुप ढेरे's picture

27 Jun 2014 - 11:41 am | अनुप ढेरे

वा. मस्तं लिहिलय. आवडल.

केदार-मिसळपाव's picture

27 Jun 2014 - 12:58 pm | केदार-मिसळपाव

पु भा प्र

पैसा's picture

29 Jun 2014 - 9:13 pm | पैसा

लिखाण आवडले. वेगळ्याच जगाचा अनुभव!