दोन चाकं झपाटलेली !

सतीश आंबेरकर's picture
सतीश आंबेरकर in जनातलं, मनातलं
28 May 2014 - 6:20 am

३२० दिवसांची ती सायकल सफर मी जेव्हा पूर्ण केली तेव्हा एका स्वप्नपूर्तीचे समाधान मला लाभले . ह्या सफरीने मला बरेच काही शिकवले ,अनुभव दिले. तो नुसताच प्रवास नव्हता तो एक अभ्यास होता ह्या जगाचा आणि त्यातील वैविध्याचा. त्या परीक्रमेतले माझे अभुभव मी व्याख्यानामधून किंवा मित्र प्ररीवारासोबत बरेचदा बोलण्यातून मांडले. हे अनुभव पुस्तकरूपाने मांडण्याची इछा फार काळ मनात घर करून होती. काही ना काही कारणामुळे त्या इच्छेला मी बगल देत होतो. गेली २ वर्ष मात्र मी त्या इछेचा पाठपुरावा केला आणि तो जगप्रवास आज "दोन चाकं झपाटलेली " ह्या पुस्तकामध्ये शब्धबद्ध झाला आहे.

१ जून २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित होत आहे , मिपा वरती बरेच मराठी लेखक आणि वाचक सक्रिय असल्यामुळे येथे ही बातमी आवर्जून जाहीर कराविशी वाटली. तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करतो .

सतीश आंबेरकर

प्रवासदेशांतरबातमी

प्रतिक्रिया

सतीश आंबेरकर's picture

28 May 2014 - 6:33 am | सतीश आंबेरकर

Cover Page

सतीश आंबेरकर's picture

28 May 2014 - 6:34 am | सतीश आंबेरकर

Cover Page

सतीश आंबेरकर's picture

28 May 2014 - 6:40 am | सतीश आंबेरकर

स्थळ :

नवदीप विद्यालय ,

जयप्रकाश नगर ,गोरेगाव (पू )
मुंबई ४०० ०६३
रविवार १ जून ,२०१४ संध्याकाळी ६

यसवायजी's picture

28 May 2014 - 7:07 am | यसवायजी

cover page is lai bhaari.
Congo. & best luck.

खटपट्या's picture

28 May 2014 - 8:13 am | खटपट्या

अभिनंदन, नक्की पुस्तक विकत घेवून वाचण्याचा प्रयत्न करेन

छान .पुस्तक आणलेत ते उत्तम कायमचा संदर्भ तयार राहातो .

सुधीर जी's picture

28 May 2014 - 9:57 am | सुधीर जी

अभिनंदन,
तसा मि पुस्तके कमी वाचतो पण
तुमचे हे पुस्तक मी नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2014 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन...! आपलं पुस्तक मिळवून वाचेन.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2014 - 10:07 am | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन ! पुस्तक रंजक असणारच, मिळवून वाचले जाईल.

तर पुस्तकाबद्दल उत्सुकता वाटेल.

असंका's picture

28 May 2014 - 12:12 pm | असंका

+१

ऋषिकेश's picture

28 May 2014 - 10:15 am | ऋषिकेश

अभिनंदन!
प्रवासाबद्दल वाचायची उत्सुकता आहे.

इरसाल's picture

28 May 2014 - 10:46 am | इरसाल

माहिती नका देवु थोडेफार लिहा इथे पुस्तकाबद्दल. किंवा शॉर्टकट मधे एखादे प्रकरण टाका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2014 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसालशी सहमत. दोन चाक झपाटलेली यातलं स्वत:च्या आतलं पहिलं चाक केव्हा झपाटलं गेलं. सफर कोणती होती, स्वप्न कोणतं होतं. प्रवास कुठे सुरु झाला. प्रवासवर्णनातील काही आठवणी. आणि अशाच काही आठवणीसाठी माझं पुस्तक जरुर वाचा असं काही तरी. आम्हा वाचकांना काही उत्कंठा लागेल असं...!

-दिलीप बिरुटे

तुमचा अभिषेक's picture

30 May 2014 - 10:23 am | तुमचा अभिषेक

अभिनंदन आणि सहमत.
थोडासा पुस्तकपरीचय आणि एखादा छानसा उतारा जो उत्कंठा वाढवेल.

कपिलमुनी's picture

28 May 2014 - 12:21 pm | कपिलमुनी

जाहिरात झाली आता इतर वेळेस पण मिपावर येत चला !

पुस्तकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा

संजय क्षीरसागर's picture

28 May 2014 - 12:58 pm | संजय क्षीरसागर

असा अनुभव आहे.

vikramaditya's picture

28 May 2014 - 6:34 pm | vikramaditya

वाचुन बरेच जण नंतर फिरकत नसावेत.

(हलके घ्या.)

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 7:35 pm | मुक्त विहारि

बर्‍याच वेळा किंचीत विचार करून आणि वैयक्तिक नसलेले प्रतिसाद जास्त शिकवून जातात.

अर्थात, नाना प्रकारे गहन विचारी माणसांच्या नादी लागून, मिपा वर येणे ज्यांनी बंद केले असेल, तर त्यांच्या सारखे अभागी तेच.

आत्मशून्य's picture

29 May 2014 - 4:09 pm | आत्मशून्य

विचारांना किंचीत विचार , गहन विचार , अथवा नुसता विचार अथवा इतर कसल्याही क्याटेगॉरी मधे न अडकवण्याची... आणी ते समजुन घ्यायची इछ्चा शक्ती निर्माण करण्याची. शुभेच्छा.

प्रतिसाद आवडला.
- धन्यवाद.

विटेकर's picture

30 May 2014 - 10:44 am | विटेकर

वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो...
( ह घ्या)

पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा ! उतम विषय आहे. लिहिते रहा. पुस्तकातील काही पाने इथे टाकलीत तरी , सूज्ञ मिपाकर विकत घेऊनच वाचतील. जे घेणार नाहीत ते तसे ही घेणार नाहीतच !

अवांतर -
मिपावरील कुणाच्या , कोणत्या प्रतिसादाची कदर करावी आणि कोणते फाट्यावर मारावेत या विषयांवर एका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे अशी मी मा. संपादक मंडळाला नम्र विनंती करतो. याच प्रशिक्षण वर्गात मिपा शब्द्कोषाचे एक स्वतंत्र मोड्युल असावे आणि व्यक्ति व कार्य अशी एक कार्यशाळा असावी. बाकी जाणकार सद्स्य भर घालतीलच.
यानिमित्तने मिपाचे प्रायमर म्हणून, "मा.संपादक,मिपावर मी काय वाचू?" अशी पुस्तिकाही प्रकाशित करावी ही विनंती !

विटेकर's picture

30 May 2014 - 10:47 am | विटेकर

व्यक्ति व कार्य च्या ऐवजी " आय डी व कार्य " असे वाचावे !

आत्मशून्य's picture

30 May 2014 - 11:32 am | आत्मशून्य

वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो...

मै सिर्फ इत्ताच कहरयेलाय.. की प्रतिसाद पडके कै लोग उस्का क्याटेगरी बनाके कंपुबाजी करेलाय. अगर वो रुक जाता हय.. तो लोगोंके खुली हवा मे लिखनेका मौका मिल सकता हय.. ये समजना मंगता. औ इस्के लिये मय तमाम अंतरजालकर लोगांनु बेस्ट विशेश देरैला... इत्ताच्य.

विटेकर's picture

30 May 2014 - 11:42 am | विटेकर

वैच ..

बराब्बर बोला.

उस्के वास्ते लोगोन्को ट्रेनिंग देना पड्ता.फिर कित्तीभी क्याटेगरी बन्ने दो.. कुच फर्क नै पडेगा. वर्ना लोगा नाराज होके चला जाता. इत्ताच मय बोल्ताय.

आत्मशून्य's picture

30 May 2014 - 11:51 am | आत्मशून्य

बेवखुपां छोडदे तो बहुत अच्छे अच्छे लोगां इधर लेखनेको आ सकता हय. अभी क्या होरेलाय ? लिचींग कल्चर की वजह से आप नये लेखकोंको पुरेसा प्रोत्साहीत नही कर रहे हो. उनको ये लग रहा हय की अगर आप अमुक तमुक लिचर नही हो तो आपको प्रतिसाद नही मिलेंगे. अगर आप लिचर बन गये तोही लिखाण कर सकेंगे. यह एक वास्त्वीकता है. पर बेवखुपां गुमराह करेले हय.

अ‍ॅज अ मेटर ऑफ फेक्ट अगर कोइ लिचींगी नही करन चाहता तो आप उसको "गहन" भी कह डालते हो. आज ऐसी बिमारी यहा पर हय की एक की गहन बात आपको गहन लगती हय तो दुसरेकी गहन बात रॉक्सं बन जाती हय. मय ऐसी दोमुही फुक्टबिहारी प्रव्रुत्ती की कडी शब्दोमे आलोचना मंगता हुं...

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 May 2014 - 3:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

आवडीचा विषय..अलबत पुस्तक मिळवुन वाचले जाईल...

बॅटमॅन's picture

30 May 2014 - 2:41 pm | बॅटमॅन

रोचक विषय.

रच्याकने: कुणी अरुण वेढीकर यांचे 'मुंबै ते काश्मीर सायकल प्रवास' हे पुस्तक वाचलेय का? जबर्‍या आहे एकदम.