आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
14 May 2014 - 10:11 am

ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे. ढेबेवाडी येथे पयीले तेंचे सापाचे शो लय गाजले, सुरवातीला पुंगी वाजवून खेळ केला असता, याकायक सापांनी, आजूबाजूच्या जनतेला डसले, तरी, जरी पुंगी आपल्या हाती होती तरी सापावर आपला काय बी इलाज चालला नाही असे त्यांनी गावाच्या चावडीवर बयान दर्ज केले, तरी झाल्या प्रकाराबद्दल तेनला अतीव दुख झाल्याचे सांगोन तेनी नंतर नजरबंदीचे खेळ चालू केले, तेन्च्यातल्या कलेचा फायदा ओसाडवाडीच्या जनतेच्या मनोरंजनासाठी व्हावा म्हणोन फक्त गावचे किराणामाल दुकानदार मुकेससेठ यांनी तेनला, गावच्या वरच्या अंगाच्या नदीपलीकडील हरिभाऊ कुंभार यांची छडी तेनला दिली, ती छडी हवेत फिरून न. म. सरकार आता अनेक जादू करून दाखीवनार हायेत. वानगीदाखल सांगायच तर गावाच्या उगवत्या दिशेला मोठ्ठ जंगल हाय, तेच्यातली चापट्या नाकाची वानरांनी, गावच्या बागेत धुमाकूळ घातलेला हाय, हवेत छडी फिरवण वानरे अद्रुश करणर हाये, तरी तेनला शो साठी कमीतकमी २७२ रु ची गरज हाये, जेवढे जास्त रु गोळा होणार तेचेवर कोणती आणि किती जादू दाखवायची हाये हे ठरणार हाये. तेंनी तर आताच पाटी पण रंगवायला घेतली आहे , ती अशी We can not create Change for You, Change has to be brought by You. अर्थात, कृपया सुट्टे पैसे आणावे.

तरी चू भू दे घे, आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी.

राजकारणमत

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

14 May 2014 - 10:19 am | सुबोध खरे

मी पहिला

जेपी's picture

14 May 2014 - 10:26 am | जेपी

विचारु का नको ?

काय केल पयल येऊन =))
>
=))
>
=))
>
=))

स्पंदना's picture

18 May 2014 - 11:21 am | स्पंदना

जे पी खाती बदलु नका हो!
म्या हाय हित्त विचारणा खात्यातली. तुमी आपल पयला यायच बगा!

चौकटराजा's picture

14 May 2014 - 11:08 am | चौकटराजा

माला तर वाटतया बदल होनारच .पन आजून दोन वरीस थांबा. नवा जादूगार एनार ! आनि त्यो बी तुमाला फशीवनार !

केदार-मिसळपाव's picture

14 May 2014 - 4:49 pm | केदार-मिसळपाव

पन जादुगार तर येनार...

हे भारीय.

शेखर's picture

14 May 2014 - 6:51 pm | शेखर

ह्या विकांताचा मेनु पक्का...

पैसा's picture

14 May 2014 - 7:56 pm | पैसा

सुट्टे पयशे हे लै आवडले!

संदीप चित्रे's picture

14 May 2014 - 8:47 pm | संदीप चित्रे

लेखनशैली आवडली :)

स्पंदना's picture

18 May 2014 - 11:19 am | स्पंदना

लिहीलयं मात्र भारी!!
मान गये पगले!
आता अवांतर- तर काय आहे एकूण सगळा विश्वासाचा मामला. आता हा विश्वास सुद्धा जरा हातच राखुनच ठेवावा. उगा विश्वासघात!! विश्वासघात!!! विश्वासघात!!!! अस ओरडत फिरु नये. आधीच सांगितलेले बरे.
अन आता अति अवांतर- तुम्हाला गरज होती म्हणुन जादुगर आणलाय. गरज नसती तर नसता आणला.

पगला गजोधर's picture

22 May 2014 - 11:31 am | पगला गजोधर

अपर्णाताई (ताई म्हटलं तर चालल नव्ह ?),
माझं तुमचं राजकीय मत/दृष्टीकोन कदाचित वेगवेगळे असू शकते, याची कल्पना कदाचित तुम्हास असून देखील,
तुम्ही दिलखुलासपणे सेन्स ऑफ ह्युमर आप्रेशिअट केल्याचं पाहून, खूप छान वाटले.

हवान तुमास्नी जदुगर, हा घ्या =
Jadugar

राही's picture

22 May 2014 - 12:15 pm | राही

धमाल लिहिलंय. 'सुट्टे पैशे आणावेत' तर हाइटच!