कुक्कुटधर्माचा मिसळपावला सक्रीय पाठिंबा

वात कुक्कुट's picture
वात कुक्कुट in जनातलं, मनातलं
6 Nov 2007 - 6:19 pm

कुकूचकू मंडळी,

थोडा उशीरच होत आहे. पण हे स्थळ बघून बहुत संतोष जाहला. नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार. मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्‍या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो. (अरे हो हो, कुक्कुटमेनकाही लवकरच अवतीर्ण होणार आहेत, पण तात्यांची तपस्या भंग न करता त्यांचे मनोरंजन करायला)

आमचे परममित्र व आद्य कुक्कुटधर्मी म्हणजेच कुक्कुट्महर्षी सर्किटेश्वर हे तर येथे नित्य नियमाने येत आहेतच, पण आम्हीही हे ठासून सांगतो की यापुढे मनोगतावर आमच्या प्रतिभेची ठोक व किरकोळ अंडी देणे आम्ही बंद करत आहोत तर्री वाचकांनी मिसळ्पावाबरोबर आमची भुर्जीही आता येथेच तिखट मानून घ्यावी ही विनंती.

जय कुक्कुट !

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

जुना अभिजित's picture

6 Nov 2007 - 6:38 pm | जुना अभिजित

चवीत बदल म्हणून आम्ही भुर्जीपाव ही खाऊ. भुर्जीत तेल टाकायला कमी करू नका नाहीतर कोरडी लागते.

कोंबडीभक्त अभिजित

विसोबा खेचर's picture

7 Nov 2007 - 1:28 am | विसोबा खेचर

नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार.

धन्यवाद कुक्कूटराव!

मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्‍या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो.

पुरस्काराबद्दल आभारी आहे...:)

(अरे हो हो, कुक्कुटमेनकाही लवकरच अवतीर्ण होणार आहेत, पण तात्यांची तपस्या भंग न करता त्यांचे मनोरंजन करायला)

येऊ द्यात! वाट पाहात आहे...

जय कुक्कुटधर्म! जय मिसळपाव...:)

तात्या.

सर्किट's picture

7 Nov 2007 - 9:01 am | सर्किट (not verified)

कुक्कुटधर्माचे संस्थापक आदरणीय कुक्कुटेश्वर ह्यांचे कुक्कुटमहर्षी सर्किटेश्वरांतर्फे स्वागत ;-)

भुर्जी आम्हाला प्रचंड आवडते. पुणे विद्यापीठासमोरील रोड-वर्तुळात रात्री दोन वाजता खाल्लेल्या भुर्जीची कसम !

- कु-सर्किट

आनंदयात्री's picture

7 Nov 2007 - 10:48 am | आनंदयात्री

आहे. परवाच तुमची आठवण आली होती कारण तिथे जशी हिंदु धर्माबाबत बोलायची फॅशन आली होती तशी येथे आय टी वाल्याना बिनडोक म्हणायची आली आहे, दर दोन दिवसांनी आपले तेच. वाटले वातकुक्कुट हवा होता राव, की आलातच तुम्ही.

(वात कुक्कुटाचा फॅन)

आनंदयात्री

सृष्टीलावण्या's picture

23 Mar 2008 - 9:40 am | सृष्टीलावण्या

खरेतर त्या गोड नावाचा मी पण पंखा. फक्त वात कुक्कुटासारखा वारा नेईल त्या दिशेला तोंड वळवू नका म्हणजे झाले..

एक अनुष्का नावाची रंभा पुरे.. अजून किती मेनका, उर्वश्या सोसायच्या?

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 8:35 pm | सुधीर कांदळकर

आम्ही स्वागत करू त्यांचे.

तेवढाच मिपा चा भाव वाढेल. फक्त विषकन्या नकोत एवढेच.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.