अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
25 Apr 2014 - 9:39 pm

आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे.
कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे.
वेळः दुपारी ४ वाजता.
.

सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान. चार-पाच कलादालने, आडिटोरियम, हिरवळ, नर्सरी, ओपन थिएटर वगैरे आहे.
अचानक ठरल्याने पूर्वसूचना देता आली नाही, याबद्दल दिलगीर आहे.

वावरसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनबातमीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Apr 2014 - 9:47 pm | मुक्त विहारि

काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच.

सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.

शुचि's picture

25 Apr 2014 - 10:06 pm | शुचि

कट्ट्याला शुभेच्छा.

फोटोतली जागा तर पार युरोपातील वाटतेय

विवेकपटाईत's picture

26 Apr 2014 - 9:46 am | विवेकपटाईत

दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 11:08 pm | शशिकांत ओक

सध्याच्या राजकीय धांदलीच्या काळात दिल्लीला येणे जमेल असे नाही पण आपण कट्ट्याच्या वृतांताची फोटोसह आतिशबाजी जरूर करावी. ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2014 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्याला शुभेच्छा !

लॉरी टांगटूंगकर's picture

25 Apr 2014 - 11:11 pm | लॉरी टांगटूंगकर

दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!!
दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.

प्रचेतस's picture

26 Apr 2014 - 6:32 am | प्रचेतस

आपला 'सागर' भंडारे आहे बंगरूळात

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Apr 2014 - 8:47 am | लॉरी टांगटूंगकर

मेसेजवतो आत्ता लगेच.

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Apr 2014 - 8:57 am | लॉरी टांगटूंगकर

मेसेजवतो आत्ता लगेच.

पुतळाचैतन्याचा's picture

26 Apr 2014 - 9:09 am | पुतळाचैतन्याचा

जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2014 - 1:13 am | प्रभाकर पेठकर

'दिल्ली तो बहुत दूर है।'

शुभेच्छा....!

दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा!!

अबकी बार मोदी सरकार.

प्रचेतस's picture

26 Apr 2014 - 6:31 am | प्रचेतस

दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा.

राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे .
एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?

विवेकपटाईत's picture

26 Apr 2014 - 9:43 am | विवेकपटाईत

आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.

सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा.
कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :)
कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.

माझीही शॅम्पेन's picture

26 Apr 2014 - 11:31 am | माझीही शॅम्पेन

अगदी +१

कंजूस's picture

26 Apr 2014 - 11:24 am | कंजूस

एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

26 Apr 2014 - 11:56 am | नॉन रेसिडेन्षिय...

अहो आम्हि पण आलो असतो ! आम्ही गुड्गाव मदे असतो.

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

26 Apr 2014 - 12:03 pm | नॉन रेसिडेन्षिय...

शुभेच्छा!

शशिकांत ओक's picture

28 Apr 2014 - 2:19 pm | शशिकांत ओक

रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे