वंशवेल

सुब्बु's picture
सुब्बु in जनातलं, मनातलं
24 Apr 2014 - 12:41 pm

माझा हा मिपा वरील पहिला लेख आहे. दोन मुली असल्यामुळे मला जे आपल्या समाजातून अनुभव आलेले मी इथे सांगत आहे.
मी मध्यमवर्गीय घरातील स्त्री, घरातले सगळे उच्चशिक्षित.घरामध्ये स्त्री ला खूप चांगली वागणूक.
मला पहिली मुलगी झाली आणि सगळे आनंदी झाले. कारण ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाली होती.
मग आम्ही तीच नाव निकिता ठेवला. तिच्या बाललील्लानी आम्ही खूप आनंदीद झालो होतो.
काही वर्षांनी जवळच्या लोकांकडून दुसर्या chance साठी विचारणा झाली. आणि दुसरा मुल मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मी स्वतः मुलगा आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही . आणि मला दुसर्या वेळीही पुन्हा मुलगी झाली.
जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा सगळे जन नाराज होते. कुणी उनाशी बोलत न्हवत. आणि त्यावेळी वातावरण खूप गंभीर झालेला होते . माझे मिस्टर फक्त माझ्या जवळ बसले होते.
थोड्या दिवसांनी हे वातावरण सुद्धा निवळले. नवीन बाल सुधा सगळ्यांचे लाडके बनले. मला सुद्धा २ मुली आहेत याचा अभिमान वाटायला लागला कारण खरच माझ्या निकिता आणि शिरीन खूप activ सुंदर आणि हुशार आहेत. मला मुलगा नाही ह्या बधल काहीच कमी वाटत न्हवती.
पण काही दिवसांनी काही लोकां कडून मुलगा नाही म्हणून काही वक्तव्ये ऐकायला मिळाली. सगळेजन आमच्या property चा भावी वारसदार कोण असा विचार करू लागले. कुणी सांगितला माझा मुलगा दत्तक घ्या तर जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार. ह्या गोष्टीने मी पुरती हलली होती.
पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात घोळायला लागले. मला २ मुली आहेत म्हणून असा कुणी का म्हणून माझ्या मुलींच्या हक्का मध्ये आडवा येतंय. मी असा कधी होऊ देणार नाहीच. पण आला खूप प्रश्न पडतात माझ्या मुली आमच्या संसाराच्या वंश वेलीवरची २ सुंदर फुले आहेत.
अजून सुद्धा मुलींना पाहिजे तो दर्जा मिळत नाही. उच्च शिक्षित माणसाने च असे विचार केले तर काय होईल? मला मुलगा नाही म्हणून माझ्या मुलींचे हक्क मी असे दुसर्या नातेवाईकाच्या मुलाला का द्यायचे? अजून खूप प्रश्न आहेत पण उत्तरे मिळत नाहीत. पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 12:46 pm | चित्रगुप्त

पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन.
या महत्वाच्या विषयावर योग्य ती चर्चा इथे घडून यावी, असे वाटते.

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 12:47 pm | बॅटमॅन

जे लोक असा वाटा मागतील त्यांना सरळ तोंडावर सुनवा: आमची प्रॉपर्टी अन आमच्या मुली काय ते बघून घेतील, मध्ये निर्लज्ज हावरटागत बोलायचं काम नाही. असले दीडदमडीचे लोक डोक्यात जातात.

सुब्बु's picture

24 Apr 2014 - 12:52 pm | सुब्बु

मन: पूर्वक आभार

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 1:13 pm | चित्रगुप्त

मामला प्रॉपर्टी वगैरेचा आहे, तर आत्तापासूनच या विषयीच्या कायदे-कानून इ. ची व्यवस्थित माहिती काढून ठेवावी. पुढचे अनेक त्रास वेळीच व्यवस्थित माहिती करून घेण्यामुळे वाचतील.
तुम्हा उभयतांच्या पश्चात तुमच्या वाट्याची प्रॉपर्टी मुलींना मिळावी, यासाठी कायदेशीर तजवीज करून ठेवावी (जरी मुली अद्याप लहान असल्या तरिही).
'सावधपण सर्वविषयी' असे समर्थ सांगून गेलेतच.

राही's picture

24 Apr 2014 - 1:02 pm | राही

निदान महाराष्ट्रात तरी आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना त्यांच्या वारसाहक्कउतरंडीच्या प्रमाणात हिस्सा मिळतो असे ऐकले आहे.

बाबा पाटील's picture

24 Apr 2014 - 1:40 pm | बाबा पाटील

तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही व तुमच्या दोन्ही मुली सोडुन कोनाचाही कायदेशिर हक्क होवु शकत नाही.त्यामुळे असला विचार सोडा,दुसर सगळ्यात महत्वाच लेकींना फिजिकल आणी मेंटली इतक स्ट्रांग बनवा की त्यांना हिस्सेदारी मागण्याची कोनाच्या बापाची हिंमत होणार नाही.या साठी कराटे क्लास्,योग या सर्व गोष्टींचा अवलंब करा. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासुन कराटे क्लास लावा. ती पाचवीला जाईपर्यंत ब्लॅक बेल्ट होते. यामुळे फक्त शाररीक नाही तर माणसिक सुदृढता देखिल यामुळे मिळते.दुसरी गोष्ट मोठ्या कन्येला आत्तापासुनच तिला सर्व गोष्टी पहायच्या आहेत याची जाणिव करुन देत जा.कारण कधी कशी वेळ आयुष्यात येईल हे कोनीच सांगू शकत नाही.तिच बालपण हरवु देवु नका पण जबाबदारी देखिल शिकवा.तुमच्या इनव्हेस्टमेंट , अ‍ॅसट्स, कर्जे याची माहिती गप्पा मारता मारता सहज तिच्या कानावर पडेल अस बोलत जा.बराच फरक पड्तो.(मी देखिल दोन लेकींचा बाप आहे पण याचे वाईट किंवा भिती मला कधीच वाटत नाही.माझी मोठी लेक कराटे,स्केटींग,शुटींग,स्विमिंग,नाचण् आणी जमलच तर थोडाफार अभ्यास असे सगळच करते.मीच काय माझ्या अख्या खाणदानात तिच्या कुठल्या गोष्टींवर हक्क सांगायची कोनाचीच हिंमत नाही.)त्यामुळे तुम्हीही ही खंबिर बना आणी लेकींना देखिल खंबिर बनवा.

सुब्बु's picture

24 Apr 2014 - 1:54 pm | सुब्बु

खूप आभार.
मुलीना खूप खंबीर तर बनवणारच आहे

पण तुमच्या विचारामुळे मुळे खूप उभारी मिळाली

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2014 - 1:41 pm | पिलीयन रायडर

लोक काय काहीही बोलतात हो.. त्यांना फाटयावर मारायचं अस्तं (म्हणजे लक्ष द्यायचं नाही..)

तुम्हाला मुली असोत वा मुलगे.. तुमची "स्वकष्टार्जित" संपत्ती तुमच्याच लेकरांना मिळते. बाकीच्यांचा काहिही संबंध नाही. बाकी जी संपत्ती वाडवडिलांकडुन मिळाली असेल तिच्या वरही तुमच्या मुलींचा "कायद्याने" मुलांएवढाच हक्क आहे.

तरीही वाटत असल्यास "मृत्युपत्र / इच्छापत्र" करुन ठेवा.

ही त्या विषयीची माहिती:-

स्वतःच तयार करा - स्वतःचे इच्छापत्र!

सल्ले देणारांना फक्त म्हणायचं....'तुम्हाला विचारलंय?'

बाकी असे प्रॉपर्टीबद्दल बोलणारांना 'तुम्ही बांगड्या भरल्यात काय, तुम्हाला पैसे मिळवायला काय झालंय' असा प्रश्न विचारा. (स्त्रीवादी येतील भांडायला, त्यांचा विचार करु नका, बांगड्या 'कम्फर्टेबल नसल्यानं' काम करताना काढून ठेवलेल्या बायकाच भांडायला येतील, डोन्ट वरी!)

अजूनही अशी मानसिकता असलेली माणसे आहेत हे ऐकून वाईट वाटले आणि रागही आला .
पण तु म्ही भाग्यवान आहात ़ कारण Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 4:22 pm | बॅटमॅन

Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life.

हा पुरुषद्वेष्टा कोट टाकायची इथे गरज नव्हती असे वाटते. बहुत काय लिहिणे, तुम्ही सूज्ञ असा.

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 4:32 pm | प्यारे१

(-१)+२= +१ टु बॅमॅ!

काटा कुठल्यातरी एका बाजूला झुकलाच पाहिजे असं का असतं नेहमी?

आदूबाळ's picture

24 Apr 2014 - 4:59 pm | आदूबाळ

+२

अब्राहम लिंकन म्हणाला होता - "मला गुलामगिरीचा तिटकारा आहे. याचा अर्थ गुलामांप्रति प्रेम आहे असा होत नाही."

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 4:51 pm | आयुर्हित

Son is your Son till he gets a wife. And daughter is your daughter for the whole life. :- १००% सहमत (नियमाला एखाद दुसरा अपवाद असू शकतो.)

यसवायजी's picture

24 Apr 2014 - 5:04 pm | यसवायजी

कैच्याकै.
असा विचार करणारे आई-बाप 'दुखी आत्मा' कॅटॅगरीत मोडतात. बिचार्‍या मुलांचे मधल्यामध्ये हाल होतात.
अनुभवाचे बोल असतील तरी जनरलाइझ करु नका.

हां विचार करणारच आहेत, नावे कुणा कुणाला ठेवणार ? मुली सुध्दा अमुक तमुक मुलाची इस्टेट नोकरी काय आहे बघुनच त्याला जवळ करतात मग या या एकुण प्रकारात अनैसर्गिक काय आहे ?

जी सुशिक्षित पार्श्वभूमी आपल्या कुटुंबाची दिलेली आहे तिथे वारस कोण हां प्रश्नच निर्माण हॉट नाही कायदा मुलगा मुलगी फरक करत नाही हे शेन्बड्या पोरालाही आता ठाउक असते.

जावई चांगले पारखून घ्या..

विनायक प्रभू's picture

24 Apr 2014 - 5:10 pm | विनायक प्रभू

ती कशी काय करायची बॉ?

अनुप ढेरे's picture

24 Apr 2014 - 7:31 pm | अनुप ढेरे

सोनिया गांधींना विचारा

शुचि's picture

24 Apr 2014 - 7:32 pm | शुचि

_/\_ :)

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 10:17 pm | पिवळा डांबिस

सोनिया गांधींना विचारा

क्या बात है!!!!
:)

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 11:34 pm | बॅटमॅन

अंहं. सासर कसे निवडावे हे रॉबर्ट वाड्रांना विचारा असं पाहिजे ते.

विनायक प्रभू's picture

25 Apr 2014 - 6:49 am | विनायक प्रभू

राबट ने निवडले आणि आता राबवतोय ़किंवा राबतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 4:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील.
या लिखाणावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला सगळं माहिती तर आहे. आता फक्त तेच आचरणात आणा. कायदाही तेच म्हणतो आहे. लोक काय दोन्ही बाजूनी बोंब मारण्यात पटाइत असतात. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हा मंत्र नीट लक्षात ठेवा म्हणजे झाले. हाकानाका.

जयवंत दळवींच्याच एका नाटकात उद्गार आहेत - मुलाला खाली बोटभर असतं ते सोन्याचं असतं का?
अर्थात - मुलगा हवा मुलगा हवा अशी जी अडाणी अन दुर्दैवी हौस असते त्यावर ओढलेला कोरडा आहे.

एसमाळी's picture

24 Apr 2014 - 6:24 pm | एसमाळी

पाहता लेखिकेची भिती अनाठायी आहे.बाकी मुलींच्या नावे संपत्ती करताना स्वत:ची तजविज करुन ठेवा. अशी बरीच प्रकरण पाहिली आहेत की मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित. (अपवादात्मक)

सहमत. आपली अपत्ये, कायदेकानून बर्‍यापैकी जागेवर असताना लोकांच्या (अगदी नातेवाईकांच्याही) बोलण्याला भीक घालायचे दिवस संपले. म्हणजे तसे ते कधी नव्हते पण आपणच जरा भाव देत होतो. परंपरागत संपत्तीबाबत तुमच्या यजमानांच्या वाटयाला काय यायचे त्यातच भेदभाव केवळ 'तुम्हाला मुली असणे' या कारणामुळे होतोय असे तुमचे म्हणणे आहे की काय ते समजले नाही.

मुली परत हिंग लावुनही आपल्या पाल्याला विचारीत नाहित.

खरं आहे.

पण एसमाळीजी एकवेळ तसं परवडलं पण हगल्या-पादल्या कारणावरुन भांडून माहेरी येऊन, पालकांच्या डोक्याला कल्हई करणार्‍या मुली नकोत. तशाही पाहील्यात म्हणून म्हणते.

शुचीजी,आपल्या मताशी सहमत आहे. पाल्याला न विचारणारी किंवा रडत भेकत माहेरी येणार्या मुली एकाच वर्गात येतील.रेवती ताईंच्या प्रतिसादातील शेवटचा भाग समजला नाही .

हाडक्या's picture

24 Apr 2014 - 8:54 pm | हाडक्या

गडबड होतेय हो.. पाल्य नाही पालक .. पाल्य म्हणजे अपत्य आणि पालक म्हणजे त्यांचे पालन पोषण करणारे..

जेनी...'s picture

24 Apr 2014 - 10:21 pm | जेनी...

जौद्याना ...नया है वह :D

सॉरी गलतीसे मिष्टेक झाली, मला पालकच म्हणायचे होते चुकुन पाल्य झाले.

आजी आजोबा जर म्हणायला लागले की "मुला, तुला रे वाटणी घेऊन काय करायची? तुला मुली आहेत तर देत नाही, किंवा कमी देऊ" असा अर्थ आहे.

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 4:08 am | आत्मशून्य

हे भारतात नक्कीच घडू शकते.. :(

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 8:53 pm | चित्रगुप्त

एकंदरित स्थावर जंगम वगैरे सर्व मालमत्ता, मुलगे असोत वा मुली, माय-बापाच्या मृत्यूनंतरच वारसांना मिळावी, अशी तजवीज करणेच जास्त चांगले, असे अनेक उदाहरणावरून दिसून येते.

खटपट्या's picture

24 Apr 2014 - 10:11 pm | खटपट्या

काही काळजी करू नका हो, सगळं व्यवस्थित होईल. कायद्याने तुमचे कोण काही वाकडे करू शकत नाही. फाट्यावर मारा पुढे चला.
मलाही दोन मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यावर माझे बरेच नातेवाईक येवून माझे सांत्वन करू लागले. मी संतापून म्हणालो "आयला मला काही दुख: नाही आहे तुम्ही कशाला एवढे सांत्वन करताय ? असे काही बोलायचे असेल तर हॉस्पिटल मध्ये कृपा करून येवू नका"

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 10:15 pm | पिवळा डांबिस

आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.

तुमची तुम्ही म्हणता ती मालमत्ता स्वकष्टार्जित (म्हणजे तुम्ही आनि तुमच्या नवर्‍याने मिळवलेली) आहे का? जर तशी असेल तर वरील वाक्याला अर्थ उरत नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता तुम्ही तुमच्या मुलींना द्या किंवा गल्लीत वाटून टाका, तो तुमचा अधिकार आहे.
जर तुमची मालमत्ता स्वकष्टार्जित आणि पुष्कळ (सबस्टॅन्शियल) असेल तर गावातला सगळ्यात चांगला इस्टेट वकील बघून (मग तो कितीही पैसे चार्ज करत असला तरी तोच घ्या!)तुमचं विल आणि ट्रस्ट करून टाका. तुमचं वय जर चाळीसच्या पुढे असेल तर ही बाब निकडीची आहे.

जेनी...'s picture

24 Apr 2014 - 10:27 pm | जेनी...

मला एक पटलं नाहि ... जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...
म्हणजे मला म्हणायचय कि इतकं काय लोकांचं ऐकायचं ...
दुसर्या लोकांचं एक ऐकलं का मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात .. त्यांना वाटतं मग आपलं दुसरं पण ह्यांनी ऐकावं

दुसरा चांस तुम्ही स्वखुशीने ... स्वताहाला हवा असताना घ्यायला हवा होता ...

शुचि's picture

24 Apr 2014 - 10:28 pm | शुचि

=)) =))

सुबोध खरे's picture

25 Apr 2014 - 1:08 pm | सुबोध खरे

@शुचि ताइ
सीता के वनवास जाने मी बडी सीख है
सीता के वनवास जाने मी बडी सीख है
घरमे तीन तीन सांस हो तो जंगल हि ठीक है

शुचि's picture

25 Apr 2014 - 3:41 pm | शुचि

हाहाहा :)

अनुप ढेरे's picture

24 Apr 2014 - 10:33 pm | अनुप ढेरे

==))

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 10:35 pm | प्यारे१

पूजाज्जी (पूजा आज्जी)

आवरा!

ओ आवळे काका हापिसात काम कमी हाय वो सद्ध्या ... मंग काय करणार :(

कवितानागेश's picture

24 Apr 2014 - 11:45 pm | कवितानागेश

अगं. नयी हय वह.
आधी एक पूस्प्गुच तरी दे, मग विचार असले प्रश्न. :D

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2014 - 12:03 am | पिवळा डांबिस

जेव्हा दुसर्यांकडुन विचारणा झाली ... तेव्हाच तुम्ही दुसरा चांस का घेतला ...

कुणाला कशाचं तर पूजेला कशाचं!!!
ओ सासूबाई, वाचताय ना? तुमचा धाक कमी होत चाल्लाय हो!!!
:)

पैसा's picture

25 Apr 2014 - 12:30 am | पैसा

जन्माला आल्यापासून पहिल्यांदा बरोबर बोल्ली असेल.

पैसा's picture

24 Apr 2014 - 11:46 pm | पैसा

आपण मेल्यावर काही का होईना, जिवंत असेपर्यंत दुसर्‍या कोणाचं कशाला ऐकावं?

जवळची एक नातेवाईक बोलली आता हिला २ मुळीच झाल्यात मग माझा मुलगाच आता वारसदार त्यामुळे सगळा मान सन्मान मलाच मिळणार.

असं तुमच्या जाऊबै म्हणाल्या वाट्टं! तिला मान काय घ्यायचा तो घेऊ दे की! वडिलोपार्जित इस्टेट काय असेल त्यात तुमचा नवरा, दीर, नंणंद सगळ्यांचा सारखाच हक्क आहे. ती इस्टेट पुढे दोन्ही मुलींना सारखी मिळेल. त्यात या दीर जाऊ इ लोकांचा काही संबंध नाही. आणि मुलगा दत्तक घ्या म्हणणारे कोण ते येडपट? तुमच्या मुलींना सांभाळायला ते आले होते का? मग झक मारू देत ना!

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2014 - 12:00 am | पिवळा डांबिस

मग झक मारू देत ना!

आमचे गोमंतकीय लोक स्पष्ट बोलण्यात अगदी पटाईत हो!!
:)

पैसा's picture

25 Apr 2014 - 12:22 am | पैसा

ती म्हण माहित आहे ना! "भिडे भिडे.. __ __"

सुबोध खरे's picture

25 Apr 2014 - 1:05 pm | सुबोध खरे

अगदी अगदी बरोबर

नगरीनिरंजन's picture

25 Apr 2014 - 5:30 am | नगरीनिरंजन

वा वा पहिलाच लेख! दोन मुलींच्या ऐवजी मुलगे असते तर लेखिकेला मिसळपाववर पहिला लेख लिहायची उसंत मिळाली नसती; तरीही स्वागत आहे!
बाकी लग्न-बिग्नादि सांस्कृतिक गोष्टींच्या मुळाशी फक्त अर्थव्यवहार असल्याने असे अनुभव आले त्यात काही आश्चर्य नाही. एकतर या निव्वळ संपत्ती रक्षणासाठीच निर्माण झालेल्या लग्नाच्या व्यवस्थेचा स्विकार करु नये आणि केलाच आहे तर जी तिची रीत आहे त्याप्रमाणे आलेले अनुभव स्विकारावे.
तरी आधुनिक काळात कायदा आणि बराचसा समाजही मुलींच्या बाजूने असल्याने तुमच्या मुलींनाच तुमची संपत्ती मिळेल. काळजी नसावी.
मुळात भविष्यात काय घडेल हे माहित नसताना आपल्या संपत्तीचा विचार करत बसणारे लोक डोक्यात जातात आणि त्यांना महत्त्व देणारेही तेवढेच डोक्यात जातात.
आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 8:38 am | चित्रगुप्त

आपल्या अपत्यांबरोबर अर्थपूर्ण आयुष्य घालवून त्यांना खर्‍या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायचे की याच व्यवस्थेला आधार देणारे वेल्थ प्रोटेक्शन मशिन बनवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

अगदी खरे. खरेतर हेच महत्वाचे आहे. आणि 'प्रेम' हे मूल्य सर्वोपरी महत्वाचे.
तरी सुद्धा 'सावधपण सर्वविषयी'हवेच.

कंजूस's picture

25 Apr 2014 - 8:40 am | कंजूस

तुमच्या नवऱ्याला जो वडीलेपार्जितवाटणीचा हिस्सा मिळणार तो पुढे जावयांपर्यँत पोहोचणार हे त्यांना नको आहे .तसा तो आत्याच्या(नणंदेच्या)नवऱ्यापर्यँत जाणार त्याचेमात्र सुतक नसते .

बाकी मुलगे असणाऱ्यांना प्रॉपटीची भांडणे म्हातारपणी बघत बसावी लागतातच .मुलांच्या आधाराने राहिल्यास ब्लैकमेल करतात आणि छळतात .परदेशात आईबाप पोरांना विशीला XXच्यावर मारून हाकलतात आणि स्वतंत्र राहातात पण उतारवयात कोणी पाहात नाही .

वंशवेल ही कल्पना खोटी आहे .उतारवयात आपलं कसं होणार हा खरा विचार असतो .दोन्ही पध्दतीत फायदे तोटे आहेत .बाळपणी आणि म्हातारपणी सुख केवळ नशिबाने मिळते ते विकत अथवा कष्टाने मिळत नाही .

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 9:57 am | संजय क्षीरसागर

त्यामुळे आता प्रॉपर्टीसाठी पुन्हा डान्स न करणं उत्तम. मुलींचं उत्तम संगोपन करुन जावयांनाच पुत्र माना म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल.

म्हणजे तुम्हाला मुलगा हवाच आहे असा अर्थ निघतो.
कशाला जावयाला पुत्र माना. जावयाने पैसे मागितले तर अवघड जागी दुखणे होते. मुलासारखे स्वच्छ सांगता येईल का पैसे मिळणार नाहीत म्हणून.
साधे सरळ मला दोन मुली( किंवा मुलगे) आहेत त्यांच्या बाललीलांचा आनंद घ्या. त्यांना मोठे होताना बघताना जो आनंद होतो त्याचा उपभोग घ्या कि. जावयाला पुत्र माना ( किंवा सुनेला मुलगी माना) हा आव कशासाठी?

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2014 - 1:12 pm | पिलीयन रायडर

बरोब्बर..

मुलीला मुलगा माना.. जावयाला मुलगा माना.. कुणाला न कुणाला तरी "मुलगा" मानाच हे काय नाटक आहे..

ज्या त्या नात्याला, त्या त्या हिशोबानी वागवायचं असतं..

दिव्यश्री's picture

25 Apr 2014 - 1:16 pm | दिव्यश्री

+++++++++++++++++++ १११११ . सून कधीही मुलगी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सासू हि सासूच असते . जावई कधीच मुलगा बनू शकत नाही . फारच थोडे अगदी बोटावर मोजण्या इतके देखील अपवाद असतील कि नाही माहिती नाही . उगीचं का जावयाला पत्रिकेतला ग्रह म्हटले जाते ? कित्येक वर्षे झाली तरी बर्याच गोष्टी होत्या तशाच आहेत . सुखावह बदल फारच कमी आहेत .

कृपया इथे दुसर्यांची उदाहरणे देऊ नये . अमका-तमका/अमकी-तमकी कसा/कशी मुलासारखा / मुलीसारखी आहे इई.
शेवटी मुला-मुली , आई-वडील यासारख असण वेगळ आणी प्रत्यक्षात ते नात असण वेगळं.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 2:07 pm | संजय क्षीरसागर

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात. मुलीला मुलगा माना, सुनेला मुलगी माना किंवा जावयाला मुलगा माना (किंवा पत्नीला परस्त्री माना!) सगळा वैयक्तिक दृष्टीकोन आणि पारस्पारिक संबंध आहे.

मी स्वतः (नातं काय आहे यापेक्षा) समोरच्या प्रसंगात काय योग्य आणि आवश्यक आहे त्याप्रमाणे निर्णय घेतो. मग मुलगा असो, पत्नी, आई की वडील. त्यामुळे जावई पैसे मागतोयं, की मुलगा, की भाऊ, की मित्र यापेक्षा प्रसंग काय आहे आणि घेणार्‍याची सचोटी आणि निकड काय आहे हा निकष राहातो. तस्मात आर्थिक असो की भावनिक कोणत्याही प्रसंगात कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही.

लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं. कारण खरा मुद्दा असा आहे... 'म्हणजे कुटुंब एकसंध राहून सगळं साधेल'.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2014 - 2:11 pm | पिलीयन रायडर

लेखिकेला (वर्तमानात) भविष्यकालीन आधाराची गरज आहे त्यामुळे तिला दिलासा मिळावा आणि पुन्हा नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकविधानानं नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पर्याय सुचवलायं

दिलासा मिळण्यासाठी कुणाला तरी "मुलगा" मानणं आवश्यक आहे काय? त्यांच्या मुलीच खंबीर होऊन त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ शकतातच ना. "जावयाला मुलगा माना" ह्याची आवश्यकताच काय? "मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?

मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

आवश्यक आहे काय?

नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?

"मुलींनाच खंबीर बनवा" हा जास्त सोपा उपाय नाही का?

इथे मुला-मुलीचा प्रश्न कुठे येतो. प्रत्येक मूल खंबीरच असायला असाच पालकाचा प्रयत्न असतो.

मनाला संपत्ती बाबत आश्वस्त होण्यासाठी मुलगाच हवा अस्तो का? मुली असल्या की चिंता अस्ते, मुलगा असल्यास ती नसते असे काही ग्रुहितक आहे का?

नाही. मन स्वस्थ होण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो मग संपत्ती असली काय, मुलगी असली काय आणि मुलगा नसला काय कशानं काही फरक पडत नाही.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2014 - 2:23 pm | पिलीयन रायडर

नाही तर लेखिकेनं ही पोस्ट कशाला टाकली असती?

आँ? म्हणजे त्यांनी कुणाला न कुणाला मुलगा मानलं की त्यांना दिलासा मिळणारे का?
अहो नाही हो.. त्या अगदी उलट म्हणत आहेत..

असो..

हे लेख वाचून लक्षात येत नाही काय? त्यांना मुलीला मुलगा मानता येत असतं तर विषयच संपला होता.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2014 - 2:34 pm | पिलीयन रायडर

पण एक मात्र नक्की , मी काही झाल तरी मी माझ्या मुलीना मुलगा म्हणून नाही तर मुली म्हणूनच वाढवणार पण मानाने आणि आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटेकरी वारसदार ह्या माझ्या निकता आणि शिरीन च असतील

त्यांनी इथे फक्त त्यांचा अनुभव मांडलाय.. थोडी भीती दर्शवली आहे इतकंच.. पण आपल्या मुलींबाबतच्या मतांवर त्या ठम आहेतच..

कुणाला मुलगा मानु हा त्यांचा प्रश्न नाहिचे (आणि तसं करायची काही एक गरजही नाहीये).. त्या मुलींमध्ये सुखी आहेत..

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 2:44 pm | संजय क्षीरसागर

त्या भीतीवर तर मी उपाय सांगितलायं! आणि तो नवपुत्रप्राप्ती किंवा दत्तकपुत्र या संभ्रमापेक्षा सोयीचा आहे.

दिव्यश्री's picture

25 Apr 2014 - 2:29 pm | दिव्यश्री

+++ १ . प्रसंगानुरूप सगळीच नाती बदलतात . म्हणून याला हे माना त्याला ते माना याची गरजच नाही . रादर तो पर्याय होऊच शकत नाही . जे आहे ते आहे आणि ते कायम तसंच असतचं . आहे ती नाती आधी योग्य प्रकारे सांभाळावीत म्हणजे मग मानलेल्या नात्यांना वागवाव लागत नाही . आई बापाशी संबंध तोडून सासुर्याना आईबाप मानण हे किती जणांना रुचेल आणि त्यांच्या सख्ख्या आईबापाला काय वाटेल याचा विचार केलात का? आणि व्हायीस व्हर्सा . स्वतःच्या आईबापाला सोडून किती जण घरजावई बनतील ??? मला सांगू नका स्वतःच उत्तर प्रामाणिक असू द्या म्हणजे झाल . सुनेने मात्र परंपरा /रूढी म्हणून सासरीच यायचं . माहेर विसरायचं ई. असो गाडं भलतीकडेच जायचं .

जावई घरीच हवा हा अट्टाहास कशापायी? त्यानं मुलींशी सुखात संसार केला आणि सासू-सासर्‍यांचा अडचणीला उपयोगी पडला की झालं.

दिव्यश्री's picture

25 Apr 2014 - 2:46 pm | दिव्यश्री

तेच ना लांब राहून करायचं . अगदी अडचणीच्या वेळी सासू सासर्यांनी काय करायचं ? कुठे जावयाला शोधायचं ? जर तो दुसर्या शहरात / राज्यात / देशात असेल तर . याला म्हणतात काडीने औषध लावणे . म्हणजे काय आपण करतो , काळजी आहे हे दाखवायचं पण लांबून . घराजावइ असावा ही अपेक्षाच नसते कोणाला कारण जगजाहीरच आहे . असो . रक्ताची नाती ती रक्ताची नातीच . काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात पण ती मनापासून असली तर जस कि मैत्रीच नात . ते कोणी जबरदस्ती केली म्हणून वागवल/ ताणल जात नाही . ते अगदी आतून असत . इष्टेटीसाठी / स्वार्थासाठी जर नाती जोडायची /मानायची असतील तर बोलायलाच नको .

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 2:53 pm | संजय क्षीरसागर

रक्ताची नाती ती रक्ताची नातीच

वस्तुस्थिती तशी नाही....कारण

शेवटी सगळी नाती हा मान्यतेचाच खेळ आहे कारण विवाह या `प्रार्थमिक मान्यतेतून' ती निर्माण होतात.

दिव्यश्री's picture

25 Apr 2014 - 2:59 pm | दिव्यश्री

असो . कितीही लिहाल तरी कमीच आहे . कारण माझा मुद्दा मला योग्यच वाटतोय तसाच तुमचा तुम्हाला . चर्चा भरकटण्या आधी थांबणे योग्य .

नावातकायआहे's picture

25 Apr 2014 - 10:06 am | नावातकायआहे

ह्यात चर्चा करण्यासारख काय आहे? :-(??

सुबोध खरे's picture

25 Apr 2014 - 1:03 pm | सुबोध खरे

+१

दिव्यश्री's picture

25 Apr 2014 - 1:32 pm | दिव्यश्री

जग कुठे चाललाय आपण कुठे चाललोय . दुसरे लोक इतके महत्वाचे असतात का आपल्या आयुष्यात कि आपण आपले महत्वाचे निर्णय त्यांच्यानुसार घ्यायचे/बदलायचे? तुम्ही सुशिक्षित दिसता . कायद्याच थोडाफार ज्ञान सगळ्यांनाच असत . कमीत कमी स्वतःच्या फायद्याच ग्यान तर नक्कीच . मग हे काय ???? स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशावर / मालमत्तेवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकेल ?

चांगला वकील बघा , चांगला सल्ला घ्या . तो जास्त उपयोगी पडेल तुमच्या असल्या फालतू आणि खालच्या दर्जाच्या विचारसरणीच्या माणसांपेक्षा . बाकी सगळ्यांनी योग्यच सांगितलं आहे . मुली आहेत मुलींसारख वागवा . कराटे शिकवा , टफ बनवा , दुनियादारी हळूहळू समजावा .
एक मैत्रीण ढसाढसा रडत होती . वडील गेले जानेवारीत . आठव्या दिवसापासून मोठा भाऊ भांडतोय आईशी इष्टेटी साठी . आईकडे बघत नाही . नुसता छळवाद मांडलाय . बर त्याला काही कमी नाही परदेशात राहतो , नोकरी करतो त्यालाही एकाच मुलगा आहे . मनात म्हंटल थांब ग त्याच्यावर हि वेळ येयीलच कधीतरी .