भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
24 Apr 2014 - 12:29 pm

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी,
भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई,

भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे
भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात
भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी

भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे
भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही
भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण
निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही
----पगला गजोधर

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

24 Apr 2014 - 12:59 pm | माहितगार

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, आणि भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे

ह्या दोन ओळीच विडंबन किंवा उपहास म्हणता येतील बाकी ओळीत मात्र वास्तवच दिसत.

पु.ले.शु.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 1:03 pm | आयुर्हित

१००% सहमत

या विषयावरील एक ताजा लेख :Shankar Sharma: Corruption is a non-issue for the voter