'सकाळ' मधे येणारे फोटो

यदुनाथ's picture
यदुनाथ in काथ्याकूट
24 Apr 2014 - 11:53 am
गाभा: 

'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात.
जसे
१. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो
- राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा
- सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो
- ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो
- परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना
- सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो

२. नेहमी येणारे फोटो
- ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो
- पुलावरील नक्शीचे ग्रिल
- पवार कुटुबिय

असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

24 Apr 2014 - 11:58 am | तुषार काळभोर

ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो.
नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Apr 2014 - 12:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पुण्यात कुठेतरी शेतीविषयक सम्मेलन असते.व्यासपीठावरच्या शेतीतज्ञांचा फोटो.
(सकाळ माजी वाचक्)माई

उगा काहितरीच's picture

24 Apr 2014 - 12:03 pm | उगा काहितरीच

फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)

- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो)
- सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.)
- पावसात भिजणार्‍या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ")
- कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले")
- चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी)
- अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यसवायजी's picture

24 Apr 2014 - 8:19 pm | यसवायजी

हे लोक स्वतःलाच जाणते राजे म्हणवतात.. राजांचा बड्डे तीनदा साजरा करायचा असतोच की.

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 9:02 pm | चित्रगुप्त

अवरंगजेबावर मराठी पुस्तक आहे का एकादे चांगलेसे?

प्रचेतस's picture

24 Apr 2014 - 9:34 pm | प्रचेतस

सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2014 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

=)) सकाळचा काळ.. आ.. दु..दु... बाळ! =))

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 7:24 pm | प्यारे१

>>>> चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी)

इस्कटून सांगा! ह्यो बाबा कोन?
बाकीचं समजलं.

आदूबाळ's picture

24 Apr 2014 - 8:36 pm | आदूबाळ

म्हापौर

- अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)

हा हा हा =))

आशु जोग's picture

24 Apr 2014 - 9:55 pm | आशु जोग

http://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.htm

इथे पहा ना विकत का घेता...