राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 2:18 pm

एप्रिल २०१४
कोणत्याशा वृत्तपत्रीय विश्लेषणात राहुल गांधी आणि मोदी यांच्या प्रचारातील फरकाचे विश्लेषण वाचण्यात आले त्या पाठोपाठ राहुल गांधींचा नेमके तेच मुद्दे कव्हर करण्यासाठी राहुल गांधींची फाईन ट्यून्ड केलेली इ टीव्ही वरील मुलाखतीचे भाग पाहण्यात आले. टिका झाल्यामुळे किंवा काय माहीत नाही. राहुल गांधींच्या प्रतीमा बदलाचा प्रयत्न होताना दिसतो आहे. हे तुलना झाल्यामुळे प्रतिमा बदलले राहुल गांधी नैसर्गीक वाटत नाहीएत अस माझ व्यक्तीगत मत झाल. आणि हे नैसर्गिक न वाटण्याचा फटकाही त्यांना बसतो आहे अस कुठे तरी वाटत आहे. मनमोहन सिंगांवरही टिका झाली पण त्यांनी त्यांच्या शैलीत अनैसर्गिक बदल टाळलेले दिसतात. सारी मुलाखत भूमिका प्रचारासाठी फाईन्ड ट्यून करून सुद्धा राहुल गांधी अंशतः आतन नर्व्हस असल्याच जाणवत राहत.

देशाच्या भागात युवक काँग्रेसच खर म्हणजे जेनुआईन काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. खास करून पंजाब मध्ये पंजाब अ‍ॅकॉर्डच क्रेडीट राजीवजींना असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभ करण्याच क्रेडीट राहुल गांधींना द्याव वाटत. अर्थात सत्ताधारी पक्ष असल्या
ने राष्ट्रीय स्तरावर मळलेली वाट चोखाळण्यापलिकडे त्यांच्या हातात फार काही शिल्लक राहतही नसावं. आणि आजच्या पब्लिक सेंटीमेंटला काँग्रेसच्या मळलेल्या त्याच त्या राजकारणाच्या वाटाच नेमक्या नकोशा झाल्या असाव्यात अशी शंका येते. अशा प्रसंगी राहुल गांधीना मनमोकळे पणाने हो मला विरोधी पक्षातच बसायचे आहे असेही म्हणता येत नाही.

राहुल गांधींच्या मोदींसोबतच्या तुलने पेक्षा त्यांची तुलना फिरोझ गांधींशी करून पहा. किंवा नेहरू विरोधी पक्षात बसले असते तर संसदेत आणि राजकारणात त्यांनी स्वतःला कस सादर केल असत ? आजच्या घडीला इंदीरा गांधींनी विरोधी पक्ष नेत्या हा रोल कसा निभावला असता ? राजीव गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून कसे सादर झाले किंवा आजच्या घडीला राजीव गांधी कसे सादर झाले असते ? आणि मग विरोधी पक्ष नेता म्हणून सोनीया गांधींना तुर्तास बाजूला ठेवले तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून कसे सादर होतील ? त्यांच्याच आधीच्या पिढ्यांपेक्षा त्यांची नैसर्गीक कार्यशैली वेगळी आहे असे वाटते का ? आणि वेगळी असेल तर इतरांनी सागिंतलेले कृत्रिम कार्यशैलीच ओझ त्यांनी वागवण त्यांना आणि पर्यायाने काँग्रेस आणि युपीए ला कितपत उपयूक्त ठरू शकेल ?

राहुल गांधींपुढे पंतप्रधान झाल्यास काय याचे प्रश्न आहेत पण विरोधी पक्षात बसावयास लागल्यास त्यांच्या पुढच्या विरोधी पक्षनेता म्हणून काय संधी आणि मर्यादा असतील.

काँग्रेसला फारच कमी जागा मिळाल्या पण युपीएला अथवा तिसर्‍या आघाडीची स्थिती सरकार बनवण्यासारखी राहिली आणि युपीए आघाडीती इतर घटकांनी राहुल गांधींच पंतप्रधान म्हणून नेत्रृत्व स्विकारण्यास नकार दिला तर त्यांच्यापुढे नेमकी कोणती आव्हाने असतील ?

* जाने २०१८ बहारीन

** https://youtu.be/z4DMLuv1G04 निवडक काँग्रेस भक्तांच्या गोतावळ्यात , अवघड प्रश्नात सॅम पित्रोदा मदत करताना दिसतात. भाजपाईंना आनंदाची गोष्ट भारतातील स्त्री असुरक्षा स्थिती मिडिया दाखवतो तेवढी वाईट नाही हे राहुल गांधी कबूल करताना दिसतात.

* ऑगस्ट २०१८ राहुल गांधी उवाच जर्मनी आणि इंग्लंड

- २०१९ च्या निवडणूक प्रचाराची राहुल गांधींची नांदी : राहुल गांधींची मांडणी सॅम पित्रोदा आणि शशी थरुर कडून पढवल्या प्रमाणे अधिक वाटते आहे. अर्थात आता जरा प्रगती आहे सॅम पित्रोदा आणि शशी थरुर मागच्या प्रमाणे सॅम पित्रोडाची मदत न घेता मुलाखती दिलेल्या दिसतात. (सॅम पित्रोदा आणि शशी थरुर श्रोत्यात बसून विद्यार्थ्याची प्रगती अनुभवत असावेत) यातील निसटत्या बाजू नीट शोधून सर्वसामान्य जनते पर्यंत नेण्यास भाजपा समर्थक कमी पडल्यास भाजपाला २०१९ निवडणूका अशक्य नाही पण महत्वाचे आवाहन नक्कीच ठरू शकतील असे वाटते.

* https://youtu.be/cIvbi61xpcM
* https://youtu.be/tUe-91wbcHE
* https://youtu.be/3m08A_IL-F4
* https://youtu.be/-0EfrJKlsnE
* https://youtu.be/VXo02MZB-Bk
* https://youtu.be/89E16KoCris
* https://youtu.be/mF0tJbkH0MY

* संबंधीत चर्चा धागा

** लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?
** राष्ट्रीय राजकारणावरचा प्रादेशिक अस्मितांचा प्रभाव

* संदर्भ आणि अधिक वाचन

** Indian general election, 2014 इंग्रजी विकिपीडिया लेख

** माझे नेहरवायण १
** माझे नेहरवायण २
** माझे नेहरवायण ३

राजकारणविचार

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Apr 2014 - 2:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम विषय.सगळीकडे मोदीमय वातावरण असताना ह्या विषयावरही उहापोह व्ह्यायला हवा.मला व ह्यांना हा राहूल नाटकी वाटतो. उगाच बोलायचे म्हणून बोलतो असे वाटते. राहूल गांधी ह्यांच्या समोर काय आव्हाने असतील ह्याचे उत्तर आता तरी देणे अवघड वाटते.सत्तेवर असो वा नसो, देशासमोर अनेक आव्हाने आहेत.एखादा मुद्दा त्यांनी जोर लावून धरावा.

माई

वरुण मोहिते's picture

27 Aug 2018 - 10:55 am | वरुण मोहिते

निवडणुकी साठी. सगळ्या जगाचे ज्ञान तुमच्या ह्यांच्याकडे आहे . मी प्रचारात सामील होईन.

चित्रगुप्त's picture

23 Apr 2014 - 3:59 pm | चित्रगुप्त

कशाला विरोधी पक्षनेता तरी??
खरेतर आता या मंडळींनी इथला गाशा गुंडाळून (बाईंच्या) मायदेशी परत जावे हे बरे, असे त्याची मुलाखत बघून अनेकांचे मत झालेले आहे.

पैसा's picture

23 Apr 2014 - 4:30 pm | पैसा

विरोधी पक्षनेत्याने संसद चालेल तेवढा सर्ववेळ संसदेत उपस्थित रहावे लागते. आणि मग सरकारला अडचणीत आणण्यासाठी मुद्दे काढून प्रभावीरीत्या भाषणे करणे आणि संसदेच्या कामकाजात भाग घेणे अपेक्षित आहे.

रागांची आधीच्या लोकसभेतील कामगिरी काय आहे? ४३% उपस्थिती आणि ० प्रश्न उपस्थित केला. २ चर्चात भाग घेतला. संसदेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?

संसदेच्या बाहेर ते काय करू शकतील देवजाणे. ते सतत गोंधळलेले वाटतात.

प्यारे१'s picture

23 Apr 2014 - 4:59 pm | प्यारे१

>>>ते सतत गोंधळलेले वाटतात.

अजून डौट आहेच का?
ते रागा, भैताड च्यायचं!
युवा काँग्रेसच्या शहर उपप्रमुखाला जेवढं राजकारण कळतंय त्याच्या १० % तरी याला कळतं का नाही कुणास ठाऊक.
काँग्रेस वाले हुशार खरे... गुळाचा गणपती शिक्का मारुन आणून ठेवला की खाली 'सग्गळं' करायला मोकळे!

बकी नेत्यांना समाजात स्वानुभवातून बरच शिकता येत आणि दुर्दैवानी या भाऊ बहिणींनी ते जीवन मीस केलय. रिअल लाईफ एक्सप्जर इस रिअल लाईफ एक्सपोजर आणि बहुश्रूततेचा अभाव. नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती त्याचा या भाऊ बहिणींकडे अभाव असणे आश्चर्य कारक नाही. काँग्रेसचे नेते गांधी परिवारा व्यतीरीक्त दुसरा सर्वमान्य नेता देण्यात कमी पडतात म्हणून यांना आपण का झेलाव अस सर्व सामान्य जनतेला वाटल तर आश्चर्य नाही. त्या शिवाय चापलूसगिरी करणार्‍यांच्या कोंडाळ्यानीं यांच बरच नुकसान होत रहात.

इन एनी केस राहूल गांधी विरोधी पक्ष नेते पद सांभाळू शकले नाहीत तर विरोधी पक्ष नेते पदा साठी दुसरी कोणती प्रभावी नावे तुम्हाला दिसतात का ?

माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा

माईसाहेब कुरसूंदीकर, चित्रगुप्त, पैसा मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.

नितिनजी धाग्यास प्रतिसादाकरता धन्यवाद वरूनच देतो म्हणजे खाली प्रतिसाद देणार्‍यां उत्साही मिपाकरांच्या जागेत माझी लुडबूड टळेल.

@ माहितगार - नेहरू, इदिरा गांधी आणि राजीवजी यांना प्रत्येक प्रदेशातला प्रत्येक विचार छटेचा माणूस अगदी विरोधी पक्षाचा असलातरी त्यांच्या वैचारीक भूमिका नेमक्या का आणि कशा घडतात याची प्रत्यक्ष माहिती होती.
पं नेहरू आणि इंदिराजी बद्दल ठीक मात्र राजीवजी यांच्याबद्दल वैचारिक भूमिका नेमक्या का आणि कश्या घडतात वगैरे लागू होत अस म्हणण्याच धाडस करवत नाही.राजीवजी पण तसे अननुभवी आणि नवखेच होते. सल्लागारांच्या गराड्यात राहून ते पक्ष आणि सरकार नियंत्रित करत असत.राजीवजी आणि स्वातंत्र्य दिवस व गणतंत्र दिवस यांत गल्लत करत याचे किस्से प्रसिद्ध आहेत.मात्र त्यांच्याकडे युवक, तसेच तंत्रज्ञान वगैरे बाबत स्वतःची एक भूमिका होती हे मात्र खरे.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2014 - 5:01 pm | नितिन थत्ते

विरोधी पक्ष नेतेपदी सुषमा स्वराज चालतील

आत्मशून्य's picture

23 Apr 2014 - 5:15 pm | आत्मशून्य

.

बाब्बो..काँग्रेस मधे यायच्या बेतात आहे कि काय सुषमा स्वराज?

बाब्बो..काँग्रेस मधे यायच्या बेतात आहे कि काय सुषमा स्वराज?

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2014 - 10:49 am | धर्मराजमुटके

विरोधी पक्षनेता बनण्यासाठी काय क्रायटेरीया असतो ?

सुहासदवन's picture

25 Apr 2014 - 11:02 am | सुहासदवन

क्राय + टेरी + या

क्राय = सतत रडगाणे गाणे - सत्ताधारी पक्षाने काही चांगले केले तरी आणि नाही केले तरी.
टेरी = सतत सत्ताधारी पक्षाची टेर खेचत शब्दांचे खेळ करीत राहाणे.
या = या व्यतिरिक्त आम्ही (विरोधी पक्ष) एकही काम करीत नाही.

राहुलजींसाठी आम्हीपण तीन वर्षापुर्वी चर्चा आपल्या समर्थकांच्याही आधी धागा काढला होता तर ! :) राहुलजी , या क्षणीतरी कदाचित येत्या निवडणूकीसाठी आपल्या वंशाच्या कृपेने राष्ट्रीय विरोधीपक्षनेते म्हणून स्थानापन्न होताना दिसतरय तर ! घोडा मैदाने काही महिन्यांवर येऊन ठेपली आहेत :)

माहितगार's picture

1 May 2018 - 11:08 pm | माहितगार

सॉरी या धाग्याला तीन नव्हे चारवर्षे झालीत

कलंत्री's picture

2 May 2018 - 10:32 am | कलंत्री

भारतासाठी सक्षम नेतृत्व, सत्ताधारी अथवा विरोधी पक्षात नसणे ही एक समस्या झाल्याचे दिसते.

भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही आणि विरोधी पक्ष इतका गलितगात्र झालेला बघणेही भयावह झालेला आहे.

पक्ष म्हणजे सत्ता संपादनासाठी शिडी, पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे, आपापले आयटी सेल निर्माण करणे, टवाळकी करत राजकारण करणे हे सर्वच काळजी करण्यासारखे झालेले आहे.

भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय नाही

नेहरू नंतर कोण (म्हणजे कोणाला का होइना झेपेल का या अर्थाने) पुस्तके पडायची तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे सबल नेतृत्व होते का?
------------------

आपापले आयटी सेल निर्माण करणे,

यात काय गैर आहे?
------------------------

पक्षात पैश्याच्या आधारे जागा निर्माण करणे,

मंजे? कोणी केलं हे?
---------------------------------------

टवाळकी करत राजकारण

काहीही?

गामा पैलवान's picture

2 May 2018 - 5:59 pm | गामा पैलवान

ज्योतिरादित्य शिंद्यांसारख्या उमद्या तरुणानं पप्पूची चाकरी केलेली पाहतांना अक्षरश: काळजाला घरं पडतात. पण करणार काय. जास्त शहाणपणा केलास तर तुझ्या बापाप्रमाणे तुझीही वासलात लावण्यात येईल. पप्पूचं निमूटपणे ऐक, अशी अप्रत्यक्ष धमकीच मिळालेली आहे.

-गा.पै.

माहितगार's picture

24 Aug 2018 - 8:05 pm | माहितगार

मोदींप्रमाणेच राहुल गांधींच्याही खुल्या मंचावरील प्रश्नोत्तरे कमी झालेली आहेत, गेल्या दोन दिवसातील जर्मनी आणि इंग्लंड मिळूनची आतापर्यंतची राहुल गांधीची खालील तीन सादरीकरणे (प्रथमच पूर्णतः ) ऐकली. यावर भारतीय माध्यमातून इतर मुद्द्यांवर चर्चा / वाद चालू असावा पण मला स्वतःला काही वेगळे मुद्दे जाणवले.

१) राहुल गांधी सध्याच्या मोदी सरकारकडे व्हीजन नसल्याची तक्रार करताना दिसतात, प्रत्युत्तरात राहुल गांधींची स्वतःची व्हीजन सविस्तर मांडताना दिसत नाहीत , जेवढी व्हीजन स्पष्ट होते ती सर्वसामान्य राजकीय वाटते, स्टेटमन लाईक असा फील येत नाही. इतर एका माध्यमात राहुलला स्वतःलाच व्हीजनच नसल्याची तक्रार दिसली, पण तिन्ही सादरीकरणे पाहिल्या नंतर राहुल गांधी मोदींवर प्रक्रीया रहीत नी जर्क प्रशासन चालवत असल्याचा आक्षेप ठेवतात त्यात पूर्ण तथ्य नसले तरी त्यांच्या टिकेत अंशतः तथ्य असावे. पण राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या काय प्रक्रीया असतील हे सांगताना दिसत नाहीत.

२) मॅन्युफॅक्चरींग जॉब्सचा मुद्दा पकडून राहुल गांधींना हिट करण्याची काँग्रेसी रणनिती दिसते , इथे स्मॉल आणि मिडीयम स्केल उद्योगातून जोब आणू असे राहुल गांधी पॉलीसी मार्केट करताना दिसतात, हा मुद्दा मागच्या काँग्रेस काळात न केलेले नवे काय करणार ; कंझुमरीझम एवजी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा जावा म्हणून मागेही कागदावर पॉलीसी होत्या पण पैसा मॅनुफॅक्चरींग मध्ये लावलाच जात नाही. हातात पैसा असलेला भारतीय व्यापारी मॅनुफॅक्चरींग मध्ये पैसा का लावत नाही याची माहिती राहुल गांधींना त्यांच्या मेव्हण्याकडूनही घेता यावी. मॅनुफॅक्चरींग आणि अ‍ॅग्री इंडस्ट्रीसाठी इंटरेस्ट रेट कमी करणे आणि ते त्यासाठीच वापरले जातील हे पहाणे कर्मकठीण आहे त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस्ने काही मार्ग शोधले आहेत का ? आता या समस्या एवढ्या जवळून माहिती व्हाव्यात एवढे राहुल गांधींचे (आणि अगदी अरुण जेटलींचे ) एक्सपोजर असेल का याची साशंकता वाटते. स्मॉलस्केल मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचा जवळून अनुभव असलेली व्यक्ती फायनान्स मिनीस्टरपदी जाणे गरजेचे असावे. तसे सेक्रेटरी लेव्हल ला प्रायव्हेट इंडस्ट्रीचा एक्सपोजर असलेले लोक घेण्याचे मोदींचे प्रयत्नांचा उद्देश्य चांगला असावा.

३) मोदींवर एकाधिकार शाहीची टिका आणि ऐकण्याचे महत्व सांगणारे राहुल गांधी स्वतःही एकटेच बोलण्याची सवय असलेले जाणवले. केवळ मिडीया मॅनेजनेंट स्टेज करण्यापुरते मो दींपेक्षा मिडिया मॅनेज करणार्‍यांचे अधिक ऐकत असावेत असे वाटून गेले

३) राहुल गांधींची इनक्लुझीवीटी आणि अंहिसावाद महात्मा गांधींच्या खिलाफती राजकारणाच्या जवळ जाणारा वाटला. लिट्टे आणि काश्मिरातील अतीरेक्यांचा हिंसाचार केवळ अहिंसात्मक प्रतिसादाने राहुल गांधी सोडवू शकतात का ? असे असेल तर राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या शिक्षा रद्द का नाही केल्या ? असे बालीश प्रश्न मुलाखत ऐकताना पडत होते.

४) स्त्री समानतेवर बोलताना तलाकचा प्रश्न अनुल्लेखीत ठेवला प्रश्न विचारणार्‍यांनीही ज्या अर्थी विचारले नाही तरी निवडक श्रोत्यांसमोर निवडक बर्‍यापैकी पुर्व नियोजीत प्रश्नोत्तरे असेच स्वरुप असावे.

५) युनिटी आणि डयव्हरसिटी गुरुनानकांच्या काळापासून भारतात आली (म्हणजे त्या पुर्वी भारतात नव्हती) हे समोरचा श्रोतावर्ग पाहून निवडलेली भूमिका राजकारणी घराण्याची पार्श्वभूमीतून विकसीत कौशल्य दाखवते पण ..

६) इतरांना ऐकावे आणि राग आणि द्वेष कमी होण्यसाठी त्यांना समजून घ्यावे यावर बरेच तत्वज्ञाअ सांगितले , भाजपाई आणि संघीयांच्या राग मात्र केवळ मिठी मारुन कमी व्हावा अशी अपेक्षा विरोधाभासी वाटली. खास करुन लांगुलचालनवाद नेहरु ते सोनीया पलिकडे जाऊन गांधींच्या खिलाफतीपर्यंत पोहचणारा असावा असे वाटत राहीले.

७ ) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे ध्येय शहरीकरणाचे होते आणि आहे हे ऐकुन भरुन आले.

८) म. गांधींची अहिंसा खिलाफतवाद घेतला, पण म. गांधी राजकारणातही सत्य बोलण्यावर भर देत त्यापासून राहुल गांधी राजकारणाच्या दृष्टीने दूर असावेत (कुठे कुठे ते भाजपा समर्थकांवर सोडलेले पुरेसे असावे) माझ्या दृष्टीने ते इतरांचे ऐकत असतील आणि महात्मा गांधी आदर्श असेल तर प्रथमतः खानदानी नेपोटीझमला तलाक देण्याची स्वतः आपल्या बहीण आणि मेव्हण्यासह सुरवात करावी.

* https://youtu.be/cIvbi61xpcM
* https://youtu.be/tUe-91wbcHE
* https://youtu.be/3m08A_IL-F4

SHASHANKPARAB's picture

26 Aug 2018 - 10:34 pm | SHASHANKPARAB

राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत यापेक्षा इंदिरा कॉंग्रेससमोर अध्यक्ष पदासाठी काय पर्याय आहेत, हा खरा प्रश्न आहे. बाकी मुळातच बेचव असणार्‍या कांदेपोह्यांवर कितीही कोथिंबीर किंवा शेव पसरवली, तरीही ते बेचव आहेत हे कळतच. नेतृत्वगुण अंतर्मनात असावा लागतो, तो शिकून केवळ दिखाव्यासाठी वापरता येत नाही हे ज्या दिवशी सोनियामाईना व राहुलला कळेल नि ते पायउतार होऊन इंदिरा कॉंग्रेस पक्षाची धुरा एखाद्या लायक नेत्याकडे सोपवतील, तेव्हाच कॉंग्रेसला काहीतरी आशा असेल.

माहितगार's picture

26 Aug 2018 - 11:19 pm | माहितगार

नेपोटीझम तत्वतः मलाही मान्य नाही. पण आपण गेल्या दोन- तीन दिवसातील राहुल गांधीं ची नवीन मांडणीचे व्हीडीओ मुळातून अभ्यासले आहेत का ? त्यांच्या समोर उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांवर त्यांची वरपांगी तरी स्ट्रॅटेजी आता पुढे आली आहे. त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण करण्या साठी भाजपा समर्थक कितपत तयार असतील या बाबत साशंकता वाटते.

डँबिस००७'s picture

27 Aug 2018 - 1:04 am | डँबिस००७

आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ?
जर्मन व ईंग्लंड मधल्या राहुल गांधींच्या व्हिजिट मध्ये आयोजलेल्या चर्चा सत्रात त्यांना विचारलेल्या प्रश्नामुळे रा गां चा त्रिफळा उडालेला सर्व जनतेला दिसला.

प्रश्न :२०१९ मध्ये पंतप्रधान होणार का ?
रा गा : मला व्हिजन नाही ! दलित व दबलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी मला काम करायचय !

प्रश्न: तुम्ही पं प्र असता तर डोकलाम ईश्यु कसा हँडल केला असता ?
रा गा : मला डोकलाम बद्दल माहिती नाही त्यामुळे मी सांगु शकत नाही !

डोकलाम बद्दलच्या पार्लमेंटरी कमीटी मध्ये रा गा सुद्धा आहेत !

नितिन थत्ते's picture

27 Aug 2018 - 7:14 am | नितिन थत्ते

प्रश्नोत्तरांना सामोरा न जाणार्‍या भित्र्या नेत्याचा त्रिफळा उडत नाही हे तितकेच खरे. एकतर्फी भाषणात भरपूर वेळा हिट विकेट करून घेतलेली असते.

माहितगार's picture

27 Aug 2018 - 12:34 pm | माहितगार

@ नितीन थत्तेजी, मोदींच्या मर्यादांनी राहुल गांधींच्या मर्यादांचे समर्थन होत नसावे.

@ डँबिस००७ , खालील वाक्यात नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.

आगामी निवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील ह्याबद्दल कोणाला शंका असण्याच कारण नाहीय, त्यामुळे त्या स्ट्रेटेजीतील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मुद्देसूद खंडण भाजपा समर्थकांनी का कराव ?

नितिन थत्ते's picture

27 Aug 2018 - 7:11 am | नितिन थत्ते

तर एकुणात रागा (संपादित) आहे याबद्दल एकमत आहे असं दिसतंय. त्याच्या (संपादित) असण्याबाबत आणि त्यावर भाजप करीत असलेल्या चुकीबाबत तवलीन सिंग या पार्शली भक्त पत्रकार बैंचा कालचा लेख.

https://indianexpress.com/article/opinion/fifth-column-a-goof-or-a-goof-...

माहितगार's picture

27 Aug 2018 - 12:43 pm | माहितगार

विरुद्ध प्रतिक्रीया मिळावी म्हणून अतिशयोक्त विशेषणाचा उपयोग प्रतिसादात केला गेलेला दिसतोय. पहिल्या प्रतिसादातील 'नाटकी' हे विशेषण पुरेसे असावे असे वाटते.

अभ्या..'s picture

27 Aug 2018 - 2:34 pm | अभ्या..

हेहेहे तसं काहीच नाहीये.
इथे संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना? निदान त्यामुळे देशभक्ती तरी प्रुव्ह होईल.
गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही. किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार.
हे करुन ते करुन वर डूआयडीच्या मागे लपून दुसर्‍यांनाच कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. अचाट अफाट आहे सारे.

माहितगार's picture

27 Aug 2018 - 3:39 pm | माहितगार

....कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची विषेषणे लावायलाही तयार. ....

या गोष्टींची या धागा चर्चेत अद्याप आठवण केली नव्हती. मिपकरांप्रती व्यक्तिगततेची सुरवातही झालेली नाही. बाकी आपले डू आयडी चे संदर्भ कळाले नाही. मी डू आयडींचा उघड तात्विक समर्थक असलो तरी माझे अद्याप मिपावर डू आयडी खाते नाही . जे काही आहे ते मुद्यांवर बोलावे . मिपाकरांवर व्यक्तिगततेची आपल्याकडून सुरवात करण्याचे औचित्य समजले नाही.

...किंवा उरलेला प्रमेय म्हणजे धोरणांवर टीका म्हणजे तुम्ही काँग्रेसप्रेमी, म्हणजे तुम्ही रागाप्रेमी, म्हणजे तुम्ही अफजल गुरु, कन्हैय्या, जनयु प्रेमी म्हणजे देशद्रोही हे सिध्दच करायचे ठरवल्यावर आणि काय होणार....

देश विरोधी कारवायांचे समर्थन केल्यावर पदरात अजून काय पडते. (केवळ मिपाकरांबद्दल म्हणत नाहीए एकुणच तथाकथित पुरोगामीत्वाच्या नावा खाली देश विघातक शक्तीचे समर्थना बद्दल प्रश्न चिन्ह आहे )

....गेलाबाजार प्रधान्सेवकाच्या धोरणांवर टीका म्हनजे प्रधानसेवकावर टिका म्हणजेच प्रधानसेवकाच्या पक्षावर टीका म्हणजेच देशावर टीका म्हणजेच देशद्रोही.

त्यांच्या मनात देशविरोधी भूमिका घेतल्या नंतर आलेल्या भितीतून अशी त्यांच्याच मनात अशी प्रमेये जन्मात येत असल्यास कल्पना नाही.
तसे पहाता मी स्वतःही मोदीं - भाजपा संघावर टिकाही केली आहे आणि देशप्रेमही व्यक्त केले . देशप्रेम व्यक्त करताना तोंड न लपवणार्‍यांना काहीच समस्या नाही. प्रश्न देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जे एक्सक्युजेस देऊन तोंड लपवतात त्यांचा असावा.

....संकरीत घराणे म्हणून जी होलसेल संभावना केली जातीय त्या तुलनेने त्या बिचार्‍याला एकट्याला बुध्दीवाचक विशेषण मिळाल्यास काही हरकत नसावी आपली. हो ना?....

मी व्यक्तिशः संकरीत घराणे अशी टिका केलेली नाही. मी आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांचा समर्थक आहे. फिरोज गांधींच्या शान मध्ये आमची मिपावर फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?
नावाची कविता आहे. स्वतः फिरोज गांधीचा परिवार आणि काँग्रेस परिवार फिरोज गांधींचे नाव घेण्यास का लाजतो हा खरा प्रश्न असावा.

नव्या मुलखतीत रागाने स्वतः विरोधकांना समजून घेण्याचे महत्व प्रतिपादीत केले आहे. त्याबाबत तो गंधीर असेल तर त्याने परिवारासहीत राजकारण संन्यास घ्यावा कारण नेपोटीझम हि अस्विकार्य गोष्ट असते हे फिरोज गांधींनीही सांगितले असते. काँग्रेसचे अध्यक्षपद १९ वर्षे पहिल्यांदच सलग बाळगले जाते त्या कालावधीतील सर्व काँग्रेस सरकारांवर रिमोट कंट्रोल असतो, शेतकर्‍याम्च्या जमिनींचे इनसाईडर ट्रेडींग होऊन परिवारातील जावई फिरोझ गांधींची लाज काढतात आणि तरीही शहजादे पत्रकार परिषदेत आमच्या परिवारातील कुणि पंतप्रधानपदी नाही अशी मखलाशी करतात ? याचे ज्यांना कौतुक वाटते त्यांनी सुवसिनी होऊन शहजाद्यांची आरती करत बसावे.

या धाग्याच्या संदर्भाने

* जादवपूर विद्यापीठात देशाच्य एकसंघतेची जी थट्टा झाली त्यावर राहुल गांधींनी राष्ट्रप्रेमी म्हणून भूमिका घेतली का ? घेतली असेल तर नेमकी कोणती भूमिका घेतली होती ? घेतली नसेल तर का घेतली नाही ?

* अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या फशीच्या संदर्भाने राहुल गांधींची नेमकी भूमिका काय होती ? या फाश्या झाल्या तेव्हा त्यंच्याच पक्षाचे सरकर होते. नव्या मुलाखतीतून त्यांना म.गांधीचा अहिंसावाद आठवत आहे, लिट्टेच्या प्रभकरनांच्या मृत्यूने त्यांना दुख्ख झाले म्हणतात. अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या कुटूंबाची काळजी करुन त्यांच्या फाश्या अहिंसावादी रागाने पक्षाकडून माफ का केल्या नाहीत ? अफजल गुरु आणि याकुब मेमनच्या प्रती त्यांच्या पक्षाकडून झालेल्या असहिष्णूतेसाठी नेमके कोणते प्रायश्चित्त रागा ने घेतले ?

नितिन थत्ते's picture

27 Aug 2018 - 4:46 pm | नितिन थत्ते

चु* किंवा *त्या असं लिहिलेलं चाललं असतं का? पूर्ण लिहिलेलं चालत नाही असं दिसतं .

बा*** भां**

अरे कुठे नेऊन ठेवला मिसळपाव (माझा) !!!

SHASHANKPARAB's picture

27 Aug 2018 - 10:04 am | SHASHANKPARAB

राहुल देशात राहून जे काही बोलत असतो, अगदी तेच मुद्दे जरासा विचारवंतांचा आव आणून बोलत आहे. त्यातही वादग्रस्त मुद्दे उगाचच उकरून काढले गेलेत ( शीख दंगल, लिंचिंग आणि बेरोजगारी यांचा संबंध, इसिस इत्यादी).
राफेल मुद्द्यावरून सरकारला घेरायचा प्रयत्नही आता थंड पडेल, करण अनिल अंबाणीच्या 5000 कोटींचा दावा केलाय.
बाकी नेहेमीचे दलित वगैरे मुद्दे राहुल नेहेमीच उगाळत असतो.

भारतातील विरोधी पक्षांची मुख्य समस्या ही आहे की जेव्हा जेव्हा ते बोलतात, तेव्हा एकदातरी ते भाजप किंवा मोदींच नाव घेतातच ! भाजपला फक्त त्या त्या विरोधी नेत्यांची नकारात्मक भूमिका लोकांसमोर मांडायचीय, मग आपोआप मोदी सकारात्मक ठरतात. आणि मग रोज नवीन वक्तव्यांमधून ते अधोरेखित होत जातं. मुळात राजकारणी व्यक्ती त्या पेशामुळेच जगभर बदनाम आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा सगळेच राजकारणी मिळून फक्त एका राजकारण्याला शिव्या घालतात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा "अपवाद" म्हणून तयार होते. दुर्दैवाने कुठलाही मोदी विरोधी नेता, सत्तेत आल्यावर स्वतः काय करणार किंवा सत्तेत असताना काय चांगली कामे केली याबद्धल बोलत नाही. त्यांचा फक्त मोदी काय चुकीचं करतात नि मोदीं कशी देशाची वाट लावणार आहेत याचाच धोशा सदैव सुरू असतो. याउलट मोदींची वाक्ये पहिली तर त्यातील 25 टक्केच नकारात्मक किंवा टीकात्मक असतात, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांची सकारात्मक बाजूच ठळक होते.
भारतातील विरोधी पक्ष एका सापळ्यात अडकलेत, नि त्यांना स्वतःलाच त्यातून बाहेर पडायचं नाही असं दिसतंय.

सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते. परंतु आतापर्यंतच्या एकंदर घडामोडींवरून त्यांचा मोदींच्या धोरणांना पाठिंबा असावा असं दिसतं.

माहितगार's picture

27 Aug 2018 - 12:57 pm | माहितगार

“There is no greater danger than underestimating your opponent.”

Overconfidence and ignorance is a deadly mistake. Don’t underestimate your opponent’s strengths and abilities,.. संदर्भ

नितिन थत्ते's picture

27 Aug 2018 - 4:44 pm | नितिन थत्ते

Never underestimate the power of stupid people in large groups- J K Galbraith

हे ऐकलं आहे का? भक्तांकडे पाहिलं की याची खात्री पटते.

माहितगार's picture

27 Aug 2018 - 4:54 pm | माहितगार

भक्त नसलेल्या -भक्त मी पण नाही मी व्यक्ती पुजक नाही ती मोदींचीही करत नाही आणि रागाचीही करत नाही- तथाकथित पुरोगामींचा लोकशाही आणि संविधान वरचा विश्वास का काय म्हणतात तो हाच का ? सर्वात महत्वाचे राहुल गांधींच्या बद्दल धागा असूनही विषय सोडून सारखे भाजपावर घसरायला का होत असेल ?

SHASHANKPARAB's picture

27 Aug 2018 - 6:53 pm | SHASHANKPARAB

that too on the topmost position, is deadly to that group. congress is experiencing it currently.

शाम भागवत's picture

27 Aug 2018 - 3:35 pm | शाम भागवत

सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच स्वच्छ प्रतिमा असलेली पण तटस्थ व्यक्ती आहे , जी मोदींना फक्त स्वतःच्या राज्यात समर्थपणे टक्कर देऊ शकते.

भाजपाने पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमधे ओडिशामधे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते आहे. कॉग्रेस तिसर्‍या स्थानावर गेली आहे. भाजपाचा जनाधार पूर्वीपेक्षा खूप वाढलेला दिसून येतो आहे. याउलट बीजेडीमधेही दुफळी पडलेली आहे. त्यामुळे २०१४ एवढी चांगली स्थिती आजच्या बीजेडीची आहे असे वाटत नाही.

वाजपेयींच्या काळातील भाजप बीजेडी युतीमधे भाजपावाल्यांनी पटनाईंकांना खूप त्रास दिला होता. त्यामुळे आघाडी मोडीत निघाली होती. पण आताचे तिथले भाजपवाले मोदी व शहांच्या शब्दाबाहेर नसल्यामुळे, या दोन नेत्यांशी जुळवून घेऊन स्थानीक नेत्यांवर कुरघोडी करून, पटनाईक ओडीसा आरामात ताब्यात ठेऊ शकतात. एकंदरीत पाहता पटनाईक मोदींना विरोध न करण्याचे किंबहुना सहकार्य करत असल्याचेच दिसून येते. नितीशकुमारांनीही मोदींच्या हळूहळू जवळ जात, मगच भाजपशी युती करावयाची चाल खेळली होती याची आठवण होते आहे. त्यामुळे लोकसभेसाठी भाजप व बीजेडी मधे युती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

नितिन थत्ते's picture

27 Aug 2018 - 4:49 pm | नितिन थत्ते

मिसळपाववर प्रॉपर निवडणुकीच्या प्रचाराचे लेख "माहिती" या नावाखाली 'माहितगार' लोक पाडू लागलेले दिसतात.

मिपावर मिपा धोरणानुसार उपलब्ध 'राजकारण' वर्गीकरणातील लेख आहे, प्रतिसादकाच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण काय आहे? मिपा या संस्थळावरून भारताच्या राजकारणची दिशा निश्चीत होत असल्याच्या भ्रमात प्रस्तुत धागा लेखक नाही -मी राजकारणात अद्यापतरी कधी गेलो नाही आणि कोणत्याही एका पक्षाची भलावण केलेली नाही- पण व्यक्तिगत टिकेवर उतरणार्‍या प्रतिसादकास असा काही भ्रम होतो आहे का की व्यक्तिगत टिकेवर उतरावे लागत आहे? चंद्र दाखवला तर चंद्र दाखवणार्‍याचे बोट कसे वाकडेवर आपण उतरतो आहोत ? धागा लेखात राहुल गांधींच्या किमान एका पैलुची सकारात्मक दखल घेतली आहे दुसर्‍या बाजूला टिकाही केली आहे.

राहुल गांधींचे प्रचार मुलाखती ंचे युट्यूब दुवे दिले आहेत. निसटत्या बाजू मांडण्याच्या माझ्या क्षमतेच्या १ टक्का सुद्धा टिका अद्याप केलेली नाही तरीही आपण एवढे परेशान आहात ? इतरांवर अमुक्चे भक्त म्हणून विशेषण बहाल करणार्‍यंनी आपणही कुणाचेतरी 'भक्त' झालो आहोत का हे तपासून पहावे.

नितिन थत्ते's picture

27 Aug 2018 - 7:26 pm | नितिन थत्ते

एक जुना व्यनि संवाद

Between you, संपादक मंडळ and पैसा
नितिन थत्ते's picture
You 12/2/13

मिटवा

आज सचीन यांचा एक लेख "भारताचे आशास्थान राहुल गांधी" प्रकाशित झाला होता. तो आता दिसत नाही. तो उडवण्यात आला आहे का?

धन्यवाद.

नितिन थत्ते
संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ 12/2/13

मिटवा Block

नमस्कार. प्रचारकी स्वरूपाचे असल्याने सचीन यांचे २ लेख काल आणि आज मिसळपावच्या धोरणानुसार अप्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही. त्यांच्याच अन्य एका लेखावरही कोणतीच सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे तोही वाचनमात्र करण्यात आला. राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या लेखांसाठी कोणत्याही पक्षाने मिपासारखी संस्थळे व्यासपीठ म्हणून वापरू नयेत असे वाटते. धन्यवाद!
पैसा's picture
पैसा 12/2/13

मिटवा Block

तो सं मं चा निर्णय आहे.

१.१) मी व्यक्तीशः सेंसॉरशीपचा समर्थक नाही. मिपाचे धोरण जे असेल त्या नुसार मिपाचे काय निर्णय होत असतील.

१.२) "भारताचे आशास्थान राहुल गांधी" ह्या धागा लेखा बद्दल मला कोणतीही कल्पना नाही पण प्रथम दर्शनीतरी शीर्षकात प्रचारकता दिसते आहे. आपण माझ्या या धागा लेख चर्चेस आपण कोण्त्या अंगाने प्रचारकी म्हणून पहाता ते कळत नाही. मी राहूल गांधींबद्दल एकच बाजू मांडलेली नाही. माझे राजकीय नेपोटीझमच्या घराणेशाहीच्या संंबंधाने पुर्वग्रह आहेत पण ते जगातल्या सर्व राजकीय घराणेशाहीला जवळपास विना अपवाद लागू होतात. आणि एवढे असूनही लेखाच्या अगदी दुसर्‍या परिच्छेदात मी राजीव आणि राहुल पितापुत्राचे एका मुद्द्यावर कौतुकही केले आहे. शिवाय आता नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदांची दखल घेतली. पण केवळ कौतुकही नाही केले मर्यादांची सुद्धा चर्चा केली. तुम्हाला कोणत्या अंगाने कोणत्या तर्काने हा धागा लेख प्रचारकी वाटतो ते स्पष्ट करावे ?

१.३) आपण वगळले गेलेल्या लेखात संपादक मंडळ म्हणते "त्यात कोणतीही चर्चा अपेक्षित दिसली नाही" आणि या धागा लेखात केवळ एका बाजूचा प्रचार नव्हे साधक बाधक दोन्हीही चर्चा अपेक्षीत आहेत . आपल्या सारखे अनुभवी सदस्य अशी तुलना कशी करु शकतत हे उमगले नाही.

१.४) चर्चेची लेव्हल चांगली राहील, मिपाकर एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळतील हे धागा लेखक म्हणून चर्चेवर मी स्वतः लक्ष्य ठेवत असतो. धागा लेख छापून नंतर दिसलोच नाही असे माझ्या धागा लेखांबाबत सहसा दिसले नसावे. उदाहरणार्थ याच धागा लेख चर्चेत या प्रतिसादात आपण आणि सदस्य डँबीस यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्या सदस्यांना त्या पैकी एकाची बाजू न घेता लिहिण्याचा प्रयास केला आहे.

१.४) त्या धाग्यावर सेंसॉरशीप झाली म्हणून या धाग्यावरही सेंसॉरहीप झालीच पाहीजे ही आपली अपेक्षा आणि त्या पुर्वग्रहातून ह्या धागा लेखकास व्यक्तिगत टिकाकरणारे ट्रोलींग आपल्या सारख्या अनुभवी सदस्याकडून व्हावे हे अनाकलनीय आहे.

डँबिस००७'s picture

27 Aug 2018 - 7:49 pm | डँबिस००७

शरद पवार यांनी सांगितला पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा फॉर्म्युला
आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनितीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जाता जाता देशाच पंतप्रधान पद उपभोगायला मिळेल अशी वेडी आशा पवार साहेबांना आहे अस वाटतय !!

या चर्चेकडे मागे वळून पहाताना एक वेगळाच प्रश्न मनात आला .

'लोक घराणेशाहीशी एवढे भावनिक दृष्ट्या बांधील कसे होऊ शकत असतील?'

हा माझा प्रश्न सर्वच पक्षातील घराणेशाही समर्थकांसाठी आहे तसा गांधी-वड्रा घराणे स्मर्थकांसाठीसुद्धा आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2019 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

बुवाबाजी, घराणेशाही, गुलामी या अश्या सवई आहेत की त्या अंगी भिनल्या की निघता निघत नाहीत... हा झाला मानसिक प्रभाव; त्यांच्यापासून जर काही वैयक्तिक आर्थिक-सामाजिक-राजकिय फायदे मिळत असतील तर मग त्या सवई सोडणे आतबट्ट्याचे असते, हेवेसांन.