अपघात

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
21 Apr 2014 - 11:31 pm

मुंबई पुणे एक्प्रेस हायवे वर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच रस्त्यावर एके दिवशी माझ्या आतेभावाचा देखील अपघात झाला आणि त्यातच तो गेला . मागच्या डिसेंबर महिन्यात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा याच रस्त्यावर अपघात झाला ज्यात हे दोनही गुणी कलावंत प्राणास मुकले . त्यानंतर बरोबर एका महिन्याने अगदी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात माझा भाऊ यज्ञेश्वर फाटक हाही गेला . अत्यंत दुर्दैवी अशी हि घटना झाली .
आम्ही त्याला बंडू दादा म्हणायचो . तो LIC मध्ये कामाला होता . त्याची बदली वाशी ला झाल्याने शुक्रवारी तो वाशीहून पुण्याला यायचा आणि सोमवारी परत वाशीला जायचा . जाताना हायवे वर उभा राहायचा आणि मुंबई पुणे करणाऱ्या गाड्यांपैकी एक गाडी त्याची रोजची ठरली होती तिने तो वाशीला जायचा . वहिनी पण LIC मधेच होती . तिची बदली नगर ला झाली होती . दोन्ही मुली पुण्यालाच होत्या . आजी त्यांच्याकडे बघायची.मोठी पूजा T Y B Com ला होती आणि धाकटी अनुजा १० विला. त्या वेळी हि तो असाच सोमवारी त्याच्या ठरलेल्या गाडीने जायला निघाला आणि गाडीला अपघात झाला . समोरून येणार्या गाडीचा ताबा सुटून ती यांच्या गाडीवर आदळली . आणि गाडीतली सर्वजण जागच्याजागी गेले .
खरी परीक्षा तर पुढेच होती . सगळ्यांचे मृतदेह जवळच्या इस्पितळात आणले गेले . दादाचा मोबाईल मात्र बाहेर पडल्याने शाबूत होता . त्यात शेवटचा लावलेला मोठ्या मुलीचा पूजाचा नंबर होता . पोलिसांनी तिला फोन केला . ती lecture ला असल्याने तिने आधी फोन उचल नाही . नंतर बघितालन तर ४/५ मिसकॉल होते . तिने फोन लावल्यावर पोलिसांनी फोन उचालाल आणि अपघात झाल्याची माहिती दिली . वहिनी देखील नगर ला गेली होती त्यामुळे घरी येउन तिने शेजारच्या काकाना सांगून घरून त्याच्या गाडीने इस्पितळात निघाली . जाताना बाबान किती लागले असेल याचा अंदाज नाही म्हणून तिने बाबांचे कपडे , थोडासा जेवणाचा डबा , एक पांघरून अशी सगळी तयारी करून ती निघाली . मात्र तिथे पोचल्यावर तिला धक्काच बसला . बाबांचा मृतदेह समोर बघून थोडा वेळ ती सुन्नच झाली . अपघातात मृतदेहाची फार वाट लागली होती . तशा अवस्थेत आपल्या बाबांना बघून तिला काय करावे कळेनाच पण मग सावरली . दादाच्या मृतदेहाची ओळख पटवणे , तो तब्येत घेणे हे सगळे सोपस्कार तिनेच पार पाडले . मग मोठ्या दादाला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली . मोठ्या दादाने सगळ्यांना फोन करून तो स्वतः तिच्या बरोबर इस्पितळात गेला . मग रुग्णवाहिका बोलावून घरी आली .आणि मग पुढचे सोपस्कार पार पडले .
आम्हाला सर्वांनाच तिचे खूप कौतुक वाटले . अशा परिस्थितीत तिने फार खंबीरपणे पावलं उचललन . आम्ही नंतर तिला विचारलं कि कस काय केलास हे ?तिने दिलेलं उत्तर खूप छान होत . म्हणाली , " बाबांच्या जागी जर मला असा अपघात झाला असता आणि बाबांवर अशी वेळ आली असती तर ते मला अस इथे टाकून गेले असते का ?त्यांनीही हे सगळ केलच असत ना ?" आम्हाला खरच कौतुक वाटल . दोन्ही मुली अचानक पने मोठ्या झाल्या . समंजस झाल्या . आपण रडत बसण्यापेक्षा आईला आधार देन महत्वाच हे त्यांना न सांगताच कळल . आता तिघीही सावरल्या आहेत . शिवाय सगळ कुटुंब आहेच त्यांच्या पाठीशी . दादाने छोट्या मुलीच्या १० वीच्या परीक्षेसाठी महिनाभराची रजा टाकली होती . ज्या दिवशी तो गेला त्याच दिवशी दुपारी त्याची रजा मंजूर झाल्याचा फोन आला आणि तो ऑफिस ला का नाही याला चौकशी झाली . झाला प्रकार त्यांना कळल्यावर त्यानाही धक्का बसला आणि वाईटही वाटल . जर सकाळी सकाळी त्याला फोन केला असता तर झाला प्रकार कदाचित टळला असता अस वाटून गेल .

समाजअनुभव

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

22 Apr 2014 - 1:25 am | खटपट्या

सुन्न !!!

योगी९००'s picture

22 Apr 2014 - 10:29 am | योगी९००

मी सुद्धा सुन्न..!!

आपण रडत बसण्यापेक्षा आईला आधार देन महत्वाच हे त्यांना न सांगताच कळल . आता तिघीही सावरल्या आहेत . हे वाचून थोडे का होईना बरे वाटले.

डिसेंबर २०१३ ला सावंतवाडी जवळ माझे दोन चुलत भाऊ (जे एकमेकांचे सख्खे भाऊ होते) असेच अपघातात गेले. गोव्याजवळ त्यांच्या दुचाकीला चुकीच्या बाजूने येणारा दुचाकीस्वार धडकला. दुसरा दुचाकीस्वाराने काही विचार न करता ट्रकला ओवरटेक करायच्या नादात त्याची गाडी रस्त्यामध्ये आणली आणि त्याचवेळी माझ्या भावांची आणि त्यांची जोरदार टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की माझे दोन भाऊ आणि दुसर्‍या दुचाकीवरचे दोघेही जागीच गेले (त्यातील दोन्ही दुचाकी चालवणार्‍यांनी हेल्मेट घातले असून सुद्धा) . माझ्या भावांचा दोष एवढाच की जरी ते त्यांच्या लेन मध्ये होते, तरी त्यांचा वेग जास्त होता (८० kmph असावा). दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने या अपघातात कोणीच वाचू शकले नाही. त्यातील मोठ्या भावाचा लग्नाचा पहिला वाढदिवस दुसर्‍या दिवशी होता. आज मला काका काकूंकडे पहावत नाही. अजून आम्ही सावरलो असे म्हणता येत नाही.

त्या दिवशी सकाळी निघताना गडबडीत त्यांनी पाणी प्यायचे नाकारले. जर ते दोन-तीन सेकंद जरी थांबले असते तर ती वेळ टळली असती असे वाटते...

प्रभाकर पेठकर's picture

22 Apr 2014 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर

Speed thrills but speed kills. असे म्हणतात.
जे चालक, मग ते चारचाकीचे असोत की दुचाकीचे, रस्त्याचे धोक्याचे फलक न वाचता किंवा वाचून दुर्लक्ष करून वाहन चालवितात ते स्वतःच्या आणि आपल्याबरोबर इतर निष्पाप जीवांच्या अंतास कारणीभूत ठरतात.
मी जेंव्हा प्रथम मोटरसायकल घेतली तेंव्हा माझ्या तत्कालीन साहेबांनी मला सल्ला दिला होता.
'वाहनाचं इंजिन ही एक ताकद आहे. आपल्या शारीरिक ताकदीच्या कितीतरी पट जास्त अशी ही ताकद आहे. तिच्यावर कायम तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. ज्या क्षणाला ती राक्षसी ताकद तुमच्यावर नियंत्रण मिळविते तेंव्हा ती तुम्हाला संपवू शकते. दयामाया न दाखवता. तेंव्हा सांभाळून चालव.' आजतागायत तो सल्ला मी पाळत आलो आहे.
दुसरं असं की स्वतः चुक न करता वाहन चालविणे म्हणजे उत्तम चालक नाही तर इतरांच्या होऊ शकणार्‍या चुका लक्षात घेऊन अपघात टाळणं हेही उत्तम चालकासाठी अत्यंत आवश्यक असतं.

क्षणैक मोहाला चालक बळी पडतो, आणि खरोखर बळी पडतो.

'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे चेष्टेवारी नेण्याचे वाक्य नाही.

योगी९००'s picture

22 Apr 2014 - 6:16 pm | योगी९००

तुमचा प्रतिसाद वाचून Near Death experience हा धागा आठवला...!!

पैसा's picture

22 Apr 2014 - 8:24 pm | पैसा

किती भयंकर! पण अशा वेळी कुठून तरी मनाला सगळं सहन करायची ताकद येते. वय लहान असताना सावरणं जरा सोपं जातं, पण उतारवयात मुलांचा मृत्यू बघावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. :(

कमाल उत्तर दिले आहे त्या मुलीने. किती प्रसंगावधान, किती धैर्य!!

प्रसंग वाचूनच अंगावर काटा आला. :(

आतिवास's picture

22 Apr 2014 - 10:00 pm | आतिवास

:-(